पुनरागमनायच

Submitted by aschig on 23 December, 2008 - 02:40

पुनरागमनायच

(आशिष महाबळ)
(१७ मार्च २००७ चे LAMAL - विषयः प्रवास)

तो जेंव्हा यानात बसुन दिर्घिकेच्या पार दुसऱ्या टोकाला सापडलेल्या सप्राणवायु ग्रहावर जायला निघाला तेंव्हा बराच खुषीत होता. केप पॉईंट वरुन नुकतेच त्यांच्या यानाने उड्डाण केले होते आणि अजुनही ऍक्सलरेशन मोड मध्ये होते. सुरक्षेकरता म्हणुन खुर्चीला बांधलेला असल्याने विचार करणे आणि मनातल्या मनात हसणे या पलिकडे सध्या त्याच्या हातात काहीही नव्ह्ते. त्याचे अनेक वर्षांपासुनचे अवकाशप्रवासाचे स्वप्न साकारत होते. खरेतर तो हाडाचा प्राणीशास्त्रज्ञ होता. २००७ च्या सुरुवातीला एका फिल्ड ट्रीप वर गॅलापॅगोसला गेला असतांना आकाशाचा बराचसा भाग व्यापुन टाकणारा अलौकिक मॅकनॉट धुमकेतु पाहिला आणि त्याच्या मनाने अवकाश विज्ञानात (आणि अवकाशात) भरारी मारायचा चंग बांधला. नाहितरी गेले काहि दिवस प्राणिविज्ञान हे केवळ स्वत:च्या फ़ायद्याकरता ठराविकच जेनेटीक रिसर्च करणार्यांनाच ग्रॅंट्स मिळताहेत हे त्याला कळुन चुकले होते.

तीन वर्षे अतोनात मेहनत केल्यानंतर आपल्या हुशारीच्या बळावर जेपीएल मध्ये प्रवेश मिळवायला त्याला फारसे कष्ट पडले नाहित. पुढील ३ वर्षे हि ऍस्ट्रोनॉट ट्रेनिंग तसेच ईंजिनिअरींग आणि ग्रह, त्यांचे कंपोझीशन, वातावरण इत्यादि खगोल्शास्त्रिय शाखांचे ज्ञान मिळवण्यात कशी गेली हे त्याचे त्यालाच कळले नाही.

त्या दरम्यान एका मागुन एक अनेक ग्रह सापडत होते, पण काही गुरु प्रमाणे केवळ गरम हवेचे चेंडु असत, काही बुधाप्रमाणे त्यांच्या ताऱ्याच्या खुप जवळ असत तर काही थेट नेपट्चुन प्रमाणे गारेगार. एखादा ग्रह योग्य अंतरावर सापडलाच तर त्यावर प्राणवयु नसे. काही तर कोणत्याहि ताऱ्याशी संबंध नसलेले अनाथ असे प्लानिमिनोज असत.

पण एकविसाव्या शतकाच्या सुरुवातिला वर्चुअल ऑबझरवेटरी चा जन्म झाला आणि जणु काही ग्रहांचे भाग्यच उदयाला आले. व्ही.ओ. द्वारे जगातिल अद्ययावत दुर्बिणिंचा डेटा लगोलग ईंटरनेट वर उपलब्ध होऊ लागला. त्यात क्वांटम कंप्युटींग वर आधारित सर्च ईंजिन्स नि माहितिचे महाजाल हे नाव सार्थ ठरविले. ईंटरनेट पिऊन सोकावलेलि कॉलेजातिल मुल-मुलि पण नव-नवे ग्रह शोधु लागलि.

