Submitted by dr.sunil_ahirrao on 1 April, 2014 - 01:45
भर्जरी दुःखात होतो नेहमी
मी तुझ्या कर्जात होतो नेहमी
शोधिसी आता मला दुनियेत या
मी तुझ्या ऐन्यात होतो नेहमी
तू जरी केले न दिसल्यासारखे
मी तुझ्या लक्षात होतो नेहमी
आसवे उबदार तू मजला दिली
मी असा श्रीमंत होतो नेहमी !
तू जरी रस्ताच माझा सोडला
मी तुझ्या रस्त्यात होतो नेहमी !
मी जरी पापी न होतो फारसा
पण तिथे स्वर्गात होतो नेहमी
मी तुझ्या हास्यामधे होतो कुठे
पण तुझ्या अश्रूंत होतो नेहमी
मी तुझ्या भाग्यामधे नसलो तरी
हातच्या रेषांत होतो नेहमी !
डॉ.सुनील अहिरराव
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तू जरी केले न दिसल्यासारखे मी
तू जरी केले न दिसल्यासारखे
मी तुझ्या लक्षात होतो नेहमी
व्वा.
धन्यवाद, समीर चव्हाण !
धन्यवाद, समीर चव्हाण !
मतला आणि तिसरा खूप आवडले ५ वा
मतला आणि तिसरा खूप आवडले
५ वा शेर मला नाही कळला
इतर बरेच शेर आवडले
धन्यवाद
मतला आणि लक्षात हे शेर
मतला आणि लक्षात हे शेर फर्मास.
छान... आवडली
छान...
आवडली