अननोन चायना - भाग २

Submitted by वर्षू. on 23 April, 2014 - 06:50

अननोन चायना - भाग १ http://www.maayboli.com/node/48666

अननोन चायना - भाग ३ - http://www.maayboli.com/node/48684

अननोन चायना भाग ४ - http://www.maayboli.com/node/48706

ठरल्या वेळेप्रमाणे टूर ऑपरेटर ने आम्हाला छंग तू च्या डोमेस्टिक विमानतळावर पोचवले. बृयाचश्या टूर कंपन्यांचे

गाईड्स आपापल्या हातात त्या त्या कंपनीच्या नावाचे झेंडे घेऊन उभे होते. आम्हालाही सुदैवाने लौकरच सापडली

आमची गाईड. म्हंजे आम्ही तिला ओळखायच्या आधी तिनेच आम्हाला नुस्त्या ऐकीव माहितीवरून ओळखले.

आमच्या शिवाय इतर कुणीच परदेशी नव्हतेच हजर .. तिलाही सोप्पं झालं असणार..

आम्ही आमच्या हमसफर टूरिस्टची वाट पाहात होतो. छंग तू हून आमचा दहा जणांचा समूह होता. आमच्यात

स्माईल्स ची देवाणघेवाण झाली.. आता या ग्रुप बरोबर आम्ही तीन दिवस राहणार होतो.

विमान वेळेवर निघाले. अवघ्या पन्नास मिनिटांच्या प्रवासात संपूर्ण निसर्गाचं रूपच बदलून गेलं..

' मिन' पर्वतराई चे दर्शन निव्वळ वेड लावणारे होते

या बर्फाच्छादित शिखरांना , विमाना च्या खिडकीतून हात बाहेर काढून नुसता हात लावायचा अवकाश होता

चिउचायकोउ च्या दर्शनाच्या आभासानेच भारावल्यासारखं झालं होतं. ही तिबेटियन खेडेगावे वसलेली दरी , जवळून

पाहायची उत्कटता लागली होती.

तिबेटिअन प्लेटो च्या कडेने , १८०,००० एकर जागा व्यापलेल्या मिन पर्वत राजी च्या कुशीत दडलेल्या या दरीत

अगणित रंगीबेरंगीत, नैसर्गिक तलाव आहेत, मल्टी लेवल्स वर असंख्य धबधबे आहेत. ही दरी युनिस्को द्वारे

प्रमाणित वर्ल्ड हेरिटेज आणी वर्ल्ड बायोस्फिअर रिझर्व साईट आहे. हे व्ही कॅटेगिरीचे प्रोटेक्टेड लँडस्केप ही आहे.

अनेक शतके इथे तिबेटिअन आणी छिआंग लोकांचा निवास होता . १९७९ मधे चायना सरकार ने या भागाला

नॅशनल पार्क घोषित केल्यापासून इथे निवास करायला बंदी आहे.

इथल्या विमानतळावर उतरताना आपण कोण्या पर्वत शिखरावरच उतरतोय कि काय असं वाटलं. विमानातून बाहेर

पडताना काही जणांना किंचित गरगरल्यासारखं वाटतं . त्याला कारण ही आहे. छंग तू, समुद्र सपाटी पासून ३०००

फूट उंचावर आहे , तर चिउचायकोउ , ११३९२ फुटावर..

इथे उतरल्यावर लगेच दरीकडे घेऊन जायला एक लहान बस , गाईड सकट तयारच होती. दोन तासाच्या प्रवासात

सर्वानी आपापल्या पिशवीतून आणलेल्या फळांचा, बिस्किटांचा समाचार घेतला.

दरीकडे जायचा रस्ता

संपूर्ण रस्ताभर ,'मिन' साथ देतच होता

वाटेत दिसलेलं हे पंचतारांकित हॉटेल

मुद्दाम ,'रामसे' पिक्चर्स चा सेट वाटावेसे बांधलेले.. पण आतून सुपर पॉश..

दरीत शिरण्यापूर्वी किंवा बाहेर आल्यावर पार्क केलेल्या गाड्या यायची वाट पाहत बसायला हे स्थळ

दरीचं प्रथम दर्शन

दरीच्या मुखाशी येऊन पोचलो. गाईड ने जाऊन तिकिटे काढली.. हातात नकाशे दिले . आमच्याकरता इंग्लिश

मधला एकुलताएक नकाशा पैदा केला. यापुढे आम्हा सर्वांना आपापले जंगलात शिरून नेमून दिलेली ठिकाणे पाहायची

होती. चेक केले असता आमच्या आणी चायनीज नकाशात जरा फरक दिसून आला . आता रस्ता चुकण्याची

भीती असल्याने आम्ही आमच्या ग्रुप मधल्या दोन चार लोकांशी जवळीक साधून त्यांच्याच बरोबर चालण्याचा

निर्णय घेतला..

दरीत शिरण्याकरता प्रवेश् द्वार..

इथे प्रवेश करण्यापूर्वी सुंदर उद्यान होतंच, तिथेही रंगीबेरंगी फुलझाडं सुशोभित होती

आणी किलोमीटर्स चे किलोमीटर्स वर चढत कधी खाली उतरत , कधी हॉप ऑन हॉप ऑफ् बसेस मधून चढ उतर

करत अनोख्या , दैविक दृष्यांचे नैनसुख लुटले..

