एक था व्हिलन..!! (स्पॉयलर)

Submitted by उदयन.. on 2 July, 2014 - 03:55

एक था व्हिलन..!

नावावरुन एका खलनायकावर बेतलेला चित्रपट वाटतो. जसे खलनायक, डर, बाजीगर इत्यादी अँटीहिरो टाईप चे चित्रपट. परंतु नावावरुन बघायला गेलात तर हमखास फसाल. या चित्रपटात खलनायक कोण आहे या वर प्रदर्शना पुर्वी उगाच रहस्याची धुळ चौफेर उधळली गेली होती ती डोळ्यात गेल्यामुळे चित्रपट बघावा लागला. वाटले मोहित सुरी आश्चर्याचा धक्का देईल . पण काय सिध्दार्थ गेला श्रध्दा गेली हाती आला रितेश या पेक्षा मर्डर २ बरा होता म्हणायचा . थोडे स्टोरी कडे वळुया .

गुरु (सिध्दार्थ मल्होत्रा) हा एक नावजलेला गुंड असतो. ( असे चित्रपटातला एक इंस्पेक्टराच्या मत असते .. "अगर ये ढुंढने निकला तो डिपार्टमेंट को लाशे गिननी पडेगी.. जसे की हा खुन पाडत जाणार आणि पोलिस त्यावर फक्त चविष्ट चर्चा करत बसणार ) तो सिजर (रेमो फर्नांडीस) साठी काम करतो. अचानक त्याची गाठ आयशा ( श्रध्दा कपुर) बरोबर होते. आयशा काही दिवसच जगणारी असल्याने बिचारी आपली एक एक इच्छा पुर्ण करण्यासाठी ( म्हणजे सोकोल्ड इतरांना आनंद देण्याकरीता) एका शहरातुन दुसर्या शहरात आपल्या वडीलांबरोबर भटकत ( भरकटत) असते ( आधुनिक बावर्चीचा लेडीज अवतार म्हणा हवे तर) गुरु च्या शहरात आल्यावर गुरु ची गाठभेट होते. त्याची मदत घेउन सोशलवर्क ( सोसेल इतकेच वर्क) वृध्द जोडप्याचे लग्न लावुन देते आणि त्यांना आनंद मिळवुन देते . तिच्या या उदारतावादी धोरणामुळे गुरु चे अंतःकरण उचंब़ळुन येते. त्याच्या हातात तिची इच्छापुर्ती डायरी लागते. बिचारा तिच्या नादाला लागुन तिची इच्छा पुर्ण करण्यासाठी बरेच काय काय करतो ( हे सगळ एकाच गाण्यात करतो मात्र ... वेळ कमी आहे ना बिचारी कडे ) आणि कथेच्या इच्छेनुसार तिच्या प्रेमात पडतो व सुधारायचा प्रयत्न करतो. ( म्हणजे चक्क एक गावगुंड मोठ्या कंपनी मधे सुटाबुटात इंटरव्हु द्यायला जातो ) पण नियतीला हे मंजुर नसावे.. आयशाचा खुन होतो. पठ्ठ्या लय चिडतो. त्यात तो इन्स्पेक्टर स्वतःचा जुना बदला सीजर कडुन घेण्याकरिता गुरु ला भडकवतो म्हणतो की तुला लहानपणापासुन सांभाळणार्या सिजरनेच तिला मारलेले आहे. गुरु लगेच त्याच्या जुन्या अड्ड्यावर पळत जातो इथल्या ३५-५० गुंडांना मारतो. सीजर ला दया येते म्हणतो "तुझे जिंद्गी देणे वाली को मै क्यु मारुंगा" बाबाचा राग निवळतो जुणे दिवस आठवतात. मग गुरु खर्या मारेकरीला शोधायला निघतो.

हा झाला एक ट्रॅक चित्रपटाचा. आता दुसरा बघु ...

राकेश महाडीकर ( रितेश देशमुख ) एका प्रायव्हेट टेलिफोन कंपनीत काम करत असतो ( अशी प्रायव्हेट कंपनी जीचे इंजिनियर बीएसएनएल च्या रस्त्यावर लावलेल्या डब्ब्यामधे काडी करत असतात) . थोडा विक्षिप्त , स्वतःची बायको ( अमना) त्याचा कितीही तिरस्कार करत असली (तिरस्कार का करते हे दिग्दर्शकालाच माहीत) तरी तिच्यावर फार फार फार प्रेम करणारा. त्याच्या बायको ने किती ही हिडीसफिडीस केले तरी ऐकुन घेणारा मात्र बाहेर मात्र कोणी बाईने तसे केल्यावर त्याच्यातला विकृत माणुस बाहेर येतो. आणि राजेरोसपणे खुन करत असतो. अणि प्रत्येक बाईच्या कडुन एक दागिना चोरतो आणि आपल्या बायकोला देतो. खिशात पैसे पुरेसे नसतात कमवतो कमी अश्यात हे दागिने कुठुन आणतो हे मात्र बायको विचारत नाही फक्त त्यानंतर बायकोच्या डोक्याचा काटा सरके पर्यंत ती त्याच्याशी गोडगुलाबीने वागते. राकेश बिचारा आपल्या बायकोचे वरचे फस्ट्रेशन मात्र दुसर्यांवर काढत असतो. अशातच बिचारी चित्रपटाची हिरोईन मौलिक सल्ले रस्त्यात काम करणार्या राकेश ला देते. पण करायला गेलो एक आणि झाले वेगळेच ही गत तिची होते. सल्ला देताना राकेशला तो अपमानास्पद वाटतो ( का वाटते हे देखील दिग्दर्शकालाच विचारा ) आणि...... ( आधीच्या ट्रॅक मधले वाचा)

