मनात आले हे अतीसुंदर बोल,
"या नेत्यांच्या बैलाला ढोल..."
देशाची काही पडली नाही, गेला बाराच्या भावात,
आपले खिसे भरताहेत, ह्यांच्या आईच्या गावात.
जगात झालाच पाण-उतारा, जो व्हायचा तो!
तरी नाही शरम, यांच्या आयचा गो!
रोज नवीन स्कॅम, रोज नवीन झोल.
या नेत्यांच्या बैलाला ढोल!
किती मजा येईल द्यायला यांच्या ढुंगणावर लात,
एकदा तरी सणसणीत देऊ कानफटात.
खरंच असं झालं तर आपण काय करु?
या साल्यांच्या घरी जाऊन आय-माय करू!
मग FB वर म्हणू "लोल!
या नेत्यांच्या बैलाला ढोल!"
धमक लागते अंगात, प्रगती करायला,
ती यांच्या गावीच नाही, ह्यांच्या मायला!
पैश्यापायी करत आहेत वाटोळं देशाचं,
ह्यांच्या मारी ह्यांना काही पडलंच नाही त्याचं,
देशाचा झाला बट्ट्याबोळ,
या नेत्यांच्या बैलाला ढोल!
- माधव आजगांवकर.
P.S - ह्या कवितेत कसला ही अर्थ शोधू नये....मनातला राग काढण्यासाठी शिव्यांसारखी दुसरी गोष्ट नाही....म्हणून हा उपदव्याप. - माधव.
मस्त आहे
मस्त आहे
(No subject)