Submitted by वेडसह्याद्रीचे on 17 June, 2014 - 07:55
हि कविता तशी दीड वर्षा पूर्वी लिहिलेली आहे. आज इथे मायबोलीवर प्रथमच पोस्ट करत आहे.
! सह्याद्री !
नभा नभातुनी ,
दऱ्या खोऱ्यांतुनी
गर्जितो माझा सह्याद्री !
दिशा दिशांना
साद घालूनी
पुलकित होतो सह्याद्री !
गड किल्ल्यांच्या
रत्नमनी शोभितो
शान आपुला सह्याद्री !
शिवरायांचे , पराक्रमांचे
गुणगान गातो हा
सह्याद्री !
मनी उभरतो,
उरी फडकतो ,
शक्तिस्थळ अपुला
सह्याद्री !
मना मनातुनी
नाद घुमते
शान आपुला सह्याद्री !
कणखर ,रौद्र
भीषण रुप त्याचे
गौरवशाली सह्याद्री !
महाराष्ट्राचा मुकुट
मनी तो ,
वेड आपुले सह्याद्री !
संकेत य पाटेकर
http://sanketpatekar.blogspot.in/2014/06/blog-post_17.html
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा