२०१४ वर्ष सुरू झाले तेंव्हा कोणालाही वाटले वाटले नसेल की पहिल्या १४ दिवसात, अमेरिकेतील शाळांमध्ये ७ वेळेसे शुटिंग होईल ! आयमिन ७ आणि ते पण जानेवारी २०१४ पर्यंत. ( मागिल वर्षाला कम्पेअर करायचे असेल तर पूर्ण २०१३ मध्ये एकुण २६ शुटिंग झाल्या.)
काल आणखी एक घटना घडली ज्यात एका टिनएजरने २१ जनांना स्टॅब केले !
बरं हे एका स्टेट पुरतंच मर्यादित आहे असंही नाही. खालील मॅप बघा. जिथे जिथे रेड आहे, तिथे दोन किंवा अधिक लोकं मेली आणि जिथे यलो,तिथे निदान एक किंवा कोणीही नाही.
शाळेतील निरपराध मुलं, जे शाळेत शिकायला जाताते, ते मृत्यूमुखी पडतात. नेमकं कसं पचवणार हे?
बरं हा मॅप फक्त शाळांपुरताच आहे, मॉल शुटिंग्स, होम / रोड शुटिंग्स हे सर्व ह्यात नाही. तो डेटा एकत्र केला तर हे चित्र भयानक दिसेल.
अमेरिकित सध्या शाळा / कॉलेज मधून मास शुटिंग / मास किलिंग च्या घटना खूप वाढत आहेत. इतक्या की त्या वाचल्यावर, पुढे नक्की काय होणार? हे सर्व कधी थांबणार देखील आहे की नाही? आणि मुख्य म्हणजे शाळा / कॉलेज मधील मुलं इतकी हिंसक का होत आहेत ह्यावर कोणालाही उत्तर सापडत नाही.
तुम्हाला काय वाटतं?
गन लॉ किती दिवस रेंगाळत ठेवणार. लोकं म्हणतात की वेपन डजन्ट किल पिपल, पिपल किल पिपल. पण माझ्यामते हे आर्ग्युमेंट योग्य नाही.
की प्रगत देशाचे वेगळे मानसिक प्रश्न ह्या सदराखाली हे सर्व येणार?
+१
+१
स्वाती आंबोळे + १ चमन - अश्या
स्वाती आंबोळे + १
चमन - अश्या लोनर्स मूलांबद्द्ल कोणी स्टेटमेंट द्यायला सांगत नाहीये...त्यांना फक्त ईमोशनली हेल्थी करायचं म्हणतोय.
गन लॉबी(firearms industry) फार मोठी आणि पैसे वाली आहे, प्रचंड पैसा ओततात हे निवडणूकीत.
अमेरीकेत शिकारीला अजून बंदी नाहिये, पहिले शिकरीला बंदी केली पाहिजे...काही प्राणी शेतीच/मालमत्तेच नूकसान करत असतील तर त्यावर सरकारने उपाय आणि वेळ पडल्यास भरपाई द्यावी.
काही भागात वन्य प्राणी आहेत जसे की अस्वल,व्हूल्फ अश्या भागात गन शिवाय रहाणे कठिण आहे. वन्य प्राण्याचां धोका असल्यास फक्त त्यांनाच गन देण्यात यावी.. म्हणजे त्या भागातील लोकांना स्व-संऱक्षण करता येइल. तो पर्यन्त सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाय केला की त्यांची गन पण काढून घ्यावी.
स्वाती लोनर आणि ट्र्बल्ड
स्वाती
लोनर आणि ट्र्बल्ड लोकांना सामावून घेण्याचे ऊपचार अवश्य करावेत, नव्हे १००% करतातच. त्याचे ईश्यूज समजाऊन घेऊन (जे माईल्ड ऑटीझम डिसलेक्सिया ते हेट्रेड, व्हाईट सुप्रीमसी) काहीही असू शकतील. हे ऊपचार त्या मुला/मुलीचे जे ईश्यू आहेत त्यांना धरून आणि पालकांच्या कन्सेन्ट नंतर घडवून आणले जातातच. पण 'ह्याला ऊपचार न दिल्यास तो सायकोपाथ बनेल' किंवा 'हिला ऊपचार देतोय म्हणजे एक सायकोपाथ कमी करतोय' ह्या थिओरीला आजिबात अर्थ नाही, असे माझे म्हणणे आहे. 'हाऊ टू डील विथ ईन-मेकिंग सायकोपाथ १०१' असलं काही असू नये.
तन्मयचा ईमोशनली हेल्थी करण्याचा मुद्दा चांगला आहे, पण तो सरसकट सगळ्यांना लागू असावा, मी आधी म्हंटले तसे हे प्रशिक्षणासारखे असावे.
तन्मय झाला ना डॉमिनो ईफेक्ट चालू.