ईक्लिप्स मेथड, कलर मेथड, मय्क्रोलेंसिंग इत्यादि अनेक पद्धती वापरल्या जात होत्या. स्पीट्झर दुर्बिणिने एका ग्रहाच्या अतिलाल भागातिल स्पेक्ट्रम सर्वप्रथम मिळवले होते. त्या स्पेक्ट्रम मध्ये पाण्याची खुण न सापडल्यामुळे मात्र लोक थोडे नाउमेद झाले होते. पण २००९ पासुन केवळ पाणिच नाही तर स्पेक्ट्रम मध्ये प्राणवायु असलेले ग्रह देखिल सापडु लागले. जीवसृष्टी असायच्या शक्यते बद्दल मात्र काहिहि सांगणे अवघड होते. परग्रहावर जाणाऱ्या पहिल्याच यानात स्थान मिळाल्याने तो खुषीत होता. आधि खरेतर निर्मनुष्य यान पाठवायचे असे ठरले होते. पण पृथ्वीवरील फॉसील फ्युएलचा साठा संपत चालला होता, फ्युजन एनर्जी चा अजुन पत्ता नव्ह्ता, आणि सौर्य उर्जा अजुन पुरेश्या प्रमाणात हार्वेस्ट केल्या जात नव्हति. भरिस भर म्हणजे उरल्या-सुरल्या तेलाकरता होत असलेली युद्धे पण वाढली होती. एकुण पृथ्वी किति काळ तग धरेल ते सांगता येत नव्ह्ते. अनेक कसोट्यांद्वारे त्याचि आणि नोविकाची निवड झाली होति. त्यांच्याबरोबर अनेक प्राण्यांचा जोड्यांकरताहि जागा होति. या मुळे क्वचित त्याला आपण नोह असल्याचा भास देखिल होऊन जाई. म्हणुनच त्याने आपल्या यानाचे नाव आर्क आणि ते ज्या ग्रहावर जात होते त्याचे नाव अरारत असे ठेवले होते.

प्रवास मोठा होता. गुरु, शनि आणि युरॅनस यांच्या गुरुत्वाकर्षणीय बुस्ट चा आधार घेऊन ते दुरवर असलेल्या अरारत कडे भिरकावल्या जाणार होते. या ६ महिन्यांच्या काळानंतर ते हायबर्नेशन मध्ये जाणार होते, आणि लक्षाच्या जवळ पोचल्यानंतर रिवाईव होवुन यान उतरवणार होते. त्यांच्या मागोमाग इतर यानेहि येणार होतिच.

नोविका बरोबर असल्याने आणि यानातिल जागतेपणाचा काळ ६ महिनेच असल्याने खुप एकटेपणा जाणवायचि शक्यता नव्हति. प्राण्यांना खाऊ घालणे, त्यांचे मेडिकल चेक-अप्स करणे, व्यायाम करणे, यानातिल ईक्विअपमेण्ट्स टेस्ट करणे यात बहुतांश वेळ निघुन जाई. आणि मग नोविका बरोबर गप्पा आणि वादविवाद. आपण नीट उतरु शकु का, वातवरण खरच कसं असेल? सजीवससृष्टी असेल का? आपल्या बरोबरच्या प्राण्यांवर काय प्रभाव होइल इत्यादि. नोविका अरारत बद्दल थोडी फार निराशावादि होति, पण तो मात्र शिंपल्याच्या पेटित पडणारे एखादा दवबिंदुच आपण आहोत असे कल्पुन खुष व्हायचा. आणि पृथ्वीबरोबर रेडीओ दळण-वळण असायचेच. त्याद्वारेच त्यांना त्यांच्या लक्षाबद्दल अधिकाधिक महिती प्राप्त होत होति. तो सुर्य देखिल जी-टाईपचाच, पण ५५०० अंश सेल्शीअस तापमानाचा म्हणजे थोडा थंड होता. त्याला ६ ग्रह होते. तिसऱ्या ग्रहाला शनिप्रमाणे कडी होति, आणि अरारत होता चौथ्या क्रमांकावर. पण प्रॉब्लेम्स मात्र नेमक्या या दळण-वळणामुळेच सुरु झाले. एक तर जसे-जसे ते पृथ्विपासुन दुर गेले तसे-तसे संदेश पोचुन परत यायला जास्त वेळ लागु लागला. त्यातच इतर वस्तियोग्य अनेक ग्रह सापडले आणि पृथ्विवरिल काहि रिसोर्सेस तिकडच्या एक्स्प्लोरेशन करता वळवल्या जाणार असल्यामुळे त्यांच्यादिशेने दुसरे यान यायला बराच काळ लागणार होता हे त्यांना कळले. त्याने तर या बातम्या आणि हे बदल शांतपणे घेतले, पण नोविकाचे मानसिक संतुलन बिघडु लागले. आधिच ति धार्मिक होती, आता तर कधि कधि काम सोडुन ध्यानधारणा, पुजा इत्यादि करु लागलि.

