खेळ

Submitted by विशाल कुलकर्णी on 30 December, 2008 - 05:32

च्यामारी काय चाललेय काही कळतच नाही. कुणीपण उठतोय आणि मुंबई पोलीसांना आव्हान देतोय. आणि वर लहान पोरांसारखी कोडी घालतोय.

वर म्हणे " थोडं डोकं चालवा, कधीतरी मेंदुला ताण द्या ! ", इन्स्पेक्टर निंबाळकर भलतेच वैतागले होते.

या नव्या केसने त्यांना हैराण करुन सोडले होते. महात्मा गांधी मार्गावर असलेली जेफ़रसन बँक कुणा डोकेबाज गुन्हेगाराने भर दिवसा लुटली होती. विशेष म्हणजे व्हॉल्टमधल्या रोकड रकमेला त्याने हातही लावलेला नव्हता. फ़क्त १७० कोटी रुपयांचे हिरे तेवढे व्यवस्थितपणे लंपास केले होते. आणि इतक्या सराइतपणे, कुठलाही पुरावा मागे न सोडता हा दरोडा टाकण्यात आला होता की जगभरात नावाजलेले, स्कॊटलंड यार्डच्या खालोखाल नाव घेतले जाणारे मुंबई पोलीस खाते आज दरोड्याला आठ दिवस झाले तरी दरोडा पडलाय यापलिकडे केसवर काहीही प्रगती करु शकले नव्हते.
बहुतेक केस सी.बी.आय. कडे सोपवली जाण्याची लक्षणे दिसत होती...त्यामुळे तर निंबाळकर साहेब जास्तच चिडले होते.

थोड्या वेळापुर्वीच कमिशनर महंतांनी बोलावुन चांगलंच झापलं होतं त्यांना.

"प्रतापराव, काहीतरी करा, नाहीतर तुम्हाला गडचिरोली, यवतमाळ असे कुठेतरी आणि मला पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत यापुढची काही वर्षे काढावी लागतील...!"

"कोण असेल तो आणि कसा घातला असेल हा दरोडा ? महत्वाचे म्हणजे आजुबाजुच्या व्हॊल्ट्समध्ये करोडो रुपयांची रोकड रक्कम पडुन होती, तिला त्याने हात का नाही लावला?" इन्स्पे. निंबाळकरांनी दोन खारका स्वत:च्याच डोक्यात मारल्या. ही त्यांची नेहेमीचीच सवय होती. आनंद असो वा चिंता अतिरेक झाला की खारका मारणे सुरु व्हायचे.

जेफ़रसन बॆंक, शहरातला सर्वात सुरक्षीत असा हा व्हॉल्ट होता. व्हॉल्टची रचनाच थोडी विचित्र होती. आत शिरले की समोर दोन तीन केबिन्स आणि त्याच्या शेजारी एक लिफ़्ट, जी कायम लॉक असते. तीची चावी मॅनेजर रस्तोगीकडे असते. जेफ़रसन बॆंक ही नावालाच बॆंक होती. खरेतर तो एक सुरक्षित व्हॉल्टच होता. शहरातल्या धनदांडग्यांना त्यांची (सर्व मार्गाने कमावलेली) संपदा, मग त्यात जडजवाहीर , रोकड सगळेच आले, ठेवण्यासाठी सुरक्षित आणि विश्वासाची एकच जागा होती..."जेफ़र्सन व्हॉल्ट". ठराविक रक्कम भरुन इथे तुम्हाला एखादा किंवा अनेकही लॉकर भाड्याने घेता येतो. एक चावी तुमच्याकडे असते. ही चावी देखील नेहेमीप्रमाणे लोखंडी चावी नसुन , प्रत्येक लॉकरधारकाला एक इलेक्ट्रॊनीक गॅजेट दिले जाते. आजकाल वापरली जाणारी वास्को टोकन्स असतात ना तसे. लॉकरधारक आला की थेट मॆनेजर रस्तोगीच्या केबीनमध्ये जातो. तो आत गेला की रस्तोगी आधी त्याची वैधता तपासुन घेतात आणि खात्री पटली की के मग ग्राहकाला घेवुन लिफ़्ट मध्ये शिरतात. गंमत म्हणजे लिफ़्ट वर जातेय की खाली हेच मुळी कळत नाही. वर जातेय म्हणावे तर तर व्हॉल्टची इमारत एकमजलीच आहे. खाली जातेय म्हणावे तर लिफ़्टमध्ये तो फ़िल अजिबात येत नाही. पण लिफ़्ट थांबली आणि उघडुन बाहेर आले की आपण व्हॉल्टच्या मुख्य तिजोरीसमोर असतो. रस्तोगी त्यांच्याकडचा कोड वापरुन तिजोरी उघडतात, तुम्ही आत गेलात की तिजोरीचे दार पुन्हा लॉक केले जाते.

