या लेखात आपण अजुन काही तंत्र थोडक्यात पाहु आणि त्यांचा वापर करुन काही सोप्पई चित्र करुया.
पहीले तंत्र - निगेटीव्ह पेंटीग - यात आधि येक रंग मारुन तो सुकू द्यावा ,नंतर त्या भोवती दुसरा किंवा पहिल्या रंगा पेक्षा डार्क शेड वापरुन आपण आपल्याला हव तो आकार मिळवायचा. आपल्याला ह्वा तो आकार न रंगवता त्या भोवती रंगवाचे म्हणजे आकारा बाहेरचा निगेटिव्ह शेप रंगवायच्जा म्ह॑णुन निगेटिव्ह पेंटींग.
इथे मी येक झाडाच्या आकार मिलवायचा प्रयत्न केला आहे
दुसरे तंत्र - ग्लेझिंग - आधि येक रंग मारुन तो सुकु द्यायचा , त्यावर खालचा रंग दिसेल असा दुसर्या रंगाचा पातळ थर द्यायचा , यामुळे आपल्याला व दोन्ही रंगाच्या मिश्रणाने मिळते त्या तिसर्या शेडचा इफेक्ट मिळेल.
इथे मीऑ पहिल्यांदा पिवळ्या रंगाचा वॉश दिला . तो सुकल्यावर लाल रंगाचा पातळ हात दिला . त्यातुन थोडा ऑरेंज शेडचा इफेक्ट मिळाला.
स्प्लॅटर - टुथ ब्रश किंवा पेंट ब्रश रंगात बूडउन ब्रिसल्स मधुन बोट फिरुऊन किंवा ब्रश बोटावर आपटुन रंगाचे शिंतोडे पेपरवर उडवायचे. काही टेक्स्चर मिळवायला , किंवा चित्र थोडे स्टायलाईज करायला हे तंत्र वापरता येते.
स्क्रेपींग - रेंग ओला असतानाच ब्रशचे मागचे टोक किंवा येखादा कडक प्लस्टिक चा तुअकडा इत्यादिने त्यावर रेषा ओढायच्या , झाडाच्या फांद्या ईं दाखवायला हे तंत्र वापरता येते मात्र यात पेपर फाटणार
नाही याची काळजी घ्या.
आता या तंत्रांचा वापर करुन दोन चित्र करुया.
पहिल्यांदा कागदावर चित्र रेखाटुन घेतले
त्यानंतर वॉटर लिलिज रंगवुन सुकु दिल्या.
त्यानंतर पिवळ्या+ निळ्या रंगाचा वॉश वॉटर लिलीज सोडुन पुर्ण कागदभर लावला. यात मधे मधे नीळा, पिवळा रंग कमी जास्त करीत थोडे वेऋएसहन /पाण्याचा इफेक्ट आणला.
आता चित्र पुर्ण सुकु दिले.
त्यानंतर या हिरव्या रंगात बर्न्ट सिएना+ कोवाल्ट ब्लू अॅड करुन डार्क हिरवा रंग तयार केला आणि तो लिलीज ची पाने सोडुन त्याभोवती नीगेटीव्ह तंत्राने रंगवला. हे चित्र सुकताना लिली मधे अजुन कही डीटेल्स टाकुन चित्र संपवले.
आता दुसरे चित्र
चित्र रेखाटुन , काही बॅगराऊंड वेट इन वेट पद्धतीने ब्लॉक करुन घेतले
ते सुकल्यावर घराचा भाग ब्लॉक करुन घेतला.
हे स्रव करताना रेलिंगचा भाग /पुढिल तुळ्शी वृंदावनाचा भाग पांढराच राहिल याची काळजी घेतली.
त्या नंतर चित्र सुकल्यावर थोडया दार्क किरब्या शेडने झाडांचा आकार लुल्जली /बोल्ड ब्रश स्त्रोक्स्ने केला तर माग्ची काही झाडे /पालवी निळसर हिरव्या रंगात केली. हे सर्व सुकु देउन पिवळ्या भिंतीवर निळ्या+ लाल अशा जांभुळक्या रंगाच्या पातळ थराने ग्लेझिंग तंत्राने घरावर पडलेली सावली बोल्ड ब्रशस्ट्रोकस्नी रंगवली. पिवळा व जांभळा हे विरुद्ध रंग (हे आपण कलर्व थिअरिच्या वेळेला डिस्कस करु) अस्ल्याने सावलीचा रंग छान ग्लेझींग ने हा इफेक्ट छान आला.
