नमस्कार मायबोलीकर.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या आपणां सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी, प्रसंगी पहाडाहूनही कणखर, खंबीर, कर्तृत्ववान अशा स्त्रिया जगात आहेत, त्यांच्यासाठी सगळेच दिवस वैशिष्ट्यपूर्ण असतात. परंतु दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन मुद्दाम साजरा केला जातो तो तुमच्या आमच्यातल्या सामान्य स्त्रियांसाठी! या दिवसाच्या निमित्ताने महिलांबद्दल, त्यांच्या अधिकारांबद्दल, त्यांच्या व्यथांबद्दल, त्यांच्या मागण्यांबद्दल, त्यांच्या अडचणींबद्दल समाजात जागरूकता निर्माण व्हावी हा या महिला दिनामागचा मुख्य हेतू. ही जागरूकता जितकी वाढेल तितकी आपली समाज म्हणून प्रगती होईल. म्हणूनच तर यावर्षीच्या महिला दिनाचं घोषवाक्य आहे "Equality for women is progress for all."
आपणही दरवर्षी मायबोलीवर संयुक्तातर्फे महिला दिन साजरा करतो. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो, कधीकधी त्यातून काही नवे विचारही समोर येतात. या वर्षीदेखील आपण उत्साहात हा दिवस मायबोलीवर साजरा करूया. या वर्षीच्या चर्चा व खेळांमध्ये सहभागी होण्याकरता आपणां सर्वांना अगत्याचे आमंत्रण !
---------------------------------------------------------------------------
माझ्या आयुष्यातील प्रभावशाली स्त्रिया
चंदेरी पडद्यावरच्या माझ्या आवडत्या व्यक्तीरेखा
------------------------------------------------------------------------------
मस्त उपक्रम आहे. धन्यवाद.
मस्त उपक्रम आहे. धन्यवाद.
महिला दिनाच्या शुभेच्छा!!
महिला दिनाच्या शुभेच्छा!!
.
.
मस्त आहेत ह्या वर्षीचे
मस्त आहेत ह्या वर्षीचे उपक्रम. धन्यवाद संयोजक