भुगर्भातले रहस्य भाग १

Submitted by केशव तुलसी on 1 March, 2014 - 04:13

आजची मिटींग आटपून प्रा.राजेश हे आपल्या केबिनमध्ये आराम करत होते.
प्रा.राजेश पाठक तसे उमदे व्यक्तीमत्व होते, जीओलॉजी याविषयातून त्यांनी
सत्तरच्या दशकात अमेरिकेतुन पीएचडी मिळवली होती, गेली तीस वर्षं ते
विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करत होते, विद्यापीठाच्या
भूगर्भशास्त्र विभागाच्या विभागप्रमुखपदी त्यांची नुकतीच बढती झाली होती,

विद्यापीठात त्यांना किंग असे आदरार्थी संबोधन होते, ते होतेही तसेच
विलक्षण बुद्धीचातुर्य असलेले त्यांना ते उपजतच लाभले होते. त्यांचे वडील
जयंत पाठक हे त्यांच्या काळातील प्रसिद्ध उद्योजक व हौशी संशोधक होते.
आपल्या वडीलांचा उद्यमाचा वारसा राजेश यांना फारसा लाभला नव्हता पण
संशोधन क्षेत्राचा वारसा त्यांना पुरेपुर लाभला. बाकीचे भाऊ शिक्षणानंतर
वडीलांचा व्यवसाय सांभाळायला लागले पण राजेश यांना संशोधनाचे क्षेत्र
खुणावत होते, आपली बुद्धी वाया जाऊ द्यायची नाही असा निश्चय करुन ते
अमेरीकेत उच्चशिक्षणासाठी गेले. तिथे या बुद्धीच्या जोरावर त्यांनी
त्यांच्या ज्ञानशाखेची डॉक्टरेट मिळवली ....वडीलांना दिलेले देशसेवेचे वचन
पाळण्यासाठी ते भारतात परत आले... खोल भुगर्माचा अभ्यास करुन पृथ्वीच्या
जडणघडणाचा अभ्यास करणे व त्यासाठीची नवी तंत्रं विकसीत करणे यात त्यांनी
तीस वर्षं खर्ची घातली होती ..
त्यांची पत्नी राणी पाठक ही एका प्रथितयश
बँकेत जनसंपर्क अधिकारी होती. कॉलेजात एकत्र शिकत असताना राजेश यांच्याशी
तीची मैत्री झाली .राजेश यांचे करारी व्यक्तीमत्व व आत्मविश्वास मैत्रीचे
रुपांतर प्रेमात करण्यात पुरेसा होता.
आज साठीच्या उंबरठ्यावर पोचलेल्या
राजेश यांचे काळे पांढरे केस व राखलेली दाढी त्यांच्या रुबाबात अजूनच भर
घालत होती.राणीला त्याच्या रुबाबदार दिसण्याचे आजही कौतुक होते.

प्रा.
राजेश यांनी घड्याळात बघितले उशीर झाला होता थोड्याच वेळात ते त्यांच्या
गाडीत होते... आज घरी जाऊन राणीला डीनरला घेऊन जाऊ असा विचार करत ते गाडी
वेगात पण सफाईने हाकत होते..
गाडी बंगल्याच्या गेटमधून आत शिरली, राणी
कुणाशी तरी फोनवर बोलताना राजेशनी लांबूनच पाहीले. बोलताना राणी एक्सायटेड
दिसत होती.गाडीतून उतरुन राणीकडे जात त्यांनी खुणेनेच कोण आहे विचारले.

''चेतनचा फोन आहे तो सकाळच्याच फ्लाइटने भारतात निघालाय',फोनवर हात ठेवून
राणी उद्गारली

''काय चेतन येतोय''

''अहो चेतनच नाही तर अंजुही येतेय अमित बरोबर''

'' दॅट्स बेटर ''राजेश उद्गारले

चेतन व अंजु ,राजेश राणी यांची अपत्ये..