काही डझन ईनसेन मुलांनी (अमेरिकेतल्या एकूण गनधारकांच्या तुलनेने हा आकडा अतिशय नगण्य आहे) ज्यांना ते काय आणि का करत आहेत, त्याचे परिणाम काय असतील हे कळत नाही, ज्यांच्या कृतीला त्यांचे बेजबाबदार पालकही कारणीभूत आहेत अश्या मुलांच्या मुळे तुम्ही करोडो लोकं जे पिढ्यानपिढ्या बंदुका बाळगून आहेत, जबाबदारीने त्याचा वापर करत आहेत, त्यांच्या मुलांना जबाबदारीने हस्तांतरित करत आहेत, काटेकोरपणे नियम पाळत आहेत अश्या लोकांचा गन्स बाळगण्याचा नैतिक आणि संवैधानिक हक्क काढून घेणार?
हे अमेरिका आहे महाराजा- ईथे लोकांना भितीखाली जगणे, अस्तित्वावर गदा येणे वगैरेचा प्रचंड तिरस्कार आहे. अस्तित्व पणाला लागल्यावर तो परिणामांचा विचार न करता मरो या मारो पवित्रा घेतो. आंदोलन, गांधीगिरी, सत्याग्रह बगैरे त्यांच्या साठी पुचाट (अवमान करण्याचा हेतू नाही पण सौम्य शब्द सुचलाच नाही) गोष्टी आहेत. तुम्ही पोलिस संरक्षण वगैरे म्हणता, 'अहो ईथे पोलिसच शंका आल्यास लागलीच बॅकअप बोलावतात.' आधी म्हणालो तसे एडिसन ते सॅनहोजे च्या मध्ये अमेरिकेत काय आहे हे जावे त्यांच्या देशा तेव्हाची कळे.
गन लॉबी(firearms industry)
गन लॉबी(firearms industry) फार मोठी आणि पैसे वाली आहे, प्रचंड पैसा ओततात हे निवडणूकीत. >>> तेच तर अवघड जागेचं दुखणं आहे.
चमन, तुम्ही म्हणता तशी
चमन, तुम्ही म्हणता तशी मानसिकता आहे अमेरिकेत हे खरे पण म्हणून ती justify करायलाच हवी असे नाही. गन वापरण्यावर सरसकट बंदी आणा असं कोणीच म्हणत नाहीये पण गन बाळगण्यावर कायद्याने काही अंकुश असेल तर त्यात वाईट काय आहे? वर्षाला ४३००० मृत्यू फक्त गनच्या चुकीच्या वापरामुळे हे योग्य वाटते का?
आणि अमेरिकन माणूस कायदाप्रेमी आहे हे नक्की! रस्त्यावर वाहन चालवत असताना सर्व कायदे पाळून चालवतात (अशी गोष्ट जी रोज ९९% अमेरिकन नागरिक करतात) आणि त्यात काही व्यक्ती-स्वातंत्र्यावर घाला वै. वाटत नाही त्यांना तर मग गन विषयीच एकदम का वाटेल?
ही एक खूप शक्तिशाली लॉबी आहे हेच खरं! अशीच एक युद्धाची शस्त्रसामुग्री तयार करणारी लॉबी आहे जिच्यापायी अमेरिका सतत जगभर युद्ध पेटवीत फिरत असते अशी एक conspiracy theory ऐकली आहे! खखोदेजा!
चमन, तुम्ही म्हणता तशी
चमन, तुम्ही म्हणता तशी मानसिकता आहे अमेरिकेत हे खरे पण म्हणून ती justify करायलाच हवी असे नाही. >> तुम्ही आम्ही जस्टीफाय करून/ न करून काय ऊपयोग. काष्मीर खोर्यामध्ये राहणार्याला बंदूकीचा परवाना द्यावा की न द्यावा ह्याबद्दल पुण्यातल्या नागरिकांकडून जस्टीफिकेशन मागवणार का? समजा सराकरने असा परवाना काष्मीरवासियांना दिला आणि एखाद्या पुणेरी माथेफिरूने काष्मीरातून बंदूक आणून पुण्यामध्ये गोळीबार केला तर पुणेकरांनी जस्टीफाय केलं म्हणून सगळ्या काष्मीरींवर निर्बंध लादण्यात काय अर्थ? हे म्हणजे गांधी हत्येनंतर ब्राम्हण आणि नंतर शिखांवर जे ओढवलं त्यासारखंच झालंना. (भारतीय ईतिहास हा मुद्दा नाहीये हे कृपया लक्षात घ्या)
गन वापरण्यावर सरसकट बंदी आणा असं कोणीच म्हणत नाहीये पण गन बाळगण्यावर कायद्याने काही अंकुश असेल तर त्यात वाईट काय आहे? >> (वरच्या प्रतिसादात बरेच जण गन बॅन करण्याबद्दल बोलले आहेत) काहीच वाईट नाही, काही आक्षेपही नाही. मलाही ह्यात आनंदच वाटेल. प्रशंसनीय पाऊल असेल पण ह्याने संवैधानिक हक्कावर गदा येणार नाही हे पण बघितलेच पाहिजे ना?
ऊद्या तुमच्या रोजच्या वापराच्या फ्रीवेवर, ड्रंक ड्रायविंग मुळे खूप अॅक्सिडेंट झाले म्हणून स्पीडलिमिट ७० चा ३५ केला आणि भसाभस तिकिटं द्यायला चालू केली. तुमचा ऑफिसला जायचा वेळ ३५ मिनिटांवरून ७० मिनिटे झाला, ट्राफिक कंजेस्शन वाढलं, गॅसचं बजेट वाढलं तर तुम्ही बंड करून ऊठणारंच ना? ड्रंक लोकांच्या चुकांपायी आम्हाला शिक्षा का? आम्ही तर नियमाला धरून वागतो ना?
