मदतीचा हात हवाय…….

Submitted by अनिकेत आमटे on 22 March, 2014 - 06:28

नमस्कार !
हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते.
ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोली ह्या अतिदुर्गम भागात, लोक बिरादरी दवाखान्यामध्ये गेली 40 वर्षे माडीया गोंड आदिवासी बांधवांवर विनामूल्य वैद्यकीय ईलाज केला जात आहे. भगत/मांत्रिक ह्या सारख्या समाजकंटकांपासून आदिवासी समाजाला दूर ठेवायचा प्रयत्न लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाताई यांच्या बरोबरच त्यांचे सुपुत्र डॉ. दिगंत आणि स्नूषा डॉ. अनघा आमटे अहोरात्र करत आहेत.
ह्या दवाखान्याची ईमारत मात्रं आता खूप जुनी झाली असल्याने तिच्या पुनर्बांधणीचे काम सुरु करण्यात आले आहे. दवाखान्याचे असे काहीच उत्पन्न नसल्याने त्याकरिता लागणारा बराचसा निधी अर्थातच देणगी स्वरुपात गोळा करावा लागत आहे.
2014 हे ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे ह्यांचे जन्मशताब्दी वर्षं. 26 डिसेंबर 2014 रोजी श्री. बाबा आमटे यांना 100 वर्षे पूर्ण होतील. ह्याच दिवशी हा दवाखाना लोकार्पण करण्याचा आमटे कुटुंबियांचा मानस आहे. यासाठी 'लोक बिरादरी मित्र मंडळ पुणे', (पुण्यातील आम्हा काही मित्रांचा ग्रुप), पुण्यातुन जास्तीत जास्त मदत पाठविण्याच्या धडपडीत आहे.
आपण श्री. अशोक हांडे ह्यांच्या 'मराठी बाणा' ह्या कार्यक्रमाबद्दल निश्चितच ऐकले असेल. लोक बिरादरी दवाखान्याच्या पुनर्बांधणीसाठी लागणारा जेवढा जमेल तेवढा निधी 'मराठी बाणा' ह्या कार्यक्रमाच्या मार्फत पाठवण्याच्या हेतूने, 'लोक बिरादरी मित्र मंडळ पुणे' तर्फे 'मराठी बाणा' या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. 26 एप्रिल 2014 रोजी सायंकाळी 7 ते 10 ह्या दरम्यान गणेश कला क्रीडा, पुणे येथे केले आहे.
ज्या कारणासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय तो हेतू लक्षांत घेता, या सगळ्या तिकिटांची विक्री होणे अवघड नाही. तरीही नुसतांच कार्यक्रम पार पाडणे हा आमचा हेतू नाही, तर ‘आमटे कुटुंबीयांचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी अधिकाधिक मदत तिथे पाठवता यावी’ हा आहे. वरील कार्यक्रमाचा सगळा खर्च वजा जाता उरणारा निधी हेमलकसा, ता. भामरागड जि. गडचिरोली, येथील लोक बिरादरी दवाखान्याच्या पुनर्निमाणासाठी पाठविण्यात येणार आहे याची नोंद घेऊन आपण कार्यक्रमाला मोठ्यात मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, ह्यासाठी हे विनंती पत्रं. देणगी प्रवेशिकांबद्दल आपल्याला वरचे वर माहिती पोहोचविण्यात येईल. तेंव्हा आजच खालील कार्यक्रमाची नोंद करून घ्या, कार्यक्रमाच्या दिवशी भेटूच. कार्यक्रम: शनिवार, दिनांक 26 एप्रिल 2014 सायं: 7 ते 10 स्थळ: गणेश कला क्रीडा, पुणे (नोंद: कार्यक्रम स्थळी डोनेशन चेक्स स्वीकारले जातील, डोनेशन वर 80 जी नुसार कर सवलत आहे) या कार्यक्रमाचे मिडिया पार्टनर लोकप्रिय दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'रेडियो सीटी' हे दोघे असणार आहेत.
आर्थिक मदतीचे आव्हान: आदिवासी बांधवानकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. जवळपास रुपये ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. अजूनही ५० लाख रुपये जमवायचे आहेत. प्रदर्शनाच्या ठिकाणी देणगी स्वीकारण्यात येईल. नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान करण्यात येत आहे.
आपल्याला अथवा आपल्या परिचयातील कोणाला जर प्रायोजक म्हणून भाग घेण्याची इच्छा असेल कृपया त्वरित संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संपर्क: आपले विनीत-योगेश कुलकर्णी – 9822273545, शिल्पा तांबे- 9226958888 / 9850666729 'लोक बिरादरी मित्र मंडळ पुणे'

