आयुष्याने दिलेल्या पचपचीत अनुभवांमध्ये मीठमसाला टाकून त्या किस्सेकहाण्या लोकांना सुनवतोय ! हसतोय आणि हसवतोय ! येण्यार्या आयुष्यात काही तरी सुरस आणि चमत्कारीक घडेल, बस्स या आशेवर जगतोय ! पण आज मात्र मी जे सांगायला जाणार आहे त्यात असत्याचा अंश कणभर सुद्धा असणार नाही. जेवढे पिळाल तेवढी त्यातून सत्याचीच धार बाहेर निघेल. आयुष्याने दिलेला एक अनुभव जसाच्या तसा मी आज तुमच्याबरोबर शेअर करायला जात आहे... का? ते मला स्वतालाही ठाऊक नाही...
तर हि गोष्ट आहे इसवीसन ..,,.. चला राहूद्या थेट प्रसंगावरच नेतो
**********************************************************
**********************************************************
वालचंद कॉलेज ऑफ ईंजिनीअरींग, सांगली !
वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली.
पुर्ण कॉलजभरात हं.
त्यातही आम्हा मुंबईकरांना आपल्या स्टाईलच्या वाटतील अश्या शोधायला गेले की त्यातल्याही निम्म्या गळाल्या.
‘बेगर्स डोण्ट हॅव चॉईस’ असे म्हटले तरी आम्ही ‘लोफर्स हॅव चॉईस’ कॅटेगरीतले होतो.
असो, तर त्यात ज्या होत्या त्यांची मग खूप चलती असायची. खास करून वॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, चॉकलेट डे, रोज डे, अश्या स्पेशल दिवशी गुलाब असो वा चॉकलेट, त्यांचा पदर फाटेस्तोवर भरून जायचा.
म्हणून मी त्या गर्दीतला एक होणे टाळायचोच.
निदान तसा आव तरी आणायचो.
तरीही एकदा एका मुलीला चॉकलेट देण्याचा योग आला. तिचाच हा चार ओळींचा किस्सा.
तर मी इतर मुलींसारखे या मुलीकडेही बघायचो, गंमत म्हणजे तिला सुद्धा माझे बघणे आवडायचे.
तर अश्याच एका चॉकलेट डे च्या दिवशी अचानक सामोरी आली.
संध्याकाळची वेळ, कॉलेजचाच एक पॅसेज, मी एकटाच कुठेतरी जात होतो तर ती देखील दिवसभराची धमालमस्ती आटोपून एकटीच कुठूनतरी येत होती.
माझी नजर नेहमीसारखी तिच्या चेहर्यावर खिळली अन तिची नजर नेहमीसारखीच माझ्या नजरेत अडकली.
जसे त्या चिंचोळ्या पॅसेजमधून जाताना आम्ही एकमेकांच्या जवळ आणि अगदी सामोरे आलो तेव्हा तिला हॅपी चॉकलेट डे म्हणून विश करणे मला भागच होते.
नव्हे तसे मी करावे अशी इच्छा तिच्या चेहर्यावरचे भाव पाहता समजून येत होती.
पोकळ विश कसे करायचे म्हणून मी खिसे चाचपले तर एक छोटेसे इकलेअर चॉकलेट निघाले.
सकाळी रूममेटने फ्रेंडशिप डे विश करत दिलेले एक’च एक रुपयाचे एक्लेअर. अर्थात यारदोस्तांमध्ये हेच बजेट असते. डेरीमिल्क आणि फाईव्हस्टार कॅडबर्यांचे बजेट केवळ मुलींसाठीच राखून ठेवलेले असते. पण देण्यामागची भावना महत्वाची नाही का, आणि आता तेच ईक्लेअर वेळेला केळं म्हणत कामाला येत होते.
ते तिच्या समोर धरून हॅपी चॉकलेट डे विश केले.
तसे हसली, आणि म्हणाली, "कसे घेऊ? हात तर फुल पॅक आहेत."
