अमेरिकेतील शाळांमधील गुन्ह्यांचे वाढते प्रमाण

Submitted by केदार on 10 April, 2014 - 10:36

२०१४ वर्ष सुरू झाले तेंव्हा कोणालाही वाटले वाटले नसेल की पहिल्या १४ दिवसात, अमेरिकेतील शाळांमध्ये ७ वेळेसे शुटिंग होईल ! आयमिन ७ आणि ते पण जानेवारी २०१४ पर्यंत. ( मागिल वर्षाला कम्पेअर करायचे असेल तर पूर्ण २०१३ मध्ये एकुण २६ शुटिंग झाल्या.)

काल आणखी एक घटना घडली ज्यात एका टिनएजरने २१ जनांना स्टॅब केले !

बरं हे एका स्टेट पुरतंच मर्यादित आहे असंही नाही. खालील मॅप बघा. जिथे जिथे रेड आहे, तिथे दोन किंवा अधिक लोकं मेली आणि जिथे यलो,तिथे निदान एक किंवा कोणीही नाही.

school shooting map.JPG

शाळेतील निरपराध मुलं, जे शाळेत शिकायला जाताते, ते मृत्यूमुखी पडतात. नेमकं कसं पचवणार हे?

बरं हा मॅप फक्त शाळांपुरताच आहे, मॉल शुटिंग्स, होम / रोड शुटिंग्स हे सर्व ह्यात नाही. तो डेटा एकत्र केला तर हे चित्र भयानक दिसेल.

अमेरिकित सध्या शाळा / कॉलेज मधून मास शुटिंग / मास किलिंग च्या घटना खूप वाढत आहेत. इतक्या की त्या वाचल्यावर, पुढे नक्की काय होणार? हे सर्व कधी थांबणार देखील आहे की नाही? आणि मुख्य म्हणजे शाळा / कॉलेज मधील मुलं इतकी हिंसक का होत आहेत ह्यावर कोणालाही उत्तर सापडत नाही.

तुम्हाला काय वाटतं?

गन लॉ किती दिवस रेंगाळत ठेवणार. लोकं म्हणतात की वेपन डजन्ट किल पिपल, पिपल किल पिपल. पण माझ्यामते हे आर्ग्युमेंट योग्य नाही.

की प्रगत देशाचे वेगळे मानसिक प्रश्न ह्या सदराखाली हे सर्व येणार?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सामान्य नागरीकाच्या हातात गन्स नसाव्यात हे माझे वैयक्तीक मत पण त्याचवेळी ज्यांना हिंसाचार करायचा आहे ते कसाही मार्ग काढतात हेही पाहिले आहे. त्यात कन्सिल्ड वेपन होते म्हणून रॉबरी थांबवता आली, लोकांचे जीव वाचले हे बघून काय चूक काय बरोबर हे कळेनासे होते. >> यू सेड ईट स्वाती. माझेही थोड्याफार फरकाने असेच मत आहे पण निश्चितच दुष्पपरिणामांची चिंता करण्याआधी मला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी मोठी वाटते.

नीधप> गन आणि रिझर्वेशनची तुलना अश्या अनुषंगाने आली की लोकांचा गन खरेदी करण्याचा आणि वापर करण्याचा घटनात्मक अधिकार रद्द करणे म्हणजे भारतात काही लोकांना घटनेने दिलेले रिझर्वेशन रद्द करणे. 'ते अधिकार सध्या गरजेचे आहेत का' हा वाद एक मिनिट बाजूला ठेवला तर शेकडो वर्षांपासून चालत आलेले ते अधिकार काही अनस्टेबल लोकांच्या चुकीमुळे काढून घेणे बरोबर आहे का? त्याहीपेक्षा कुठ्ले भारतीय सरकार 'रिझर्वेशनचा कायदा रदबातल' असा ठराव संमत करण्यास धजावेल त्याचप्रमाणे अमेरिकतला गन कायदा रद्द करायला पॉलिटिकल विल ऊभी करणे प्रचंड अवघड आहे. असे.

