काही प्लान्स कधी कधी असे अचानक सहज फारशी पूर्वतयारी न करता ठरून जातात. मी आणि माबोकर मनोज दोघांनी गेल्या शनिवारी केलेली पुणे-सातारा सायकल राईड हि अशाच प्लानिंग न केलेल्या सफरीन्पैकी एक. शुक्रवार रात्री ९ वाजले तरी मी आपला हाफिसात कीबोर्ड बडवत होतो आणि 'उद्या कुठे जायचं का?' विचारायला मनोजचा फोन आला. पण मला काही कामाने सातार्याला सासुरवाडीला जायचं होत त्यामुळे मी तर already बुक्ड होतो. पण कोणी असेल तर सायकल ने एक attempt मारायची तयारो आहे म्हणाल्यावर मनोज पण तयार झाला. पण पठ्याने पुढचाच बॉम्ब टाकला..बोलला 'माझी सायकलची तेव्हढी सोय कर'. एव्हाना ९:३० वाजले होते, आता ह्यावेळी कोणाला फोन करावा ह्या विचारात असताना मला रोहितची आठवण झाली. रोहित कडे २ सायकलस होत्या त्यातली एक मिळण शक्य होत. रोहित ला फोन केला आणि तो त्याची Racer सायकल द्यायला लगेच तयार झाला. आता पुढची सूत्र पटापट हलवण भाग होत कारण मी अजून हिंजवडीत होतो आणि मनोज चिंचवडला.
१० ला हिंजेवाडीतून बाहेर पडून सुसाट वेगाने घरी पोचलो. घरी जाऊन bag भरून तयार व्हायला वेळ लागला आणि साधारण रात्री सव्वा अकरा ला संतोष hall पाशी मनोज नि मी भेटलो. रोहित कडे पोचायला आम्हाला १२ वाजले. उशीर झाला तरी बरोबर आणलेली कुल्फी मात्र आठवणीने खाल्ली आणि गप्पा मारत मारत १,१-३० पर्यंत झोपून गेलो. उशिरा झोपल्याने ६च्या गजरावर उठूनसुद्धा आळस आल्याने आवरून निघायला आम्हाला तब्बल ७:१५ झाले. आता पटापट pyadalमारण भाग होत आणि १-२ करत आम्ही अभिरुची च्या जवळ आलो. पण इतक्यात रोहितच्या रेसर सायकल ने आवाज करायला सुरुवात केली आणि आमच्या मनात प्रश्णचिन्ह उभ राहील. झाल !! परत फोनाफोनी करून रोहित ला बोलावून घेतलं आणि या खेपेला त्याच्याकडची Schwinn mountain Bike काढून घेतली आणि त्याला बिचार्याला त्या कुच्कुच्नार्या रेसरवर परत पाठवलं. परत एकदा आम्ही जोमाने सायकली हाणायला सुरुवात केली आणि थोडाच वेळात बायपास ला लागलो देखील.
इथे मनोज्च्या सायकलचा Tail Lamp पडला तर तो शोधायला हा पट्ठ्या परत मागे गेला. शेवटी एक्दाचे आम्हि त्या दरीपुलावर आलो तेव्हा ९ वाजले होते आमची ही आगळीक पाहून सुर्यनारायण आमच्यावर अंमळ नाराजच होते. पाणी पडाव तसा हेल्मेटमधुन घाम टपटपत होता. आज काहि खर नव्हत. गेल्या १-२ दिवसान्चा अनुभव अणि wather.com वर भरवसा थेवुन वाटेत कुठेतरी ढगाळ हवा असेल असा दिलासा देउन अम्हि पुढे निघालो. दरीपुल ओलांडला तरी मनोजचा पत्ता नव्हता. समोर एक सरकार्मान्य नीरा विक्रीच खोक दिसल. मस्त थन्ड पणिही मिळाल. तेव्ह्ध्यात मनोजपण अलाच. थोडे थाम्बुन फ़्रेश होउन कात्रज चा बोगदा पार करून पलीकडे खेड-शिवापूरकडे सायकली दामटल्या. कात्रजपर्यंत सततच्या चढला वैतागून आम्ही उतारावर सुसाट निघालो आणि हाहा म्हणता टोल नाक्यावर पोचलो. उन तापल होत आणि आता पटपट शिरवळ गाठायचं होत.