त्यानंतर निळा+लाल+ बर्न्ट सियेना असा डार्क रंग घेउन निगेटिव्ह पेंटिंग तंत्राने रेलींग आणि खांब यांचे आकार मिळवले , फोरग्राऊंड्च्।ई हीरवी झूडपे ही सुद्धा निगेटिव्ह पद्धतीने उटुन दिअसतील हे बघीतले.
त्यानंतर थोडा हिरवा रंग स्प्लॅटर केला आणि चित्र संपवले
PS: माझा पीसी खराब झाल्याने OS रीईन्स्टॉल करावी लागली आणि फोटो एडीटर चालत नाहीये, त्यामुळे काही ठीकाणी रंग मुळ चित्राबरोबर मॅछ होत नसतील तसेच दोन स्टेप्स मधे सुद्धा रंगात फरक दिसत असेल त्याबदाल क्षमस्व.
या लेखा बरोबर आपण आवश्यक त्या सर्व तंत्रांवर बोललो आहोत. अजुन बरीच छोटो मोठी तंत्र असली तरी त्यावाचुन सध्या आपले काही अडणार नाही यापुढील लेखात आपण बेसिक कलर थिअरी आणि चित्र चांगले होण्यासाठी कसा वापर करायचा हे पाहु.
(No subject)
कलाकार - जमतेय , अजुन सरावने
कलाकार - जमतेय , अजुन सरावने आणखी क्लिन होईल.
अश्विनी के- चांगले आहे, नंतरचा वॉश अजुन डार्क चालला असता आणि त्यात ब्रशचे स्ट्रोक्स दिसताहेत ते कमी हवेत, थोडक्यात येका व्रश ट्स्रोक मधे जास्तीत जास्त कागद कवहर करायचा प्रयत्न करायचा आणि त्याच त्याच भागवर परत परत रंग लेपन करायचे नाही.
करेक्ट... चित्र पटापट सुकत
करेक्ट... चित्र पटापट सुकत होतं. त्यामुळे परत परत पाणी, पाणी/रंग घेऊन ब्लेंड करायला बघत होते. मलाच नाही आवडलंय फारसं. पण आहे तसंच टाकलं इथे
मला माझ्याच चित्रातली ती पानं न वाटता दगड वाटतायत 
अजय, ग्लेझींगमधल्या रंगांच्या
अजय, ग्लेझींगमधल्या रंगांच्या गडदतेचे ध्यानात ठेवतो. सावली एकाच शेडमध्ये यायला हवी का? माझ्या चित्रातल्या सावलीतही जांभळ्या रंगांचे कमीजास्त प्रमाण झाले आहे. आणि एक विचारायचे होते - रेलींगच्या वरच्या भागातले शेडिंग मला ऑईल पेंटींगसारखे वाटतेय. हे जलरंगात असे यावे का (चालते का)?
वृषाली, बस्के, अंतरा, कलाकार, धन्यवाद.
गजानन - सावल्या योग्य रितीने
गजानन - सावल्या योग्य रितीने रंगवणे हे खुप महत्वाचे आहे. जरा विस्ताराने लिहावे लागेल , या आठवड्यात नवा भाग लिहिन त्यात यावर बोलुया.
ओके. मला या चित्रात
ओके.
मला या चित्रात स्क्रेपींग करताना खूप मजा वाटली. त्या दोन तीन रेघोट्यांनी एकदम जिवंतपणा जाणवायला लागला.
हे मी केलं,पण मनासारखं नाही
हे मी केलं,पण मनासारखं नाही जमलं.काहितरी चुकलंय्,प्लीज चुका सांगू शकाल का?
हे अजून एक केलं मध्यंतरी..
हे अजून एक केलं मध्यंतरी..

