कॅटॅस्ट्रॉफ
(आशिष महाबळ)
(१३ डिसेंबर २००८ चे LAMAL - विषयः जेंडर)
मोहिते आज आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कॅटॅस्ट्रॉफ म्हणजे काय हे समजावुन सांगत होते. विषयाला धरुनच पण अवांतर व रोचक माहिति ते सांगत त्यामुळे हुशार विद्यार्थी त्यांचा तास कधिच चुकवत नसत. अनेकदा मुळ विषयाला धरुन एखादी सुरस कथा ते नंतर सांगत म्हणुन त्यात रस असलेलेही सगळे झाडुन हजेरी लावत.
त्यामुळे अर्धा तास संपल्यावर अर्ध्याअधिक विद्यार्थ्यांच्या माहितित पडलेली भर अवाजवी नव्हती. बटरफ्लाय कॅटॅस्ट्रॉफ सारखे मोहक नाव असलेला देखिल एक गणिति प्राणी असतो हे त्यांना कळले. नाही म्हणायला परिक्षेत उपयोगी पडु शकतिल अश्या अजुन एकदोन ठोस गोष्टि कळल्या. एक म्हणजे चतुर्मीत विश्वात न्युनतम उर्जा साठवु पहाणाऱ्या प्रणालीत केवळ सात वेगवेगळ्या प्रकारचे कॅटॅस्ट्रॉफ होऊ शकतात (पंचमित विश्वात ११ वगैरे) व दुसरी म्हणजे त्या प्रकाराचा अर्थ. एखाद्या प्रणालीमध्ये जेंव्हा २ स्थिर बिंदु एकत्र असतात तेंव्हा ती प्रणाली त्या बिंदुपर्यंत कोणत्याही बिनधोक मार्गानी पोचली तर त्यांनंतर कोणत्या मार्गाचे पात्र जड होईल हे सांगता येत नाही. किंवा असेच काही तरी. अनेकांच्या कानांवर नुसतेच शब्द आदळत होते.
‘चला आता एक गोष्ट ऐकु या’, हे शब्द मात्र शितकारी मलमासारखे त्यांच्या कानात शिरले आणि कॅटॅस्ट्रॉफ झाल्यागत ते एकदम सरसावुन बसले.
मोहिते पुढे बोलते झाले: अनेक युगांपुर्विची ही घटना आहे. मनुष्याच्या जन्माच्याही आधिचि. तेंव्हा प्रगत प्राणि पृथ्विवर नसुन दुसऱ्याच दोन ग्रहांवर होते. एक पृथ्विपेक्षा थंड होता तर दुसरा तप्त. थंड ग्रहावरील लोक स्वत:ची उष्णता टिकवण्यासाठी सतत काही ना काही करत असत. मेंदु गोठुन जाऊ नये म्हणुन सतत विचार करत रहावा लागे. त्यामुळे डोक्यानीही जरा गरमच होते. रहातही एक प्रकारे अधिक एनट्रॉपीमध्ये म्हणजे पसाऱ्यातच. पण तसे मनाने चांगले. त्यामुळे त्यांच्या ग्रहाचे नाव होते लाल आंबा.
त्याउलट पांढऱ्या नाड्या या ग्रहावरचे प्राणि स्वछतेचे भोक्ते होते. जास्त हालचाल मात्र ते तापमान खूप वाढु नये म्हणुन करत नसत. येवढेच काय, उष्णता वाढेल म्हणुन खुप विचार करणे सुद्धा त्यांच्याकरता पाप होते. त्यांचे बरेच काम राग, लोभ, मत्सर, अशा विविध हार्डवायर्ड रसांवरच चाले.
गम्मत म्हणजे या दोन्ही ग्रहांवरचे प्राणी आकारमानानी आपल्या सारखेच, म्हणजे अर्थातच बहुपेशिय होते, आणि तरीसुद्धा त्यांचे प्रजोत्पादन हे मायोसिस या प्रकाराने होत असे. म्हणजे वटवृक्षाप्रमाणेच त्यांच्या पेशिंमधिल क्रोमोसोम्स या दुभंगुन दोन पेशिंमध्ये वाटल्या जात नसत. असे प्राणि प्रगत असुच कसे शकतात हे आपल्याला अजुनही न सुटलेले कोडे आहे.
