'आजोबा' - परस्परसंबंध ओळखा स्पर्धा - चित्र क्रमांक २

Submitted by माध्यम_प्रायोजक on 30 April, 2014 - 03:58

'ही आपल्यासमोर आहेत ही माणसं कोण?', 'नक्की चाल्लंय काय त्यांचं?', 'आणि हा कुत्रा का घाबरालाय म्हणतो मी एवढा? आता खाणार आहे का मी त्याला इथे अडगळीत?'...

आजोबाला नक्कीच असे प्रश्न अनेकदा पडले असतील. पण आता हे प्रश्न विचारणार कोणाला आणि उत्तरं देणार तरी कोण?

पण तुमचं-आमचं तसं नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची तुम्ही नक्की उत्तरं देऊ शकता. Proud

'आजोबा' हा चित्रपट प्रदर्शित होतोय ९ मे रोजी. त्या निमित्ताने आम्ही घेऊन आलो आहोत एक स्पर्धा.

परस्परसंबंध ओळखा स्पर्धा.

ही स्पर्धा अगदी सोप्पी बरं का!

खाली एक चित्र दिलं आहे. या एका चित्रात अजून काही चित्रं आहेत. काही आकडे आहेत, काही आकृत्या आहेत.

koda-2.jpg

या चित्रातली चित्रं, आकडे, आकृत्या 'आजोबा' या चित्रपटातल्या तीन महत्त्वाच्या कलाकारांकडे नामनिर्देश करतात.

तुम्हांला या कलाकारांची नावं ओळखायची आहेत.

हां, पण फक्त ही नावं ओळखून काम भागणार नाही. तुम्हांला या चित्रांचा तुम्ही ओळखलेल्या नावांशी संबंध कसा, हेही सांगायचं आहे. अपूर्ण उत्तरं बक्षिसासाठी विचारात घेतली जाणार नाहीत

आता आम्ही एवढी मेहनत घेतली, बक्षिसाचं काय?, असं तुम्ही विचारण्याआधीच सांगून टाकतो.

या कोड्याचं अचूक उत्तर देणार्‍या पहिल्या स्पर्धकाला मिळेल ६ मे रोजी मुंबईत होणार्‍या किंवा ९ मे रोजी पुण्यात होणार्‍या 'आजोबा'च्या शुभारंभाच्या खेळाचं एक तिकीट. या खेळाला चित्रपटातील (आजोबा वगळता) सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित असतील.

या कोड्याचं बरोब्बर उत्तर देण्याची अंतिम मुदत आहे १ मे, रात्री बारा वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार).

महत्त्वाची सूचना -

उत्तर याच बाफवर लिहायचं असलं, तरी स्पष्टीकरणासह संपूर्ण उत्तर दिलं असलं, तरच बक्षीस मिळेल.

तसंच, शुभारंभाच्या खेळाची तिकिटं चित्रपटनिर्मात्यांकडून देण्यात येतात. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्रमात बदल झाल्यास तसं विजेत्यांना कळवण्यात येईल.

IMG-20140426-WA0001.jpg

तर मग लावा तुमचं डोकं कामाला, आणि बघा 'आजोबा'ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हांला सापडतायेत का...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. उर्मिला मातोंडकर - Anaganaga Oka Roju तेलगु सिनेमा. मुख्य अभिनेत्री + बडे घर कि बेटी (मून्शी प्रेमचंद)
२. यशपाल शर्मा - नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी + हजार चौरासी कि मा आणि हजारो ख्वाहिशे ऐसी.
३. ऋषिकेश जोशी - कमीने (लेले) आणि Yellow चित्रपट

Anaganaga Oka Roju ह्या तेलगू चित्रपटामधे उर्मिला मातोंडकर मुख्य अभिनेत्री
कमिने मधे - ऋषिकेश जोशी यांची भुमिका
यशपाल शर्मा हे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी, प्रेमचंद हे त्यांच्या वडीलांचे नाव व हझारो ख्वाईशे ऐसी मधेही त्यांची भुमिका, तो मुलगा हे हर ख्वाईश पे दम निकले याचे प्रतिक

