Submitted by धानी१ on 15 May, 2014 - 07:23
मी यावर्षाच्या अखेरीस अट्लन्ट येथे शीफ्त होणार आहे. नवरा आय. टी कम्पनीमध्ये असल्याने मुक्काम जवळ्पास २-३ वर्ष असेल. मला येथिल एरिया बद्दल कहीच महीति नाही. कोणी मदत करू शकेल क? अट्लान्ता मध्ये कॄष्णवर्णीयान्चे प्रमाण जास्त असल्याने इथले कही भाग सेफ नाहीत असे आइकले आहे. या गोष्तित कित्पप तथ्य आहे? येथे रहाण्यासाठी कुठले भाग सेफ आहेत. भारतीय उत्पादने कुठे मिळतत आणी कुठली. मेडिकल facilities कष्या आहेत?
आणी सर्वात महत्वचे म्हणजे भरतीय कुठल्या भागात असतत. कुणी माबोकर आहे इठे?
धन्यवाद
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल मी हे गप्पन्च पान
काल मी हे गप्पन्च पान केल्यावर मला कही प्रतिसाद दिसत होते. आज सगले गायब आहेत. अस का बरे झले?
धानी, दिवा दिला म्हणजे लाइटली
धानी, दिवा दिला म्हणजे लाइटली घ्या असा अर्थ होतो. असो.
धानी१, अहो कोणत्या शहरात ते
धानी१,
अहो कोणत्या शहरात ते लिहा.कंपनि तर्फे तुम्ही येत आहात्,याचा अर्थ्,तुमचा अधि बरेच लोक तिथे काम हि करत अशणार (शक्यतो क्लायंट एकच असल्यामुळे),शिवाय दुसर्या कंपनिकडून ही.त्यामुळे एकदा येऊन पोचलात कि आपोआप कळेलच.
तुम्हाला दुखवण्याचा हेतु नाहिये.तुमचि उत्सुकता,थोड नर्वस झाला असालच्,हे सगळ मि समजु शकते.पण अमेरिकेला येण म्हणजे काहि मोठ रॉकेट सायंस उरलेल नाहिये.
भारतीय उत्पादने काय मिळुनच जातिल.आगदिच काहि नाहि तर,अमॅझोन.कोम वर हिंग हळदिपासुन सगळ सामान ऑर्डर करता येत.
अट्लान्ता मध्ये कॄष्णवर्णीयान्चे प्रमाण जास्त असल्याने इथले कही भाग सेफ नाहीत असे आइकले आहे.>>> हे तुम्हाला,तिथे गेल्यावरच नीट कळेल.आणि सगळेच काहि अंगावर धावुन येत नाहित.उगाच काळजि नको.
थंडीत येत आहात, तेव्हा ऊबदार कपडे (जॅकेट वगरे) आणा.ते हि होटेल ला पोचेपर्यंत कारण्,भारतातले स्वेटर्,जॅकेट इथे अपूरे ठरतात.इथे येऊन नवीन घ्यावेच लागतील.
बरेच ऑनलाइन भारतीय फोरम असतात,प्रत्येक राज्यासाठि ही असतात.तिथे हि नोंदणी करून विचारु शकता
बाकि, अटलांटावासी व जाणकार अजून सांगतीलच
गोपिका तुमच्या प्रतिसादबद्दल
गोपिका तुमच्या प्रतिसादबद्दल धन्यवाद. अमेरिके मध्ये येण हे रॉकेत सयन्स नाही हे मह्तियात मला. मात्र. तिक्डे आल्यावर लगेच चारचाकी हातशी नाही आणी कम्पनी accomodation फारतर महीन्याभराचे असेल आधी महीती असलेलि उत्तम म्हनून विचारले.
परवा पण एकदा प्रतिसाद दिला
परवा पण एकदा प्रतिसाद दिला होता.आज परत देते…
अट्लान्ता मध्ये कॄष्णवर्णीयान्चे प्रमाण जास्त असल्याने इथले कही भाग सेफ नाहीत असे आइकले आहे.>>
असे काही भाग आहेत इथे पण आपण तिथे जाण्याची फारशी वेळ येत नाही.रात्री डाऊनटाऊनमध्ये थोडी खबरदारी घ्यावी.पण फार काळजी करण्याची आवश्यकता नाही.
रहाण्यासाठी कुठले भाग सेफ आहेत.>>तुमचे कामाचे ठिकाण माहित असेल तर ह्या प्रश्नाचे नीट उत्तर येता येईल.