मुद्दा शाळांमध्ये कळत्या-नकळत्या वयातल्या मुलांकडून होणारा हिंसाचार असा आहे ना. मग शिक्षणप्रणाली आणि वय हे दोन महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत ना.
>>अमेरीकेत शिकारीला अजून बंदी
>>अमेरीकेत शिकारीला अजून बंदी नाहिये, पहिले शिकरीला बंदी केली पाहिजे...काही प्राणी शेतीच/मालमत्तेच नूकसान करत असतील तर त्यावर सरकारने उपाय आणि वेळ पडल्यास भरपाई द्यावी.
काही भागात वन्य प्राणी आहेत जसे की अस्वल,व्हूल्फ अश्या भागात गन शिवाय रहाणे कठिण आहे. वन्य प्राण्याचां धोका असल्यास फक्त त्यांनाच गन देण्यात यावी.. म्हणजे त्या भागातील लोकांना स्व-संऱक्षण करता येइल. तो पर्यन्त सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी ठोस उपाय केला की त्यांची गन पण काढून घ्यावी.>>
असहमत!
शिकारीसाठी वापरली जाणारी बंदूक आणि इतर हत्यारे आणि अॅसॉल्ट वेपन या दोन भिन्न गोष्टी आहेत. शिकार करायला मुलं मुली आपल्या कुटुंबियांबरोबर जातात. खूप काही शिकतात. अतिशय जबाबदारीने हे शिक्षण दिले जाते. हंटिंग सिझन मधे शिकार करून हरणासारख्या प्राण्यांची संख्या नियंत्रित केली जाते. बरेच नियम पाळावे लागतात. शिकारीतून मिळणारे वेनिसन मीट बरेचजण दान करतात. डिअर्/वेनिसन डोनेशन म्हणून सर्च केल्यास याबाबत माहिती मिळेल. इतर वन्य प्राण्यांबाबतही DNR चे नियम आहेत. माझ्या ओळखीची बरीच कुटुंबं हंटिंग करतात. १३-१४ वर्षाच्या मुलामुलीनी केलेली पहिली शिकार - वेनिसन डोनेशन हे सगळे फार वेगळे आहे. टीनएजरने रात्रभर जागून कौशल्याने केलेली टर्कीची शिकार ही अभिमानाची बाब असते. कृपया कुटुबियांबरोबर सगळे नियम पाळून शिकार करायला जाणे आणि शाळा, मॉल्स वगैरे ठिकाणी होणार्या हत्या हे एका मापात मोजू नये ही विनंती.
चमन, सॉरी पण दोन्ही उदाहरणं
चमन, सॉरी पण दोन्ही उदाहरणं नाही पटली. जाऊ दे! तुम्ही आम्ही वाद घालून काय होणारे! अमेरिकेत कायदे करणं काही आपल्या हातात नाही! पण ह्या वाढत्या घटना पाहून तो कोणीतरी करण्याची गरज आहे एवढं मात्र नक्की!
मलाही ह्यात आनंदच वाटेल.
मलाही ह्यात आनंदच वाटेल. प्रशंसनीय पाऊल असेल पण ह्याने संवैधानिक हक्कावर गदा येणार नाही हे पण बघितलेच पाहिजे ना? >> चमन मूळात तो संवैधानिक हक्क सध्याच्या परिस्थितीत योग्य आहे का ह्याबद्दल चर्चा होणे जरुरीचे नाहि का हा प्रश्न आहे.
तो कोणीतरी करण्याची गरज आहे
तो कोणीतरी करण्याची गरज आहे एवढं मात्र नक्की!
अमेरिकेत कायदे फक्त तेंव्हाच होतात जेंव्हा ते करणार्यांचा काही आर्थिक फायदा (अप्रत्यक्षपणे) होत असेल तरच.
असे इथल्या अनेक जाणकार अमेरिकनांचे मत आहे. काही लेख लिहून हा मुद्दा स्पष्ट केला आहे.
गनचाहि कायदा आहे, लोकांना दा़खवण्यासाठी, पण बरेचदा तो अंमलात आणला जात नाही किंवा त्यात बर्याच पळवाटा आहेत, म्हणजे गन लॉबी वाल्यांचेहि समाधान, मग ते पैसे देतील, निवडून येता येईल, नि असल्या पळवाटा कायद्यात घुसवता येतील. मग लाचलुचपत न करता सगळे कसे कायदेशीर!
तेंव्हा सरकार, कायदे यांच्यावर विसंबून रहाता येणार नाही. लोकांच्या मनात आले तरच कायद्याशिवाय सुद्धा होईल.
चमन मूळात तो संवैधानिक हक्क
चमन मूळात तो संवैधानिक हक्क सध्याच्या परिस्थितीत योग्य आहे का ह्याबद्दल चर्चा होणे जरुरीचे नाहि का हा प्रश्न आहे.>> सध्याची परिस्थिती बघता (वाढलेला हिंसाचार, असुरक्षितता, ढासळती मानसिक कणखरता, वंशवाद, धर्मवाद, सांस्कृतिक फरक, ड्र्ग्ज, गेम्स ई ई ) तो ऊलट आत्ताच जास्तच जरूरीचा झाला आहे असे नाही वाटत का?