बिबट्या १२० किमी चालला... १००० शी याचा संबंध असेल.
पिवळा रंग- बिबट्याचा रंग दर्शवतो. सिनेमाचं एक पोस्टर पिवळं आहे. अजून एक बादरायण संबंध. पिवळा म्हणजे यलो. यलोतली कलाकार गौरी (गाडगीळ) आणि आजोबाची स्क्रिनप्ले रायटर गौरी(बापट)
आडव्या रेषा- बिबट्या खोडावर बसलाय, हे दर्शवतात

जिप्सी, नाही Proud

मी_आर्या, हर्पेन
योग्य मार्ग Proud
पण सगळी उत्तरं बरोबर नाहीत.

शिवाय त्या आडव्या रेषांचं काय? आणि प्रेमचंदांचं चित्र नीट बघा. Happy

१. उर्मिला मातोंडकर - Anaganaga Oka Roju तेलगु सिनेमा. मुख्य अभिनेत्री + बडे घर कि बेटी (मून्शी प्रेमचंद)
२. यशपाल शर्मा - नॅशनल स्कुल ऑफ ड्रामाचा विद्यार्थी + हजार चौरासी कि मा आणि हजारो ख्वाहिशे ऐसी.
३. ऋषिकेश जोशी - कमीने (लेले) आणि Yellow चित्रपट

ते लहान मुलाचे चित्र Statue of Eros sleeping आहे

प्रेमचंदांचं चित्र नीट बघा>>>>> माझ्या प्रतिसादात लिहिलंय कि "बडे घर कि बेटी" Happy

चुकलंय का?

जिप्सी,
आपला प्रतिसाद एकाच वेळेस आला.

तरी अजून त्या आडव्या रेषा आणि तो झोपलेला पुतळा शिल्लक आहेत. Happy

जिप्सी..................... तिकीट एकच मिळणार आहे........ एक तर तु जाउ शकतोस नाहीतर वहिनींना पाठवु शकतोस....

तु एक्टा गेलास तर मी वहिनींजवळ कुचाळक्या करणार...

बेटर वे...........तु उत्तर नीट दे आणि तिकिट मला दे Happy

जिप्सी..................... तिकीट एकच मिळणार आहे...>>>>उदय तिकिटांसाठी कोण खेळतंय. धम्माल येतेय कोडं सोडवायला. Happy

इरॉसचा पुतळा :

Young children were demonstrated in exotic and unique poses, whether in mythological statue form, as the baby Eros, or, in larger scenes that exhibit many activities of many deities and notable Greeks and Romans, frolicking and playing with one another, or seen dealing with animals.

लोकहो,
जरा मागे वळून पाहा.. आपल्या इतिहासात डोकावून बघा.. ग्रीकांकडे जायची गरज नाही. पुतळा ग्रीक असला तरी Happy

तरी अजून त्या आडव्या रेषा >>>>>"समांतर" ऋषिकेश जोशी ???

तो झोपलेला मुलगा, म्हणजे प्रेमाचं प्रतिक ........
नेहा महाजन.... नेहा म्हणजे प्रेम.>>>>तीनच कलाकार सांगायचे आहेत ना?

सांगू का उत्तरं? <<< नको. जिप्सी जवळजवळ पोचलाच आहे तिथे. त्याला उत्तर देऊ द्या. तो नाहीतरी तिकिटासाठी खेळत नाही. मग त्याला मिळालेलं तिकिट आम्ही (स्वतःसाठी आदरार्थी) घेऊ.

तो झोपी गेलेला मुलगा भगवान विष्णु शेषनागावर पहुडेलेले आहेत असे वाटते
श्रीकांत यादव... श्रीकांत म्हणजे भगवान विष्णु.

Pages