आता समोर दोघेही उभे होते, संकेत आणि आशंका. तिने बोलायला सुरुवात केली.
"प्रिय मित्रांनो, याआधी संकेत जे काही बोलला ते सर्व माझ्याही मनात होतं. त्यामुळे आता मी ज्या कामासाठी पुढे आलेय त्याला सुरुवात करते. सर्वप्रथम आम्ही या आमच्या शाळेला आमच्या वर्गातर्फ़े छोटीशी भेट प्रदान करतो." असे म्हणुन तिने आधीच बाजुला आणून ठेवलेल्या चार खुर्च्या समोर आणण्यास सांगितले. आणखी चार मुलामुलींना पुढे बोलावून त्या खुर्च्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. सर्व शिक्षक आणि कर्मचारी यावेळी उभे रहिले होते. भेटवस्तूचा स्वीकार केल्यावर पुढे संकेत बोलू लागला.
"आता मी आशंकाला विनंती करतो की तिने संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाराव राणे यांना वर्गातर्फ़े भेटवस्तू द्यावी." तिने समोर ठेवलेल्या पेनांच्या बॉक्समधून एक पेन काढले आणि बाबारावांच्या हाती देउन त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्याने एक पेन काढले आणि चव्हाण सरांजवळ गेला. हातात पेन देऊन नमस्कार करताना त्याचे डोळे भरुन आले होते; पण सगळ्यांच्या समोर रडणे बरे दिसणार नाही म्हणून आपले अश्रु त्याने कसेबसे रोखून धरले. नमस्कार करुन तो पुन्हा पुढे आला. यावेळी अर्थातच तिने त्याला विनंती केली होती. त्यानंतर त्याने आपला परम मित्र जयेश याला ऊठून विज्ञान शिक्षक श्री. पाटील सरांना भेटवस्तू देण्यास सुचवले. असे एकेका विद्यार्थ्याने एकेका शिक्षकाला भेटवस्तूरुपी पेन देऊन नमस्कार केला.
यात विशेष अशा दोन गोष्टी होत्या. पहिली ही की, पुढे येण्याची संधी अगदी दिपकसारख्या, कधीही कोणत्याही शिक्षकाच्या पुढयात न वाकलेल्या विद्यार्थ्यालाही दिली गेली होती. आणि दुसरी म्हणजे, शिक्षकांबरोबरच इतर कर्मचारी, अगदी शिपायांसकट सर्वाना पेनं देण्यात आली होती. दिसायला ही साधी पेनं होती पण त्यामागचं महत्व शिक्षकांसहित सगळ्यांना माहित होतं. आज इतक्या वर्षातं पहिल्यांदाच सगळ्या स्टाफला या मुलांनी सर्वांच्या समोर भेट देऊन वाकुन नमस्कार केला होता. शिक्षकांना तर सगळेच नमस्कार करतात; पण शिपाई, क्लार्क वगैरे कर्मचारी सुद्धा आपल्याला वेळोवेळी मदत करत असतातच. त्यांच्या कधी कोण पाया पडतं मुलांपैकी? कधीच नाही. आज मात्र या लोकांनाही सर्वांदेखत नमस्कार करुन १० वी च्या मुलांनी एक वेगळाच आदर्श घालून दिला होता. ही योजना या मुलांचीच होती. आणि सगळ्यांच्या समोर थोडासा का होईना, सन्मान झाल्यामुळे स्टाफमधील प्रत्येकाच्या चेहर्यावर एक समाधानाचं स्मित झळकत होतं.या वर्गाची ही कल्पना इतर मुलांसहीत सगळ्यांना आवडलेली होती हे प्रत्येकाच्या चेहेर्यावरुनच समजत होतं. आणि सगळ्यांच समाधान पाहून आपली योजना सफल झाल्यामुळे पुढे उभे असलेल्या दोघांसहीत १०वी च्या संपूर्ण वर्गाला आनंद झाला होता.
निरोप ३
Submitted by सन्केत राजा on 20 March, 2014 - 01:31
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा