आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते. त्यामुळे माती रस्त्यवर येत नाही.
डांबरी रस्ते पाण्याच्या संपर्कात आले कि खराब होतात असे सांगतात. BMC / TMC चे नामवंत अधिकारी !!
अक्खा घोडबंदर रोड आणि त्याच्या शी संलग्न असलेले रस्ते - मानपाडा, वसंत विहार, टिकुजीनी वाडी, बालकुम , माजिवडा , वाघबीळ , आझाद नगर, कोलशेत आणि अजून किती तरी ठिकाणे . मुख्य GB रोड आणि या सर्व गल्ल्या सर्वत्र हिरवाई पसरलेली असते.
पण TMC ला हे बघवत नाही. खाबू गिरी करण्या करता कोणाच्या तरी सुपीक डोक्यातून कल्पना निघाली कि हे हे गवत , छोटी झुडुपे काढायला पाहिजेत . मग काय. सगळीकडे काही माणसे हे गवत काढायच्या मोहिमेवर. यामुळे होते काय ? हे गवत माती धरून ठेवते. गवत काढल्यावर जेव्हा जोरात पाउस पडतो तेव्हा माती रस्त्यावर यायला लागते , पाण्याच्या प्रवाह बरोबर. आणि मग हे सतत होत च राहते. संपूर्ण पावसाळा भर. माती रस्त्यवर आली कि रस्ता वर चिखल , रस्ता जास्त वेळ ओला . डांबर लवकर खराब होणार. TMC चे लोक खुश कारण लगेच नवीन टेंडर काढायची संधी.
किती तरी वेळा मी या लोकांना मोकळ्या मैदानातून झाडे , पाचोळा, गवत उपटून त्यांच्या टेम्पोत भरताना बघितले आहे. मजा आहे नाही ? भर गवत , पाला पाचोळा टेम्पो मध्ये, लगाव बिल TMC ला. फुकटचा पैसा कंत्राट दाराला .
एकीकडे TMT बस सर्विस या लोकांना डोईजड होते असे म्हणतात आणि दुसरीकडे हा असा पैसा वाया घालवायचा.
आपण इथे काहीच करू शकत नाही. पण आशा करू या कि हा संदेश त्या खाबू लोक पर्यंत पोचेल आणि या वर्षी तरी हा प्रकार होणार नाही.
ठाणे महानगर पालिका आणि तिचे खाबुगीरीचे नवे फंडे
Submitted by अभि१ on 21 May, 2014 - 09:19
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून एका ठिकाणी
अजून एका ठिकाणी खाबुगिरी
गावदेवी मैदानात एक मोठी बिल्डिग बांधून ठेवलीय , तिथे भाजीबाजार हलवणार म्हणे. शाहू मार्केट बांधले ते ओस पडलेय तरीपण हे गावदेवी ला नसते धंदे कशाला ? कोणीही भाजीवाले तिथे कधीच जाणार नाहीत हे स्पष्ट आहे. जनतेच्या हिताची थोडीतरी काळजी असती तर इथे ३/४ मजली इमारत बांधायची - कार , बाईक पार्किंग करता. पण ते केले तर यांची रोजची कमाई जाइल ना. ठाण्यात रोज RTO ची लोक फिरत असतात , गाड्या , बाईक उचलायच्या आणि तोडपानी करायचे. रोजच १ लाखाचा तरी धंदा नक्कीच होत असणार . RTO कडून नक्कीच काही तरी मलई TMC च्या लोकांना , नगरसेवकांना मिळताच असणार. मग लोकांची सोय करून आपल्या पोटावर कशाला मारून घ्यायचे ?
गवत काढतात वगैरे त्या मागे
गवत काढतात वगैरे त्या मागे मच्छर जास्त होउ नये हे एक कारण असते.
तूम्ही माहिती आधाराखाली हे
तूम्ही माहिती आधाराखाली हे कंत्राट कुणाला दिले, कितीला दिले वगैरे माहिती मिळवू शकता. गवत तसेच ठेवल्याने रस्त्याचे काही नुकसान होते का, यावर एखाद्या इंजिनीयरचे मत घेऊ शकता. आणि हे दोन्ही प्रसिद्ध करू शकता.
मच्छर गवतात होतात ? कि
मच्छर गवतात होतात ? कि साचलेल्या / खराब / गटारी पाण्यात ?