Submitted by गजानन on 12 March, 2014 - 12:54
अॅगाथा ख्रिस्तीचे चाहते आहेत का?
तुम्ही कोणती पुस्तके वाचली? सगळ्यात आवडते कोणते? याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.
आवश्यक तिथे कृपया स्पॉयलर वॉर्निंग द्या.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
टूवर्ड्स झिरो - मला अत्यन्त
टूवर्ड्स झिरो - मला अत्यन्त आवडलेले पूस्तक.
हायल्ला... मी पण आहे या
हायल्ला...
मी पण आहे या क्लबात ! कर्टन, फाईव्ह लिटल पिग्स, अ मर्डर इज अनाऊंन्सड, द माऊसट्रॅप, अँड देन देअर वेअर नन, पेरील अॅट द एन्ड हाऊस, द सिक्रेट अॅडव्हर्सरी ....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सालं कुठलंही नाव घ्या, आवडलेलंच आहे हे जाणवतं. रच्याक धाग्याबद्दल धन्स गजानन
"The Murder of Roger Ackroyd"
"The Murder of Roger Ackroyd" आवडलेला मी एकटाच का इकडे?
बाकी मला जुळी भावंड किंवा सारख्या दिसणाऱ्या बहिणी या प्रकारची गोष्ट आवडत नाही. पुस्तकाच्या शेवटी उगाचच फसवणूक झालीय असं वाटत रहात.
ट्ग्या , मी लिहीलय ना वर,
ट्ग्या , मी लिहीलय ना वर, माझं आवडतं पुस्तक - The Murder of Roger Ackroyd !
तुम्हाला कोणाला तिची कुठली
तुम्हाला कोणाला तिची कुठली कथा प्रेडिक्टेबल वाटली का?
-----------------------------
संपादित.
----------------------------
पण हे एक्सेप्शन झाले. बर्याचशा कथा आपल्याला थक्क करून सोडतात. murder at orient express वाचल्यावर तर मी प्रचंड अवाक झाले होते.
चैत्रगंधा, थेट नाव
चैत्रगंधा, थेट नाव लिहिण्याऐवजी फुल्या फुल्या लिहाल का कृपया? चुकूनही ते वाक्य वाचले गेले तरी अजून ज्यांनी पुस्तक वाचलेले नाही त्यांची मजाच निघून जाईल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
काल लगेच अ मर्डर इज अनाऊंन्सड
काल लगेच अ मर्डर इज अनाऊंन्सड मुव्ही बघितला - चांगला वाटला...पण प्रेडिक्टेबल वाटला.
बर्याचशा कथा आपल्याला थक्क करून सोडतात. murder at orient express वाचल्यावर तर मी प्रचंड अवाक झाले होते. >> +१
Strongly recommended: 1.
Strongly recommended:
1. Endless Night
2. Ordeal by Innocence
3. The Secret of Chimneys
4. Sad Cypress
5. Towards Zero
6. Cards on the Table
7. Death in the Clouds
8. Lord Edgware Dies
9. After the Funeral
10. Taken at the Flood
11. Five Little Pigs
12. Hercule Poirot's Christmas
13. The Pale Horse
14. Three Act Tragedy
15. Nemesis
16. A Pocket Full of Rye
17. 4.50 from Paddington
मी पण क्लबात कोणीतरी थोडक्यात
मी पण क्लबात
कोणीतरी थोडक्यात पुस्तकाचं नाव, अन एका वाक्यात त्याची स्टोरी लिहा ना, म्हणजे पटकन आठवेल कोणत्या पुस्तकात काय प्लॉट होता ते
काय हा योगायोग. मी काल पासूनच
काय हा योगायोग. मी काल पासूनच 'डेथ ऑन द नाइल' वाचायला सुरू केलंय (तिचं मी वाचत असलेलं पहिलंच पुस्तक). इथल्या लायब्ररीत तिची अलमोस्ट सगळी पुस्तकं आहेत.
