Submitted by pltambe@yahoo.co.in on 5 April, 2014 - 10:05
कारल्याचे वेफर्स
साहित्य : रसरशीत ताजी कार्ली २५०ग्राम,आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल,चवीनुसार लाल तिखट व मीठ
कृती : प्रथम कारली स्वच्छ धुवून व कोरडी करून घ्या,दोन्ही बाजूंचे शेवटचे टोकाचा भाग कापून टाका,उरलेल्या कारल्याचे विळीवर अतिशय पात्तळ काप / चकत्या करून घ्या,गॅसवर एका कढईत तेल तापवून घेऊन त्यात हे पात्तळ काप टाकून तळून घ्या व एका चाळणीवर काढून घेऊन तेल निथळून घ्या. एका ताटात हे तळलेले गरम काप घेऊन त्यावर चवीनुसार लाल तिखट व मीठ घालून हाताने चोळून सगळीकडे सारखे लागेल असे बघा.
झाले हे कारल्याचे वेफर्स खाण्यासाठी तय्यार !
खास करून ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या साठी हे वेफर्स फारच आरोग्यदायी व उत्तम आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे मला आवडतात फ्रेश फ्रेश
हे मला आवडतात फ्रेश फ्रेश असतील तर अजुन मस्त ...पण जरा कडवट लागत अस्ल्याने खुप जास्त नाही खाउ शकत....
कारल्याचे अतिशय पात्तळ काप
कारल्याचे अतिशय पात्तळ काप करून जर तेलावर फ्राय केले व गरम असतानाच मीठ लावून वाळवले तर कडवटपणा निघून जातो.