भारतीय उत्पादने कुठे मिळतत आणी कुठली.>> पटेल स्टोअर्स ब्रदर्स्,चेरियन स्टोअर्स अशी मोठी दुकाने डिकेटर भागात आहेत.रोजच्या वापरातल्या स्वंयपाकातील सगळ्या वस्तू तिथे मिळतात.तिथे काही देशी रेस्टॉरंट्स पण आहेत.
मेडिकल facilities कष्या आहेत? चांगल्याच आहेत.कोणत्याही भागात राहिलात तरी डॉ.ची ऑफिसेस आजूबाजूला असतातच.
आणी सर्वात महत्वचे म्हणजे भरतीय कुठल्या भागात असतत. >> अल्फारेटा,मॅरिएटा,डनवूडी,सँडीस्प्रिंग्स वगैरे ह्या भागात बरेच भारतीय रहातात.
हातात गाडी नसेल तर मार्टा(लोकल ट्रेन्,बसच्या) रुटवरचे ठिकाण रहाण्यासाठी निवडता येईल.
ही वेबसाईट पहा http://www.itsmarta.com/
अजून काही माहिती हवी असेल तर नक्की विचारा.
रच्याकने बोटॅनिकल गार्डनच्या धाग्यावर तुमचाच प्रतिसाद आहे का? काही महिन्यांपूर्वी अटलांटाला येऊन गेलो म्हणून?
तिक्डे आल्यावर लगेच चारचाकी
तिक्डे आल्यावर लगेच चारचाकी हातशी नाही आणी कम्पनी accomodation फारतर महीन्याभराचे असेल आधी महीती असलेलि उत्तम म्हनून विचारले.>>>
इथे प्रत्येक होटेल मध्ये फ्री वाय-फाय असतेच जेणेकरून तुमच्या लॅप्टोप वर इंटरनेट सुरु होइल.तिथे रिसेप्शन मध्ये विचारलात तरि टॅक्सि चि माहिति मिळूशकते.महिनाभर म्हणजे भरपूर आहे.काळजि नको.आणी तुमच्य यजमांचे कलीग्ज घरांबद्दल माहिती देतिलच.
अजुन काहि हव असेल तर विचारा किवा विपू करा
हा धागा "जॉर्जिया"च्या ग्रूप
हा धागा "जॉर्जिया"च्या ग्रूप मधे हलवला आहे. या ग्रूपमधे तुम्हाला योग्य ते मायबोलीकर सापडतील.
पूर्वा, प्रतिसादबद्दल
पूर्वा,
प्रतिसादबद्दल धन्यवाद. हो येउन गेले आहे मात्र १ महिनाभार होते. मत्र त्याकळाअत मझ्या लहान बाळाचे नुकतेच निधन झाल्याने मनस्थिति चन्गलि न्हवति. त्यामुळे long term रहाण्याच्या द्रुष्तीने विचार केला नाही. फक्त एक चेऩ्ज म्हणून आलो होतो.
मझ्या नवर्याच ऑफिस हे सीएन एन सेन्टर जवळ आहे. त्यामुळे डुन्वूडी च अऑप्शन चान्ग्ला वाततोय.
इकडे बरेच माबोकर आहेत हे वचून बरे वाटले. माबोकरना भेटयला नक्की आवडेल.
हो डनवूडी,सँडीस्प्रिंग्स
हो डनवूडी,सँडीस्प्रिंग्स दोन्ही स्टेशन्सच्या जवळ अपार्टमेंट्स आहेत.ते तुम्हाला सोयीचं पडेल.
अजून काही लागलं तर नक्की संपर्क करा
हो डनवूडी,सँडीस्प्रिंग्स
हो डनवूडी,सँडीस्प्रिंग्स दोन्ही स्टेशन्सच्या जवळ अपार्टमेंट्स आहेत.ते तुम्हाला सोयीचं पडेल. >> +१
धानी, मी डनवुडी स्टेशनच्या
धानी, मी डनवुडी स्टेशनच्या जवळ राहते.
काही मदत लागली तर सांग.. संपर्कातून मेल पाठव..
चिवा... मी डनवुडी स्टेशनच्या
चिवा...
मी डनवुडी स्टेशनच्या जवळ राहते. <<< मी हे 'मी धनकवडी स्टेशनच्या जवळ राहते.' असे वाचले..
(No subject)