Details of Domestic Funds Transfer to Lok Biradari Prakalp:
Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora (Bank of Maharashtra, Bhamragad Branch)
Saving Bank Account Number: 20244238823. IFSC: MAHB0001108
All donations have exemption under section 80 G of the Indian Income Tax Act. For the receipt – Email us Name of the Donor, Address and PAN.

लोक बिरादरी प्रकल्प - माडिया-गोंड आदिवासींचे आशास्थान
क्षय रोगाने पोखरलेले देह, मेंदूच्या मलेरिया ने कोमात गेलेले रुग्ण, झाडावरून पडून हात पाय मोडलेले रोगी, जीवघेण्या विषारी सर्पांनी घेतलेले चावे, अस्वलांनी चावा घेऊन फाडलेले चेहरे घेऊन शे-दोनशे किलोमीटरचे जंगल तुडवत येणारे माडिया गोंड आदिवासी दवाखान्यात - अंगणात झाडाखाली जागा मिळेल तिथे त्यांच्यावर रात्रंदिवस चाललेले उपचार, कडेकपारीतील पाडे सोडून लिहिणं, वाचणं, जगणं शिकायला आलेल्या माडिया - गोंड मुला-मुलींना गजबजलेली आश्रमशाळा आणि बिबट्या, अस्वल, कोल्हे, साप, मगर, साळींदर, हरीण, मोर, लांडोरीपासून 'करीना' नावाच्या शुभ्र देखण्या गाढवी पर्यंत अनेकानेक अनाथ प्राण्याचं दुखलं - खुपलं पाहत त्यांना सुखाने एकत्र नांदावणार अनाथालय !
हे जग प्रत्यक्षात अस्तित्वात आहे…..गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा या गावात !
डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गेली ४० वर्षे अखंड राबून उभी केलेली "लोक बिरादरी प्रकल्पातील" हि अनोखी दुनिया !
महाराष्ट्राच्या एका टोकाला अतिशय दुर्गम भागात चालणाऱ्या या निरलस कार्याचा प्रारंभ स्व. बाबा आमटे व स्व. साधनाताई आमटे यांनी १९७३ मध्ये केला. त्यानंतर डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी अन्य कार्यकर्त्यान समवेत ही जबाबदारी उचलली. आज हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्यात दरवर्षी ३५ ते ४० हजार रुग्ण मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात. लोक बिरादरी च्या आश्रमशाळेत (बालवाडी ते १२ वी) सुमारे ६५० आदिवासी विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. तसेच जंगलतोड आणि शिकारीमुळे मरणाच्या तोंडाशी पोहोचलेल्या अनाथ वन्य जीवांना आमटेज् अनिमल आर्क (वन्यप्राणी अनाथालय) मध्ये अभय देण्याचे कार्य अविरत सुरु आहे.
आर्थिक मदतीचे आव्हान: आदिवासी बांधवानकरिता विनामूल्य चालविण्यात येत असलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या सर्वोपचार दवाखान्याची जुनी इमारत मोडकळीस आली आहे. त्याच ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात येत आहे. नागरिकांनी सढळ हाताने मदत करावी असे आव्हान करण्यात येत आहे.
ऑन लाईन देणगी पाठवावयाची असल्यास खाली दिलेल्या खात्यात देणगी जमा करता येते.