अरेच्च्चा खरेच की, आता कुठे माझी नजर तिच्या हातांवर गेली. दोन्ही हातांची ओंजळ करून उभी होती आणि ती ओंजळ फुल्ल ऑफ चॉकलेट्स होती.
अर्थात त्या ढिगार्यावर माझे छोटेसे इक्लेअर बॅलेंस करत ठेवणे काही अवघड नव्हते, पण माझेही या बाबतीतले प्रसंगावधान आणि हुशारी बघा,
मी उत्तरलो, "तू फक्त आ कर, मी टाकतो तोंडात"
गंमत केली हं.... असे मी पुढे बोलणार इ त क्या त तिने ऑं वा स ला सुद्धा..
मी थरथरतच एक्लेअर कसे बसे सोडले आणि टाकले तिच्या तोंडात. तिच्या ओठांना माझ्या बोटांचा स्पर्श होऊ नये ईतपत काळजी घेत बास्केटबॉल सारखेच टाकले, ते थेट तिच्या घशात जाऊन ठसका लागला नाही हेच माझे नशीब !
बस्स मग काय, ती आपल्या रस्त्याला, मी आपल्या रस्त्याला. जाताना पलटून मात्र चुकूनही पाहिले नाही. हि आपली स्टाईलच म्हणा ना. अश्या प्रकरणात घाई नडते हा गुरुमंत्र मी खूप लहानपणीच शिकलो होतो. या गुरुमंत्रानेच माझा कित्येक प्रेमप्रकरणात घात केला ती गोष्ट निराळी.
असो, तर या चॉकलेट डे चा हा किस्सा इथेच संपला...........................
नाही !
इथेच संपायचा असता तर नक्कीच हा लिखाण प्रपंच नसता.
**********************************************************
**********************************************************
दुसर्या दिवशी होता रोज’ डे. आता रोज रोज काय नशीब उघडत नाही म्हणतात, तरीही चुकूनमाकून उघडलेच तर कालच्यासारखे पुन्हा खिसे चाचपडून फूल न फुलाची पाकळी शोधावी लागू नये म्हणून मी सकाळीच मालकांच्या बागेतली गुलाबाची कळी खुडून घेतली. कोणाला द्यावे लागेल की नाही याची खात्री नसताना फुललेल्या टवटवीत गुलाबाला ५ रुपये खर्च करण्याऐवजी हे फुकटात पदरी पाडून घेतलेले सोयीचे समजले.
तशीच वेळ आली तर, "सखे, नुकत्याच उमलणार्या गुलाबाच्या कळीप्रमाणे आपल्यातील मैत्रीचे नातेही असेच उमलू दे" हि पंचलाईन सोबतीला तयार होतीच. समोरची पार्टी आपल्या फेवरमध्ये असेल तर कितीही पाणचट विनोद का असेना त्यावर हसले जाते वा कितीही दवणीय चारोळी का असेना हाऊ रोमॅंटीक म्हटले जाते हा अनुभव.. स्वत: अनुभवलेला नाही तर इतरांचा पाहिलेला.
दुपारपर्यंत तरी ते कळीचे फूल कोणाला द्यायचा योग आला नाही. हा योग संध्याकाळपर्यंत आला नाही तरी काही बिघडत नाही अशी एक पराभूत मानसिकता वयात आल्यापासूनच अंगी बाणवली होती. दुपारी त्या फूलावरच्या दोनचार सुकलेल्या पाकळ्यांचे आवरण बाजूला सारून आतला टवटवीतपणा शाबूत आहे याची खात्री तेवढी करून घेतली.
कालची माझी चॉकलेट क्वीन आज कुठे दिसली नव्हती. खरे तर हुरहुर याचीच होती की ‘ती’ माझे फूल स्विकारेल का. किंबहुना ते तिला देण्यायोग्य स्थिती वा संधी मला आजच्या दिवसभरात उपलब्ध होईल का आणि झालीच तरी मला ते धाडस जमेल का?