केदार>> घटना दुरूस्ती?? ड्रिंकिंगचे लीगल वय कमी जास्त करणे, मिनिमम वेज १:५० सेंट्स ने वाढवणे वगैरे ह्याला घटना दुरुस्ती म्हणता येईल. गन अधिकार काढून घेणे ह्याला दुरुस्ती कसे म्हणणार? घटना बदल म्हण हवं तर (आय होप आपण गन अधिकार काढून घेण्याबद्दलच बोलत आहोत आणि नुसतेच नियम कडक करण्याबाबत नाही)

ती लोकं घटनेतील ही दुरूस्ती स्विकारायला रक्तरंजीत क्रांती ब्रिंती करतील हे कुठल्याही अमेरिकेत राहणार्‍याला पटायचे नाही >>एवढे सोपे असते का रे केदार? लाखो लोक अ‍ॅम्युनिशन्स संबंधित बिझनेस, गन रेंजेस, ट्रेनिंग सिक्योरिटी अश्या संबंधित गोष्टींवर आपले घरदार चालवतात त्यांचे काय? आज करोडो लोक जे प्राऊड गनओनर्स आहेत त्यांना काय सांगायचे की 'ह्या दिवसापर्यंत तुमच्या गन्स सरकार दफ्तरी जमा करा नाही तर कायदेशीर कारवाईला सामोरे जा?' खारीचा हा प्रसंग शिस्तपालन आणि 'रिगार्ड फॉर ह्यूमन लाईफ' मुद्द्यावरून आला होता. ह्याचा अर्थ असा नाही की ते गन्स गिवअप करून स्वतःला वल्नरेबल बनवतील. ते म्हणणार की आम्ही जबाबदारीने गन्स वापरतो तर काही डझन लोकांच्या चुकीमुळे करोडोंना का शिक्षा? आज जे अगदी खुल्याप्रमाणात ऊपलब्ध आहे आणि कायदेशीर आहे ते असं अचानक बेकायदेशीर ठरवल्याने काय हॅवॉक होईल ह्याची काही कल्पना? समाजा १० करोड मधल्या ९०% लोकांनी गन्स परत दिल्या म्हणजे कायद्यला १ करोड बेकायदेशीर गन्स बरोबर डील करणे आले. तर काय ज्यांनी गन्स दिल्या नाहीत त्यांच्या घराचे दरवाजे ठोठावणार? आणि सगळ्यात महत्वाची गोष्टं. ह्या घटना बदला नंतर आर्म्ड रॉबरी आणि होमिसाईडच्या केसेस वाढल्या आणि बळी पडलेले लोक गन गिवअप केलेले असतील कोर्ट कचेरी, लॉ स्यूट्स वगैरेमुळे सरकारवर किती नामुष्की ओमुळे?

असामी>> नाही नाही काहितरी गैरसमज होतो आहे. मी नियम कडक करायला आणि जागरूकता पसरवण्यासाठी सगळ्यां ईतकाच ऊत्सुक आणि तत्पर आहे. माझा विरोध फक्त गन्सच्या खरेदीवर आणि ती बाळगण्यावर पूर्ण बंदी ह्याला आहे.

चमन तू australian govt ने केलेल्या guns control कायद्याबद्दल वाचले आहेस का ? तू म्हणतोस तसे आक्षेप तिथेही आले होते नि त्यावर कसा उपाय काढला गेला हे अतिशय कुतूहलाचे आहे.

असामी, मी मागे थोडे फार वाचले होते पण तुला त्याबद्दल चांगली माहिती असल्यास नक्की ईथे लिही त्याबद्दल. मी सुद्धा पुन्हा रेफरंसेस मिळवून वाचून बघतो.

चमन मला नीटसे आठवत नाही पण NPR वर ऐकले होते त्यावरून शोधून वाचले होते. वेळ मिळाला तर शोधून लिहीन नक्की.

चमन, ह्म्म सिमिली समजून घेण्याचा प्रयत्न करतेय.

प्राण्याची शिकार ही सायकोपॅथ असण्याची टेस्ट समजायची तर मग सर्व मांसाहारी व्यक्तींना सायकोपॅथ ठरवायचं की काय?
की पोटात जाणारी कोंबडी, बकरी, गाय, मासा स्वतः मारलेला नसतो म्हणून ते ओके आहे?

मला मांसाहारी लोकांवर कुठलीही टिका करायची नाहीये. मांसाहारावर माझा कणभरही आक्षेप नाहीये. पण प्राण्यांची शिकार म्हणल्यावर मला अन्न म्हणून प्राण्याची शिकार हेच आठवले म्हणून प्रश्न आला. असो.

"ओन्ली थिंग दॅट कुड स्टॉप बॅड मॅन विथ ए गन इज ए गुड मॅन विथ ए गन"

हे प्रसिद्ध वाक्य एनआरए च्या चेअरमन साहेबांचं आहे. पटण्यासारखं आहे पण दुर्दैवाने नेमके गोळीबार होताना गुड मेन त्या जागेवर नसतात...

