Submitted by अत्रुप्त आत्मा on 8 March, 2014 - 05:06
मुक्त मोहिनी श्यामल नयनी
सुंदर साधी पवित्र तू ही
तुझ्या उदरीचे पवित्र फल मी
बीजानेही तुझाच मी ही
कधि भासिशी सुंदर शीला
कधि मोहिनी तू मधुशाला
तुझ्याच साठी आसुसलेला
मी ही येथे रिताच प्याला
धाक तुझाही हवा वाटतो
पत्नी म्हणूनी माता म्हणूनी
प्रेम तुझेही हवे वाटते
कधि सखी तू कधी कामिनी
धर्माचेही तुटले बंधन
संस्कृतिचेही सुटले कोंदण
अंगण झाले कधि नभी ते
नभही झाले कधी..च अंगण
आता आहे पुढेच सारे
जिंकायाचे...चाखायाचे
स्वातंत्र्याचे मिळता सोने
जपून ते हि राखायाचे.
सांगायाचे इतुके सांगून
मी ही येथे जरा थांबतो
मज बुद्धिने दिली-पौरुषी
कशी वाटते तुला पहातो.
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा.
०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०=०
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर कविता , छान रांगोळी!
सुंदर कविता , छान रांगोळी!
रांगोळी छान आहे
रांगोळी छान आहे
धन्यवाद हो... साती...चैत्राली
धन्यवाद हो... साती...चैत्राली आणि बिरुटे सर.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. -दिलीप बिरुटे
छान.
-दिलीप बिरुटे