मला वाटतं बहूतेक जण 'गन चुकीच्या माणासाच्या हातात जाऊ नये म्हणून गन्स नको किंवा ती मिळवणे प्रचंड अवघड असावे' ह्या मताचे आहेत तर माझ्यासारखे 'गन किंवा कुठलेही शस्त्र चुकीच्या माणासाच्या हातात जाऊ नये (कायदा असो वा नसो ) हे निंयंत्रित करणे माझ्या ,कायद्याच्या किंवा सरकारच्या आवाक्याबाहेरचे आहे म्हणून माझ्याकडे गन जरूर असावी जी मी गरज पडल्यास वापरेन' अश्या मताचे आहेत.
मूळात तो संवैधानिक हक्क
मूळात तो संवैधानिक हक्क सध्याच्या परिस्थितीत योग्य आहे का ह्याबद्दल चर्चा होणे जरुरीचे नाहि का हा प्रश्न आहे.
प्रचंड अनुमोदन. संविधान लिहिणारी शेवटी माणसेच होती. त्यांनी लिहिलेले त्रिकालबाधित सत्य आहे असे मानायची गरज नाही. (हे एखाद्या रेडनेक ला सांगितले तर तोच गन उगारायचा). ज्या कारणाने हा हक्क दिला गेला ते तर आज अगदी हास्यास्पद आहे.
चमन तुमचा उपाय रोगापेक्षा औषध भयंकर या प्रकरातला आहे. सर्वांनीच स्वरक्षणार्थ गन बाळगायला सुरु केले तर काय होईल?. नुकतीच घडलेली घटना, एका थिएटर मध्ये एक माणूस सिनेमा सुरु असतानाही मोबाईल वर एस एम एस करत होता. त्या मागच्या माणसाने भांडण काढले, थोडी बाचाबाची आणी मागच्या माणसाने गोळी झाडली, पुढचा गतप्राण!. गन साफ करतान गोळ्या काढायला विसरले आणी गोळी लागून गन धारक किंवा दुसराच कुणीतरी जखमी/ मयत झाले हे तर नेहेमीचेच.
> हे निंयंत्रित करणे माझ्या ,कायद्याच्या किंवा सरकारच्या आवाक्याबाहेरचे आहे
हेही पटले नाही. बरेच उपाय आहेत.
चमन, खरच तुमचा उपाय
चमन, खरच तुमचा उपाय रोगापेक्षा औषध भयंकर वाटतो. का ते विकुंनी थोडक्यात वर लिहिलेच आहे.
जर एखाद्या अल्पवयीन
जर एखाद्या अल्पवयीन व्यक्तीच्या हातून असा अंदाधुंद गोळीबाराचा गुन्हा घडला तर ज्याच्या नावे ते शस्त्र नोंदलेले आहे त्या सज्ञान व्यक्तीला दोषी ठरवणारा तरी कायदा हवा जेणेकरुन शस्त्र बाळणाऱ्या सज्ञान व्यक्ती आपले शस्त्र भलत्या हाती पडू नये म्हणून अधिक जागरुक राहतील.
अमेरीकेतील २८ राज्यात आणि
अमेरीकेतील २८ राज्यात आणि डी.सी. त child access prevention laws आहेत. मात्र या कायद्यांत एकवाक्यता नाही. काही राज्यात कठोर कायदे आहेत तर काही राज्यात ते तितकेसे कठोर नाहीत. तसेच मायनर म्ह्णून वयाची अट ही देखील वेगवेगळी आहे. (१४-१८ वर्षे)
http://smartgunlaws.org/child-access-prevention-policy-summary/
फेडरल लेवलवर मात्र असा कायदा नाहिये.
जिज्ञासा >>गुन्हा घडून
जिज्ञासा >>गुन्हा घडून गेल्यानंतर कोणाला जबाबदार धरायचे, आणि किती शिक्षा करायची ह्याचा सध्या घडणार्या घटना घडू नयेत म्हणून करायच्या ऊपयांशी परस्पर संबंध कसा ? मी कुठेही जबाबदार व्य्क्तींना शिक्षा करू नका किंवा सौम्य शिक्षा करा असे म्हंटलेले नाहीये. तुम्हाला अश्या मुलांच्या पालकांनाही शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे ठीक आहे. ईथे शिक्षेच्या बाबतीत कायदा ऊदासीन नाहीये तर अगदी तत्परच आहे. बाकी कायदा आला तरी खटला, वकील आणि ग्रँड ज्युरी ह्यावरच कोर्टात काय सिद्ध करता येते ते ठरेल ना?
सुनिधी >> तुम्ही दिलेले ऊदाहरण वैयक्तिक असल्या कारणाने ह्या वादात ते पुढे चर्चिले जाऊ नये असे मला वाटते. त्याबद्दल मी काही लिहित नाही.
