Submitted by pltambe@yahoo.co.in on 18 April, 2014 - 00:21
पित्त नाशक आमसुलाचे सार
साहित्य : ८-१० सुकी आमसुले ,चवीनुसार हिरव्या मिरचीचे तुकडे व मीठ,किसलेला गूळ एक चमचा,पाव वाटी खवलेला नारळाचा चव,दोन चमचे तांदूळाची पिठी,एक चमचा जिरे पूड,बारीक चिरलेली कोथिंबीर व दोन कप पाणी.
कृती : गॅसवर एका स्टीलच्या गंजात दोन वाट्या पाण्यात ८-१० सुकी आमसुले घालून उकळून घ्या,ओल्या नारळाचा चव,हिरवी मिरची,मीठ व जिरे पूड एकत्र मिक्सरवर वाटून घेऊन ते वाटण त्या आमसुले उकळून घेतलेल्या पाण्यात घालून उकळत ठेवा,त्यात चवीनुसार किसलेला गूळ व दाटपणा येण्यासाठी दोन चमचे तांदळाची पिठी घालून पांच मिनिटे उकळून घेऊन गॅस बंद करा.वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून झाकून ठेवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही नारळाचा चव उकळत नाही,
आम्ही नारळाचा चव उकळत नाही, तो चव वाटुन त्याचे दाट व पातळ दूध काढुन ते आमसुलाच्या उकळुन गाळलेल्या पाण्यात घालतो, त्यालाच सोलकढी म्हणतो. सोले म्हणजे आमसुले त्याची कढी सोलकढी. त्यात मग चवीनुसार हिन्ग, साखर, मीठ, कोथिम्बीर व हि. मिर्ची घालतो.
व्वा! मस्त!
व्वा!
मस्त!
मस्त आहे हे सार. मला
मस्त आहे हे सार. मला उन्हाळ्यात असल्या पित्तनाशक पदार्थांही खुप गरज पडते.
मस्त ! फोटोत अंधार आलाय
मस्त ! फोटोत अंधार आलाय उजेडात काढला असता तर अजून छान दिसला असता.
तांबेकाका , ह्या वयातला तुम्हचा उत्साह खरेच वाखाणण्यासारखा आहे .
ग्रेट !
कोकम सरबत पित्तशामक आहे हे
कोकम सरबत पित्तशामक आहे हे माहित होतं. पण सोलकढी पित्तशामक नसावी, नारळ खूप असतो ना म्हणून. पण खूप आवडते मला तरी सोलकढी.
उकळून केलेले सार तितके आवडत नाही, का कुणास ठाऊक आमसुले आणि नारळ दोन्हींची चव उकळल्यावर बदलल्यासारखी वाटते.
आमची आई आमच्या लहानपणी अंगावर
आमची आई आमच्या लहानपणी अंगावर पित्त (मुंगी चावल्यावर येते तसे) उठले की हे 'सारच' सोलकढी नव्हे (टोमॅटोचे सार-सूप नव्हे) करून देत असे व ते दिवसातून दोन-तीन वेळा घेतले की पित्त नाहीसे होत असे. ते उकळून थोडे गार झाल्यावर एका वेळी एक-दोन वाट्या घ्यावे लागत असे.
आमची आई आमच्या लहानपणी अंगावर
आमची आई आमच्या लहानपणी अंगावर पित्त (मुंगी चावल्यावर येते तसे) उठले
मी हा त्रास खुप भोगलाय लहानपणी. अंगभर पित्त उठायचे. आई सार करुन द्यायची आणि मी अंगाला कोकमे चोळत बसायचे..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काका त्याला पित्ताच्या गान्धी
काका त्याला पित्ताच्या गान्धी उठणे पण म्हणतात. मी तर नुसते आमसुलाचे पाणी करुन ते हाता-पायाला आणी चेहेर्याला लावत होते. मला पित्ताचा भयानक त्रास व्हायचा. आता अजीबात नाही. चेहेरा मात्र सुजल्यासारखा दिसायचा त्यावेळी.