कालचा किस्सा अजून रूममेटला किंवा ईतर कोणा मित्रांना सांगितला नव्हता. मुद्दामहूनच लपवला होता. कारण काही अतिउत्साही मित्र अंड्यातून जीव उमलायच्या आधीच त्याचे पार आमलेट करून टाकतात, म्हणून हि खबरदारी. आज तिने माझे फूल चारचौघांसमोर स्विकारलेच तर मात्र काही लपून राहणार नव्हते ना लपवण्याची गरज असणार होती.
अखेर ती वेळ आली.
विद्यार्थ्यांमध्ये लाडके आणि लोकप्रिय बनायला सारेच शिक्षक अश्या खास दिवशी लवकर सोडतात. खास करून दुपारच्या सत्रात कोणी फारसे ताणून धरत नाही. ज्यांच्यात काहीतरी घडवायची धमक असते अश्या निवडक प्रेमवीरांचे सकाळीच काय ते घडून झालेले असते. पण मुंबई असो वा सांगली, जिथे तिथे आमच्यासारख्या ताटकळलेल्यांचेच प्रमाण जास्त असल्याने दिवसअखेरीस सुद्धा बर्याच घडामोडी घडणे बाकी असतात. एकाचे बघून दुसर्याची हिंमत वाढते आणि दुसर्याचे बघून तिसर्याची. या साखळीत आपणही कुठे फिट होतो का हे सारेच चेक करत असतात. मी देखील आपले नशीब आजमवायला म्हणून कॉलेजच्या प्रांगणात जमलेल्या घोळक्याचा एक भाग झालो.
जिथे मी उभा होतो तिथून ती मला दिसत होती, पण जिथे मी उभा होतो तिथून मी तिलाच काय कोणालाही दिसलो नसतो. पण सुरुवातीला हेच योग्य होते. लांबूनच तिचे निरीक्षण चालू होते. मूड तिचा हसरा खेळकर होता. ते पाहून माझा आत्मविश्वास वाढत होता. जणू काही माझ्याच विचारांत हसत होती. हळूहळू दिवस मावळू लागला, उन्हे उतरू लागली, गर्दी पांगू लागली. आता मला लपायला फारशी जागा नव्हती, तशी त्याची गरजही नव्हती. दोनचार मित्रांचे टोळके सोबतीला घेऊन मी तिच्या नजरेस पडेल अश्या जागी येऊन स्थिरावलो. काल तिचे हात चॉकलेटने भरले होते पण आज मात्र तिच्या हातात एकही फूल नव्हते. अर्थात हे चांगलेच होते. अन्यथा आजही ती मला "तुझे फूल कसे स्विकारू राजा, माळ की तूच आपल्या हाताने माझ्या केसांत" असे खचितच बोलणार नव्हती. उलट अजूनपर्यंत तिने कोणाचे फूल स्विकारले नाही याचा अर्थ नक्कीच मला वाव होता. अन ईतक्यात तिची नजर माझ्यावर पडली...