कालच The Murder of Roger
कालच The Murder of Roger Ackroyd वाचून हातावेगळं केलं. एकदम अफाट. एकदा वाचायला सूरूवात केल्यावर पूर्ण करूनच संपवलं...
चुकूनही ते वाक्य वाचले गेले तरी अजून ज्यांनी पुस्तक वाचलेले नाही त्यांची मजाच निघून जाईल. स्मित
>> गजानन, परवा वेळ नव्ह्ता म्हणून विचारले नाही पण स्पॉयलर वॉर्निंग देऊन पण वाक्य वाचले तर मग इथे बाकी चर्चा करताच येणार नाही. का या धाग्यावर फक्त पुस्तकांची नावे लिहीणे अपेक्षित आहे?
मला एक कल्पना सुचवाविशी वाटली. स्पॉयलर वॉर्निंग देतांना स्पॉयलर वॉर्निंग <पुस्तकाचे नाव> असे लिहून मग खाली लिहीले तर ज्यांनी ते पुस्तक वाचलेय तेच खालचा मजकूर वाचतील.
चैत्रगंधा, त्यापेक्षा
चैत्रगंधा,
त्यापेक्षा सर्वांनीच मूळ पुस्तकं वाचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मी पण क्लबात बहुतेक सगळीच
मी पण क्लबात![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बहुतेक सगळीच पुस्तकं वाचून झाली आहेत. मेरी वेस्ट्मॅकॉट नावाने लिहिलेली एकदोन वाचली पण फारशी आवडली नाहीत. मात्र आत्मचरित्रात्मक लिहिलेलं 'कम टेल मी हाउ यू लिव्ह' हे पुस्तक सार्वकालिक आवडत्या पुस्तकांपैकी एक. अजून आत्मचरित्र वाचायला मुहूर्त लागलेला नाही.
बहुतेक रहस्यकथा रहस्य कळल्यावर परत वाचायला मजा येत नाही. पण ख्रिस्तीची पुस्तकं अपवाद आहेत. तिचं मनुष्यस्वभावातले बारकावे, गुंतागुंती टिपत जाणं फार आवडतं. एकापाठोपाठ एक पुस्तकं वाचली की खूपदा खुनी कोण ते आधी लक्षात येतंही पण त्यामुळे पुस्तकाची मजा लेशभरही कमी होत नाही. अजूनही माझा कुठलाही लांबपल्ल्याचा प्रवास तिच्या पुस्तकांच्या सोबतीशिवाय पूर्ण होत नाही
तिने वुडहाऊसच्या शैलीची नक्कल करून एक रहस्यकथा लिहिली आहे (बहुदा कोणतीतरी टॉमी-टपेन्सची आहे का?). केवळ अफाट आहे. त्या पुस्तकाचं नाव आत्ता अजिबात आठवत नाहीये.
त्यापेक्षा सर्वांनीच मूळ
त्यापेक्षा सर्वांनीच मूळ पुस्तकं वाचा >>
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण मग चर्चा कधी करायची.. सर्वांनीच सर्व मूळ पुस्तकं वाचल्यावर ? हे म्हणजे आजारापेक्षा उपाय जालिम झाले
काल व्हिटनेस फोर दी
काल व्हिटनेस फोर दी प्रोसिक्युशन पाहिला. एक्दम खिळवून टाकणारा होता. " शी डिडन्ट मर्डर लिओनार्ड, शी एक्सीक्युटेड हीम!!!"
वरदा, सिक्रेट अॅड्व्हर्सरी
वरदा, सिक्रेट अॅड्व्हर्सरी म्हणतेय्स का?
अजून एक पार्ट्नर्स इन क्राइम बहुतेक. (कथा आहेत ह्यात. )
मला नाव अजिबात आठवत नाहीये,
मला नाव अजिबात आठवत नाहीये, इन्ना. आणि आत्ता हाताशी ते पुस्तक नाहीये. पण ती कादंबरी आहे, कथासंग्रह नाही.