हा झाला चित्रपटाचा दुसरा ट्रॅक ...

आता आपण दोन्ही ट्रॅक एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करु ( दिग्दर्शकाने देखील तेच केलेले आहे)

गुरु बदला घेण्या करीता दारोदार ओपन जीप मधुन फिरत असतो . अचानक त्याला आयशाची वस्तु एका कडे दिसते. त्यावरुन तो राकेश चा माग काढुन त्याच्या पर्यंत पोहचतो. राकेश एक खुन करणार असतो तेव्हढ्यात गुरुची एंट्री होते .. ढँण्ण्टडँन......... गुरु चालता बोलता गुंड असल्याने गरिब सामान्य माणसु असलेल्या राकेश ला बुकलुन काढतो. पण त्याला असे मारुन टाकायचे नसते. रोज मारायचे असते आणि स्वतःच्या बदल्याची तहान रोज भागवायची असते (सोन्याची अंडी देणारी कोंबडीला कापु नये बहुतेक ही गोष्ट त्याने वाचलेली होती) म्हणुन त्याला धुतल्यावर त्याला एका हॉस्पिटल मधे बरा होण्याकरीता दाखल करतो वर पैसे देखील देतो .. Wink गुरु तिथे पण त्याच्यावर वॉच ठेउन असतो. आणि परत एकदा मारतो आणि परत त्याला वाचवतो.. राकेश बिचारा मलाच का मारतोय व वाचवतोय म्हणुन कंटाळुन तिथुन पळुन जातो. त्याला त्याचा जुना मित्र कमाल खान मिळतो ( याचे विचार जसे बाहेर आहेत तसेच चित्रपटात आहे) कमाल खान त्याला मौलिक सल्ला देतो ... आता राकेश ला हुरुप येतो.. आणि गुरु वर पलटवार करायला सुरुवात करतो .

यांच्यात कोण जिंकते यासाठी चित्रपट बघा अथवा नका बघा.... Happy

अभिनयः- सिध्दार्थ मल्होत्रा ठिक ठाक अभिनय केलेला आहे. चेहर्यावर दगडाचे भाव ठेवले की आपण गँगस्टर बनतो ही भावना जितक्या लवकर त्याच्या मनातुन जाईल तितके चांगले . नॉर्मल असल्यावर त्याने अभिनय चांगला केलेला आहे. श्रध्दा कपुर डोक्यात जाते. एकसुरी आवाजात सारखे जोक विचारु का बोलुन फडतुस विनोद ज्याला त्याला सांगत असते .. मधे मधे जब वी मिट मधल्या करिना सारखे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करते पण काही जम्यानहीच. तिला फक्त खुन होण्याकरीता घेतले असते तरी चालण्याजोगे असते.. सुरुवातीला एक गाणे दाखवायचे त्यात तिची हिरो इच्छापुर्ती करतो आणि लगेच मारुन टाकायचे किमान संपुर्ण चित्रपट थोडातरी सुसह्य झाला असता. कमाल केली आहे ती मात्र रितेश ने त्याने पहिल्यांदाच खलनायक रंगवला आहे अति तिथे माती या म्हणीचा अभ्यास शाळेत केलेला दिसतोय . कुठे ही अति केलेले नाही (अपवाद एक दोन आहेत्च पण ते इग्नोर होण्याजोगे आहेत) नॉर्मल आणि विकृत दोन्ही रुप संयम बाळगुन दाखवलेले आहे.. हिडीसपणा न दाखवता देखील एक व्हिलन असु शकतो हे जाणवले. फक्त पहिल्यांदाच असा रोल करत असल्याने मनाचा थरकाप मात्र उडत नाही.
अमना सुंदर दिसते. काम पण चांगले केले आहे.