विकु >> 'रेडनेक' शब्द वापरणं मी माझ्या पोस्टींमधून कटाक्षाने टाळत होतो. पण आता तुम्ही तो लिहिल्या कारणाने मला लिहिणे आले. मी आधीही म्हणालो कुठे कमी तर कुठे खूप जास्त प्रमाणात ही अमेरिकन कॉलोनिस्ट मानसिकता आहेच. ती कुठल्याच कायद्याने बदलता येणार नाही. १९९२ ची आयडहो मधली 'रूबी रिज' घटने बद्दल वाचून बघा. संवैधानिक हक्क बदलण्याबद्दल मी आधी 'भारतातल्या रिझर्वेशन सिस्टीमचं' ऊदाहरण दिलं होतं.कायद्याने हा हक्क बदलायचा आहे, आणि त्यामुळे अमेरिका सुरक्षित बनेल असे तुम्हाला वाटत असेल तर जरूर असा प्रयत्न व्हावा पण हे स्थित्यंतर रक्तरंजित असेल असे मला वाटते, आणि म्हणून कोणतेही सरकार ह्या हक्कावर निर्बंध लादण्याची शक्यता कमीच आहे.
बाकी तुम्ही सांगितलेल्या घटना रेज आणि अपघात ह्या सदरात मोडतात. ते जगात रोज कोठेही सर्रास होते. गाडी चालवतांना, ईलेक्ट्रिक ऊपकरणे हाताळतांना, किचनमध्ये कुठेही. न्यूयॉर्क सबवेमध्ये तुमच्या आमच्यासारखे चाकरमाने किती लोक कन्सील्ड वेपन घेऊन रोज प्रवास करतात ह्याबद्दल मागे एक सर्व्हे वाचला होता.
> हे निंयंत्रित करणे माझ्या ,कायद्याच्या किंवा सरकारच्या आवाक्याबाहेरचे आहे
हेही पटले नाही. बरेच उपाय आहेत. >> ड्र्ग्ज आणि त्यामुळे दरवर्षी बरबाद होणारी हजारो टीनेज मुले नियंत्रित झाली? सिगरेट नियंत्रित झाली? ओबीसीटी नियंत्रित होतेय? शाळेत ड्र्ग्ज मिळू शकतात म्हणून आपण मुलांना शाळेत पाठवणे थांबवतो का? तर त्यांना हे कसे आणि किती वाईट आहे हे समजावतो ना? थ्रीडी प्रिंटर वापरून घरच्या घरी गन बनवता येते आज काल.
जागरूकता अवश्य निर्माण केली पाहिजे. डिफेंसिव ड्रायविंग सारखी 'डिफेंसिव फायरआर्म ट्रेनिंग' कंपलसरी केलीच पाहिजे. मी आधीच प्रशिक्षण देण्याचा मुद्दा अधोरेखित केला आहे.
चमन, माझा प्रतिसाद तुम्हाला
चमन, माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशून नव्हता. घडणाऱ्या घटना बघता असलेला कायदा पुरेसा नाही असे बहुतेकांना वाटत आहे आणि म्हणून इथे सगळे उपाय सुचवत आहेत.तुम्ही सर्व पोस्ट्स स्वतःवर घेऊ नका.
गुन्हा घडून गेल्यानंतर कोणाला जबाबदार धरायचे, आणि किती शिक्षा करायची ह्याचा सध्या घडणार्या घटना घडू नयेत म्हणून करायच्या ऊपयांशी परस्पर संबंध कसा ? >> सरळ संबंध असतो. जर सिग्नल तोडल्यावर सणसणीत दंड होणार असेल तर नियम मोडण्याआधी लोक दहादा विचार करतात. म्हणूनच तर गुन्ह्याच्या गंभीरतेवर शिक्षेचे स्वरुप अवलंबून असते!
चमन मूळात तो संवैधानिक हक्क
चमन मूळात तो संवैधानिक हक्क सध्याच्या परिस्थितीत योग्य आहे का ह्याबद्दल चर्चा होणे जरुरीचे नाहि का हा प्रश्न आहे.
तसे बर्याच लोकांचे मत होत आहे. पण गन लॉबी पेक्षा जास्त पैसा देण्याची क्षमता सध्या नाही. तोपर्यंत कुणिहि हा विचार उचलून धरणार नाही.
कॅपिटालिस्ट - सर्व काही पैशाशी निगडित. तिथे लोककल्याण, बरोबर, वाईट हे सगळे पैशात मोजले जाते.
अहो, प्रत्यक्ष कोर्टाबद्दल म्हणतात - This is the court of law. It recognizes legally accepted statements and lawyer's arguments . Truth and justice have no place here.
चमन, .. वैयक्तिक अनुभव काढुन
चमन,
.. वैयक्तिक अनुभव काढुन टाकत आहे ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण तुमचे, शाळेत ड्र्ग्ज मिळू शकतात म्हणून आपण मुलांना शाळेत पाठवणे थांबवतो का? तर त्यांना हे कसे आणि किती वाईट आहे हे समजावतो ना? > हे मान्य. घरी मोठ्या शाळेतले संभाव्य धोके हल्लीच सांगितले. ड्रग्स बद्दल वगैरे पण. किती लक्षात राहिले माहीत नाही पण अधुनमधुन सांगत रहाणार. लेखातली मुख्य बातमी पण सांगितली.
