Submitted by डॉ अशोक on 8 June, 2014 - 02:16
"शांतता राखा" - तरही गझल
"शांतता राखा" असे कां, ओरडावे लागते?
कां सत्यही पुराव्यासह, दाखवावे लागते?
*
हे खरे की ना कळाले, आजवर काही तुझे
नजरेतले सारेच कां, ओळखावे लागते?
*
नाही मिळाले कुणाला, सौख्यही दु:खाविना
दागिना होण्या सोन्यासही, तापवावे लागते!
*
"तो" असे सर्वत्र अन, सर्वद्ऩ्य आहे म्हणे
कां संकटी ईश्वराला, आळवावे लागते?
*
सगळ्यांना सारे मिळते, असे कां झाले कधी?
येण्यास पहिले दुसऱ्यास, डावलावे लागते !
दरबार होता तिथे अन, पाच ही होते तिथे
तरीही तिला कृष्णास कां, बोलवावे लागते
-अशोक (०८/०६/२०१४)
(टीप: "तरही" ची प्रेरणा "शांतता राखा" असे कां, ओरडावे लागते?
" ..... डॉ. कैलास गायकवाड)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लीज वॄत्त वगैरे लवकर शिकून
प्लीज वॄत्त वगैरे लवकर शिकून घ्या
माननीय आणि आदरणीय रा. रा.
माननीय आणि आदरणीय रा. रा. वैभवजी
आज्ञा प्रमाण!