मायबोलीने ई-बूक्स प्रकाशित करावी असे वाटते का ?

Submitted by दिनेश. on 24 April, 2014 - 11:23

आता एवढ्यात काही उत्तम मालिका मायबोलीवर वाचण्यात आल्या.

डॉ. सुरेश शिंदे यांचे लेख. स्वमग्नता एकलकोंडेकर यांची मालिका... असे काही दर्जेदार आणि संग्राह्य लेखन, लेखकांच्या संमत्तीने, मायबोलीने ई-बूक्स रुपात प्रदर्शित करावे असे मला वाटते.

यासंबंधात मायबोलीकरांना आणि मायबोली प्रशासनाला काय वाटते ? हे शक्य आहे का ?
पुस्तक प्रकाशन मायबोलीचा व्यवसाय नाही हे मान्य पण मग असे लेखन काही काळाने कुणाला संदर्भासाठी एकत्र हवे असल्यास उपलब्ध व्हावे, यासाठी तरी..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलिवरच लेखमाला करतात ना? मग त्याच लेखांच्या इ-बुक ची काय गरज? तसंच वाचायला सभासद असण्याची गरज नसल्यामुळे ते सर्वांना उपलब्ध असेलच.
माबोच्या बाहेरच्या साहित्याचे इ-बुक म्हणत असाल तर वेगळा मुद्दा आहे. त्यात मॉनिटरी इंटरेस्टचं झंझट असणारच. ती सगळी डोकेदुखी ओढवून घ्यायची का हा सर्वस्वी वेमांचा प्रश्न आहे. हे अर्थातच माझे वैम.

इ-बूक बनवणे ही खरं तर खूप सोपी गोष्ट आहे...जे लेख आपल्याला आवडले असतील त्याचे कुणीही सहजपणे इ-बूक बनवू शकतो...अर्थात हे करतांना मूळ लेखक/लेखिकेची परवानगी घेणे कधीही अपेक्षित आहेच..आपल्या वैयक्तिक संदर्भासाठी असल्यास आणि ते तसे पटवून दिल्यास क्वचितच कुणी लेखक परवानगी नाकारेल...मात्र काही व्यावसायिक बाबींसाठी तसे काही करावयाचे असल्यास रीतसर परवानगी, करार इत्यादि ओघानेच येते.
उदा. हे संकेतस्थळ पाहा...
मी स्वत: माझ्याच लेखनाची काही इ-बूक्स इथून बनवली आहेत.
आमचा एक दिवाळी अंकही आम्ही असाच प्रकाशित केलाय...ज्यात आलेले लेख हे ई-बूक्स पद्धतीने आम्ही त्यात मांडलेत.