मानवाप्रमाणेच त्यांना ईतर विभाग पदाक्रांत करायची उर्मि मात्र सतत असे. युद्धाचे एक आगळेच व्हायरल तंत्र त्यांनी अवगत केले होते. आपल्या क्रोमोसोम्स वापरुन ते त्यांच्या शत्रुला ताब्यात घ्यायचा प्रयत्न करत. दुसरा पक्षदेखिल तसेच करु पहाणार याची त्यांना जाणिव असल्यानी ते त्याविरुद्धची दक्षता घ्यायचा प्रयत्न देखिल करत.
दुसऱ्या ग्रहावरुन होणारे असे हल्ले त्यांच्या प्रणालिंनी आत्मगत केले होते. त्यामुळे त्या एलियन आरएनएचा त्यांच्या उपयोगी असलेला भाग ते आपलासा करुन घेत. पण दोन्ही पक्षांना त्यांच्या चढाईंचा कितपत उपयोग होतो आहे हे मात्र फार काही कळत नसे.
उत्क्रांती ही अतिशय संथ प्रक्रिया आहे. होता होता दशकं, शतकं, येवढेच नाही तर अब्जावधी वर्ष लोटली. कळत-नकळत लाल आंबा वासी आणी पांढऱ्या नाड्या वासी यांना एकमेकांचे गुण-अवगुण, वाण-अववाण हे सर्व थोड्या-अधिक प्रमाणात लागले.
हे सर्व बदल बिनधोक पणे होत असतांनाच दोन्हीकडच्या वैज्ञानीकांच्या लक्षात एक अजब गोष्ट आली ती म्हणजे प्रजोत्पादनाचे पॅटर्न्स अचानक पुर्णपणे बदलले होते. दोन्हीकडे दुसऱ्या ग्रहावरुन क्रोमोसोमल आक्रमण झाल्याशिवाय नविन अपत्य निर्माण होत नव्हती आणि त्या अपत्यांची काळजी देखिल जास्त घ्यावी लागत असे. लाल आंब्यावर अतिउष्ण विभाग तातडीने निर्माण करावे लागले होते, तर पांढरी नाडी वर अतीशित. दोन्हीकडच्या प्राण्यांच्या लक्षात आले की अभुतपुर्व असे काही केल्याशिवाय धडगत नाही. एकमेकांबरोबर (खरंतर एकमेकांच्या क्रोमोसोम्स बरोबर) जगण्याशिवाय पर्याय नाही. पहिल्यांदाच त्यांनी एकमेकांशी थेट संधान बांधले आणि एकमेवाद्वितिया असा तह केला. लाल आंबा पेक्षा उष्ण पण पांढऱ्या नाड्या पेक्षा शित असा मधला ग्रह निवडला आणि एका नव्या सुरुवातिची सर्व जय्यत तयारी करुन सीड पॉप्युलेशन म्हणुन दोन्हीकडुन एकएक प्राणी वसुंधरेवर पाठवला. लाल अंबावरुन मनु आला तर पांढऱ्या नाड्यांवरुन ईव्ह.
छान आहे
छान आहे कथा...
catastrophe या शब्दाचा उच्चार कटॅस्ट्रफी असा आहे....
सही मारले
:):-) सही मारले आहेस काही. अधिक पसारा, हार्डवायर्ड रस... 'खूप विचार करणे पाप...' बायकोला दिलेस का वाचायला ?

लाल आंबा अधिक एंट्रोपीचा कसा ? तो (तुलनेने) शीत आहे ना ?
>>> तर त्यांनंतर कोणत्या मार्गाचे पात्र जड होईल हे सांगता येत नाही...