मी तिला पाहिल्यानंतर तब्बल पाऊणएक तासाने ती मला बघत होती, आमची नजरानजर होत होती, अन होताच काय ते ओळखीचे भाव. पहिल्यापेक्षाही दाट आणि गहिरे. माझ्याकडे पाहतच तिने आपल्या मैत्रीणीला खुणवले आणि दोघी जणी माझ्या दिशेने चाल करून येऊ लागल्या. माझी नजर पहिल्यापासूनच तिथे खिळलेली असल्याने माझ्या मित्रांच्याही ते लक्षात आले होते. आणि आता तिचे असे स्वताहूनच माझ्या दिशेने चालत येणे. फूल नक्की मी तिला देणार होतो की तिच्या मनातच मला द्यायचा विचार होता. छे, काहीतरीच काय, कसे शक्य होते. हे असे काही अदभूत घडणे शक्य मानले तरी तिचे हात तर रिकामेच होते. ना तिच्या मैत्रीणीच्या हातात काही होते. सर्व शक्यतांचा विचार करेपर्यंत ती माझ्या समोर येऊन उभी राहिली सुद्धा आणि माझ्या आ वासलेल्या तोंडानेच मी कसेनुसे हसलो. बस्स क्षणभरापुरतेच. कारण दुसर्याच क्षणी माझ्या काहीही ध्यानीमनी नसताना एक खाडकन मुस्काटात पडली. हो, तेच कोमल हात ज्यात मी काही काळापूर्वी फूल टेकवायचा विचार करत होतो, ते माझ्या गालफडावर अस्ताव्यस्त पसरले. नाही म्हणायला प्रतिक्षिप्त क्रियेनुसार मी चेहरा थोडा मागे सरकावला, पण परीणामी ती चापट डाव्या डोळ्याच्या कडेला चाटून गेल्याने त्यातून नकळत पाण्याची धार लागली. काही दिर्घ श्वास घेत मी नाकाडोळ्यातून येणारे पाणी थांबवायचा निष्फळ प्रयत्न करू लागलो कारण हाताने पुसायचा पर्याय खचितच नव्हता. तिच्यावर रागवावे, चिडावे, शांत शब्दात तिला याचे कारण विचारावे वा उलटून तिच्याही एक ठेऊन द्यावी. या पैकी काहीही ठरवायच्या आधीच ती माझ्या हातात कसलासा बोळा कोंबून आल्यापावली नाहीशीही झाली.
पुढचा किती तरी वेळ मी त्या हातातल्या चॉकलेट कव्हर कडे बघत होतो. बहुधा मी काल तिला दिलेल्या इक्लेअरचेच असावे. ते तिने असे परतवून जावे. नक्की काय तिला आवडले नव्हते. माझे तिला चॉकलेट भरवणे. तिनेच तर ‘ऑ’ केले होते. कि ती निव्वळ जांभई होती, जी योगायोगाने त्याच वेळी आली होती आणि मी त्याचा चुकीचा अर्थ काढला होता. जेवढी शोभा झाली तेवढी पुरेशी होती. ना मी तिला याबाबत काही विचारायला गेलो, ना ती मला कधी सांगायला आली. पुढे सेमीस्टर गेले, वर्ष सरले, पण त्या थप्पड की गूंज कायम मनात घर करून राहिली. त्यापेक्षाही त्यामागचे कधीच न उलगडलेले कारण.
या प्रकरणानंतर मला त्या वर्षभराच्या वालचंदमधील वास्तव्यात कधीच कुठल्याच मुलीने चारा टाकला नाही. ना कोणत्या मुलीने मी टाकलेले दाणे टिपले. त्याच्या पुढच्याच वर्षाला आम्हा मुंबईकरांना ट्रान्सफर मिळून सारे मुंबईच्या वीजेटीआय आणि सरदार पटेलला परतलो आणि हा वालचंद अध्याय तिथेच संपला. जे एका अर्थी बरेच झाले.
परंतु,
पिक्चर अभीभी खतम नही हुआ मेरे दोस्त ....
**********************************************************
**********************************************************
दोनेक वर्षांत कॉलेज संपले. नोकरीला लागलो. सेटल झालो. नवीन गर्लफ्रेंड मिळाली. मला नव्हे तर प्रत्येकालाच. काही मित्रांची लग्नही झाली. तर कोणाची ठरली. अश्याच एका मित्राचे लग्न ठरल्याची पार्टी करायला म्हणून मग आम्ही बसलो होतो. ईथेही बारचे नाव मुलीच्या नावाप्रमाणेच गुप्त राखतो. लग्नाची पार्टी म्हणून साहजिकच लग्नाचे विषय, पोरींचे विषय, आजवर केलेल्या भानगडींचे विषय. कॉलेजच्या आठवणी उगाळल्या जात होत्या आणि त्या आठवणींचा काटा सरकत सरकत पुन्हा एकदा माझ्या थपडेवर स्थिरावला. मी सोडून सारेच फुटेस्तोवर हसायला लागले. त्या हसण्याहसण्यातच माझ्या तेव्हाच्या रूमपार्टनरला चढलेली दारू बोलायला लागली....