आता यावर उपाय म्हणुन आमच्या (जॉर्जिया) राज्याने नविन कायदा अंमलात आणायचं ठरवलं आहे; उध्या बुधवारी गव्हर्नर साहेबांनी सहि केली कि कायदा झाला. कन्सिल्ड वेपन्स बार, चर्च, क्लब्स इत्यादि सार्वजनिक ठिकाणी नेण्यास परवानगी देण्यात यावी; अशा लोकांना पोलिसांनी हटकु नये, विरोध करु नये. न जाणो, कोणितरी यातलाच "गुड मॅन" पुढे होउ घातलेलं मॅसकर वाचवु शकेल... गो फिगर!

बाप रे! हा तर रोगापेक्षा जालीम उपाय वाटतो आहे!

देशातील लोकांच्या मानसिकतेवर अवलंबून कायदे कोणत्या देशात बनतात? जर असे असते तर भारतात स्त्रीभ्रूणहत्या बंदी कायदा झालाच नसता ना कारण अजूनही बहुतांश भारतीय समाजाची मानसिकता ही मुलगा वंशाचा दिवा असतो अशीच आहे!

भले अमेरिकन लोक परंपरागत शिकारी वै. असतील पण स्वाती२ यांनी म्हटल्याप्रमाणे शिकारीसाठी लागणाऱ्या बंदुकी आणि AK47 सारखी स्वयंचलीत शस्त्रे ह्यात फरक असतो. २ वर्षापूर्वी इथे कॅम्पसवर एका विद्यार्थ्याने AK47 ने अंदाधुंद गोळीबार केला होता! पोलिसांची गाडी येताना पाहून तो घाबरला आणि लायब्ररीत शिरला! बिचारा इतका घाबरला होता की हातात बंदूक घेऊन लोकांना Excuse me! excuse me! म्हणत पळत सहाव्या (शेवटच्या) मजल्यावर गेला. पोलिसांनी बाहेरून घेरलं आहे हे कळल्यावर स्वतःच्या डोक्यात गोळी मारून घेतली Sad
तो एक दिवस सुट्टी मिळाली. १७-१८ वर्षे वयाच्या मुलाच्या हातात AK47?! त्या घटनेच्या एक महिना अगोदर मी रोज त्याच लायब्ररीच्या सहाव्या मजल्यावर दिवसभर अभ्यास करत असे. त्या घटनेनंतर जवळपास महिनाभर मी तिकडे जाऊ शकले नाही! त्या घटनेनंतर इथेही कॅम्पसवर concealed weapons ना परवानगी मिळावी अशी मागणी झाली होती! सुदैवाने अनेक विद्यार्थी संघटनांनी विरोध करून तो ठराव पास होऊ दिला नाही!
civilians कडे कोणतीच शस्त्रे नसावीत ह्या मताची मी नाही पण AK47 सारखी ज्यातून गोळ्यांच्या अनेक फैरी एकाच वेळी चालवता येतील अशी शस्त्रे कोणाच्या हातात असावीत ह्याबद्दल काहीतरी तारतम्य असावे, federal level वर कायदा असावा असे वाटते.

http://www.latimes.com/local/la-me-isla-vista-shooting-20140525-story.ht...

Sad

हे फार हॉरिबल आहे. पालकांनी - त्या मुलानी महिन्याभरापूर्वी डिस्टर्बिंग व्हिडीओज टाकल्यावर पोलिसांना कळवले. पण त्याचे अपब्रिंगिंग कसे झाले आहे हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. त्याचा मास किलिंगचा १३७ पेजेसचा प्लॅन वगैरे तयार होता. Sad

गन्स नसत्या तर निदान हानी कमी झाली असती.

हे गन्स बद्दल नाही पण नेट च्या प्रभावामुळे झालेले आहे. मुली आहेत आणि अजून लहानच आहे त १२ वय.
हे ही अवघड वाट्ते.
http://www.huffingtonpost.com/2014/06/03/slenderman-stabbing_n_5439667.html

का लच एन डी टीव्ही वर वाचले होते पण हपिसातून लिंक द्यायला वेळ झाला नाही. मुलींच्या पालकांनी एकदा बघून घ्या.

स्लेंडरमन ...stabbing भयानक आहे हे.
या मुलींना adult सारखे चार्ज करून ६५ वर्षापर्यंत कोठडी होऊ शकते.

Pages