तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते
कुणीही दाखवा.....आम्ही तिचा सत्कार ठेवू
नदी......जी सागरापाशी मनापासून जाते
तिच्या संधीप्रमाणे वागण्याचा राग येतो
कधी येथून जाते ती कधी तेथून जाते
तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते
तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते
कुणाला दु:ख होते ऐकुनी माझी स्थिती अन्
मला माहीत आहे कोण आनंदून जाते
कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते
कशाचा अर्थ आहे काय काहीही कळेना
स्वतःशी हासते किंवा मला हासून जाते
शरीराला टिकवणे एवढे कर्तव्य आहे
सुरू होते तिथे आयुष्य हे संपून जाते
जगाला सांग...... वाचव खर्च तू मद्यालयाचा
मला रोखायला येते...... मला पाजून जाते
किती वर्षे प्रतीक्षा चालली आहे तिची ही
म्हणाली 'बेफिकिर' जी "मी उद्या येऊन जाते"
-'बेफिकीर'!
मस्त
मस्त
मस्त गझल... अगदी सहज
मस्त गझल...
अगदी सहज
तुझे आच्छादलेले जग मला सांगून
तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते
.
तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते
बढिया शेर
तुझे आच्छादलेले जग मला सांगून
तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते
कुणीही दाखवा.....आम्ही तिचा सत्कार ठेवू
नदी......जी सागरापाशी मनापासून जाते
----------------------वाह वाह !!!
सुंदर !
तुम्हाला येत नाही का अशी अडचण
तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते.........आय हाय ! क्या शेर कहा है !
कायम लक्षात राहिल ....धन्यवाद !!
तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते.............आह !
शरीराला टिकवणे एवढे कर्तव्य आहे
सुरू होते तिथे आयुष्य हे संपून जाते.........खरय !!
किती वर्षे प्रतीक्षा चालली आहे तिची ही
म्हणाली 'बेफिकिर' जी "मी उद्या येऊन जाते".......वाह ! कातिल !!
फक्त मॉन्सून नीटसा उलगडला नाही ( माझी आकलनशक्ति कमी पडत असावी
)
बाकी हरएक शेर कोट करावा असा.
धन्यवाद !!
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते
नदी जी सागरापाशी मनापासून जाते
कशाचा अर्थ आहे काय काहीही कळेना
स्वतःशी हासते किंवा मला हासून जाते
मला रोखायला येते मला पाजून जाते
मस्त!
(No subject)
जगाला सांग...... वाचव खर्च तू
जगाला सांग...... वाचव खर्च तू मद्यालयाचा
मला रोखायला येते...... मला पाजून जाते
>> वन ऑफ द बेस्ट ऑफ युवर्स....!!
फक्त मॉन्सून नीटसा उलगडला
फक्त मॉन्सून नीटसा उलगडला नाही<<<
कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते
ह्या शेरातील 'जाते' ह्या शब्दाचा अर्थ 'जाणारे / गेलेले' असा आहे. (म्हणजे गेल्या वर्षी संपलेले मॉन्सून).
गेल्या वर्षी आलेल्या मॉन्सूनचे माणसांनी भरगच्च स्वागत केलेले होते, कौतुके केली होती. पण ते सगळे उपभोगून इथून जाताना मात्र मॉन्सून कृतघ्नासारखे वागले, परत कधी येणार हे सांगितलेही नाही, असे म्हणायचे आहे.
शेर नीट स्पष्ट झाला नसल्यास पुन्हा विचार करून पाहतो.
सर्व प्रतिसाददात्यांचे आभार मानतो.
शेवटाकडचे काही शेर कमीकमी
शेवटाकडचे काही शेर कमीकमी आवडत गेले
बाकी मला आवडलेले काही शेर /ओळी वर अनेकांनी कोट केल्याच आहेत
मॉन्सून नाही आवडला
मद्यालयाच्या शेरावरून माझा एक शेर आठवला
फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
तश्या जातात काही पालख्या
तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते ..
अप्रतिम !
पहिला, तिसरा, चाैथा जास्त
पहिला, तिसरा, चाैथा जास्त आवडले सर
धन्यवाद
ओह ! अच्छा, अच्छा
ओह ! अच्छा, अच्छा !!
जाते......त्या अर्थी घेवून वाचलेच नव्हते मी.
वा ! काय रदीफ निभावली गेलीय .
तुमचे शेर वाचताना वाचणा-यांचाही कस लागतो अनेकदा !
मन:पुर्वक धन्यवाद !!
-सुप्रिया.
कधी येईल यंदाचा...... कुठे
कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते
हा शेर सोडुन बाकी सारे आवडले
हा सगळ्यात मस्त वाटला ...
तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते
तुम्हाला येत नाही का अशी अडचण
तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते
तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते
शरीराला टिकवणे एवढे कर्तव्य आहे
सुरू होते तिथे आयुष्य हे संपून जाते
सुरेख शेर…. गझल आवडली.
पहिला शेर मस्तच. कृतघ्नासारखे
पहिला शेर मस्तच.
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते>>> हे अडखळल्यासारखे वाटते.
सूपर्ब! तक्रार अशी मांडता
सूपर्ब! तक्रार अशी मांडता यायला हवी गझलेतून! संयत पण थेट! 'पालख्या' चा शेर अफ्फाट!
कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते
गेल्या वर्षी आलेल्या मॉन्सूनचे माणसांनी भरगच्च स्वागत केलेले होते, कौतुके केली होती. पण ते सगळे उपभोगून इथून जाताना मात्र मॉन्सून कृतघ्नासारखे वागले, परत कधी येणार हे सांगितलेही नाही, असे म्हणायचे आहे.
>>> हा अर्थ (स्पेशली "गेल्या वर्षी आलेल्या मॉन्सूनचे माणसांनी भरगच्च स्वागत केलेले होते, कौतुके केली होती." हा)
नाही लागत आहे या शेराच्या कुठल्याही ओळीतून...