अनुमोदन झक्की!! . पैशाची ताकद
अनुमोदन झक्की!!
. पैशाची ताकद आणि राजकीय वजन हेच कायदा बनवण्याचे आणि बदलण्याची 'मस्ट हॅव' माध्यमं आहेत. नैतिकतेच्या व्याख्या ईथे खुजा पडतात. बरोबर काय आणि चूक काय ह्याचे अर्थ गरजेनुसार ही माध्यमं बदलू शकतात. आपण माणूसकी आणि सदसद्विवेकबुद्धीनुसार ऊत्तरं देऊ, ऊपाय सांगू पण ते बरोबर आहे की चूक ते ठरवणं आपल्या हातात नाही.
सरळ संबंध असतो. जर सिग्नल तोडल्यावर सणसणीत दंड होणार असेल तर नियम मोडण्याआधी लोक दहादा विचार करतात. म्हणूनच तर गुन्ह्याच्या गंभीरतेवर शिक्षेचे स्वरुप अवलंबून असते! >> जिज्ञासा, हे अर्ग्यूमेंट चुकीच्या अॅझम्पशन वर बेस्ड आहे असे नाही वाटत का? लोक सिग्नल तोडत नाही ते सणसणीत दंड होतो म्हणून नाही तर 'रिगार्ड फॉर ह्यूमन लाईफ' स्वतःच्या आणि ईतरांच्या म्हणून. समजा मी एक मल्टाय मिलेनिअर आहे आणि सिग्नलच्या दोनचारशे डॉलर्सच्या फाईनमुळे मला एका चहाचा कप तोडल्यावर होणार्या नुकसानीएवढाही फरक पडत नाही तर मी सिग्नल तोडलेला चालेल का? समजा माझी महत्वाची बिझनेस डील आहे आणि सिग्नलवरती दोन मिनिटे वाया गेल्याने मला खूप नुकसान होणार आहे तर मी भरावयाच्या दंडाची पर्वा न करता सिग्नल तोडला तर चालेल का?
कुठल्याही परिस्थितीत सिग्नल न तोडणे ही मानसिकता आहे ती शिकवणूकीतूनच येते. आणि ती ईथल्या बहूतांश लोकांच्या अंगी नसती तर, दंड करायला पोलिस आसपास नाही तोडा सिग्नल, कॅमेरा नाही तोडा सिग्नल, रात्रीचे दोन वाजता ट्राफिक नाही तोडा सिग्नल असे चित्र सगळीकडे दिसले असते. पण तसे होत नाही, कारण शिस्त, शिकवण आणि रिगार्ड फॉर ह्यूमन लाईफ'. पार्किंगमध्ये रस्त्यावरून आडव्या पळालेल्या खारीसाठी करकचून ब्रेक दाबणारे अमेरिकन्स बघितले आहेत आणि 'बेबी ऑन बोर्ड' चा बोर्ड लाऊन माझ्या बाळाचे आयुष्य तुमच्या हवाली म्हणत ट्राफिकचे सगळे नियम धाब्यावर बसवणारे देसी बघितले आहेत. देसी लोकांना जिवाची तमा नाही असे नाही पण शिकवण आणि शिस्तीत ते मार खातात.
म्हणून पुन्हा म्हणेन शिक्षेची भिती घडावयाची घटना थांबवू शकत नाही पण चांगली शिकवण थांबवू शकते. आणि सुरक्षित शस्त्र हाताळणीसाठी प्रशिक्षणच गुरूकिल्ली आहे.
टीनएजरने रात्रभर जागून
टीनएजरने रात्रभर जागून कौशल्याने केलेली टर्कीची शिकार ही अभिमानाची बाब असते. >> काहीही. ह्यातूनच
दुसर्या जिवावर हत्यार उगारणे चालते असा संदेश दिला जातो. प्राण्यांचा अब्यूज ही सायकोपाथ ओळखण्याची पहिली पायरी आहे. एक तर ब्रोकन होम्स, उरलेला पालक इमोशनली अवेलेबल नसणे सहज उपलब्ध हत्यारे
डिप्रेशन, शाळेतून बुलींग ह्यामुळे काही मुले एकलकोंडी बनत जातात व मग अश्या तर्हेने व्यक्त होतात. सजग पालकत्व जरूरी आहे कारण ती सज्ञान होईपरेन्त पालकच त्यांच्या कृत्याला जबाबदार असतात.
मीडिया मधील हिंसा पण काही अंशी कारणी भूत आहे. विडीओ गेम्स मध्ये एकूण मारणे आणि जीव घेणे गाड्या चोरणे हेच असते. ह्या गेम्स खे ळून मुले डिसेन्सिटाइज होतात. गेम मध्ये आपण मेलो कि परत सुरू करतो तसेच त्यांना वाटू लागते. जीटीए सारख्या गेम मध्ये इतक्या बिनधास्त पणे ते एक मेकांना मारतात आणि कोणत्याही स्ट्रेंजरच्या अंगावरून गाडी नेतात ते बघून फारच कसे तरी होते. पिढीचा दोष असेल कदाचित पण तरीही.
