१. देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"
२. देवळांच्या देशा - "मानस मंदिर"
३. देवळांच्या देशा - "शहाडचे बिर्ला मंदिर"
४. देवळांच्या देशा - "गोंदेश्वर मंदिर (सिन्नर)"
५. देवळांच्या देशा - "संगमेश्वर आणि चांग वटेश्वर मंदिर (सासवड)"
==============================================================================
==============================================================================
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला
दक्खन मुलुखाला देव आलाया वस्तीला
भीती नाही कळीकाळाची देव आधार भक्ताला
प्रचि ०१
जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आरध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले आणि सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले.
निसर्गाच्या सन्निध्यात नैसर्गिक रित्या वाढणाऱ्या वास्तूकलेचे जेजुरीचा खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.
गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.
(विकिपिडियाहुन साभार - अधिक माहिती येथे वाचा.)
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
फेट्यात तुरा मोत्याचा डुल बाशिंग सोन्याचं
रिकीबीत पाय तोड्याचा हाती पात तलवारीचं
मार्तंड दुष्ट संहारी.... दुष्ट संहारी
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी
प्रचि ०७
प्रचि ०८
देव भंडारी रंगला, देव यळकोटी दंगला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
गड उंच उंच मंदीर नवलाख त्याला पायरी
हिथ मंडप चांदण्याचा साजिरी त्यात हि नगरी
तिर्थाची किर्ती नवखंड नवखंड नवखंड
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
सदानंदाचा जय जय बोला, माझ्या देवाचं जय जय बोला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
बाणुबाई म्हाळसा दोघी देवाच्या दोनी अंगाला
देवा खंडोबाकारणी होतीया गर्दी जत्रंला
नाचती वाघ्या अन् मुरळी...वाघ्या अन् मुरळी
मल्हारी.....मल्हारी.......मल्हारी
प्रचि १८
प्रचि १९
प्रचि २०
प्रचि २१
घाटीची साथ दिमडीला देवरायाच्या दिमतीला
देवाचं ठाणं जेजुरी नांदे दक्खन मुलुखाला
प्रचि २२
प्रचि २३
प्रचि २४
छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजीराजे यांची भेट
प्रचि २५
जिप्सिने टाकलेल्या फोटोत आहे
जिप्सिने टाकलेल्या फोटोत आहे तोच गुलाल असतो जोतिबावर.
जिप्सी, तुमचं कुलदैवत नाइकबा का?
जिप्सी, तुमचं कुलदैवत नाइकबा
जिप्सी, तुमचं कुलदैवत नाइकबा का?>>>>>नाही रे. आमचं कुलदैवत श्री सिद्धनाथ. मु.पो.जावली, ता. फलटण, जि. सातारा.
आमच्या जत्रेबद्दल मी मायबोलीवर इथे लिहिलंय.
९८% डिस्काऊंट रीया, सगळ्या
९८% डिस्काऊंट
रीया, सगळ्या पायर्या नाही काय. पहिल्या पाच पायर्या बायकोला उचलून घेऊन चढायच्या असतात
>>>
याच्या पुढे तुला काही सांगायचय का म्हणजे मी पण घेऊन चढलो वगैरे असं?
मस्त फोटो रे !
मस्त फोटो रे !
मस्त फोटोज् रे मित्रा. लय
मस्त फोटोज् रे मित्रा.
लय भारी.
Jipsi - Ha Photo Javali Cha
Jipsi - Ha Photo Javali Cha Ahe Ka?
आमचं कुलदैवत श्री सिद्धनाथ.
आमचं कुलदैवत श्री सिद्धनाथ. मु.पो.जावली, ता. फलटण, जि. सातारा. ( आम्हि भ्होइते वथार णिम्बाल्कर )
Pages