मी पुन्हा एकदा केलेला प्रयत्न
मी पुन्हा एकदा केलेला प्रयत्न पण झाडे अजूनही जमत नाही.

अंतरा झाडाच्या पानांचे बारीक
अंतरा झाडाच्या पानांचे बारीक बारीक काम करण्या पेक्षा मोठा झुपका काढायचा , वेट इन वेट किंवा ड्रात ब्रश इ तंत्र वापरुन. जलरंग हे माध्यमच प्रवाही असल्याने बारीक बारीक काम करत बसलो तर मजा निघुन जाते.
येक छोटेसे निगेटीव्ह पध्हतीने केलेले चित्र.



ताजा प्रयत्न..
ताजा प्रयत्न..

मस्त झालंय वृषाली...!
मस्त झालंय वृषाली...! ग्लेझिंग चांगलं दिसतंय.
खूप छान वॄषाली...
खूप छान वॄषाली...
नमस्कार, हा माझा
नमस्कार,
हा माझा प्रयत्न..
बाहेरगावी असल्याने बराच आभ्यास राहिला आहे. बहुदा झाडांवर भरपुर काम करावे लागेल..
@वृषाली... कलर छान दिसत
@वृषाली... कलर छान दिसत आहेत. तुम्ही कोणते कलर वापरता ?
पोगो वाहिनीवर एक अॅनिमेटेड
पोगो वाहिनीवर एक अॅनिमेटेड कार्टून प्रोग्रॅम येतो 'कुंग फू भीम' (छोट्या भीमवर). त्यातल्या निसर्ग चितारणार्या फ्रेम्स (जंगल, नद्या, नाले, डोंगर, सुर्यास्त, रात्रीचा चंद्र आणि असंख्य!) इतक्या नयनरम्य असतात की लगेच त्यातली एखादी फ्रेम कॅप्चर करून ब्रश आणि कागद काढून ट्राय करून बघावेसे वाटते.
लायब्ररीतून एक पुस्तक मिळालं
लायब्ररीतून एक पुस्तक मिळालं पेंटिंगचं,त्यामधली ही २..


काही ठिकाणी जमतं ब्लेंडींग्/शेडिंग,काही वेळा अगदीच बाळबोध दिसतं,पण करत रहाणे :ड्,आणि आता "जलरंग कार्यशाळे"तल्या बाकी विद्यार्थ्यांना पकवणे,:ड
गजानन,अंतरा,सन्कुल,बस्के, अश्विनी धन्यवाद.सन्कूल मी "reeves" चे कलर्स वापरते.
वृषाली हे चित्र पण खूप छान
वृषाली हे चित्र पण खूप छान दिसते आहे.
अजय, केळीचं चित्र पण भारी
अजय, केळीचं चित्र पण भारी आहे. या वीकेंडला करीन.
वृषाली, मस्तच आलेत गुच्छ! पहिल्या चित्रातली ती जांभळी फुले एकदम मस्त!
चित्र चांगली होताहेत , थोडा
चित्र चांगली होताहेत , थोडा कामात अडकल्याने फारसे काही लिहु शकलो नाही त्याब्द्दल दिलगीरी.
वृषाली, सुंदर असतात तुझी
वृषाली, सुंदर असतात तुझी चित्रं
पाटील, आम्हीच दिलगीर आहोत वेळेअभावी घरचा अभ्यास करु शकत नाहियोत पटापट म्हणून
केळीची झाडे काढायचा प्रयत्न -
केळीची झाडे काढायचा प्रयत्न -
हा माझा प्रयत्न :
हा माझा प्रयत्न :

हा माझा
हा माझा

नवीन प्रयत्न..
नवीन प्रयत्न..

केळिची चित्र सगळ्यांचीच
केळिची चित्र सगळ्यांचीच चांहली आहेत, निगेटीव्ह पेंटींग चांगले जमतेय.
वृषाली - चांगले आहे. काहि छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या.
). वेगले पोस्टर कलर घ्यायची गरज नाही, कोणत्याही रंगात पांढरा रंग मिसळला तर अपार्दर्षक रंग तयार होतो.
झाडांचे फॉलिएज येव्हढे दाट असेल तर फांद्या बाहेरुन चिकटवल्या सारख्या दिसणार नाहित , त्याना थोड्या हाईड इन- हाईड आउट पद्धतीने रंगवा.
घरा ल्गतची सावली खुप डार्क झाली आहे, खरे तर येकाच रंगाची सावली ग्लेझ केली तरी खालच्या गवतामुळे रस्त्याच्या रंगामुळे वेरिसेशन मिळाले असते. डार्क करायचे झालेच तर येक सलग रंगाने सावली रंगउन मग ओल्या रंगात थोडा डार्क रंग मिसळुन द्यावा.
फुलं खुप ब्राईट न वाट्ता थोडी डल दिसतात. येक तर तेव्हढा भाग पांढरा सोडुन नंतर शेवटी चित्र सुकल्यावर फ्रेश रंगानी फुलं काढावीत , हे कठीण वाटत असेल तर सरळं पोस्टर कलर नी ती फुलं काढावीत ( प्युरिस्ट ना हे आवडणार नाही पण येव्हढी मोकळीक घ्यायला हरकत नसावी
निगेटिव्ह पेंटिंग आणि
निगेटिव्ह पेंटिंग आणि ग्लेझिंगचा प्रयास ....
मला चित्रांचे फोटो नीट काढता येत नाहीत. दोन्ही बाजूंनी थोडा काळोख येतोच.
अश्विनी,भारीच आलय हे.
अश्विनी,भारीच आलय हे.
भन्नाट आहेत सारीच चित्र -
भन्नाट आहेत सारीच चित्र -
अश्विनी हे चित्र पण खूप
अश्विनी हे चित्र पण खूप सुंदर आहे...
Pages