एकामागूनेक नैसर्गिक तळी लागत होती. या जागेत मॅग्निशियम आणी कॅल्शियम चा भरपूर साठा असल्यामुळे

काही तळ्यांचे रंग गडद निळे, हिरवे, मोरपंखी , राखाडी होते तर काही तळ्यांत सारेच रंग एकत्र झाले होते..

एका तळ्यात तर बदके ही पोहत होती

चढ चढून किंवा उतरून दमलात तर इथे विश्राम करा.. बाजूलाच व्यवस्थित वॉशरूम्स आहेत.

डस्टबिन आणी झाडू आहेच उभा..

चला परत पुढे.. म्हंजे वर..

हे सर्व चढ उतार करून बरीच पायपीट झाली होती.. जवळजवळ पाच तास चालणं झालं होतं ते सर्वात रंगीत तळं

पाहायला तर चक्क साडेतीन किमी खाली उतरून जायला लागलं होतं .. पण पाहिल्यावर सर्व श्रम सार्थकी लागले

होते..

शेवटी सर्व पाहून बाहेर येऊन पुन्हा प्रवेश द्वारा जवळच्या बागेत आराम करायला बसलो. समोर दरी पाहून

येणार्‍यांचा मेळा भरला होता. दर दिवशी हजारोंच्या संख्येने इथे आसपासचे लोकं भेट देतात.

अजिबात गोंधळ, गडबड , घाण न करता सर्व स्मूदली होत असताना दिसले. पूर्ण दरी फिरताना सिगरेट प्यायला बंदी

आहे , हा नियम तोडणारा अजिबात एक सुद्धा माणूस दिसला नाही..

हा ट्रेक संपून आमची बस आम्हाला आमच्या हॉटेलवर घेऊन गेली..

इथली हॉटेल्स मधे एक गम्मत होती..

आणी हो!! डिसक्लेमर राहिलंच की..

या सीरीज मधील एक ही फोटो , फोटोशॉप केलेला नाहीये..

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षूताई, कैच्याकै सुंदर जागा आहे! विदेशी पर्यटक नसतांनाही स्थळाची इतकी लख्ख देखभाल करायला खरोखरच स्थानिक माणसाच्या अंगी आवड आणि अभिमान पाहिजे. शिवाय सृष्टीसौंदर्य काय वर्णावे! Happy
आ.न.,
-गा.पै.

वर्षू अगदी हावरटासारखे फोटो बघितले. आणि डीस्क्लेमरकडे आत्ता लक्ष गेलं.
खरंच डिस्क्लेमरची गरजच आहे इतके अफाट रंगित आलेत फोटो.

वॉव, अननोन चायना नोन करुन दिल्याबद्दल धन्यवाद. फोटोज पाहुन हेवा वाटला. खरच अमेरिकातर सोडा, भारताला चायनाची बरोबरी करायला अनेक पिढ्या वाट पहावी लागेल.

".....विमाना च्या खिडकीतून हात बाहेर काढून नुसता हात लावायचा अवलंब होता....??'

आपणांस अवलंबच्या ऐवजी 'विलंब' असे म्हणावयावयावयाचे होते क्काँय? (....आमची इतरत्र कुठेही शाखा नाही!)

अर्रे क्काय सुंदर ठिकाण आहे? 'चिनिमाती' पुस्तक वाचल्यानंतर ह्या चिन्यांविषयी एक कुतुहलच आहे! बाकी 'चिनी माल' वाले चिनी अन इतके सुंदर ठिकाण पोटात ठेवणारे चिनी हे एकच का?

इथे जमलेल्या इच्छूक भट्क्या शुद्ध शाकाहारी मंडळींन्नी एकत्र येउन एखादा 'गट' स्थापन करून वर्षुतैंन्ना साकडे घालु यात का आपल्याला अशा ठिकाणी घेउन जाण्यास? दिनेशभौंसरखे मिही 'फलाहार व्रती' होण्यास तयार आहे!

वर्षु हा भाग खूपच आवडला पहिल्या तीन पैकी. फोटोज अप्रतिम आलेत. अगदी पेंटिंग असल्यासारखे वाटतायत. २१व्य फोटोत पाण्यात साप आहे का? मला तसं वाटलं.

mi tar chayanij nave vachalih nahich .... te chang choo vagaire koN manalaavoon vaachata basaNaar? Proud aaNi vachali tari lakshat rahila nako? Wink

Photoz apratim!

mabowar devanagarit lihita yet nhiye tyamule pudhachya series wr may be pratisad denar nahi. pan follow karate Happy
thanks!

सगळेच अद्भुतरम्य...... परीकथेत वर्णन असते ना तसेच वाटतेय .... खूप भारी .....

आणी हो!! डिसक्लेमर राहिलंच की..

या सीरीज मधील एक ही फोटो , फोटोशॉप केलेला नाहीये..

>>>>

गरजही नाही , अपने आप मे बहोत बढीया है Wink
सारेच निव्वळ वॉलपेपर ..

Pages