आत गेल्यानंतर आपल्या जवळच्या टोकनवरुन तात्पुरता अव्हेलेबल झालेला कोड नंबर ग्राहकाला त्याच्या लॉकरवर असलेल्या इलेक्ट्रॊनिक पॅनेलला फ़िड करावा लागतो. त्यानंतर तो पॆनेल त्याच्या जवळ असलेल्या इलेक्ट्रॊनिक सुविधेच्या साहाय्याने पुढचा कोड पुरवतो आणि लॉकर उघडला जातो. इथे सुद्धा तुम्हाला फ़क्त पाच मिनीटे मिळतात. पाच मिनीटच्या वर जर काळ तुम्हाला लागला तर लॉकर आपोआप बंद होतो आणि बाहेर रस्तोगीच्या केबीन मध्ये अलार्म वाजतो, लॉकर पुन्हा उघडायचा झाल्यास या वेळी मात्र त्यासाठे रस्तोगींना त्यांच्या केबीन मध्ये असलेली यंत्रणा वापरावी लागते. त्याही पुढे जावुन एक लॉकर दिवसातुन फ़क्त दोन वेळाच एकुण दहाच मिनीटाकरीता उघडता येतो. आठवड्यातील शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता बँक बंद झाली की थेट सोमवारीच उघडते..मग मध्ये कितीही आणिबाणी आली तरी सोमवारची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि अशा या अभेद्य व्हॉल्टमधुन या शर्विलकाने समोर करोडोची दौलत पडलेली असताना फ़क्त १७० कोटीचे हिरेच लंपास करुन व्हॉल्ट्चे मालक आणि पोलीस दोघांनाही चांगलीच चपराक दिली होती.

सोमवारी सकाळी नौपाड्यातले प्रसिद्ध सुवर्णकार श्री. चिंतामणी पेठे नेहेमीप्रमाणे बँकेत आले. पेठ्यांचा हा नित्यक्रम होता. दर सोमवारी ते व्हॉल्टमध्ये येत आणि आपल्या लॉकरमधुन काही हिरे काढुन ते आपल्या पेढीवर घेवुन जात. त्यांच्याबरोबर त्यांचे स्वत:चे दोन हत्यारी अंगरक्षक असत. जाताना जेफ़रसनचे दोन गार्ड त्याना दुकानापर्यंत संरक्षण देत. आज नेहेमीप्रमाणे रस्तोगींना अभिवादन करुन पेठे आपल्या लॊकरकडे वळले, त्यांनी लॉकर उघडला आणि .......

लॉकर पुर्णपणे रिकामा होता. फ़क्त त्याच्या जागी एक कागद होता. कागदावर चार ओळीत , प्रत्येक ओळीत पाच या प्रमाणे काही आकडे लिहीले होते. बस्स.........!

त्यानंतर पेठ्यांना जाग आली ती हॊस्पीटलमध्येच.त्यांच्या घट्ट मिटलेल्या मुठीत तो कागद तसाच होता.....

३० , ४, २१ , ०० , ८५
३२ , ०७ , ८ , १९ , ३३
२४, ०९ , ६८ , ११ , ०४४
२१ , ५६ , ८३ , ०० , १२

पेठ्यांना जाग आली आणि समोर इन्स्पेक्टर प्रतापराव निंबाळकर उभे होते. पेठ्यांनी काही न बोलता तो कागद त्यांच्या हातात देला..

"साहेब, याने पुरता नागवला हो मला, मी संपलो, पुरता बरबाद झालो, १७० कोटीचे हिरे होते लॊकर्मध्ये! आता काहीही नाही. त्याला शोधा साहेब, नाहीतर मला आत्महत्याच करावी लागेल."

इन्स्पेक्टर प्रतापराव निंबाळकर बराचवेळ त्या कागदाकडे पाहात उभे होते. थोड्या वेळापुर्वीच कमिशनर साहेबांकडुन ऐकलेली वरदवाणी आणि वेडावुन दाखवणारे या कागदावरचे आकडे......

"च्यायला, काय प्रकार आहे हा?
पण मी तुझ्यापर्यंत पोहोचेन मित्रा! तु कोणीही अस, कोठेही अस तुला गजाआड टाकल्याशिवाय मला चैन पडणार नाही !"

