माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

'जमीनी सुरक्षीत नाहीत' अशी सर्वत्र बोंबाबोंब आहे. त्यामुळे जमिनीचा नाद सोडून गाळा डायरेक्ट इथून उचलला आहे.

माझी जमीन कसण्या घेऊन प्रोफ गेले!
सैपाक* मीच केला, जेवून प्रोफ गेले!

'प्याले हलाहलाचे रिचवेन मीच' म्हणुनी....
कोन्याक हाय माझी सेवून प्रोफ गेले!

'माझ्या घरी बरा मी' ठसक्यात सांगताना....
दारात वाकुल्यांना दावून प्रोफ गेले!

'पाडेन काव्यचकल्या, सोर्‍या तुटो बेहेत्तर'....
झेंडा बगावतीचा रोवून प्रोफ गेले!

मृण धन्यवाद देई विचक्या न टाकल्याचे....
मातब्बरांस इथल्या भोवून प्रोफ गेले!

* 'आर्ती'च्या चालीवर वाचावे.
** प्राध्यापकांनी (हे चुकूनमाकून वाचलंच तर) उदार मनानं माफ करावं ही विनंती.

विषय: 
शब्दखुणा: 

प्रतिसादांबदल धन्यवाद!

(धन्यवाद ओरडून बोल्डात लिहायचं नसतं हे आत्ताच लक्षात आलं.)

मृ... बस नामही काफी है !
मृ चे नाव वाचून गझल वाचण्याचे धाडस केले कारण मृ म्हणजे जबरदस्त पंचची ग्यारंटीच !
एरव्ही तसाही प्रोफेश्वरांच्या वाटेस जात नाहीच.

आगे बढो

बापू. इथे प्रोफेसर देवपूरकर नावाचे एक गझल सम्राट होते.ते स्वतःचा उल्लेख आवर्जून प्रोफ. असा करायचे. जौक आणि गालिब यांच्या पासून चालू असलेली दोन गझलवाल्यांचे दुस्मनी इथेही होती. एका स्वनामधन्य पाट्याटाकू गझलवाल्याने प्रोफेश्वरांना लॉबीइंग करून माबो वरून पळवून लावले. इथे एक लष्कर ए गझल नावाची अतिरेक्यांची टोळी आहे त्यांच्यात एकमेकांची पाठ खाजवण्याचे आणि दुसर्‍या गटातल्या गझलकारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे व्रत इमानेइतबारे चालू असते. त्याचा बाकीच्याना उपद्रव होत नाही कारण उभयपक्षांच्या गझला अन्य कुणीही वाचतच नाही.

त्याचा बाकीच्याना उपद्रव होत नाही कारण उभयपक्षांच्या गझला अन्य कुणीही वाचतच नाही. >> पतेकी बात .
नैनं छिंदंति शस्त्राणि ( तर पाच पन्नास कवितांनी काय होणार ) असे पुटपुटत काव्य प्रकार ओलांडून पुढे जायला जमलं की मायबोली सुसह्य होते बरीच

दुसर्‍या गटातल्या गझलकारांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे व्रत इमानेइतबारे चालू असते. त्याचा बाकीच्याना उपद्रव होत नाही कारण उभयपक्षांच्या गझला अन्य कुणीही वाचतच नाही. >>>> Biggrin

Pages