मला स्वतःला (चार्ल्स लॉटन असूनही) विटनेस फॉर द प्रॉसिक्यूशन सिनेमाचा बदललेला शेवट नाही आवडला. कथा फार जास्त परिणामकारक आहे.
परवाच लायब्ररीतून Cards on
परवाच लायब्ररीतून Cards on the Table आणले आणि आज हा बाफ बघितला. मी पण क्लब मधे
खालील दुव्यावर अगाथा क्रिस्ती
खालील दुव्यावर अगाथा क्रिस्ती ची एक चांगली कथा वाचता येयील . दुव्याची वैधानिकता माहित नाही.
http://www.bestfree-book.com/Mystery_Suspense/the_mysterious_affair_at_s...
माझ्याकडे बाबांमुळे घरी सगळी
माझ्याकडे बाबांमुळे घरी सगळी पुस्तके आहेत. पण मी आत्ताशी सुरु करतेय हा खजाना उलगडायला..
https://signup.acorn.tv/ ईथे
https://signup.acorn.tv/ ईथे तुम्हाला महिना $५ ला अप्रतिम ब्रिटिश ड्रामाज बघायला मिळतील.
अॅगाथा ख्रिस्तीच्या मार्पल आणि पॉरो चे झाडून सगळे अप्रतिम एपिसोड्स सुद्धा. ह्या मध्ये जे लंडन आणि ईतर कंट्री साईड दाखवली आहे ती तुम्हाला कधीच कुठेही बघायला मिळणार नाही. अमेंझिंग ब्रिटिश लॅंग्वेज, पेहेराव, 'सर्/लॉर्ड्/लेडी' लोकांचे एटिकेटस ...यू जस्ट कॅन नॉट हॅव ईट ईनफ.
पॉरो टेलिविजन सिरिज तर मागच्या वीस वर्षांपासून चालू आहे. जेरेमी ब्रेट च्या शेरलॉक सारखा डेविड सुचेत तर अगदी जगलाय पॉरो. त्याच्या मिशांपासून चालण्यापर्यंत आणि बेल्जिअन अॅक्सेंट मध्ये 'अर्क्यू प्रॉवो' म्हणण्यापासून ते त्याच्या ओसीडी पर्यंत सरळं सगळं अमेझिंग. शेवटचा १३ वा सीझन लवकरच प्रदर्शित होत आहे.
म्हणतात ना नो वन टेल्स मिस्ट्री बेटर दॅन अ ब्रिटिश. ख्रिस्तीच्या कथांमधल्या मिस्ट्री बद्दलतर काही सांगायलाच नको. पहिल्याने थोडं स्लो वाटेल पण नंतर अक्षरशः प्रेमात पडायला होतं.
दीड-दीड तासांचे एपिसोड्स आहेत, अजूनही बरेच गाजलेले ब्रिटिश ड्रामाज आहेत.
हायली रेकमंडेड. $५ वर्थ ईट, पहिला महिना ही फ्री आहे, बघाच. काही एपिसोड्स नेटफ्लिक्सवरही आहेत.
हिंदीतल्या अब्बास मस्तानच्या
हिंदीतल्या अब्बास मस्तानच्या 'गुप्त'ची कथा सुद्धा प्वॉरोच्या एका कथेवरून ढापलेली आहे. गुप्तचं विकी पेज एडिट करायला पाहिजे.
कथेचं नाव आठवून लिहितो ईथे.
वरती मी लिहिलंय त्या
वरती मी लिहिलंय त्या पुस्तकाचं नाव 'सेव्हन डायल्स मिस्टरी'
सोनीच्या शायडीतले काही भागही
सोनीच्या शायडीतले काही भागही अॅगाथाच्या कथांवर असतात.
अरेच्चा! गजा.... मी Founder
अरेच्चा! गजा.... मी Founder Member या क्लबची
स..ग..ळी.. पुस्तकं माझ्याकडे आहेत आणि असंख्य वेळा वाचलेली आहेत (एक सोडून). Murder on Orient Express हा चित्रपट म्हणून अफाट छान आहे! स्टार-कास्ट तर जबरदस्त! पण पुस्तक त्यापेक्षा Murder of Roger Acroyd, Cards on the Table, 4:50 from Paddington, At Bertram's Hotel, वगॅरे जास्त आवडली.
