मोर म्हंटलं की पावसात नाचणार्या मोराचं चित्र डोळ्यासमोर उभ रहातं..नाचणारा मोर फारचं क्वचित बघायला मिळतो...पण अश्या मोराचं दर्शन म्हणजे केवळ आनंदाची उधळणचं.
भारताच्या राष्ट्रीय पक्ष्याला परदेशात नाचताना पाहून माझ मन पण नाचू लागलं
कंट्रीसाईड मध्ये ड्राईव्ह करत असताना, एका फांदीवर मोर दिसलां असं वाटलं. पहिले तर विश्वासचं नाही बसला म्हटलं ईथे कूठून आलेत मोर..भास झाला असावा. असं म्हणतो न म्हणतो तोच एक मोर शिळ ठोकत समोर आला.
एका माणसाची प्रॉपर्टीत हे मोर होते. त्यांनी पाळले होते, पण त्यांना पिंजर्यात ठेवलं नव्हत...
तोर्यात बसलेला मोर.
हा फक्त पाहायचा आणि अनूभवायचा सोहळा...किती हे रंग, किती छटा आणि आणि मोहक चालं.....
या मोराने लांढोरीला पटवण्यासाठी चांगलीच फिंडींग लावली होती...या व्हिडिओ मध्ये कळेल.
लांढोर काही रिस्पोन्स देत नाही म्हंटल्यावर, हिरमूसला बिचारा ...नाच गाण थांबवून तिच्या मागे लागला
आणि तिच्या सोबत सन बाथ घेत पहूडला...
असाचं काही वर्षापूर्वी नाचणारा मोर कास पठारला जाता असताना दिसला होता..सातार्याजवळ. जंगलात नाचणारा मोर !!
न्यू जर्सी मध्ये सध्या चेरी पिकींचा सिझन आहे, आम्ही चेरीच्या वनात गेलो असता हा पांढरा मोर नाचताना दिसला...पहिल्यांदाच पांढरा मोर पाहिला ते सूध्दा ध्यानी-मनी नसताना...मोराचा पांढरा रंग हा एका प्रकारचा आजार आहे, पिगमेंट्स कमी असतात... पांढरा कावळा, रॉबीन पण असतात, त्याच्यात पण पिगमेंट्स कमी असतात.
पांढरा नाचणारा मोर मला तर स्वप्नवत वाटतो.
धन्यावाद,
तन्यय शेंडे
https://www.facebook.com/Tanmay.Photography
मोर मस्त आहेत. पण तन्मय फोटोत
मोर मस्त आहेत. पण तन्मय फोटोत नेहमी इतकी मज्जा नाही आली. खास तुझा "टच" जाणवत नाही आहे.
सुंदर फोटोज्.
सुंदर फोटोज्.
Pages