पण कापूरहोळच्या अलीकडे माझी सायकल puncture झाली..अगदी flat tyre. इथे बरोबर घेतलेल्या पंप उपयोगी पडला. थोडी थोडी हवा भारत भारत आम्ही कापूरहोळ पाशी पोचलो. वाटल कि गावात नक्कीच सायकलच दुकान असेल तेव्हा काम होऊन जाइल. पण कोणीच तयार होईना. सगळेच दुचाकी आणि चारचाकी वाले त्यामुळे सायकलमध्ये कोणीच हात घालायला तयार होईना. शेवटी आम्ही स्वत:च हे काम करायचं ठरवलं. puncture किट होतच तेव्हा गरज होती एका शेड ची आणि परातभर पाण्याची. रस्त्याबाजूच्या एका Tyre Worksच्या शेडमध्ये आमची सोय झाली. मग त्याच्याकडूनच हळूहळू कानस, कात्री(कातर) पाणी अस करत आम्ही बाकीची सामग्री मिळवली. एकाच बाजूला २ punctures होती. आम्हाला आधी वाटल कि एकच आहे म्हणून तेव्हढा प्याच मारून हवा भरली तर परत हवा गायब मग दुसरा प्याच मारला. परत चेक केल यावेळी मात्र हवा टिकून राहिली पण यामध्ये बहुमुल्य ४५ मिनिट खर्ची पडली होती. आता घाई कारण भाग होत कारण थोडाच वेळात आकाशातून विस्तव पडायची लक्षण दिसत होती.
छोटेमोठे चढ उतार पार करून ११:१५ la आम्ही शिरवळला पोचलो. ३ वडापाव मिसळ कांदेपोहे ताक असा फक्कड बेत पोटात ढकलला आणि तिथेच पुढे रस्त्याच्या डावीकडे असलेल्या झाडाखाली मस्त आडवे झालो. उन खूपच असल्याने आम्ही दोन तास तिथेच आराम करायचा प्लान केला.
शेजारीच पाण्याचा नळ होता आणि समोर एका आज्जी बाईची झोपडी. तिने 'प्रेमाने' चौकशी करून खायला पाणी प्यायला काही हव का म्हणून विचारलं आणि न मागता एक ताडपत्री दिल्ली नि म्हणाली निजा आता निवांत. "आज्जीबाई किती दयाळू" अस म्हणेस्तोवर म्ह्तारीने देवळाच बिल भरायचं म्हणत १०० रुपये मागितले. तिच्या हातावर ५० रुपये टिकवून तिला वाटेला लावलं.
खादाडी आणि २ तासांच्या विश्रांतीनंतर आम्ही मस्त ताजेतवाने झालो. पण पुढे उभा होता खंबाटकी.
घाट चढायला सुरुवात केली आणि कितीही मनाचा हिय्या केला तरी हळूहळू आमचा धीर खचला अन सरतेशेवटी घाट टेम्पोमधून पार करू असा निर्णय झाला. बरेच टेम्पो truck la हात केला पण कोणीच थांबेना तेव्हा मात्र 'काय व्हायच ते होईल पण सायकलनेच जाईन' म्हणत आम्ही परत एकदा मार्गस्थ झालो. एकदा मनाची तयारी केली कि कुठलीच गोष्ट फार कठीण नसते आणि मग इतर गोष्टी आपोआप जुळून येतात. घाट चढता चढता आकाश मस्त काळ्या ढगांनी भरून आल. मनोज आणि माझ्यात थोड अंतर पडल होत करण तो चालवत होता ती सायकल Mountain होती आणि तिची Tyres लहान होती. माझी सायकल Hybrid असल्याने मला पटपट पुढे जाता येत होत. घाटाच्या Topवर पोचलो तेव्हा दोन पोर डोंगरची मैना (करवंद) विकत होती. २-३ द्रोण भरून करवंद खाल्ली आणि समोरून मनोज मस्त एका Truckला धरून येताना दिसला
४ वाजून गेले होते पण इथून सातारा आता ४० km होत पण उतार होता. Within No Time आम्ही घाट उतरलो. पुढे भुईंजला सुमधुर उसाचा रस प्यायलो आणि सरतेशेवटी साडेसह पावणेसात च्या सुमारास आम्ही सातारी मुक्कामी पोचलो.
दुसर्या दिवशी परत येताना मनोज भाऊ टेम्पोमधून परत आले
मस्त.. मनोजचे फोटो फेसबूकवर
मस्त.. मनोजचे फोटो फेसबूकवर बघितले होते...
अरे कल्ला केलाय तुम्ही
अरे कल्ला केलाय तुम्ही लोकांनी....एवढ्या टळटळीत उन्हाचे, मे महिन्यात पुणे सातारा सायकल वर जाण्याच्या विचाराबद्दलच साष्टांग दंडवत आणि तो अंमलात आणल्याबद्दल तर आपला लकडीपूलावर जाहीर सत्कारच करावा असे वाटत आहे....
त्यात पुन्हा उशीरा निघून, सायकल पंक्चर काढून अरारारा....