डेव्हिड सुशे आणि प्वाहो वेगळे करताच येत नाहीत. पीटर उस्तिनॉव्ह, आल्फ्रेड मोलिना वगैरे लोकांना प्वाहोच्या भुमिकेत पाहिले आहे; पण देव्हिड सुशे इज द मॅन!
छे! एक-एक पुस्तक घेऊन इथे लिहायला हवं ना?
आणि हो, न वाचलेलं पुस्त्क म्हणजे Curtain. आयुष्यात करायची ती शेवटची गोष्ट असं ठरवलं आहे. प्वाहोचं शेवटचं पुस्तक वाचून रामराम!
सही लिहिलंय प्रिया! डेविड
सही लिहिलंय प्रिया!
डेविड सुशेचा प्वॉरो आजिबात डोक्यातून जात नाही. नंतर नंतर तो कुठल्या बेल्जिअन शब्दांचा वापर कधी करणार हे प्रेडिक्टेबल होऊन जाते पण मजा येतच राहते.
'द क्लॉक्स' मध्ये तो दोन छोट्या मुलींना त्याचं नाव सांगतो तेव्हा त्या म्हणतात 'ईट्स नॉट अ नेम, ईट्स जस्ट अ नॉईज्' कसलं अॅप्ट आहे ते.
Murder on Orient Express जबरदस्त आहे पण, कल्पनेपलिकडचे रहस्य!! एमिली ब्लंट पासून जेसिका चॅस्टाईन ते मायकल फासबेंडर केवढ्यातरी हॉलिवुडच्या आघाडीच्या लोकांना प्वॉरोमध्ये ब्रेक मिळाला आहे.
वरदा तू 'सेवन डायल्स मिस्टरी' कुठल्या संदर्भात लिहिलं आहेस?
मला वाटतं गुप्त 'मर्डर ऑन द लिंक्स' वरून घेतला असावा.
मार्पल आणि प्वॉरो दोन्हीं मध्ये किती तरी कथा ट्रेन मध्ये घडतात, आणि किती तरी कथांमध्ये ट्रेन महत्वाचा घागा बनून येते.
छे! एक-एक पुस्तक घेऊन इथे लिहायला हवं ना? >> आमेन.
चमन - ते पुस्तक बर्यापैकी
चमन - ते पुस्तक बर्यापैकी वुडहाऊस शैली आणि त्याच्या गोष्टींची सोशल सेटींग्ज वापरून लिहिलं आहे. दोघं लेखक एकमेकांचे प्रचंड चाहते होते
मोलिनाच्या प्वॉरो मध्ये
मोलिनाच्या प्वॉरो मध्ये सुशेने जॅपची भुमिका केली होती, पण मोलिना 'लिटल बेल्जिअन' च्या व्याख्येत आजिबातच बसत नाही.
सद्ध्या 'Death on the Nile'
सद्ध्या 'Death on the Nile' वाचतोय.
'Murder on Orient Express' - पुस्तक आणी मूव्ही..दोन्ही अप्रतिम. एका रजेच्या दिवशी सकाळी ७:३० वाजताच हे पुस्तक घेऊन बसलो होतो.. आणी झपाटल्यासारखं संपवूनच खाली ठेवलं.
चमन, मोलिना काय किंवा पीटर
चमन, मोलिना काय किंवा पीटर उस्तिनॉव्ह काय - ते मुळात 'लिटल' च नाहीत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Death on Nile च्या एका प्रॉडक्शनमध्ये - पीटर उस्तिनॉव्ह प्वॉहो आहे आणि त्यात आय्.एस्.जोहर चीही भुमिका होती.
गजाने हा फलक उघडून छळ मांडला आहे पण![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
Pages