S.B. Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora
S.B. Account No.: 20244238823 (Bank of Maharashtra, Bhamragad branch), IFSC: MAHB0001108

Details of Overseas Funds Transfer to Maharogi Sewa Samiti, Warora, through SWIFT

Beneficiary Name: Maharogi Sewa Samiti, Warora

Beneficiary Address: At & Post: Anandwan, Tah.: Warora,
District: Chandrapur, Pin code: 442914
Maharashtra State, India.

E-mail: lbp@sancharnet.in
aniketamte@gmail.com

Beneficiary Bank Account Number: 048010100301343

Beneficiary Bank Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora

Beneficiary Bank Address: AXIS BANK, M. G. House,
Rabindranath Tagore Road,
Besides Board Office, Civil Lines,
Nagpur - 440 001
Maharashtra State, India
Phone No.: +91-712-2555647 / 2601699

Beneficiary Bank SWIFT code: AXISINBB048

MAHAROGI SEWA SAMITI,
WARORA has FCRA clearance
(Foreign Contribution Regulation Act): Registration No. 083810006

Please specify in your email that this donation is for Lok Biradari Prakalp, Hemalkasa.

पावती करिता देणगीदाराने कृपया आपला संपूर्ण पत्ता, ईमेल आणि मोबाईल नंबर नक्की कळवावा.
देणगी दिल्यावर आयकर विभागाच्या 80 जी अंतर्गत पावती देण्यात येईल.

अधिक माहिती करिता श्री. सचिन मुक्कावार - 7588772858 अथवा श्री. केतन फडणीस - 7588772857 यांच्याशी संपर्क करावा.
Email: aniketamte@gmail.com and hemalkasa1973@gmail.com
Website: www.lokbiradariprakalp.org and www.lbphemalkasa.org.in
पत्ता: लोक बिरादरी प्रकल्प, मु. हेमलकसा, तालुका-पोस्ट: भामरागड, जिल्हा: गडचिरोली, पिनकोड: 442710. महाराष्ट्र.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला उपक्रम. माझ्या वहिनीने तिथे भेट दिल्यानंतर, निवृत्तीनंतरचा वेळ तिथेच घालवायचे ठरवले आहे.
तिला सांगतो हा निरोप.

प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद. देणगी करिता कुठलीही मर्यादा नाही. तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आमच्या खात्यात देणगी भरू शकता. भारतीय देणगीदाराने बँक ऑफ महाराष्ट्र मध्येच देणगी ट्रान्स्फर करावी. देणगी ची रक्कम जमा केल्यावर कृपया मला ईमेल द्वारे रक्कम, तुमचे नाव आणि पत्ता पावती करिता कळवावा. तुम्ही फेसबुक वर शेअर करू शकता.

Details of Domestic Funds Transfer to Lok Biradari Prakalp:

Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora

(Bank of Maharashtra, Bhamragad Branch),

Saving Bank Account Number: 20244238823. IFSC: MAHB0001108

All donations have exemption under section 80 G of the Indian Income Tax Act.
For the receipt – Email us Name of the Donor, Address and PAN.

लोभ असावा.

कार्येक्रमाच्या तिकीटा बद्दल शिल्पा तांबे यांना फोन करून विचारून घ्यावे.
देणगी ट्रान्स्फर करण्यात अडचण येत असल्यास मला aniketamte@gmail.com वर संपर्क करावा.
--

धन्यवाद अनिकेत.....

"बाबा आमटे" हे नावच इतके लखलखीत आहे की निव्वळ तितकाच उल्लेख आला तरी देणगी देणारे हात पुढे येतातच. तरीही या निमित्ताने श्री.अशोक हांडे प्रस्तुत "मराठी बाणा" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ही बाब विशेष स्वागतार्ह आहे. इमारत प्रकल्पाला हार्दिक शुभेच्छा

मी कोल्हापूरचा आहे. तर येथील अ‍ॅक्सिस बॅन्केच्या शाखेत मी यथाशक्ती देणगी रक्कम जमा केल्यास तिथे ती स्वीकारली जाईल का ? जात असल्यास काय केले पाहिजे याबद्दल कृपया मार्गदर्शन इथे मिळावे.

अशोक पाटील