(विवेकानंद नगर)
घरासमोरच म्हाडाच्या बैठ्या घरांकडे जाणारी एक गल्ली आहे. आमच्यामध्ये हमरस्ता, त्यावरून वेगाने जाणारी वाहने,
गल्लीत शिरल्यावर छान वाटते .
छोटी छोटी दुकाने, भाजीच्या फळांच्या गाड्या,
आता सारे ओळखायाला लागलेत,
विशेष म्हणजे दोन्ही बाजूंनी झाडे,
आणि एक वेगळाच निवांतपणा जाणवतो
एक कलावती आईंचे मंदिर आहे,...
तिथे लगबग आणि भजन चालू असते,
खुप मोठे मैदानही आहे.
मुले खेळताना दिसतात
दोन्ही बाजूंनी बैठी घरे,
मध्ये कॉमन एरिया
माणसे घराबाहेर दिसतात,
मोठ्या घरांमध्ये,
एकाच घरातही माणसे आपल्या कप्प्यात (खोलीत ) असतात,
असे वाटते की प्रायवसी मिळुन काय मिळवले?
शहाळेवाली भाभी विचारते, बेटी कैसी है?
तिची dolly पामेरियन कुत्री, छान खेळायची राधिकाशी…
भाजीवाल्या भैयाच्या गाडीवर,
आमचे वोल्टासचे निकमकाका मदतीला उभे असतात.
खूप वेळा मी उगीचच गल्लीतून जातो,
विचारांचा वेग कमी करायला,
अस वाटत कि गल्ली म्हणते,
वा छान, ये…
असा ऐकतोय की, तिकडे development येणार आहे?
कुणाचे भले होणार?
फिलिंग दु:खी
छान आहे. आवडली
छान आहे. आवडली