मी ७३ वर्षांचा निवृत्त स्थापत्य सल्लागार अभियंता असून निवृत्तिनंतर स्वेछेने गेल्या काही वर्षापासून मी व माझी पत्नी दोघांनी मिळून आमच्या घरी पर्यावरण रक्षणाचे खालील छंद अत्यंत आवडीने जोपासले आहेत.
१) सौर वॉटर हिटर २४.०१.२००१ ला बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून २४x७x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. एकूण खर्च २३,५०५/-(दरमहाची बचत किमान ५००/- पेक्षा जास्त होत आहे)
२) घरातील सर्व प्रकारच्या ओल्या कचर्या/पासून बायो-गॅसची निर्मिती संयंत्र ०१.०७.२००६ ला बसवून घेतले असून तेंव्हा पासून माझ्या L.P.G.गॅस सिलिंडरच्या वापरात २१ दिवसापर्यंत बचत होऊ लागली आहे,त्याचप्रमाणे गॅस निर्मिती झाल्यावर त्यातून उत्सर्जीत होणारे सांडपाणीसुध्दा बायो-कल्चरसाठी खत म्हणूनच वापरले जाते. एकुण खर्च ७४५०/-
३) आम्ही नोव्हेंबर २००९ पासून १४’ x १०’ च्या गच्चीवर घरातील ओल्या कचर्या पासून बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच ओल्या कचर्यानपासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचाचोथा,कोथिंबीर,पालक,शेपू,मेथी,चाकवत,अंबाडी,माठ,चुका,मुळा,करडई इत्यादि भाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली,बिरड्यांचीसाले,कलिंगड,फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी,लिंबू इत्यादि फळांच्या साली,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ,नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) विविध ४० हून जास्त प्रकारची फळझाडे (आंबा,पेरु,चिक्कू,डाळिंब,अंजीर,पपई,केळी,लिंबू इत्यादी) लावली असून वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.
भाजीपाला(वांगी,टोमॅटो,पालक,मेथी,कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा,मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. फुलझाडे(अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद,निशिगंध,पारीजातक,रातराणी, झेंडू,अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा,सदाफुली,तगर,ब्राम्हकमळ इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पन्न घेत आहे.सोबत आमच्या बायो क्ल्चरचे काही फोटो नमुन्यादाखल दिलेले आहेत
४) रोजचे अन्न शिजवण्यासाठी सौर कुकर चा ०७.११.२००९ पासून वापर सुरू केला आहे. ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या,बटाटे,चिकन,मटण,पुरण सुद्धा उत्तम शिजतेच पण ह्या कुकरमध्ये दूधाची बासुंदी सुद्धा न करपता होते. (खर्च २,६००/-)
५) व्हर्मी-कल्चर म्हणजेच गांडूळ खताची निर्मिती १२.०९.२०१० पासून सुरू केलेली आहे. त्यापासून निर्माण होणारे जैविक खताचा वापर बायो-कल्चरसाठी केला जातो. खर्च २,८००/-
६) ०१ जानेवारी २०११ पासून मी घराच्या छतावर दोन ८० वॅट्ची सौर पँनेल्स व १८० वॅट्ची बॅटरी बसवून घेतली असून त्यापासून घरगुती वीज निर्मिती सुरू केली असून त्यावर दिवाणखान्यातील १८ वॅटची एक ट्यूब ,स्वयंपाकघरातील १८ वॅटची एक ट्यूब , जिन्यातील ९ वॅटचे L.E.D.चे चार दिवे ,व गच्चीवरील एक ९ वॅटचा दिवा असे सर्व दिवे आता पुर्णपणे सौर उर्जेवर चालतात.
आमचे पर्यावरण रक्षणाचे उपक्रम व इतर मुलूखावेगळे छंद
Submitted by pltambe@yahoo.co.in on 27 March, 2014 - 12:23
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झकास. असाच बिनविषारी भाजीपाला
झकास.
असाच बिनविषारी भाजीपाला आणि घरच्या म्हशीचे निर्भेळ (भेसल नसलेले) दुध कायम मिळत राहिल तंव्हापासुन मग जाम मजा येइल.
सगळे उपक्रम मस्त आहेत.
सगळे उपक्रम मस्त आहेत. अभिनंदन.
शून्य कचरा! कमी वीजवापर! वा वा!
सविस्तर लिहिले तर ज्यांना हे करण्याची इच्छा आहे त्यांना मदत होईल.
उत्तम लेख. कृपया या लेखातल्या
उत्तम लेख.
कृपया या लेखातल्या प्रत्येक मुद्द्यावर छायाचित्रांसह स्वतंत्र लेख लिहाल का?
छान. चिनुक्स अनुमोदन.
छान.
चिनुक्स अनुमोदन.
अरे व्वा .. मि बोललि आनि
अरे व्वा .. मि बोललि आनि तुम्हि नविन धागा काढला...अभिनंदन. ..
