मैदा - १ कप
सोडा - १/२ टी स्पून किंवा १/४ टी स्पून
सायट्रिक अॅसिड - १/२ टी स्पून
साखर - १ कप
हळद - १/२ चिमूटभर
तूप - तळण्यासाठी
तेल - १ टेबलस्पून
१. साखरेचा एकतारी पाक तयार करा.
२.मैदयामध्ये सायट्रि़क अॅसिड, हळद व पाणी घालून भज्याच्या पीठासारख मिश्रण तयार करा पण थोड घट्ट हव. जास्त पातळ करू नका.
३. तेलामध्ये सोडा घालून चमच्याने ढवळून घ्या.
४. कढईत तूप तापत ठेवा.
५. तेल आणि सोडयाचे मिश्रण मैदयामध्ये घाला आणि फेसून घ्या.
६. हे मिश्रण प्लास्टीकच्या सॉसच्या बॉटलमध्ये भरा आणि तूपात जिलेब्या पाडा. मध्यम आचेवर तळून साखरेच्या पाकात घाला. एक तळणीचा घाणा होईपर्यंत जिलेबी पाकात ठेवा. दुसरा जिलेबीचा घाणा तळून झाला की पाकातल्या पहिल्या काढून घ्या आणि खा.
ही जिलेबी अजिबात बिघडत नाहीत आणि नरम पडत नाहीत.
बनवायला खूपच सोपी आहेत.
सोडा जास्त झाला असावा का? की पाणी जास्त झालं? <<< पाणी कमी घाला. पीठ थोड घट्ट हव कारण सोडा घातल्यावर पातळ होत.
तुटत होती जिलबी तळताना. <<< तूप तापलेल हव. गॅस मिडीयमवर ठेवला तरी चालतो.
नंतर आंबट लागल्या << जास्त आंबट लागल्या असतील तर सायट्रीक अॅसिड १/४ टीस्पून घाला.
तोपासु.
तोपासु.
मस्तच!
मस्तच!
आरती जिलेब्या, लाडु, बर्फ्या
आरती जिलेब्या, लाडु, बर्फ्या ( त्यातल्या त्यात पिस्ता वगैरे), कतल्या पाहिले की माझे डाएट धुमशान होते. एकवेळ मी बटाटेवडे, कचोर्या, समोसे, चिवडा, भेळ, आणी फरसाण बाजूला सारेन यासाठी.:डोमा::फिदी:
करून पाहिली. पण तुटत होती
करून पाहिली.
पण तुटत होती जिलबी तळताना.
सोडा जास्त झाला असावा का? की पाणी जास्त झालं?
जिलब्या पाकात जास्त वेळ राहिल्या, तेही पाक बर्यापैकी गरम असताना...आणि मऊ पडल्या
त्यामुळे करायला गेलो जिलबी आणि झाला मालपुवा... अशी गत झाली.
शेवटच्या दोन जिलब्या मात्र जिलबीसारख्याच झाल्या. त्या पाकात जास्त वेळ न ठेवल्याने मऊ पडल्या नाहीत.
पण पाक नीट मुरला नाही त्यामुळे सुरुवातीला गोड आणि नंतर आंबट लागल्या.
मी परत एकदा करून बघणार आहे.
पाकृ रॉकिंग आहे.
नुसतं एखाद्याला सांगितलं ना 'जिलबी घरी केली आहे'....
समोरचा लोटांगणच घालेल...
भारतीताई, जागू, गजानन
भारतीताई, जागू, गजानन धन्यवाद.
मलासुद्धा गोड खूप आवडत.
माझे डाएट धुमशान होते <<< रश्मी,
चैतन्य, ट्राय करुन इथे प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद.
सोडा जास्त झाला असावा का? की पाणी जास्त झालं? <<< पाणी कमी घाला. पीठ थोड घट्ट हव कारण सोडा घातल्यावर पातळ होत.
तुटत होती जिलबी तळताना. <<< तूप तापलेल हव. गॅस मिडीयमवर ठेवला तरी चालतो.
नंतर आंबट लागल्या << जास्त आंबट लागल्या असतील तर सायट्रीक अॅसिड १/४ टीस्पून घाला.
पुढच्या वेळेस फोटो नक्की द्या.
रियाला खायला बोलवा आणि तिने लोटांगण घातल तर.........
रियाला फोटो पाठवले तरी ती
रियाला फोटो पाठवले तरी ती लोटांगण घालेल
काय रिया?
नक्की ट्राय करतो पुढच्या वेळी.
मस्त सोपी पाकृ!
