पाकातल्या पुर्‍या

Submitted by pltambe@yahoo.co.in on 14 April, 2014 - 19:53

पाकातल्या पुर्‍या
 पुर्‍या xxx.jpg
साहित्य : पाव किलो मैदा , एक वाटी साखर , बारीक किसलेलले खोबरे,खसखस,बदाम-पिस्ते बारीक तुकडे करून,खाण्याचा केशरी रंग,तळणीसाठी तेल
कृती : प्रथम मैदा चालून घ्या व त्यात गरम तेलाचे मोहन आणि खाण्याचा केशरी रंग व थोडे पाणी घालून घट्ट मळून घ्या. गॅसवर एका पातेल्यात एक वाटी पाणी व एक वाटी साखर घालून उकळूत ठेवा.थोड्या वेळाने पाक तयार होईल. पाक थोडा पातळच असू द्या. पाकाचे पातेले गॅसवरून उतरवून बाजूला ठेवा व गॅसवर एका कढईत तेल तापत ठेऊन मग मळलेल्या मैद्याचे छोटे छोटे घोळे करून त्याच्या पुर्या लाटून तेलात तळून घ्या व तळलेल्या लगेच पाकात टाकून पांच मिनिटात बाहेर काढा. सर्व्ह करतेवेळी त्यावर बदाम-पिस्त्याचे काप घालून सर्व्ह करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पुर्‍या थोड्या आंबटसर असतात ना? माझी आई पुर्‍यांचं पीठ भिजवताना ( मैदा + रवा + कणीक + तांदूळ पिठी) ताक घालून, रात्रभर ठेवून , सकाळी पुर्‍या करत असे. तसंच पाकातही थोडा लिंबूरस टाकत असे.

शुगोल बरोबर आहे तुझे. माझी आई तसेच साबा पण पाकात लिम्बुरस घालतात. या पुर्‍या बाहेर २-३ दिवस टिकतात, त्यामुळे केव्हाही खायला बर्‍या. फोटो मस्त आलाय.

तुम्हाला ज्या फोटोवर नांव टाकायचे आहे त्याच्यावर राइट क्लिक करून ओपन विथ हा ऑप्शन वापरुन पिकासा मध्ये तो फोटो ओपन करून घ्या,मग एडिट इन पिकासावर क्लिक करा. नंतर टेक्स्ट वर क्लिक करा व फोटोवर हवे ते नांव टाका.यात मराठीतून नांव कसे टाकता येईल हे मलाही अद्याप जमलेले नाही. मराठी ऑप्शन घेतल्यास मराठी ऐवजी ???? असे येते. कुणाला माहिती असल्यास कळवले तर बरे होईल,मीही काहीतरी नाविन शिकेन.

मराठी ऑप्शन घेतल्यास मराठी ऐवजी ???? असे येते.<<<

सर ती प्रश्नचिन्हे मराठीतही तशीच असतात की? काहीतरी विचारले जात असावे त्यामार्फत बहुधा!

(हा तुम्ही काढलेलाच फोटो आहे का वगैरे)

मराठीतील 'अक्षरे' न येता फक्त प्रश्नचिन्हेच येतात. मीच काढला याची खात्री करायची असेल तर केंव्हाही घरी येऊन तुमची खात्री करून घ्या.

मराठीतील 'अक्षरे' न येता फक्त प्रश्नचिन्हेच येतात. मीच काढला याची खात्री करायची असेल तर केंव्हाही घरी येऊन तुमची खात्री करून घ्या. माझा पत्ता १४१५ सदाशिव पेठ पुणे ३० दूरध्वनी (०२०) २४४७ ४७८३