प्रतापरावांना एकदम आपल्या बायकोची आठवण झाली. दिडच महिन्यापुर्वी सातार्‍यातल्या त्यांच्या टोलेजंग वाड्यात सुन म्हणुन आलेली नाजुक सावित्री त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहीली. सरदार घाटपांड्यांची एकुलती एक कन्या आणि आता सरदार निंबाळकरांची लाडकी सुन. सरदारसाहेबांना वाटले होते की देशभक्तीच्या प्रखर भावनेने सगळे ऐश्वर्य बाजुला ठेवुन पोलीसात भरती झालेला आपला एकुलता एक लेक आता लग्न झाल्यानंतर तरी थोडा माणसात येइल......!

राज्यशास्त्र हा विषय घेवुन पदवीधर झालेले प्रतापराव थेट पोलीसदलात भरती झाले. आणि गुन्हेगार, त्याही पेक्षा गुन्हेगारीला आपला कट्टर शत्रु मानुन अपराधक्षेत्रावर तुटुन पडले. त्यापासुन त्यांना थोडे माणसात आणण्यासाठी म्हणुन सरदार निंबाळकरांनी त्यांचे लग्न करुन दिले जेणे करुन आतातरी मुलगा थोडे घरात, घरच्या व्यवसायात लक्ष घालेल.

पण नियतीला ते मान्य नव्हते बहुदा. लग्नानंतर आठवड्याभरातच ड्युटीवर हजर झालेल्या प्रतापरावांसमोर ही केस एक नवे आव्हान घेवुन उभी होती. आणि आजपर्यंत गुन्हेगार आणि गुन्हेगारीचा कर्दनकाळ ठरलेल्या इन्स्पे. प्रतापराव निंबाळकरांनी हे आव्हान स्विकारले होते.

ट्रिंग ट्रिंग....ट्रिंग ट्रिंग....

टेलीफोनची घंटी वाजली आणि प्रतापराव पुन्हा वर्तमानात आले.

"नमस्कार, सदर बज़ार पोलीस चौकी, इन्स्पे. प्रतापराव निंबालकर बोलतोय....!"

"नमस्कार प्रतापराव साहेब, अजुन बोलताच आहात का तुम्ही...चोर सापडला की नाही. अहो एवढा मोठा क्लु दिलाय त्याने तुम्हाला आतापर्यंत थोडीतरी प्रगती व्हायला हवी होती."

"हे बघा, तुम्ही कोण बोलताय, आणि तुम्हाला काय माहित चोराने काय क्लु ठेवलाय ते..," निंबाळकर साहेब सावध झाले. कारण तिजोरीत सापडलेल्या कागदाबद्दल आत्तापर्यंत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

"मीच ठेवलेल्या गोष्टीची मला माहिती असणार नाही का साहेब...? चला तुम्हाला पुढचा क्लु देतो, बघु तुमच्या डोक्यात काही प्रकाश पडतो का ?

नीट ऐका....

"अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर वर अतिरेक्यांनी हल्ला केला, मागचे पुढचे शेजारीही त्यातच अडकले. पण त्यांनी हार मानली नाही. ते सगळे एकत्र आले आणि अतिरेक्यांना शोधण्याचा पहिला दुवा सापडला..."

कसं वाटलं हे नवं गणित...शोधा म्हणजे सापडेल. आणि हो फोन ट्रेस करायचा मुर्ख प्रयत्न करु नका...मी हे सिम कार्ड फ़ेकुन देतोय. असंही बनावट नावानेच घेतलंय. उद्या पुन्हा फोन करीन. मला खात्री आहे तो पर्यंत तुम्ही पहीली पायरी सर केलेली असेल. शुभ संध्या, उद्या बोलुच...."

"हे बघ, तु जो कुणी .......................!, " प्रतापराव फोनवरच ओरडले. उगाचच त्यांना आपलाच आवाज चिरकल्यासारखा वाटला. पण....

फोन कट झाला होता...........!

तुम्हाला काही येतंय लक्षात ?

क्रमश:

गुलमोहर: 

हं... interesting..!!
एकदम सुहास शिरवळकरांची आठवण झाली. Happy
पुढचा भाग कधी?
लवकर येवू देत. आम्हाला खारका मारायची वेळ आणू नका.. Happy
---------------------------------------------------------
सगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

डोकेबाज Happy
काय विशाल, सध्या काय काम नाय वाटतं तुला... Happy

दोन्ही कथा छान लिहिल्यात.. Happy

फक्त.. "पण मी तुझ्यापर्यंत पोहोचेन मित्रा! तु कोणीही अस, कोठेही अस तुला गजाआड टाकल्याशिवाय बायकोला स्पर्ष करणार नाही." हे वाक्य भयंकर funny वाटलं.. Proud

एकतर पोलिसाने चोराला (मनात का होईना पण) "मित्रा" म्हणण..
आणि "बायकोला स्पर्ष करणार नाही">>>> काय संबंध...?????? त्या पोलिसाचा work life balance अगदीच गंडलाय म्हणायचा.. Proud

अँडम,

कथा एकच आहे. कदाचित माझी चुक असु शकेल. पण आयुष्यात तुम्हाला काय महत्वाचे वाटते हे देखिल तितकेच आवष्यक आहे. निंबाळकरांच्या तोंडी हे वाक्य आलंय कारण त्यांच्या लग्नाला फक्त एक - दिड महिनाच झालाय. तरीसुद्धा बायकोपेक्षा सद्ध्या ही केस त्यांना महत्वाची वाटतेय ही त्यामागची भावना आहे. प्रेझेंटेशन मध्ये कदाचीत कमी असु शकेल.

