Submitted by सुरजभोसले on 6 May, 2014 - 05:15
आमच घर एजंट तर्फे भाड्याने दिले आहे. मागच्या वर्षी एजंट ने अर्ध्या महिन्याचे भाडे कमिशन म्हणून घेतले होते. या हि वर्षी Agreement Renew करताना (त्याच भाडेकरू बरोबर) पुन्हा कमिशन द्यावे लागते का ?
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
धागा सार्वजनिक कराल का? जास्त
धागा सार्वजनिक कराल का? जास्त लोकांना बघता येइल. भाड्याने देण्यासाठी मालकांकडून कमिशन घेत नाहीत असे ऐकले होते.
सुमेधाव्ही , भाड्याने
सुमेधाव्ही ,
भाड्याने देण्यासाठी मालकांकडून कमिशन घेत नाहीत असे ऐकले होते.>>>>>>>> बरोबर आहे.भाडेकर्याकडूनच
कमिशन घेतात. फा s र पूर्वी दोघांकडून एका महिन्याचे भाडे घ्यायचे.
Agreement Renew करताना आता एजंट का हवा? तुम्ही दोघे (मालक-भाडेकरु) हे काम करू शकता.जरएजंट हवा असेल तर परत कमिशन द्यावे लागते.
आमच्याकडून घेतले होते. उलट
आमच्याकडून घेतले होते. उलट भाडेकर्याकडून एका महिन्याचे भाडं तसेच मालकाकडून एका महिन्याचे भाडं असे घेतले. दर वर्षी घेतात सा*.
आम्ही आमचे अपार्टमेंट
आम्ही आमचे अपार्टमेंट भाड्याने देण्याबद्दल एजंटकडे चौकशी केली आहे त्यात अर्ध्या महिन्याचे भाडे त्याने मागितले आहे. जर तुम्ही नंतर त्याच भाडेकरुबरोबर परस्पर संमतीने लीज एक्स्टेंड केलेत एजंटला मधे न आणता, तर परत द्यावे लागणार नाही. ती अर्ध्या महिन्याची फी "फाइंडर फी" असते. वन टाईम.
उत्तर इतके सोप्पे नाहीये. -
उत्तर इतके सोप्पे नाहीये.
- कायद्यानी आणि ethically त्या एजंट ला आहे तोच भाडेकरु पुन्हा ठेवण्यासाठी कमिशन देण्याची काही गरज नाही.
- तुम्ही भारतात रहाता आणि इथे कायद्या पेक्षा गुंडगिरी चे राज्य चालते हे लक्षात घेउन -
१. तो एजंट गुंड किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता ( खरे तर दोन्ही एकच ) आहे का?
२. जर असेल तर त्याला कळणार आहे का की तुम्ही ते लीज पुढे वाढवुन दिले आहे?
३. जर कळणार असेल आणि तो गुंड असेल तर तो मागायला आला तर अर्ध्या महिन्याचे भाडे देउन टाका. जर आलाच नाही मागायला, तर प्रश्न मिटला.
तेच तेच विषय .. मायबोली सर्च
तेच तेच विषय ..
मायबोली सर्च वापरावे. एजंट आणि कमिशन हे दोन शब्द त्यात घेऊन सर्च केल्यास जुने धागे मिळतील.
http://www.maayboli.com/node/40315 इथे भरपूर चर्चा झालेली आहे.