Submitted by सुभाषिणी on 9 May, 2014 - 10:12
पायाची टाच दुखणे ही समस्या बर्याच जणांना विशेष तः मध्यम वयीन स्त्रिया ना छळणारी समस्या आहे.मलाही बरेच महिने हा त्रास होतोय.असथीरोग तद्न्य वेदनाशामके सगळे करून झाले.सकाळी उठुन पायटेकवणे भयंकर त्र्रासाचे होई.काही दिवसांपूर्वी. netवर वाचले आणि हा उपाय बर्यापैकी उपयोगी झाला .तो असा पाण्याची pet.वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे. बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहा.सुरवातीला खुप गार वाटते पण मग बरे वाटु लागते .असे साधारण ५ १०मिनिटे करावे. दिवसातुन २ ३वेळा.मी पहिल्यांदि रात्री अेकदाच केले.दुसर्या दिवशी बराच फरक वाटला.असे तीन दिवस केले. आणि खुपच फरक पडला आहे.मला.बर्फाच्या शेकाने स्नायुना अालेली सुज जाते त्यामुळे बरे वाटते. असे स्पष्टिकरण होते netवरच्या लेखामधे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म. खरंचं कि, लक्शातचं
ह्म्म. खरंचं कि, लक्शातचं नाही आला हा उपाय. बर्याच्दा सुज आली असता आपण हेचं करतो. मलाही हा त्रास काही महिन्यांपासुन होत आहे. ट्राय करीन हे. ईथे लिहिल्याबद्द्ल धन्यवाद.
आधी हीट ट्रीटमेंट मग एखाद्या
आधी हीट ट्रीटमेंट मग एखाद्या क्रीमने (साधं लोशन असेल ते किंवा फुट क्रीम) हलक्या हाताने मालीश आणि मग बर्फाने शेक असं केलं तरी खूप फायदा होतो.
वेदना शामक गोळ्या घेणे हे
वेदना शामक गोळ्या घेणे हे शरीराला हानीकारक असत,
त्या पेक्षा तुम्ही सुचवलेला उपाय उत्तमच आहे.
धन्यवाद !!
आमच्या ओळखिचे एक तामीळ कुटुंब
आमच्या ओळखिचे एक तामीळ कुटुंब आहे, त्या काकांना असाच त्रास होता, त्यांच्या पायांना खुप भेगा पड्ल्या होत्या अगदी रक्तबंबाळ झालेले पाय मी पाहीले आहेत. त्यांच्या सासूबाईं नी सांगितले की त्यावर पांढर ग्रिस (पंख्यात घालतात ते) लावत जा. अगदी ६-७ दिवसात. त्यान्चे पाय अगदी मुलायम झालेत.
protein intake कमी करा. uric
protein intake कमी करा. uric acid level चेक करा. पाण्याचे प्रमाण वाढवा.
.सकाळी उठुन पायटेकवणे भयंकर
.सकाळी उठुन पायटेकवणे भयंकर त्र्रासाचे होई.>>>>>>>> तुमचा हात्रास म्हणजे कल्केनियल स्पर तर नाही ना?
मला दोन्ही टाचांना ,एकामागून एक झाले होते.फॅमिली डॉक्टरने सांगितले की अल्ट्रासाउंड शेक घ्या किंवा वजन कमी करा.एक महिन्यानंतर दुखणे गायब झाले.(मी चालत होते) नंतर दुसरी टाच दुखायला लागली पण फार त्रास नाही झाला.
माझा कलीग बारीक असून चालण्याचा व्यायाम न चुकता करतो.त्यालाही वरीलप्रमाणे दुखत होते.त्याने आयुर्वेदीक गोळ्या व मसाज महिनाभर करून घेतला.तुम्हाला बर्फथेरपी लागू होते हे छान आहे.पावलांचा मसाजही होतोय.
http://www.webmd.com/a-to-z-g
http://www.webmd.com/a-to-z-guides/plantar-fasciitis-topic-overview
प्लान्टर फॅसिटीस / फॅसिआटिस मधे तळपायांचा व्यायाम अतिशय महत्वाचा आहे. आणि मुख्य म्हणजे अत्यंत सोपे ५-१० मिनीटात होणारे व्यायाम आहेत, पण लगेच फरक पडतो, कुठल्याही औषधाशिवाय.
पेप्सी, कोक चे सिलिंड्रिकल फ्रोजन कॅन्स तळपायाखाली ठेवून त्यावर पाय रोल करणे याने दुखणे बरेच कमी होते. टेनिस बॉल ने पण असाच रोल करण्याचा व्यायाम केला तरी फरक पडतो.
इंटरनेट वर शोधले तर बरेच व्यायाम साप्डतील.