एकतर पोलिसाने चोराला (मनात का होईना पण) "मित्रा" म्हणण..>> मी आधीच स्पष्ट केलंय, की या पोलीसाचा गुन्हेगारापेक्षा गुन्हेगारीवर, अपराध्यापेक्षा अपराध करण्याच्या वृत्तीवर राग आहे. एखाद्याच्या बुद्धीमत्तेचा गौरव करताना तो निरपेक्षच असायला हवा. गुन्हेगारांना मनातल्या मनात नव्हे तर प्रत्यक्षात सुद्धा मित्र म्हणणारे कित्येक पोलीस अधिकारी वास्तवातदेखील आहेत. ते तुमच्या वृत्तीचे द्योतक आहे. हवं तर असं म्हणु की ती एका बुद्धिमान व्यक्तीने दुसर्‍या बुद्धिमान व्यक्तीला मनापासुन दिलेली दाद आहे.

असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

विशाल,
पोलिसाने चोराला मित्र म्हणणं.... ठिक, त्यामागचं लॉजिक मलाही पटलं तु सांगितलंस ते...
पण बायकोला स्पर्श करणार नाही हे थोडं अतीच वाटलं...

नाव प्रतापराव, जेफर्सन बँकेचा वॉल्ट, एलेक्ट्रोनिक कोड!! हम्म्म!! सुहस शिरवळकर आणि दा विंची कोड चा संगम तर नाही ना ही कथा!! लवकर पुढचे येउ द्यात!! वाचतेय आणि वाट पहतेय.

>>>>>पण बायकोला स्पर्श करणार नाही हे थोडं अतीच वाटलं...

विशाल.. बायकोला स्पर्श न करण्याची आयडीया कॅन्सल कर बघू. Proud
दुसर्‍या भागात कथेतली मजा थोडी कमी झाली असं वाटलं.
पुढचा भाग लवकर येऊ देत. Happy

---------------------------------------------------------
सगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

एक्क्क्क्क्क्क्क्क्क्दम छान !! मला सस्पेंस फार आवडते.

फक्त एक गोष्ट ------ शरविल म्हणजे चोर
पण तुम्ही लिहीलेला - शर्विल म्हणजे शंकराचे एक नाव. (शर्व = शंकर त्यावरून शर्विल हे नाव पडले)

मला हे पक्के माहिती आहे कारण माझ्या मुलाचे नाव 'शर्विल' आहे. नाव ठेवताना बरिच माहिती काढली होती.

मान्य बदल केला आहे.

स्नेहा,

हा शब्द "शर्विलक" असाच आहे, शरविल नाही. हा शब्द आपल्या मराठी साहित्यातुन पुर्वापार वापरात आहे. जर मी चुकत नसेन तर शर्विलक हा मुळ संस्कृत शब्द आहे. मला आठवतय शशी कपूरच्या "उत्सव" मध्ये पण एका चोराचे पात्र होते..त्याला त्यात शर्विलकच म्हटले आहे.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

मुलाचे नाव ठेवताना बरिच पुस्तके चाळली होती ( नावांची, संस्कॄत, श्लोकांची वगैरे) तेव्हा त्यातून ही माहिती मिळाली होती. (शरविल म्हणजे चोर)

http://www.all-babynames.com/meaning-of-name-Sharvil.html

असो .चु. भू. द्या. घ्या.

*एकूण काय नावं ठेवताना बरीच माहिती गोळा करायला लागते* Proud
---------------------------------------------------------
सगळे कागद सारखेच.. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते.

ए विशाल,
जास्ती चर्चा नको, कथेचा पुढचा (3रा) भाग लवकर टाक बघू..

विशाल छान रंगतीए कथा.. दा विन्ची कोड आठवले एकदम.. पुढचे भाग वाचत आहे..

अवांतर : स्नेहा, शर्विल हे कृष्णाचे नाव आहे. माझ्या भावाच्या मुलाचे (अभ्यास करून ठेवलेले) नाव आहे.. Happy
शरविल असा शब्द नसेल बहुधा, आणि विशाल म्हणतो तसे शर्विलक म्हणजे चोर.