टीव्ही शोज, रिअॅलिटी शोज, मधूनही हिंसेचा मारा होत असतोच. नीट वाढवलेली मुले देखील टीनेज रेबेलिअन नावाखाली अशी वर्तणूक करू शकतात.
गन लॉबी विरूद्ध सामान्य नागरिक काही करू शकणार नाही. झक्कींचे बरोबर आहे. परंतू फेसबुक कँपेन,
सह्या मोहीम आणि तुमच्या एरियातल्या सरकारी प्रतिनिधीवर प्रेशर गॄप बनवून दबाव आणणे. निवड्णुकीत हा एक इश्यू करणे असे करू शकता का ते बघावे.
हा देश जगभर लोकांच्या माथी शांततेच्या नावाखाली हिंसा करत असतात. किती सिविलिअन डेथ्स, किती लोक डिस्प्लेस्ड किती रेंडिशन्स, किती अत्या चारी हुकुमशहांना सोयीस्कर पाठिंबे !सम डे कर्मा इज गोइंग टू हिट बॅक. ( हे अगदी वैयक्तिक मत आहे. तुम्हास हसू येइल कदाचित. व हा बाफचा विषय ही नाही)
अजाण शाळकरी मुले हकनाक मरू नयेत हे खरेच आहे. सँडि हुकच्या अॅनिवरसरीला आम्ही त्या मुलांचा फोटो दोन दिवस लावला होता. जग त्यांना विसरूनही जाईल. वाइट वाट्ते.
वाचते आहे. काहीजणांनी तिकडे
वाचते आहे.
काहीजणांनी तिकडे गन्स अॅव्हेलेबल असणे याला इथे रिझर्वेशन असणे हे समांतर आहे अश्या स्वरूपाची विधाने केलेली वाचली. ते कसे काय ते समजले नाही. असो.
काही पोस्टस वगळता फार पटकन लेबलिंग होतेय असं वाटलं.
स्थित्यंतर रक्तरंजित असेल असे
स्थित्यंतर रक्तरंजित असेल असे मला वाटते >>
अरे काहीही काय चमन. दोन तीन वेळा तू हा युक्तीवाद केलास पण तुझा हा युक्तीवाद बेसलेस आहे. जी लोकं खार आहे म्हणून करकचून ब्रेक दाबतात, अन रात्री २ वाजताही लाईट पाळतात, ती लोकं घटनेतील ही दुरूस्ती स्विकारायला रक्तरंजीत क्रांती ब्रिंती करतील हे कुठल्याही अमेरिकेत राहणार्याला पटायचे नाही. आणि कोणाला मारणार ही गन सपोर्ट करणारी माणसं? निरपराध लोकांना?
'गन किंवा कुठलेही शस्त्र
'गन किंवा कुठलेही शस्त्र चुकीच्या माणासाच्या हातात जाऊ नये (कायदा असो वा नसो ) हे निंयंत्रित करणे माझ्या ,कायद्याच्या किंवा सरकारच्या आवाक्याबाहेरचे आहे म्हणून माझ्याकडे गन जरूर असावी जी मी गरज पडल्यास वापरेन' अश्या मताचे आहेत. >>> पण मग गन समोरच्या व्यक्तीकडे पण असेल , मग शाब्दीक वादावादी होण्याऐवजी , ढिश्क्याँव ! ढिश्क्याँव !! होईल. नाही का ?
पेट थेरपी, इथे मांसाहार ही
पेट थेरपी,
इथे मांसाहार ही नॉर्मल गोष्ट आहे. हॉग, चिकन, बीफ वगैरेचे कमर्शिअल प्रॉडक्शन चालते तर मग व्यवस्थित लायसन्स काढून डिपार्टमेंट ऑफ नॅचरल रिसोर्सेसचे नियम पाळून घरातील वडीलधार्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली शिकार आक्षेपार्ह का ठरावी? अशी शिकार करायला जाणारी मुले ब्रोकन फॅमिलीतून नव्हे तर तीन पिढ्यांची घट्ट वीण असलेल्या घरांतून येतात. जंगलात जाणे, प्राण्याच्या पावलांच्या ठशावरून माग काढणे, पानथळ, दलदल असलेल्या ठिकाणी सावधपणे वावरणे, एका बाणात्/बारात शिकार करणे हे सर्व मुले मोठ्या माणसांकडून शिकतात. प्रत्येकाला किती शिकार करता येइल याचे नियम आहेत. त्यांची अंमलबजावणी करायला स्टाफ असतो. स्थानिक नद्यांची सफाई, इतर नॅचरल रिसोर्सेसचे जतन करणे हे देखील ही मुले शिकत असतात. हिच शिकार करणारी मुले स्नो स्टॉर्म नंतर रुरल भागातले रस्ते सेवा म्हणून साफ करायला पुढे असतात. मोबदला न घेता पहाटे चारला उठून उणे तपमानात रस्त्यावरचा ६ इंच स्नो काढायला डेडीकेशन लागते. ही मुले फ्लड येणार असतो तेव्हा नदीच्या काठावर सॅन्ड बॅग लावतात. स्टॉर्म/टोर्नॅडो उन्मळून पडलेली झाडे पॉववर सॉने तोडून साफसफाई करतात. अशा वेळी सायकोपाथ म्हणून शिक्का मारणे जरा अतिच होते असे मला वाटते. टर्कीचे उदाहरण दिले कारण टर्की या पक्षाची शिकार करणे खूप कठीण असते. मिळालेली शिकार बरेचजण फूड बँकेला डोनेट करतात. आम्ही जिथे रहातो त्या भागात २०% माणसे फूड इन्सिक्युअर आहेत. बर्याच कुटुंबांना सुपर मार्केटमधे जाऊन मांसाहारासाठी खरेदी करणे परवडत नाही. हंटर्सनी दान केलेले मांस हा इथल्या फूड बँकांचा मोठा आधार असतो. शाकाहाराचा पुरस्कार करणे सोपे आहे पण जिथे फक्त सोसाबिन आणि फीड कॉर्न पिकते, सर्व भाज्या-फळे हे बाहेरून आल्याने खिशाला परवडत नाही तिथे मांसाहार ही चंगळ नसून गरज आहे. तसे बघायला गेले तर एकेकाळी भारतातही शिकार करणे हे कॉमन होते.