हो आमसुलाचे पाणी किंवा नुसती
हो आमसुलाचे पाणी किंवा नुसती आमसुले अंगाला चोळतात हे माहिती आहे, चांगला उपाय आहे
सर, तुमची पाककृती मस्त आहेच,
सर,
तुमची पाककृती मस्त आहेच, पण वेळ नसल्यास नुसते एखादे आमसुल थोडे मीठ लावून खाल्ले तरी पित्त कमी होईल का? मला पित्ताचा त्रास आहे म्हणून विचारत आहे. धन्यवाद!
हो , नुसते एखादे आमसुल थोडे
हो , नुसते एखादे आमसुल थोडे मीठ लावून खाल्ले तरी पित्त कमी होईल. हा आमसुलाचा (कोकम) गुणधर्मच आहे.
आम्ही नारळाचा चव उकळत नाही,
आम्ही नारळाचा चव उकळत नाही, तो चव वाटुन त्याचे दाट व पातळ दूध काढुन ते आमसुलाच्या उकळुन गाळलेल्या पाण्यात घालतो, त्यालाच सोलकढी म्हणतो. सोले म्हणजे आमसुले त्याची कढी सोलकढी. त्यात मग चवीनुसार हिन्ग, साखर, मीठ, कोथिम्बीर व हि. मिर्ची घालतो.>>>>>>>>>आम्हीपण! गरम पाण्यात सोले भिजत घालून त्यात हिंग व मीठ घालावे.हिरवी मिरची ,थोडेसे जिरे व लसणाच्या ३-४ पाकळ्या व ओले खोबरे एकत्र वाटून गाळून सोलांच्या पाण्यात घालावे.
पित्त असलेल्यांसाठी ट्रेनमधे
पित्त असलेल्यांसाठी ट्रेनमधे भेटलेल्या न्युट्रिशियनचा सल्ला... रोज १०-१२ काळ्या मनुका रात्री,जास्त पाण्यात भिजत घाला. दुसर्या दिवशी वरचे पाणी पिऊन बियांसकट मनुका खाव्यात.
माझ्या आज्जोबांचा आवडता
माझ्या आज्जोबांचा आवडता पदार्थ्.......गरम मऊ भात आणि आमसोल सार.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
देवकी मी सुद्धा असंच करते
देवकी मी सुद्धा असंच करते कोकमाचे सार / सोलकढी. नॉनव्हेज जेवणानंतर हमखास प्यायले जाते. पचायला सोपे जाते जड जेवण.
भिजवलेले काळे मनुके पोट साफ होण्यासाठीही चांगले. पाणीही प्यावे भिजवलेले.
हो , नुसते एखादे आमसुल थोडे
हो , नुसते एखादे आमसुल थोडे मीठ लावून खाल्ले तरी पित्त कमी होईल. हा आमसुलाचा (कोकम) गुणधर्मच आहे.<<<
धन्यवाद सर
मस्तच... पित्तवाल्यांकरता एक
मस्तच...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पित्तवाल्यांकरता एक सोपा उपाय. कोकम आगळ आणून ठेवावं. गरज वाटेल तेव्हा पेलाभर गार पाण्यात चवीनुसार घालावं, हवं असेल तर मिठाची कणी, चिमूट्भर जिरेपावडर / चुरलेलं जिरं घालावं अन चाखत चाखत ते पाणी हळूहळू प्यावं आराम पडतो.
यातच साखर घातली की कोकम सरबत तयार. साखर घालणे आपल्यावर असल्याने कमी साखरेचं करता येतं. विकतच्या प्रमाणे जास्त गोड नाही होत. वर कोकमाची चव व्यवस्थित असते.
अजून एक प्रकार - सोडा करता येईल याचाच. खारा/ गोड कसाही.
थोडं आगळ + पाणी अशी कढीही करता येईल. ही थोडी गार लागली की मग त्यात गार ताक घालून पिता येते.