आठवतेय ते चॉकलेट ... जे मी तिला दिलेले ... जे सकाळी माझ्या रूमपार्टनर ने फ्रेंडशिप डे विश करत माझ्या हातात ठेवले होते ... जे मी तेव्हा न खाता खिशात कोंबले होते .. आणि तेच ते चॉकलेट पुढचा मागचा कसलाही विचार न करता तिच्या तोंडात टाकले होते......................... ते नकली होते !
इक्लेअरच्या वेष्टणात गुंडाळलेले, बाहेरून चॉकलेटसारखेच दिसणारे, आतून चवीला मात्र अत्यंत कडवट आणि तोंडात घेताच थुंकून टाकण्याच्या लायकीचे होते. त्याची चव काय असावी याची कल्पना न केलेलीच बरी कारण त्याचा परिणाम मी पुरेपूर भोगला होता.
खाडकन मुस्काटात मारायची पाळी आता माझी होती. तेव्हा माझ्या हातातले गुलाब हलले होते आज मी त्याच्या म्हणजे माझ्या मित्राच्या हातातील नारंगी हलवली होती. काही प्रमाणात उतरवलीही होती.
कित्येक वर्षानी त्या घटनेचा बदला म्हणून मित्राला मारलेली एक पुरेशी सणसणीत चपराक नशेत असल्याने त्याला फारशी जाणवलीही नसावी, पण मला मात्र त्यातून कसलेसे समाधान मिळाले होते. ‘उस’ थप्पड की गूंज आता केवळ माझ्या एकट्याच्याच कानात वाजणार नव्हती. त्यात मी मित्रालाही त्याचा वाटा व्यवस्थित पोहोचवला होता.
पण तरीही ते समाधान अपुर्णच होते.........
आज दोनचार संकेतस्थळांवर मी लिहितो. चारचौदा लेख झालेत माझे. तीसचाळीस लोक ते वाचतात. आणखी शेदोनशे लोकांपर्यत ते लिखाण पोहोचवतात. असेच हा लेखही कधीतरी इच्छित स्थळी पोहोचेल, बस्स याच आशेवर हा लिखाण प्रपंच.
कुठेतरी, कुणालातरी, अरेरे... असे जेव्हा आतून, अगदी मनापासून वाटेल, तेव्हाच मिळेल मला माझे पुर्ण समाधान ..!
- तुमचा अभिषेक
ऑल द बेस्ट. बरं का मस्त
ऑल द बेस्ट. बरं का
मस्त लिहिलय
पण लिहलय मस्त. मजा आली.
पण लिहलय मस्त. मजा आली.
मस्त लिहिलयं
मस्त लिहिलयं
मस्त!
मस्त!
छान लिहिलय.
छान लिहिलय.
छान लिहिलय.....
छान लिहिलय.....
(No subject)
(No subject)
अपने के आवड्या आय इमॅजिन्ड
अपने के आवड्या
आय इमॅजिन्ड (ड सायलेंट आहे )
(No subject)
(No subject)
तुला सम्पुर्ण समाधान मिळो ही
तुला सम्पुर्ण समाधान मिळो ही सदिच्छा, तथास्तु
कहानी मे जोरदार ट्विस्ट
कहानी मे जोरदार ट्विस्ट है.
आवड्या.
Mastch lihilay...
Mastch lihilay...
मस्तय.. त्यात वालचंदमधला
मस्तय.. त्यात वालचंदमधला किस्सा म्हटल्यावर तर अजूनच आवडलं
कथा तर फारच आवडली...
कथा तर फारच आवडली... वाल्चंदची आहे म्हणल्यावार आवडणारच!