प्राण्यांबाबत कृएल्टी इथेही खपवून घेतली जात नाही. तो गुन्हा आहे. मात्र ससे, हरीण, टर्की वगैरे इथल्या लोकांसाठी अन्न आहे.
सामान्य नागरीकाच्या हातात गन्स नसाव्यात हे माझे वैयक्तीक मत पण त्याचवेळी ज्यांना हिंसाचार करायचा आहे ते कसाही मार्ग काढतात हेही पाहिले आहे. त्यात कन्सिल्ड वेपन होते म्हणून रॉबरी थांबवता आली, लोकांचे जीव वाचले हे बघून काय चूक काय बरोबर हे कळेनासे होते.
फार पटकन लेबलिंग होतेय
फार पटकन लेबलिंग होतेय
मायबोलीवरच नव्हे तर कुठेहि मोठ्या प्रमाणावर असेच होते.
सभ्य, विचारी, हुषार लोक सहसा असे करत नाहीत, विशेषतः कुणाबद्दल derogatory बोलण्या आधी नक्कीच विचार करतील.
पण काय आहे, दुसर्याला वेडा म्हंटले की आपण किंवा तसे म्हणणारा लगेच शहाणा, अशी अनेक, अनेक लोकांची समजूत असते. ते सोपे नाही का? नाहीतर स्वतःचा शहाणपणा लोकांना पटवून देणे किती कठीण नि वेळखाउ असते.
ज्यांना व्यक्तीपासून व्यक्तीचा विचार वेगळा करणे जमेल असे फार थोडे लोक असतात. नि त्यांनाहि ते नेहेमी जमेलच असे नाही.
>> ह्यातूनच दुसर्या जिवावर
>> ह्यातूनच दुसर्या जिवावर हत्यार उगारणे चालते असा संदेश दिला जातो. प्राण्यांचा अब्यूज ही सायकोपाथ ओळखण्याची पहिली पायरी आहे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
प्राण्यांचा अब्यूज आणि शिकार एकाच मापात मोजून शिकार्यांना सायकोपॅथ्स ठरवून मोकळं होणं ही कशाकशाची पहिली पायरी असू शकेल?
प्राण्यांचा अब्यूज आणि शिकार
प्राण्यांचा अब्यूज आणि शिकार एकाच मापात मोजून शिकार्यांना सायकोपॅथ्स ठरवून मोकळं होणं >>> अगदी बरोबर , प्राण्याला मारहाण करणे आणि गोळी घालुन मारणे एकाच मापात कसं मोजणार ?
<<चमन, सॉरी पण दोन्ही उदाहरणं
<<चमन, सॉरी पण दोन्ही उदाहरणं नाही पटली. जाऊ दे! तुम्ही आम्ही वाद घालून काय होणारे! अमेरिकेत कायदे करणं काही आपल्या हातात नाही! पण ह्या वाढत्या घटना पाहून तो कोणीतरी करण्याची गरज आहे एवढं मात्र नक्की!
>>
पूर्ण सहमत. वाद-प्रतिवाद करायला भरपूर मुद्दे आहेत. पण इथे फायदा दिसत नाहीये.
मी स्व्-संरक्षणासाठी गन कधी घेणार नाही आणि सामन्य नागरिकाना पूर्ण-पणे गन्स बॅन नाहीतर अत्यंत कठोर शिक्षा करायला माझा संपूर्ण पाठिंबा राहील.
कुणी तरी म्हटल्याप्रमाणे ' नो मिन्स नो!'
म्हणून पुन्हा म्हणेन शिक्षेची
म्हणून पुन्हा म्हणेन शिक्षेची भिती घडावयाची घटना थांबवू शकत नाही पण चांगली शिकवण थांबवू शकते. आणि सुरक्षित शस्त्र हाताळणीसाठी प्रशिक्षणच गुरूकिल्ली आहे. >> चमन हे अगदी बरोबर आहे पण फक्त एव्हढेच करायला हवे असे तू म्हणतोस हे पटत नाही. थोदे कडक निर्बंध, थोडा common sense असलेले कायद्यातील बदल can go long way along with education and awareness असे नाहि वाटत ?
Pages