Submitted by रॉबीनहूड on 11 July, 2014 - 12:56
ईइंग्रजीतील शब्दसंग्रह वाढविण्यासाठी काय तंत्र वापरता येईल ? विशेषतः क्रियापदे व विशेषणे अधिकाधिक कशी आत्मसात करता येतील याबाब्त स्वतः वापरलेली म्हणा , शिकवलेली म्हणा अथवा इंटरनेटवरच्या चांगल्या साईट्स च्या माध्यमातून उपलब्ध होतील अशी माहिती कृपया सांगावी....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझं टेक्निक शिक्रेट
माझं टेक्निक शिक्रेट हाय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फक्कस्त संपर्कातून सांगता येतंया.
पण एक सांगू? हा धागा तुमच्याकडून आलाय असं वाटत नाही.
संपर्कातून लवकरच मेल करतो.
Thesaurus वापरणे. वेगवेगळ्या
Thesaurus वापरणे.
वेगवेगळ्या विषयांवरची अधिकाधिक इंग्रजी पुस्तके, मासिके, चित्रपट, मालिका बघणे. लिहिताना वापरण्याची शब्दसंपंदा वाचून वाढते. बोलतानाची शब्दसंपदा ऐकून (प्रत्यक्ष माणसांशी किंवा दृकश्राव्य माध्यमातून) वाढते. अर्थात active आणि passive vocabulary असा प्रकार असतो. वरच्या पद्धती passive vocab वाढण्यासाठी आहेत. पण passive vocab वाढल्याशिवाय active च्या पोहोऱ्यात काही येऊ शकत नाही.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/47650
इथे काही मिळेल.
१. वेगवेगळ्या विषयामधील
१. वेगवेगळ्या विषयामधील वेगवेगळ्या पद्धतीच्या लिखाणाचे वाचन.
स्पोर्ट्स हाच एक विषय घेतला तरी रोजच्या बातम्या, वर्ल्ड कप , टूर द फ्रांस सारख्या इव्हेंटच्या निमित्ताने आलेले विशेष लेख, खेळाडूंची चरित्रे / आत्मचरित्रे, या विषयावरले ब्लॉग्ज हे सर्व चिकाटीने व नियमितपणे वाचावे. वाचनाच्या सोर्सच्या क्वालिटीकडे ही लक्ष हवे --मी शाळा कॉलेजात असताना टाइम्स ऑफ इंडियामधले लेखन प्रमाण भाषेतले असायचे. आता जिमिंग असे क्रियापद रुप सर्रास छापतात . याबाबतीत जाणत्यांकडून मार्गदर्शन अवश्य आहे. नाहीतर टाइम्स मधे आहे म्हणजे 'जिमिंग' बरोबर अशी समजूत झाली तर चूक नाही.
२. नावाजलेल्या वर्तमानपत्रात, मासिकात भाषेला . लेखनाच्या स्टाइल ला वाहिलेले स्तंभ असतात. ते वाचणे. न्यू यॉर्क टाइम्सचे एक लेखक होते त्यांच्या लेखांचे इन लव्ह विथ नॉर्मा लोकेंडी नावाचे एक पुस्तक पण निघाले होते. स्लेट.कॉम वर पण एक कॉलम आहे .
३. राजकारणी , समाजकारणी, संशोधक अशांची भाषणे वाचणे.
४. कोटेशन्सची पुस्तके मिळतात . बार्टलेट बहुतेक अति प्रसिद्ध. ते अधून मधून चाळत रहावे.
५. हे सर्व वाचताना चांगली डिक्शनरी, थिसॉरस हाताशी हवेत . डिक्शनरी एकापेक्षा अधिक असल्याल केंव्हाही चांगले.
६. शक्य असल्यास एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिकामधली कुठलीही रँडम एंट्री रोज एक अशी वाचावी.
७. ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, जी वीस बावीस खंडांची आहे, शक्य असल्यात त्यातल्या एंट्रीज सुद्धा रँडमली वाचाव्यात .
यातले काहीही पी हळद हो गोरी तत्वावर चालत नाही.
ही एकदम टेलीपथीच झाली
ही एकदम टेलीपथीच झाली म्हणायची.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी आता अगदी असाच धागा काढावा काय या विचारात होते.
पण मायबोलीवर चालेल की नाही म्हणून नाही काढला.
झालंय काय की मला कुणाशी इंग्रजी बोलण्याची वेळच येत नाहीये.
आणि साधं इंग्रजी विसरायला झालंय.
आता मुलांना इंग्रजी शिकवायचं म्हटलं की फॅ फॅ उडतेय.
काल अगदी 'बफेलो' चं स्पेलिंगही मुलांच्या पुस्तकात वेगळंच लिहिलेलं आढळलं.
त्यात मुलं इथल्या लोकल शाळेत अप्रशिक्षित शिक्षकांकडून शिकलेलं चुकीची वाक्यरचना असलेलं आणि विचित्र उच्चार असलेलं इंग्रजी शिकतायत.
मायबोलीवर राहून मराठी सुधारत चाललीय माझी पण इंग्रजीचा पार बट्ट्याबोळ झालाय .
इतकेच नव्हे तर अभ्यासाचे/ माझ्या विषयाचे सोडून इतर ललित इंग्रजीही वाचावेसे वाटत नाही आजकाल.
कुणी एखादी इंग्रजी साईट सुचवेल का जिथे पडून राहून प्रतिसाद देऊन इंग्रजी सुधारता येईल?
मेधा, उत्तम
मेधा, उत्तम माहिती.
धन्यवाद.
ईकाका , मला पण मेल धाडून द्या.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ईकाका मला पण मेल धाडा .
ईकाका मला पण मेल धाडा .
हूडा, जूनी पुस्तके आंतरजालावर
हूडा, जूनी पुस्तके आंतरजालावर उपलब्ध आहेत. पण त्यात जूनी भाषा असेल. क्लासिक्स म्हणतोय मी. अर्थात व्याकरणात्मकदृष्ट्या अचूक असणार.
तात्कालीन ईंग्रजीसाठी चांगली वृत्तपत्रे वा त्यातले चांगले स्तंभ वाचणे हा उपाय योग्य.
हे झाले लेखी ईंग्रजीसाठी. बोली ईंग्रजीसाठी रेडियो / टिव्ही उत्तम. बातम्या, चर्चा / परिसंवाद अभ्यासणे उपयोगी ठरू शकते.
आपल्याला ज्या क्षेत्रात ईंग्रजीची जास्त गरज भासते त्या क्षेत्रातले वाचन / दृक् श्राव्य माध्यम अभ्यासल्यास त्याच क्षेत्रातले शब्दप्रयोग वाक्प्रचार मुखोद्गत होतील.
वाचण्याबरोबरच भरपुर ऐका आणि
वाचण्याबरोबरच भरपुर ऐका आणि पहाही. (शकतो इंग्रजी चॅनेल्स आणि सबटायटल्स असलेली चॅनल्स..) सगळीकडुन काही ना काही शिकायला मिळतेच.
शुभेच्छा..
वाक्ये 'बनवू ' नका .क्रियापदे
वाक्ये 'बनवू ' नका .क्रियापदे 'वापरू' नका .कोणताही हेल काढू नका .व्याकरणापासून चार हात दूर राहा .चांगली सोपी भाषा (वाक्ये )आत्मसात करा .जशीच्या तशी .शैली सर्वात महत्वाची .