असो पण खोटे इक्लेअरचे चॉकलेट मिळू शकते हे माहीत नव्हते...
पण - "वालचंद सांगली म्हटले की मोजून सात आठ च सुंदर मुली" हह्या वाक्यातील आकडे चुकले आहेत असे वाटते! चूक ़ओणत्या बजूने झाली आहे ते मी गुलदस्त्यामधेच ठेवतो.
>>>>गंमत केली हं.... असे मी
>>>>गंमत केली हं.... असे मी पुढे बोलणार इ त क्या त तिने ऑं वा स ला सुद्धा..
मी थरथरतच एक्लेअर कसे बसे सोडले आणि टाकले तिच्या तोंडात. तिच्या ओठांना माझ्या बोटांचा स्पर्श होऊ नये ईतपत काळजी घेत बास्केटबॉल सारखेच टाकले, ते थेट तिच्या घशात जाऊन ठसका लागला नाही हेच माझे नशीब !<<<
हा पॅरा मी अगदी इमॅजिन केला. व हसले.
सर्व दृष्ये आली कि
सर्व दृष्ये आली कि डोळ्यासमोर.. ते चॉकलेट तोंडात टाकल्याचे
आवड्या.
आवड्या.
छान लिहिलय. लेखकाच्या भावना
छान लिहिलय.
लेखकाच्या भावना आणि लेखाचा उद्देश पोहोचला. त्यासंदर्भात - मी आजच आमच्या एच्.आर. मधे चौकशी करते बरं की वालचंद, सांगली मधल्या किती जणी आणि कुठल्या जणी इथे आल्या आहेत त्याची आणि त्यानुसार हा लेख इच्छित स्थळी पोहोचलाय का ते सांगते इथेच. (स्माइली टाइपली जात नाहिये, तेव्हा समजुन घ्या की मी हसतेय ते)
चूक ़ओणत्या बजूने झाली आहे ते
चूक ़ओणत्या बजूने झाली आहे ते मी गुलदस्त्यामधेच ठेवतो.
>>>>>>>.
सुसुकू, ज्या भयाने आपण हा आकडा गुलदस्त्यात ठेवला त्यावरूनच कोणत्या बाजूला जायचे ते समजतेय
आशिका,
जर खरेच हा लेख इच्छित स्थळी पोहोचणार असेल तर मी दुसरा लेख लगोलग लिहायला घेतो, हे तरी बरेच गंमतीत घेण्यासारखे आहे वा किमान लिहिले तरी तसे आहे पण खरा पोहोचवण्यासारखा ट्रॅजेडीने ओतप्रोत भरलेला किस्सा मी अजून मनातच दाबून बसलो आहे
माझ्या दुखात आनंदाने सहभागी होणार्या सर्व प्रतिसादांचे धन्यवाद
हे सर्व वाचून मला खूपच हसायला
हे सर्व वाचून मला खूपच हसायला येतं आहे, त्याबद्दल सॉरी!
हसायला येत आहे तर सॉरी
हसायला येत आहे तर सॉरी कश्याला माझा कुठे देवदास झालाय या प्रकरणानंतर
(No subject)
खुपच मस्त लेख आहे हा. मज्जा
खुपच मस्त लेख आहे हा. मज्जा आली वाचुन.
नेहमीप्रमाणे मस्तच. आवडल.
नेहमीप्रमाणे मस्तच. आवडल.
खुप मस्त. i m also from
खुप मस्त. i m also from वालचंद
.'माझा कुठे देवदास झालाय या
.'माझा कुठे देवदास झालाय या प्रकरणानंतर.......... मेले हसून हसून!!!!!!!!!!
मस्तय!!!
मस्तय!!!
अभिषेक.. अशी स्वतःला
अभिषेक.. अशी स्वतःला मिळालेल्या गोष्टीची टोपी केली ना की अशीच गम्मत होऊ शकते..
Pages