संगीतः- दोन गाणी फक्त ऐकण्याजोगी आहेत तरी ती चित्रपटाचा वेग थांबवतात . तेरी गलिया हे गाणे तर आधीच हिट झालेले आहे. श्रध्दा कपुर च्या आवाजातले देखील सुंदर आहे ते गाणे थोडा आशिकी २ च्या गाण्यांचा भास होतो बहुतेक गायक आणि संगितकार एकच असल्याने होत असेल

-------------

बघायचा असल्यास बघा..... टाईमपास म्हणुन चांगला आहे

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तेरी गलिया श्रद्धानेच गायलंय Happy

मला फार आवडलं Happy

सिनेमा बघणार नाही Happy

तू छान लिहीलयेस. अगदी खुसखुशीत Lol
बर्‍याच ठिकाणी लिखाणाच्या चुका आहेत Happy बघ सुधारता येतायेत का Happy

सगळ्या पेपर्सनी रितेश ची प्रशंसा केलीय.. यापुढेही त्याला चांगले रोल मिळोत.. पण खलनायकच रंगवत राहिला तर मात्र.. !

>>जब वी मिट>>

चित्रपट पाहून आपण मिटलेले दिसता. ते "मेट" असे आहे. Proud
चित्रपट बघणार नाहीच. माझे पैसे वाचवल्याबद्दल आपले धन्यवाद (घरी बघितला तरी वीज खर्च होणारच ना Wink )

मी नेट वर बघितला...

आणि अशी गाणी लागल्यावर मी फास्ट फॉरवर्ड करतो.. Wink कशात काय तर फाटक्यात पाय अशी असल्याने बघु नयेच

आणि अशी गाणी लागल्यावर मी फास्ट फॉरवर्ड करतो.. >>>> हुम्म्म तु शुद्ध सात्विक Proud तु नेटवर बघीतालाय्स मग जाउचदे

मी पण थेटरात पाहीला. अतिशय बंडल वाटला.
रितेशचं काम छान. सिध्दार्थ मल्होत्रा ठोकळा.

श्रद्धा कपुर खुप छान दिसली (मला तरी ) त्यामुळे तिच्या अभिनयाकडे लक्षच गेल नाही Wink

उदय तु नालायक आहेस........ मी हा मुव्ही पहायला जाणार होते... आता जाईन की नाही शंका आहे.....असले नालायकपणा करत जाउ नकोस....नाहीतर तुलाच घेउन जाईन मी विलन बघायला

अनि ... हेडींग मधे स्पॉयलर म्हणुन लिहिले आहे ना... तरी पण वाचलेस ? Wink

तिकिट काढत असशील तर मी यायला तयार आहे Biggrin

नाही तुला मोबाईल वर दाखवणार आहे....एकतर स्पॉयलर टाकलाय...वरुन तुझे आणि माझे मिळुन ४००-५०० रुपडे मी नाही खर्च करणार....हव तर सब वे मधे नेते तुला

फर्स्ट डे थर्ड शो....

आपला फिक्सच असतो !

विशेष आवडला नाही, पण नावडलाही नाही.

रितेश देशमुखने जबरदस्त काम केलं आहे. सिद्धार्थ मल्होत्रामध्ये मला त्या डिनो मोरियाचा अनेक वेळा भास झाला. तो भास होणं, हे सिनेमातील रितेशने हिंसक बनण्यापेक्षा भयावह होतं !
श्रद्धा कपूर साधारणच आहे. पण पब्लिक जाम फिदा आहे ह्या मरतुकडीवर !

गाणीसुद्धा बरी वाटली.

उदयन,

छान लिहिलं आहे.

धन्यवाद ! Happy

हे काल का नाही वाचलं? निम्मा पिकचर झाल्यवर वाटल काहितरी जबरदस्त बघायला मिळणार. सकाळी उठल्यावर कळाल कि तिची शेवटची इछा तो शेवटी पुर्ण करतो. (म्हणजे विचार करा बघताना मेंदु किती भंजाळला असेल)

स्टोरीलाईन ईंटरेस्टींग आहे, तरुणाईसाठी नॉवेल म्हणून छान जमेल, पण चित्रपट पेलवला तर ठिक अन्यथा हास्यास्पदही होऊ शकतो. परीक्षण आणि प्रतिसादांवरून असे वाटतेय की गाडी घसरलीय कुठे कुठे ..
असले चित्रपट ही माझी आवड नाही मात्र परीक्षण खुसखुशीत Happy

परीक्षण आवडले. तीन flash back एकात एक अशी स्टोरी सांगण्याची स्टाईल असल्याने चित्रपट नक्कीच रंजक बनतो.

एक सांगावेसे वाटते:

चित्रपटात खरा व्हिलन "BSNL चा खड्डा" आहे, रितेश नाही.
कारण त्याच खड्ड्यामुळे श्रद्धा रितेशला बोलते आणि तो तिला मारतो.
आणि त्याच खड्ड्यामुळे सगळ्यात शेवटी रितेश मरतो...
ते कसे काय ते बघण्यासाठी चित्रपट बघा!!

एरवी दुसर्या कोणत्या चित्रपटात प्राची देसाई एवढी सेक्सी दिसली नव्हती पण या चित्रपटातल्या गाण्यात ती खूपच सेक्सी दिसली आहे.

छान लिहीले आहे. खतरनाक चित्रपट दिसतो. पाहायला हवा. श्रद्धा कपूर मला आशिकी-२ चे जे तुकडे पाहिले तेवढ्यात बरी वाटली होती.