लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
आल्याची चटणी
आमच्याकडे आंध्रात इडली, दोसा केला कि त्याच्या बरोबत आल्याची चटणी पण करतात. मला माझ्या एका तेलुगु मैत्रिणीने सांगितली ही कृती. अगोदर कुणी ह्याची कृती दिलीहि असेल. मला माहित नाही. करायला सोपी आणि चवीला खूपच छान. रंगही छान असतो.
कृती :
१००ग्राम आलं
१००ग्राम चिन्च
१००ग्राम लाल तिखट
१००ग्राम गुळ
प्रथम आलं स्वच्छ धुवुन त्याची साल काढुन घ्यावी.बारीक तुकडे करावेत. चिन्च थोडसं पाणी घालुन भिजवावी. गुळ किसून ठेवावा. चिन्च चांगली भिजली कि आलं मिक्सर मधे बारीक करावं.त्यातच भिजलेली चिन्च घालुन बारीक करावी. चांगली बारीक झाली कि त्यातच तिखट, मीठ (लोणच्याला घालतो तसे भरपूर) घालुन मिक्सर मध्ये एकजीव करून घ्यावं त्यातच किसलेला गुळ घालावा आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवुन घ्यावं. थोडीशी घट्ट होते. पण बाटलीत भरुन ठेवावी. जेंव्हा हवी असेल तेंव्हा थोडेसे पाणी घालुन फोडणी घालुन वाढावी. खूप छान लागते. ही चटणी फ्रीजमध्ये वर्षभरही रहाते. मीठ मात्र कमी पडता कामा नये. मी एवढीच चटणी करते. तर लहान बाटली भरून होते. पण आलं उष्ण असते त्यामुळे बेताने खावी.
छान आहे. फोटो आहे?
छान आहे. फोटो आहे?