Submitted by वेल on 23 May, 2014 - 06:22
भारतीय संस्कृतीला
स्त्री स्वातंत्र्य मान्य आहे.
स्वातंत्र्य ह्या शब्दामध्ये
तंत्र शब्द प्रमुख आहे.
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे
हाच मंत्र खरा आहे.
पारतंत्र्याची बेडी तोडून
मुक्त आम्हाला व्हायचे आहे
मुक्त होऊनदेखील आमचे
स्वत्त्व जवळ राखायचे आहे.
भारतीय स्त्रीची प्रतिमा
माता म्हणून स्पष्ट आहे
पत्नी म्हणून तिला मात्र
पोतेर्याचे स्थान आहे.
गृहलक्ष्मी असे म्हणून तिला
देवघरात बसवले आहे,
दारे बंद देवघराची
चावी पुरुषांच्या खिशात आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त शेवटच्या दोन ओळी खूप छान
मस्त
शेवटच्या दोन ओळी खूप छान
दोन धागे फारच मनावर घेतलेस का
दोन धागे फारच मनावर घेतलेस का गं? अस्वस्थतेतून आलेय जन्माला ही कविता बहुदा
Written way back in 1994
Written way back in 1994
मस्तच,
मस्तच,
खुप च छान.
खुप च छान.
(No subject)