त्यानंतर म्हणजे प्रणाली स्थिर बिंदूला आल्यावर ? पण ती तिथून हलावी यासाठी धक्का (perturbation) लागेलच. त्या धक्क्यानंतर ती परत त्या बिंदूला येते की काय करते याची trajectory मांडता येईल... अर्थात, त्या धक्क्याच्या स्वरूपावर आणि पूर्वावस्थेवर (initial conditions) मार्ग ठरेल... तुला sensitive dependence on initial conditions अपेक्षित आहे का ?
गंमत म्हणून रेड मँगो आणि व्हाईट थ्रेड चे ऍनाग्राम शोधले... व्हाईट थ्रेडचा एक ऍनाग्राम 'earthed with' असा मिळाला
***
उसके दुश्मन हैं बहुत
आदमी अच्छा होगा
आवडली.
आवडली. बर्याच दिवसांनी मराठी स्किफि वाचले.
छोटी आहे पण थोडी. आणि त्यात गोष्टपणा कमी आहे. म्हणजे पात्रं बित्रं नाहीयेत.
एक थियरी मांडलीय फक्त असं वाटतं. किंवा उत्क्रांतीची एक प्रक्रिया सांगितलीय.
बाय द वे LAMAL म्हन्जे काय म्हणे?
धन्यवाद. santin
धन्यवाद.
santino, गेले अनेक वर्षे catastroph हे स्पेलिंग अनेक ठिकाणी वापरल्या गेलं आहे.त्या नावाचा एक चित्रपट देखिल आहे. पण catastrophe theory मधे मात्र तु म्हणतोस त्याप्रमाणे फी हवे.
LAMAL = Los Angeles Marathi Author's Literameet
आर्कईव्ह करता म्हणुन ईंग्रजी नाव. उलटे देखिल तसेच वाचता यावे म्हणुन केलेली थोडी ओढाताण.
दिड-दोन वर्षांपुर्वि सुरु केला. दर २ महिन्यांनी काहि लोक भेटतो, आदल्यावेळी ठरवलेल्या विषयावर प्रत्येकाने काही तरी मराठीत लिहुन आणायचे (ललित, कविता, अनुभव काहिहि). मी साय-फाय कथा लिहितो बहुदा. आधिच्या पण काही आहेत, टाकिन त्या इथे.
विचार करायला ८ आठवडे मिळुन देखिल अनेक लोक शेवटच्या काही दिवसातच लिहितात. या वेळचा विषय तसा जरा कठीण वाटला. जेंडर मध्ये सेक्स असे अभिप्रेत नव्हते. आसिमोव्ह्च्या Gods Themselves चे मराठी संक्षिप्तिकरण करावे का असे आधि वाटले होते.
स्लार्टी, या वेळी २ दिवस आधि पर्यंत माझे देखिल काही ठरले नव्हते. बायको भारतात जायला निघाली होती. विमानतळावर तिला ड्राईव्ह करतांना हे कथानक सुचलं. अजुन नक्किच फुलवता आली असती, पण ते अजुन तितके सहजी जमत नाही. नाही, अजुन तिने पुर्ण कथा नाही पाहिलेली.
critical feedback is always welcome!
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद
विमानतळाव
विमानतळावर तिला ड्राईव्ह करतांना हे कथानक सुचलं. >> म्हणजे तू फिजीकल मूक्ततेच्या आधी वैचारिक मुक्तता मिळवलीस. आणी कधी एकदा तिला पोर्टावर टाकून येतो आणि लिहीतो असे झाले असेल.
(माझेही असे होतेच. कधी कधी. )
स्लार्टि,
स्लार्टि, एंट्रोपी लाल आंब्याची नाही तर त्यावरील लोकांची (जास्त गर्मी मिळवण्याचा प्रयत्न).
स्थिर बिंदुला पोचल्यावर कोणत्या बाजुकडे प्रणाली जाईल ते अजुनही सांगता येत नाही. अजुनतरी स्थिरच आहे. वसुंधरिची सद्ध्याची परिस्थिति पहाता सध्या काही धोका दिसत नाही
--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद