मैदा - १ कप
सोडा - १/२ टी स्पून किंवा १/४ टी स्पून
सायट्रिक अॅसिड - १/२ टी स्पून
साखर - १ कप
हळद - १/२ चिमूटभर
तूप - तळण्यासाठी
तेल - १ टेबलस्पून
१. साखरेचा एकतारी पाक तयार करा.
२.मैदयामध्ये सायट्रि़क अॅसिड, हळद व पाणी घालून भज्याच्या पीठासारख मिश्रण तयार करा पण थोड घट्ट हव. जास्त पातळ करू नका.
३. तेलामध्ये सोडा घालून चमच्याने ढवळून घ्या.
४. कढईत तूप तापत ठेवा.
५. तेल आणि सोडयाचे मिश्रण मैदयामध्ये घाला आणि फेसून घ्या.
६. हे मिश्रण प्लास्टीकच्या सॉसच्या बॉटलमध्ये भरा आणि तूपात जिलेब्या पाडा. मध्यम आचेवर तळून साखरेच्या पाकात घाला. एक तळणीचा घाणा होईपर्यंत जिलेबी पाकात ठेवा. दुसरा जिलेबीचा घाणा तळून झाला की पाकातल्या पहिल्या काढून घ्या आणि खा.
ही जिलेबी अजिबात बिघडत नाहीत आणि नरम पडत नाहीत.
बनवायला खूपच सोपी आहेत.
सोडा जास्त झाला असावा का? की पाणी जास्त झालं? <<< पाणी कमी घाला. पीठ थोड घट्ट हव कारण सोडा घातल्यावर पातळ होत.
तुटत होती जिलबी तळताना. <<< तूप तापलेल हव. गॅस मिडीयमवर ठेवला तरी चालतो.
नंतर आंबट लागल्या << जास्त आंबट लागल्या असतील तर सायट्रीक अॅसिड १/४ टीस्पून घाला.
वॉव ! तोंपासु
वॉव !
तोंपासु
कर तू मज्जा. असे मस्त फोटो
कर तू मज्जा. असे मस्त फोटो डकवून जळव. डाएटवाल्यांनी कुटं जायचं वो?
कर तू मज्जा. असे मस्त फोटो
कर तू मज्जा. असे मस्त फोटो डकवून जळव. डाएटवाल्यांनी कुटं जायचं वो? स्मित >>> मी पण सेम टे सेम
कर तू मज्जा. असे मस्त फोटो
कर तू मज्जा. असे मस्त फोटो डकवून जळव. डाएटवाल्यांनी कुटं जायचं वो? स्मित >>> मी पण सेम टे सेम>>>>>>>> मी पण
वॉव आरती...तोंपासु
वॉव आरती...तोंपासु दिसताहेत......
एकदम तोंपासू दिसताहेत
एकदम तोंपासू दिसताहेत जिलब्या.
अजून पातळ कडी हवी असेल तर काय करता येईल?
मस्त आणि सोपी कृती आहे
मस्त आणि सोपी कृती आहे
चैतन्य, बारीक नोझल असलेल्या बाटलीतून जिलबी पाडावी लागेल.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
डाएटवाल्यांनी कुटं जायचं वो? <<< गल्ली (नजर) चुकवून कधीतरी खायच की वो.
बारीक नोझल असलेल्या बाटलीतून
बारीक नोझल असलेल्या बाटलीतून जिलबी पाडावी लागेल. <<< अश्विनी + १ किंवा चैतन्य, दुधाच्या पिशवीला किंवा कॉटनच्या कपड्याला बारीक भोक पाडून ट्राय करा.
मस्तच!
मस्तच!
मस्त!
मस्त!
अश्विनी, आरती..
अश्विनी, आरती.. धन्यवाद.
बारीक नोझल ची बाटली/ दुधाच्या पिशवीला बारीक नोझल तयार करून ट्राय करून बघायलाच हवी ही पाकृ.
व्वा ..आरती मस्तच........