तो जरी पुर्णत: निरिश्वर्वादि असला तरि इतरांच्या फेद बद्दल त्याला काहि प्रॉब्लेम नव्ह्ता. पण जेंव्हा जवळचे कुणि इर्रॅशनली धार्मिकतेकडे वळायचे तेंव्हा मात्र जणू त्याच्या जुन्या जखमा चिघळायच्या. ग्लोबलायझेशन मुळे भारत, मलेशिया, ब्राझिल, चिन, आमेरिका यांची भरभराट झालि होति, पण एकुणच जगातिल धार्मिक कट्टरताहि वाढली होति. दक्षिण आफ्रिकेत हिंदु-ख्रिश्चन आई-वडिलांबरोबर बालपण घालवुन, मग ऍन्टी ख्रिश्चन प्राणिशात्राचा अभ्यास करुन आणि नंतर ऍन्टी-लोकल अवकाशिय शास्त्र शिकल्यामुळे त्याचे डिव्हिनिटिशी जरा वाकडेच होते. त्यात त्यांचा काहि संबंध नसतांना एका जातीय दंगलित झालेला त्याच्या आई-वडिलांचा मृत्यु. केवळ विचारांनिहि त्याला त्रास होऊ लागायचा.

त्यामुळे जेंव्हा नोविकाने ठरल्या वेळेआधीच हायबर्नेशन मध्ये जायचे ठरवले तेंव्हा त्याला बरेच वाटले नंतर ठरल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना त्यांच्या हायबर्नेशन चेंबर मध्ये नीट सेट करुन तोहि आपल्या चेंबर मध्ये प्रदिर्घ झोपेकरता शिरला.

जेंव्हा तो बाहेर आला तेंव्हा चित्र एकदम बदललेले होते. पुढिल सर्व गोष्टि खुपच वेगाने घडत गेल्या आणि तो फक्त एका बघ्याचीच भुमिका निभावु शकला. नोविकाचा बहुदा पुर्ण तोल गेला होता आणि तिने चालकाच्या खोलीत स्वत:ला कोंडुन घेतले. आसपास पाहिले तर त्याच्या लक्षात आले कि तिने पॅरॅशुट्स उघडुन काहि प्राण्यांना पिंजऱ्यांसकट आधीच यानाबाहेर काढले होते. वातावरणातच जळुन गेली असणार बिचारी. इंटरकॉम वरुन तिला समजवायचा त्याने बराच प्रयत्न केला, पण काहि फायदा झाला नाही. नशिबाने त्याच्या पॅरॅशुटला तिने काही केले नव्ह्ते. त्याला कळले कि पृष्ठभागाच्याजवळ पोचल्यावर त्याला देखिल पॅरॅशुट वापरण्याशिवाय गत्यंतर नाही. ती वेळ जवळ येण्याला २ मिनिटेच उरली होती. तोच त्याला काचेतुन नोविकाचे पॅरॅशुट दिसले. २ मिनिटे म्हणजे अनेक किलोमिटर, ती पण नक्किच जळुन जाणार. बिचारी. पॅरॅशुटवरील प्रोटेक्टीव कॅपसुल तिने आधीच काढले होते.

वेळ येताच त्याने उडी मारली. ट्रेनिंग मध्ये शिकल्यप्रमाणे १० सेकंद थांबुन त्याने इन्नर पॅरॅशुट डिप्लॉय केले. रात्रीची वेळ होती. दुरवर यान भस्मसात होतांना एखाद्या मोठ्या उल्केप्रमाणे लकाकुन गेले. कायमचेच गेले. त्याबरोबर त्याचे नोह बनण्याची स्वप्ने देखिल. त्याचा एकांतवास सुरु होत होता. किति काळ चालेल तो कोणास ठाउक.

दुरवर ऐकु आलेल्या घंटानादाने त्याची तंद्रि भंग पावली. त्याने एक मोठ्ठा सुस्कारा सोडला. काय अर्थ होता ते सगळे आठवुन. आलिया भोगासि असावे सादर. त्याच्या सायंपुजेचि वेळ झालि होती. अरारत वरील १-फुटि अश्मयुगिनान्नि आणलेला प्रसाद खाऊन जगणेच त्याने पत्करले होते.

गुलमोहर: 

Nice Very Nice............
Nice story............
Keep It Up............
Best of Luck for ur Next Stories....
Wating for ur more stories.............

सही कॉन्सेप्ट गोष्टीचा. नाव तर खूपच आवडलं.

