आमचे पर्यावरण रक्षणाचे उपक्रम व इतर मुलूखावेगळे छंद

Submitted by pltambe@yahoo.co.in on 27 March, 2014 - 10:19

मी ७३ वर्षांचा निवृत्त स्थापत्य सल्लागार अभियंता असून निवृत्तिनंतर स्वेछेने गेल्या काही वर्षापासून मी व माझी पत्नी दोघांनी मिळून आमच्या घरी पर्यावरण रक्षणाचे खालील छंद अत्यंत आवडीने जोपासले आहेत.
१) सौर वॉटर हिटर २४.०१.२००१ ला बसवून घेतला आहे व तेंव्हा पासून २४x७x३६५ केव्हाही गरम पाणी मिळते. एकूण खर्च २३,५०५/-(दरमहाची बचत किमान ५००/- पेक्षा जास्त होत आहे)
२) घरातील सर्व प्रकारच्या ओल्या कचर्या/पासून बायो-गॅसची निर्मिती संयंत्र ०१.०७.२००६ ला बसवून घेतले असून तेंव्हा पासून माझ्या L.P.G.गॅस सिलिंडरच्या वापरात २१ दिवसापर्यंत बचत होऊ लागली आहे,त्याचप्रमाणे गॅस निर्मिती झाल्यावर त्यातून उत्सर्जीत होणारे सांडपाणीसुध्दा बायो-कल्चरसाठी खत म्हणूनच वापरले जाते. एकुण खर्च ७४५०/-
३) आम्ही नोव्हेंबर २००९ पासून १४’ x १०’ च्या गच्चीवर घरातील ओल्या कचर्या पासून बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच ओल्या कचर्यानपासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचाचोथा,कोथिंबीर,पालक,शेपू,मेथी,चाकवत,अंबाडी,माठ,चुका,मुळा,करडई इत्यादि भाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली,बिरड्यांचीसाले,कलिंगड,फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी,लिंबू इत्यादि फळांच्या साली,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ,नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) विविध ४० हून जास्त प्रकारची फळझाडे (आंबा,पेरु,चिक्कू,डाळिंब,अंजीर,पपई,केळी,लिंबू इत्यादी) लावली असून वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.
भाजीपाला(वांगी,टोमॅटो,पालक,मेथी,कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा,मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. फुलझाडे(अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद,निशिगंध,पारीजातक,रातराणी, झेंडू,अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा,सदाफुली,तगर,ब्राम्हकमळ इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पन्न घेत आहे.सोबत आमच्या बायो क्ल्चरचे काही फोटो नमुन्यादाखल दिलेले आहेत
४) रोजचे अन्न शिजवण्यासाठी सौर कुकर चा ०७.११.२००९ पासून वापर सुरू केला आहे. ह्या कुकरमध्ये रवा व शेंगदाणे उत्तम भाजले जातात व वरण-भात,सर्व प्रकारच्या भाज्या,बटाटे,चिकन,मटण,पुरण सुद्धा उत्तम शिजतेच पण ह्या कुकरमध्ये दूधाची बासुंदी सुद्धा न करपता होते. (खर्च २,६००/-)
५) व्हर्मी-कल्चर म्हणजेच गांडूळ खताची निर्मिती १२.०९.२०१० पासून सुरू केलेली आहे. त्यापासून निर्माण होणारे जैविक खताचा वापर बायो-कल्चरसाठी केला जातो. खर्च २,८००/-
६) ०१ जानेवारी २०११ पासून मी घराच्या छतावर दोन ८० वॅट्ची सौर पँनेल्स व १८० वॅट्ची बॅटरी बसवून घेतली असून त्यापासून घरगुती वीज निर्मिती सुरू केली असून त्यावर दिवाणखान्यातील १८ वॅटची एक ट्यूब ,स्वयंपाकघरातील १८ वॅटची एक ट्यूब , जिन्यातील ९ वॅटचे L.E.D.चे चार दिवे ,व गच्चीवरील एक ९ वॅटचा दिवा असे सर्व दिवे आता पुर्णपणे सौर उर्जेवर चालतात.
७) वरील ६ नावीन्यपूर्ण गोष्टीखेरीज गेल्या ८ -१० वर्षांपासून आम्ही घरातील सर्व मंडळींनी मिळून एक आगळावेगळा असा मुलूखावेगळा छंद जोपासला आहे व तो म्हणजे विविध माध्यमातील अत्यंत दुर्मिळ असा 'गणेश मुर्तींचा संग्रह'(Museum of Lord Ganesh Idols) ह्यामध्ये विविध माध्यमातील उदाहरणार्थ लाकूड,काच,कागद,कापूस,कागदाचालगदा,लोकर,सोने, चांदी,विविधप्रकारचेदगड(Laterite,Sand,Teraacotta,Marble,Ganite,Gagoti etc.) ,शहाळे,धान्य.धातू,मणी हयातून साकारलेल्या ४००० हून जास्त दुर्मिळ गणेश मूर्ती,कि-चेन्स,नाइट लँम्प्स,भेट कार्डे, लग्न पत्रिका,आगपेटी ,अंगठ्या,लॉकेट्स,राख्या,ह्यांचा संग्रह आहे ह्या आमच्या मुलूखावेगळ्या छंदाची नोंद गणेश-विश्वकोषातही घेण्यात आलेली आहे॰ह्यामध्ये आपणास क्रिकेट खेळणारे गणपती,नाशापाणी करणारा गणेश,लॅपटॉप,अॅाटॅची व मोबाइल घेतलेला आधुनिक गणेश,अश्वारूढगणेश,धनुर्धारीगणेश,पानाच्या डब्यावरील गणेश,अदृश्य गणेश,अंधकारमे गणेशा पासून ते लेसर गणेश व संगणकातून साकारलेल्या त्रिमिती गणेशा पर्यन्त गणेशाची विविध मोहक रुपे पाहावयास मिळतात. आतापर्यन्त टाइम्सऑफइंडिया,लोकसत्ता,एशियनएज,सकाळ,पुढारी,ऐक्य इत्यादि वृत्तपत्रातून व पुण्याचे न्यू जनरेशन टिव्ही न्यूज चॅनेलवर,तसेच पुणे,मुंबई,सातारा,कोल्हापूर इत्यादि ठिकाणाहून ह्या संग्रहाबद्दल लिहून आले आहे.
८) याखेरीज मला विविध देशांची पोस्टाची तिकिटे जमवणे , खेळातील विविध चित्रे असलेले पत्ते जमवणे , विविध देशांची नाणी व चलनी नोटांचा संग्रह करणे , ग्रंथ संग्रह करणे असे मुलखावेगळे छंद आहेत.
प्रमोद तांबे
(०२०) २४४७ ४७८३,पत्ता : १४१५ सदाशिव पेठ,पुणे-४११ ०३०, E-mil ID: pltambe@yahoo.co.in

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशापाणी करणारा गणपती Happy मजा आहे.

तुमच्या छंदांच्या व इतर पर्यावरण उपक्रमांना यश लाभो ही सदिच्छा!