अपरिमित धैर्य दाखवले आहे यात शंकाच नाही....
पुढच्या वेळी इथे सांगितलेत तर नक्कीच काही जण बरोबर येतील. (मी तर १०० टक्के)
मायला अशी राईड केली होय.. मला
मायला अशी राईड केली होय.. मला वाटले की सकाळी लवकर निघालात तुम्ही लोक.. धन्य आहात.
आता पुढचा विकांत महाबळेश्वर नक्की आणि तोसुद्धा सकाळी लवकर उठूनच..
भन्नाट त्या दिवशी पाउस पडेल
भन्नाट
त्या दिवशी पाउस पडेल असे वाटले होते.पण चक्क उन्हात सातारा गाठल कि तुम्ही.
अभिनंदन ...............
mast !
mast !
मनीष धन्यवाद, आशुच्याम्प -
मनीष धन्यवाद,
आशुच्याम्प - सत्काराबद्दल धन्यवाद !! अहो इथे आम्हि बाफ काढतोच. तसच तुम्हाला सम्पर्कातुन लिहील्पण होत मी गेल्या आठवड्यात. पुढ्ची साय्कल राइड ३१-१ ला महाबळेश्वर ची आहे. त्याला नक्कि समील व्हा. मग तुम्हाला ७-८-९ चा जन्गी प्लान कळेलच
पिन्गु किरण - धन्यवाद. आता महाबळेश्वर ड्न करायचय आता.
कमाल आहे राव तुमची. तो
कमाल आहे राव तुमची. तो खंबाट्की घाट टु व्हीलरने चढु पर्यंत नाकि नऊ येतो.... हॅट्स ऑफ ...ते पण असल्या उन्हात...
ऑस्सम !! अपडेट्स वाचत होतो.
ऑस्सम !! अपडेट्स वाचत होतो.
क्या बात है!!!
क्या बात है!!! मस्तच.
___/\____
एवढ्या टळटळीत उन्हाचे, मे महिन्यात पुणे सातारा सायकल वर जाण्याच्या विचाराबद्दलच साष्टांग दंडवत>>>>आशु +१
जबरदस्त! >तो खंबाट्की घाट टु
जबरदस्त!
>तो खंबाट्की घाट टु व्हीलरने चढु पर्यंत नाकि नऊ येतो.... हॅट्स ऑफ
+१
मस्त रे फोटो इथे दिसतील असे
मस्त रे
फोटो इथे दिसतील असे दिल्याबद्दल धन्यवाद 
>>>> समोरून मनोज मस्त एका Truckला धरून येताना दिसला <<<< हो हो अगदी, हे अस्सेच धरुन आम्हिही चढ पार करायचो, पण तसे रिस्की असते बरका, आमच्या आपल्या चौविस इन्ची सायकली असायच्या...
वाटेत बरेचदा वाटले असेल ना की कुठून या फन्दात पडलो? पण त्या निराशेवर मात करणेच तर अशा उपक्रमातुन शिकायचे असते. माणूस शेवटी स्वतःवरच करवादू लागतो, पण थोडा वेळ गेला की पुन्हा उत्साहाने उठू पहातो, हे पुन्हा उत्साह अन्गी आणण्याचे बळ यावे, सराव व्हावा म्हणून तर अशा ट्रीपा...... कोण किती वेळात आल गेल असल्या रेस करता नाही!
पुढील उपक्रमाकरता शुभेच्छा!
मस्त.
मस्त.
माझ्याकडून साष्टांग दंडवत
माझ्याकडून साष्टांग दंडवत तुम्हा दोघांना.
धन्य आहात... : भर उन्हात
धन्य आहात... :

भर उन्हात सायकल चालवुन ७० किमीची मजल मारलीत तुम्ही!! ग्रेट!
मस्तच रे पठ्ठ्यांनो
मस्तच रे पठ्ठ्यांनो
>>>>पण तसे रिस्की असते
>>>>पण तसे रिस्की असते बरका,
सहमत.
एकूण अंतर ११० किमी झाले.
परत येताना मला खंबाटकी आणि कात्रज घाट उतरायचा होता म्हणून
सातारा - पाचवड - टेंपोमधून,
पाचवड ते खंडाळा - सायकल - ३० किमी
आणि
नंतर पुन्हा खेड शिवापूर ते कोथरूड असे २० किमी हे ही अंतर सायकलने पार केले.
पुणे सातारा प्रवासाचा एलेव्हेशन लॉग,
यातला पहिला टॉवर कात्रज घाट तर दुसरा टॉवर खंबाटकी घाट आहे.
ग्रेट, ग्रेट .........
ग्रेट, ग्रेट .........