मस्तच जमलीय. मागच्या गोष्टीत विज्ञान जास्त होते. यात गोष्ट जास्त आहे. Happy
पण आयडिया भारीच. येऊ द्या अजून...

फारच घाईत लिहिली आहे गोष्ट. त्यामुळे शेवटची कलाटणीदेखील फार दचकवत नाही.
यावर खरेतर कादंबरी लिहिता येईल Wink

माझ्या कथा अतिलघु होतात खर्या. ही सर्वात जुन्या कथांपैकी एक आहे (पहिलीच!).
यात एकही संभाषण नाही, आणि बुजुर्गांच्या मते संभाषणाशिवाय कथा होत नाही.
वेगवेगळ्या स्टाईल्स ट्राय करणे सुरु आहे. सर्वात अलिकडची नाटुकल्या सारखी आहे - केवळ संभाषणाद्वारे प्रस्तुत (अजुन प्रकाशीत केलेली नाही). त्याआधिची जी होती त्यात बहुतांश संभाषण होते. तुमच्यापैकी काहींनी पाहिली असेल.
सापशिडी http://www.maayboli.com/node/25605

(इतक्यातल्या रंगिबेरंगी मधे प्रकाशीत केल्याने कथा या विभागात दिसत नसाव्यात. सगळ्यांचे दुवे एकत्र करायला हवे)

कथा आवडली. Happy

रच्याकने, काही र्‍हस्व-दीर्घाच्या चुका टाळत्या आल्या असत्या तर वाचताना खटकल्या नसत्या. उदा. दीर्घिका, इंजिनीअरिंग, खगोलशास्त्रीय वगैरे.
आणि 'जेव्हा', 'तेव्हा' वर अनुस्वार अजूनही देतात का? माझ्या माहितीत तरी नसावा.
चु भू द्या घ्या. Happy

पेशवा, तुला धन्यवाद म्हणायचे की नाही ते कळत नव्हते, पण तो चित्रपट माझ्या गोष्टीनंतर वितरीत झाला आहे. धन्यवाद. Happy
कोणती गोष्ट ते आठवले तर नक्की सांग.

प्रज्ञा, हो, पण तेंव्हा मी मराठी पहिलीत होतो - आता बहुदा इतक्या चुका होत नसाव्यात Wink

खुर्चीला बांधलेला असल्याने विचार करणे आणि मनातल्या मनात हसणे या पलिकडे सध्या त्याच्या हातात काहीही नव्ह्ते.>>

या वाक्याशी प्रचंड आयडेन्टिफाय झालो.

खुर्चीला बांधलेला असल्याने विचार करणे आणि मनातल्या मनात हसणे या पलिकडे सध्या त्याच्या हातात काहीही नव्ह्ते.>>

या वाक्याशी प्रचंड आयडेन्टिफाय झालो.

आस्चीग अरे तुझि गोष्ट वाचल्यावर ह्या दोन मला आठवल्या इतकेच.

ह्यां दोघांचा तुझ्या गोष्टिवर प्रभाव आहे असे मला मुळिच म्हणायचे नाही. तसे ध्वनीत झाले असल्यास मा.लि.दो.

तुझे कथानक आणि पँडोरम चे कथानक प्रचंड समांतर आहे. तसेच जीथे तुझ्या कथेचा शेवट होतो तेथुन जीएंची ती कथा सुरू होते. नाव आठवले की लिहितो.

पेशवा, मी गम्मत करत होतो Happy
तसेही प्रभाव कळत-नकळत पडतच असतात. त्या एका कारणाकरता मला Hermann Hesse चे Glass Bead Game खूप आवडतं.

म्ह्णजे ज्यांना दिर्घकथा हवी होती ते तो चित्रपट पाहु शकतात.

कथा खुप आवडली.
हो नक्कीच याची दिर्घकथा/ कादंबरी होईल.
अश्मयुगिनान्नि>> हा शब्द अश्मयुगिन सजीवांनी अशा अर्थाने आहे असे मला वाटले. ते बरोबर आहे का?

अश्मयुगिनान्नि>> हा शब्द अश्मयुगिन सजीवांनी

हो.

> म्हणजे शेवटी अश्रद्ध असूनही, दुसर्‍या ग्रहावर जाऊनही 'धर्मा'तच अडकला असं का?

हो, पण मेजाच्या दूसर्या बाजुला.