भातचेीखिचडेी

Submitted by सुभाषिणी on 10 July, 2014 - 13:33

भाताची खीचडी.
साहित्य - ज्या तांदळाचा भात मोकळा होतो.( अगदी चिकट होणारा नसावा.) अशा कोणत्याही तांदळाचा शीळा भात – एक वाटी., दाण्याचे कुट- पाव वाटी., लाल तिखट किंवा हि. मीर्च्या – चवी प्रमाणे.,साखर- (एईछीक) ओले खोबरे, धुवुन चिरलेली कोथींबीर, फोडणीसाठी साजुक तुप कींवा रिफाईंड तेल, जीरे.
क्रुती – भात हाताने मोकळा करुन घ्यावा. त्यावर दाण्याचे कुट, तीखट,मीठ, साखर घालुन सारखे करावे. कढईत तुप कींवा तेलाची जीरे घालुन फोडणी करावी. त्यात वरील मीश्रण घालुन हलवावे. झाकण ठेवुन एकच वाफ काढावी. वरुन लिंबु पीळुन खोबरे कोथींबीर घालावे.
नेहमी भात उरला की फोडणीला टाकला जातो. त्यापेक्षा जरा वेगला आणि अगदी थोड्यावेळात होणारा पदार्थ आहे. विशेषतः मुलांना पटकन काही खायला द्यायचे असेल तर सहज होण्यासारखा आहे.
स्त्रोत – माझी आत्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी तर फोडणी टाकायचे कष्टं पण घेत नाही.
शिळ्या भातात लाल तिखट(कोंकणी लाल मसाला),दाण्याचं कूट, मीठ आणि तेल मिक्स करून खाते.
मस्तं लागतं. सोबत कैरीचं लोणचं आणि कांदा, अहाहा!

नेहमीच्या फोडणीच्या भातापेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे, आणि पाककृती एकदम सोप्पी आहे. नक्कीच बनविण्यात येईल.