व्वा ..आरती मस्तच........
जिलबि प्रकरण इतक सोप आहे का?
जिलबि प्रकरण इतक सोप आहे का?
जिलबि प्रकरण इतक सोप आहे
जिलबि प्रकरण इतक सोप आहे का?ंं << मेरेको भी यहीच सवाल है.
फोटो मस्त आहेत...
रावी, पौर्णिमा, सृष्टी
रावी, पौर्णिमा, सृष्टी धन्यवाद.
चैतन्य, ट्राय केल की सांगा.
जिलबि प्रकरण इतक सोप आहे का? <<< mrudul, हो सोप आहे, करून पाहा.
खुपच सोप्पा दिसतोय हा प्रकार.
खुपच सोप्पा दिसतोय हा प्रकार. फोटोही छान आलाय.
दिनेशदा धन्यवाद. नंदिनी,
दिनेशदा धन्यवाद.
नंदिनी, ट्राय करके देखो जी.
च्यामारी लावा कामाला
च्यामारी लावा कामाला आम्हाला... फोटो (आणि अर्थात रेस्पि) मस्त आहे... जरा उशीराने करेन. तिखट सॉसची एक बाटली इतक्यात टाकली...ही रिकामी होईस्तो वेळ आहे.
यम्मी!!!
यम्मी!!!
साखरेचा पाक गार असताना कि गरम
साखरेचा पाक गार असताना कि गरम असतानाच टाकायची जिलेबी त्याचात?
वॉव............जबरदस्त!
वॉव............जबरदस्त!
ही जिलबी जमली, तर तीसुद्धा
ही जिलबी जमली, तर तीसुद्धा जमेल का ? कारण फक्त आंबटपणा नॅचरल किंवा केमीकल एवढाच फरक आहे ना? बाकी कृती तर सेमच असणार....
वेका, आश, मानुषी काकू
वेका, आश, मानुषी काकू धन्यवाद.
पेरु, साखरेचा पाक गरम हवा. थंड नको.
ही जिलबी जमली, तर तीसुद्धा जमेल का ? <<< सुमेधाव्ही, ट्राय करा पण ती नरम पडण्याची शक्यता असते आणि ही नरम नाही पडत.
चैतन्य वरच्या फोटोतील जिलेबी मी प्लॅस्टिकच्या पिशवीने पाडली होती, माझ्याकडे सॉसची बाटली नाही आहे. बाटलीने बारीक पडते. हे काल रात्री आठवल. बाटली आईकडे आहे.
जिलबी खुप कठीण पदार्थ वाटतो,
जिलबी खुप कठीण पदार्थ वाटतो, तुम्ही सांगत आहात ती सोपी पध्दत वाटटे आहे..
प्रयत्न करायला हरकत नाही...
अरे द्या ते रसरशीत जिलेबीचे
अरे द्या ते रसरशीत जिलेबीचे ताट इकडे. जाम भूक लागली पाहून. सगळ्याच गट्टम करणार. आरती मस्त झाल्यात जिलेब्या. आवडल्या.
आज ट्राय करणार आहे. वर
आज ट्राय करणार आहे.
वर दिलेल्या प्रमाणात साधारण किती जिलब्या होतात?
६-७ तरी होत असतील ना?
सायली करून पाहा. रश्मी,
सायली करून पाहा.
रश्मी, तुम्ही एकट्याच आहात विथाऊट डाएट बाकी सगळ्या डाएटवाल्या मुली जिलेबीच ताट बघून तूच खा म्हणाल्या. आता तुम्ही आरामात सगळ्याच गट्टम करा.
चैतन्य, २०-२५ जिलेब्या होतात आणि फोटोसुद्धा द्या.
चैतन्य, तुला हे जमलं तर आणखी
चैतन्य, तुला हे जमलं तर आणखी एक डिश तुझ्या नावावर
मस्त आणि सोप्पी धन्स आरती
मस्त आणि सोप्पी धन्स आरती
Pages