मस्त सोपी पाकृ!
ho tar taste la dilas tar
ho tar
taste la dilas tar tuzya navacha jayghosh pan Karen
स्वाती२ धन्यवाद. चैतन्य,
स्वाती२ धन्यवाद.
चैतन्य, पुढच्या वेळेस फोटो नक्की डकवा म्हणजे रीया टेस्ट करेल आणि तुमच्या नावाचा जयघोष करेल
या रेसिपीने मी केलेल्या
या रेसिपीने मी केलेल्या जिलेबीचा हा फोटो.

करायला अगदी सोपी पा. कृ. आणि चवीला पण छान लागत होती.
फक्त एक शंका, नंतर-नंतर पाक घट्ट होत, कडक होत गेला, तेव्हा काय करायचे ते कळत नव्हते की माझा पाक जरा जास्त झाला म्हणून असे झाले असावे?.... माहित नाही.
नंतर-नंतर पाक घट्ट होत, कडक
नंतर-नंतर पाक घट्ट होत, कडक होत गेला, तेव्हा काय करायचे ते कळत नव्हते की माझा पाक जरा जास्त झाला म्हणून असे झाले असावे?.... <<<< आशिका, पाक घट्ट झाला तर थोड पाणी घालून मंद गॅसवर ठेवायचा. फोटो छान आहे.
पाक घट्ट झाला तर थोड पाणी
पाक घट्ट झाला तर थोड पाणी घालून मंद गॅसवर ठेवायचा.>>>मी तेच केलं, पण असं होतंच का की माझा पाक जास्त झाला होता ते विचारायचं होतं.
जिलेब्या झाल्यावर पाक थोडा
जिलेब्या झाल्यावर पाक थोडा उरतोच कारण जिलेबी पाकात बुडवायची असते. कमी पाक केला तर शेवटच्या जिलब्या थोड्या चपट्या किंवा अगोड राहतात कारण पाक संपत येतो आणि पाकात टाकल्यावर मुरत नाहीत.
आरती., जास्त म्हणजे
आरती., जास्त म्हणजे क्वांटिटी नाही. आशिकाला पाक जास्त पक्का झाला होता का? असं विचारायचं आहे बहुतेक.
आशिका जिलब्या मस्त दिसताहेत. तू म्हणे रव्याचे लाडूही खूप छान करतेस? आम्हालाही दे की एकदा.
आशिका, पाक नंतर नंतर पक्का
आशिका, पाक नंतर नंतर पक्का होत जातो कारण जिलब्या तळणीतून काढल्यावर लगेच पाकात घालतो ना.. त्या उष्णतेने पाक पहिल्यापेक्षा पक्का होत जातो.
हो आरती, पाक जास्त पक्का झाला
हो आरती, पाक जास्त पक्का झाला असावा माझा म्हणून घट्ट होत होता, असेच विचारायचे होते.
मामी - रवा लाडू
जास्त म्हणजे क्वांटिटी नाही.
जास्त म्हणजे क्वांटिटी नाही. <<<< मामी :).
आशिका, मंजुडीने बरोबर उत्तर दिल आहे.
रवा लाडू क्या है????? आशिका, मामी आम्हाला पण हळूच सांगा.
ओके, धन्स, आरती, मंजुडी.
ओके, धन्स, आरती, मंजुडी.
मनात विचार आला की यात Pancake
मनात विचार आला की यात Pancake mix वापरता येऊ शकेल का?
पॅनकेक मिक्स वापरून केलेले
पॅनकेक मिक्स वापरून केलेले गुलाबजाम खूप सुंदर होतात. जिलेबी करून पहायला हवी नवरात्रात.
चवीला मस्तच.
चवीला मस्तच.
पण २तास पण कडक राहीली नाहीत. जेवणापर्यंत ढेपाळली .
अगदी १०-20 sec ठेवली पाकात.काही वेळ कडक होती
काय चुकलं माझं ???
स्वस्ति, पाक खूप पातळ झाला
स्वस्ति, पाक खूप पातळ झाला होता का?? त्याने जिलेबी नरम पडू शकते. जिलेबी, फोटो मस्तच, हळद अजून कमी घाला.
पाक घट्ट हवा थोडा.
स्वस्ति, पाक खूप पातळ झाला
स्वस्ति, पाक खूप पातळ झाला होता का?? >> ह्म्म्म . हे कारण असू शकेलं . पुढच्या वेळी लक्शात ठेवीन .
पाक घट्ट होऊ नये म्हणून त्यात
पाक घट्ट होऊ नये म्हणून त्यात लिंबू पिळायचे.
सायट्रिक अॅसिड नसेल तर काय
सायट्रिक अॅसिड नसेल तर काय वापरु शकतो ?
Pages