शिवणकला हा मला अतिशय अवघड विषय वाटायचा. माझी बहीण ही खुप चांगले ब्लाउजेस शिवायची. तिने मला शिवणकाम शिकवायचा प्रयत्न केला पण मी डावखुरी असल्याने मला कटींग जमले नाही. त्यानंतर मी केव्हा प्रयत्न ही केला नाही पण शिवणयंत्र घरी असल्याने रीकाम्यावेळी नुसते पॅडल फिरवुन हौस भागवुन घ्यायचे.
सहा महीन्यापुर्वी बहीणीने फॅशनचे ब्लाउजेस व पंजाबी ड्रेसेस शिवण्याचा क्लास लावला. मला वाटू लागले कि मीही क्लास लावावा पण नोकरी मुळे फक्त रविवारीच क्लासला जाऊ शकत होते. त्यात बहीणीने व घरच्यांनी समजावले की शिवणकला ही सगळ्यांनाच जमत नाही. खुप कठीण असते. बर्याचदा काही जणींना मशीनही चालवता येत नाही, मशीन उलटीच फिरते. शिवणक्लासला ७-८ महीने जाउनही काही जणांना काहीच शिवता येत नाही. त्यामुळे तु हा नाद सोड , उगाच पैसे वाया घालवु नकोस. पण तरीही मी घाबरत घाबरत क्लास लावला. शिकवणारी चांगली असल्याने तिने मला डाव्या हाताचा वापर कसा कराव हे शिकवले. पहील्यांदा साधा कुर्ता कटींग केला. मग तिने मला शिवणयंत्रावर बसायला सांगितले. मी सुरुवात केली आणी आश्चर्य म्हणजे मी पहील्याच दिवशी खुप छान कुर्ता शिवला. शिलाई खुप सफाईदार होती. शिकवणारीला खुपच आश्चर्य वाटले. कुठेही शिलाई वाकडी तिकडी आलेली नव्ह्ती. तिने माझे कौतुक तर केलेच पण बर्याच जणांना सांगितलेही. घरच्यांनीही कौतुक केले. मग मी अनारकली ड्रेस शिवण्याचा विचार केला. पहिला अनारकलीचं कटींग क्लासटीचरने शिकवल्यानंतर तिच्या मार्गदर्शनखाली शिवलेल्या अनारकलीची फिनिशींग सुद्धा खुप छान आली. पण कळ्या ज्या पद्धतीने काढायला शिकवल्या होत्या ती पद्धत खुप किचकट वाटली. मग मी स्वतःच थोडंसं डोकं लढवलं आणी २-३ अनारकली शिवले. ते ही खुप छान झाले. मग मी महिला दिनासाठी खास एखादा अनारकली शिवण्याचा विचार केला पॅटर्न ठरवले आणी बाजारातुन कापड , लेसेस विकत घेतल्या आणी पुढील ड्रेस शिवला जो माझ्या शिवणक्लास टीचरलाही खुप आवडला. मी शिकल्यापासुन हा माझा ४था अनारकली ड्रेस आहे.
छान..
छान..
सुंदर आहे...
सुंदर आहे...
मस्त ...सहीच .
मस्त ...सहीच .
मस्त!
मस्त!
सुंदर
सुंदर
खूपच सुरेख चिकाटी ग्रेट
खूपच सुरेख चिकाटी ग्रेट आहे.
धन्यवाद
धन्यवाद
फारच छान प्रयत्न. यश पण आलच
फारच छान प्रयत्न. यश पण आलच आहे.
छान दिसतोय! अवघड असेल ना हा
छान दिसतोय! अवघड असेल ना हा शिवायला?
छान!
छान!
वा!! हि रंगसंगती नाही मला
वा!! हि रंगसंगती नाही मला चांगली वाटली (कोल्ह्याला द्राक्षे ...
)
मस्त.एवडढ्या चिकाटीने
मस्त.एवडढ्या चिकाटीने शिवल्याबद्दल कौतुक.
वा अप्रतिम
वा अप्रतिम
वा, सुंदर.
वा, सुंदर.
छान झालाय.
छान झालाय.
सुरेख !
सुरेख !
धन्यवाद
धन्यवाद
सुंदर
सुंदर
छान!
छान!
होय के अंजली, अनारकलीच्या
होय के अंजली, अनारकलीच्या कळ्यांची कटींग करणे आणि त्या शिवणे ही मोठी कसरत असते. हा एकुण २४ कळ्यांचा अनारकली आहे आणि २" ची एक लेस आणि १/२" ची एक लेस असे एकत्र शिवुन हा पट्टा तयार केलाय.
खुप छान झालाय. कुणाकडे
खुप छान झालाय. कुणाकडे शिकलात?
मलापण शिकयचा आहे
मलापण शिकयचा आहे
फोटो दिसत नाही आहे.
फोटो दिसत नाही आहे.
आता दिसतोय का फोटो?
आता दिसतोय का फोटो?
कविता छान.
कविता छान.
मस्त च शिवलाय. छान दिसतोय.
मस्त च शिवलाय. छान दिसतोय.
मस्तच..
मस्तच..
मला अनारकली ड्रेसेस फार आवडतात..एकेकाळी तेच घालायचे ॲाफिसला .. पण आता अनारकली घालणं सोडून दिले..त्यात अनारकलीपेक्षा अकबरच जास्त दिसते