होमिओपथी तयार औषधे घेऊन पाहा
होमिओपथी तयार औषधे घेऊन पाहा .
चिन्गु आपल्या प्रतिसादाबद्दल
चिन्गु आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.पण माझे क्लिनीकल रिपाेर्टस् नाॉर्मल आहेत.माझ्या नोकरीचा भाग म्हणुन मला बराच काळ उभे रहावे लागते .डॉ.च्यामते हे व माझे मध्यम वय हे यामागचे कारण आहे.
मा.बो.चे सभासद होवून मला काही काळच झाला आहे.पण येथे अेका मुद्दयाला धरुन जे विचारमंथनहोते ते मला फारच आवडले.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/42686 वर टाचदुखीवरील लेख आहे
मलाही हा त्रास कांहीं
मलाही हा त्रास कांहीं वर्षांपूर्वी झाला होता व चालणं हा माझा महत्वाचा छंद असल्याने मीं हादरलो होतों. पण आमच्या डॉक्टरने << कल्केनियल स्पर तर नाही ना? >> असंच कांहींसं म्हणून मला बूटाच्या तळव्यावर स्पंज ठेवून चालायला सांगितलं. आठ दिवसांत मला आराम वाटला व १५ दिवसांत टांचदुखी गायब झाली.
अर्थात, प्रत्येकाच्या टांचदुखीची कारणं व उपाय वेगवेगगळे असूं शकतात.
४)मुरूम पुटकुऴया लाली फोड
४)मुरूम पुटकुऴया लाली फोड त्वचेचे :
BECKOMENT NO ? ,SKIN CARE ,DR. VCNALLY'S मलम .एक दिवसात गुण येतो ......... किती Number क्रीम आहे..... व मुरूमाचे दाग ही जातात का?
Are wa itka sopa upay aajach
Are wa itka sopa upay aajach Karun pahate! Kalach Dr kade jaun
ale calcium ghyala sangitalay! Anek dhanyavad in advance!
पांढरं ग्रीस म्हण्जे काय
पांढरं ग्रीस म्हण्जे काय व्हअॅसेलिन किंवा पॅरेफिन असतं का?
पायाच्या भेगात ग्रीस? हॉरिबल नाहीये का हे?
आणि भाऊ म्हणाले तसं प्रत्येकाचं ताच दुखीच कारण वेगळं असतं तज्ञांना दाखवोओन सल्ल घेतलेला बरा. टाचेचं हाड वाढलं असेल तर बर्फ गरम पाण्याचा शेक, मऊ चप्पल वगैरे तात्पुरता आराम देणार. लाँग टर्म साठी औषधोपचार हवेतच,.
होमिओपथीचा इलाज एकदा करून
होमिओपथीचा इलाज एकदा करून पाहा .
प्रतिसाद संपादित केला आहे .
BECKOMENT NO १६ ......
BECKOMENT NO १६ ...... WARTEX CREAM net वर यानावाने दीसते तिच आहे का?
होमिओपथीचा इलाज एकदा करून
होमिओपथीचा इलाज एकदा करून पाहा .
प्रतिसाद संपादित केला आहे .
युरीक अॅसिड वाढण्यावर आणि
युरीक अॅसिड वाढण्यावर आणि गाउट वर काही होमिओपॅथीक औषध आहे का?? माझ्या आईला खुप त्रास आहे जॉइन्ट पेनचा !!! कृपया सांगा.
माझ्या आईला खुप त्रास आहे
माझ्या आईला खुप त्रास आहे जॉइन्ट पेनचा !!! कृपया सांगा.>>>>>> प्लीज रोचीन तुम्ही होमिओपॅथीक डॉक्टरकडून औषध घ्या.
मी असाच पण पाण्याच्या [ बर्फ
मी असाच पण पाण्याच्या [ बर्फ असलेल्या पान्याच्या] बदलीत पाय ठेवते
मी पण हा उपाय करुन पाहीन.
मी पण हा उपाय करुन पाहीन. मलाही ,कुठेही न जाता ,हा त्रास होतो.
होमिओपथीचा इलाज एकदा करून
होमिओपथीचा इलाज एकदा करून पाहा .
Submitted by Srd on 1 June, 2014 - 10:45 >>>>> स ह म त
रात्री पायाला साजूक तूप लावून
रात्री पायाला साजूक तूप लावून पातळ मोजे घालून झोपायचे त्याआधी दोन काचेच्या बाटल्या घ्यायच्या. एकीत गरम पाणी व दुसरीत बर्फाचे पाणी भरायचे. गार बाटली आडवी ठेवून त्यावर टाच ठेवून बाटली फिरवायची टाच गार झाली की सेम गरम बाटलीवर. 4-5 वेळेला करायचं.