मस्त लेख ! सौर दिव्या
मस्त लेख !
सौर दिव्या संबंधीचा खर्च नाही दिला !
जबरीच की. फोटोसहीत डिटेलमध्ये
जबरीच की.
फोटोसहीत डिटेलमध्ये लेख लिहाच.
प्रेरणादायी लेख !!
प्रेरणादायी लेख !!
एक आदर्श घर करून ठेवलय तुम्ही
एक आदर्श घर करून ठेवलय तुम्ही .
उत्तम आणि उपयुक्त लेख!
उत्तम आणि उपयुक्त लेख!
चिनुक्स +१
प्रत्येक उपकरणाचे फोटोसहीत डीटेल्स द्या!
छान आहेत उपक्रम. एक विचार
छान आहेत उपक्रम.
एक विचार मनात आला. कोणीतरी मनावर घेऊन मुलाखत वजा माहितीपर लेख लिहिला तर काकांच्या वयाचा विचार करता सोयीचे नाही का होणार?
मस्त लेख. एम्बी, अनुमोदन.
मस्त लेख.
एम्बी, अनुमोदन.
वा वा वा वा !!!! टाळ्या. कधी
वा वा वा वा !!!! टाळ्या.
कधी स्थलांतर झाले तर काका तुमच्याकडुन ह्या सर्व गोष्टी शिकुन आचरणात आणायला नक्की आवडेल.
खुपच प्रेरणादायी आहे तुमचे
खुपच प्रेरणादायी आहे तुमचे काम!
चिनूक्स +१.
एम्बी, सहमत.
एम्बी, सहमत.
फोटो बघायला आवडतील तुमच्या
फोटो बघायला आवडतील तुमच्या बागेचे.
उत्तम लेख.. फोटोसहीत
उत्तम लेख.. फोटोसहीत सविस्तर लिहा.
सर्वांना अनुमोदन. या सर्व
सर्वांना अनुमोदन. या सर्व बाबींविषयी अधिक सखोल माहिती वाचायला आवडेल.
छानच उपक्रम ! काही फोटो
छानच उपक्रम !
काही फोटो त्यांच्या ब्लॉग वर आहेत . खूपच छान फुले आहेत.
तांबे साहेब आपला हा मस्तच
तांबे साहेब आपला हा मस्तच उपक्रम आहे. पण अनेक लोकांना हे आवडले तरी आचरणात आणणे अवघड आहे. गतिमान जीवन जगणार्या लोकांना या साठी द्यावा लागणार वेळ व पेशन्स नसतो.
अरे वा! मस्त! बागेचे फोटो
अरे वा! मस्त! बागेचे फोटो बघायला खरच आवडतील.
वाह!! आपल्या सर्व उपक्रमांची
वाह!! आपल्या सर्व उपक्रमांची माहिती फोटो सकट मिळाली तर या लेखाला बहार येईल अजून
खूपच आवडला लेख!! ___/\___
मस्तच.. अतिशय प्रेरणादायी
मस्तच.. अतिशय प्रेरणादायी आहे हे सगळॅ.
कृपया या लेखातल्या प्रत्येक मुद्द्यावर छायाचित्रांसह स्वतंत्र लेख लिहाल का?
खरेच . लिहा. सगळ्यांना माहिती मिळेल, ज्यांना इच्छा आणि वेळ आहे ते यातले जमेल तेवढे करु शकतील.
फोटोसहित नवीन धागा टाकला आहे.
फोटोसहित नवीन धागा टाकला आहे. प्रत्येक मुद्यावर स्वतंत्र तपशीलवार सचित्र लिखाण सुरू केले आहे व जस जसे पूर्ण होत जाईल तसे तसे नवीन धाग्यावर टाकणार आहे.
खूपच प्रेरणादायी, आगामी
खूपच प्रेरणादायी, आगामी लेखांकरता आत्तापासूनच अनेकानेक धन्यवाद!
एम्बी <<<काकांच्या वयाचा
एम्बी <<<काकांच्या वयाचा विचार करता सोयीचे नाही का होणार? >>>
एम्बी , मी काही एव्हढा म्हातारा नाही बरका ! एव्हढा अॅक्टिव्ह आहे की औंध सिंध कॉलनीमधून सदाशिव पेठेत घरी चालत आलो.
"अभी तो मै जवान हूं " मला अद्याप टक्कल नाही व सगळे केसही कलप न लावता काळे आहेत ,एखाद्-दुसरी दाढ सोडली तर बाकीके दाताही अद्याप शाबूत आहेत .
मस्तच आहे. एकदम प्रेरणादायी.
मस्तच आहे. एकदम प्रेरणादायी.
खूपच छान उपक्रम. आमच्या
खूपच छान उपक्रम. आमच्या सारख्यांसाठी प्रेरणादायी आहे.