इंजिनिअर होऊन चेतन अमेरिकेत मोठ्या
पगाराच्या नोकरीवर होता. तिथं स्थाइक व्हायचा निर्णय त्यांनं घेतला होता.
मुलगी अंजुचा नवरा ही त्यांच्या लग्नानंतर अमेरीकेत मायग्रेट झाला
होता. देशाभिमानी राजेशना हे पटत नव्हत, पण त्यांचा नाईलाज होता.

'' ते आज
संध्याकाळी मुंबईत लॅन्ड होतायत'' राणी म्हणाली
''ह्म्म दोघेही एकाचवेळी
भारतात यायची ही पहीलीच वेळ आहे आय एम सो ग्लॅड राणी''

''खरं आहे तुझं राजेश दरवेळी चेतन किंवा अंजुपैकी एकचजण भारतात येतो यावेळी
दोघंही येतायत ते ही महीन्याभरासाठी ''

''चल चल लवकर आटप आपल्याला त्यांना
पिकअप करायला जायचेय ''राजेश पुटपुटले

एअरपोर्टच्या लाउंजमध्ये राजेश राणी मुलांची वाटत पहात होते.राजेश शांत होते, कोणत्याही परिस्थितीत जास्त भावनिक न
व्हायचा त्यांचा स्वभाव होता.
'' राजेश ते बघ ते आले
अगं हो हो
चेतन अंजू आणि तिचा नवरा तिघांना घेउन राजेश व राणी
गाडीत बसले..गाडी हायवेने सुसाट पळत होती राजेश गाडी चालवत होते
.चेतन
अंन्जू तुमचा प्रवास कसा झाला,राजेशने विचारले.
पप्पा ममा आमचा प्रवास छान
झाला पण तूम्ही का एवढ्या रात्री धावपळ केलीत?
जाऊ दे गं तुमी आलात ना
सुखरुप, झाले तर मग राणीने पुस्ती जोडली .

चेतन अंजुला येऊन आठ दिवस झाले
होते.मुलं अल्याच्या आनंदात एक छोटी पार्टी झाली होती . चेतन अंजू
जावयाबरोबर गप्पाटप्पांमध्ये वेळ मजेत जात होता...

आठवड्यानंतर राजेश पुन्हा
आपल्या कामाकडे रुजु झाले,

आज कामाला आल्यासरशी त्यांना प्रा. शर्मा यांनी
त्यांना काही नवीन भुगर्भमापक यंत्रे विद्यापीठात आली आहे व त्याचे
टेस्टींग करायला लागणार आहे असे सांगितले.
सर ही गेजेस आपण कुठे चेक करु
शकतो
शर्माने विचारले
शर्मा, ही गेजेस तपासण्यासाठी आपल्याला
हजार मीटर उंचीवर जावे लागेल.
पण का सर?
ही गेजेस पर्वतीय भुगर्भाचे मापण
करण्यासाठीची आहेत . चुंबकीय तरंगाचा वापर करुन हजार मीटर पर्यंतच्या खोल
भुग्रभाचे मापण ही गेजेस करु शकतात. त्यासाठीच आपल्याला नजीकच्या
पर्वतरांगामध्ये जावे लागेल.
मग कधी जायचे सर?
मंडे नेक्स वीक
गेजेसचा
विचार करतच राजेश घरी परतले, चेतन व आशुतोष राजेशची जुनी मारुती घेऊन
बाहेर गेले होते.

''पपा तुमचे आमच्याकडे लक्ष नाहिये ,तुमी लगेचच कामात
गुतंवून घ्यायची गरज नव्हती''अंजुने जरा नाराजीनेच तक्रार केली
आय नो बेटा
पण सध्या एका नवीन संशोधनात मी गुंतलो आहे
'' तू म्हणजेना राजेश मुलं एवढा
आग्रह करतायत तर घे ना थोडा ब्रेक" राणीने त्याला खडसावले

नॉट पॉसिबल
डार्लिंग, नेक्स्ट मंडे मी दौर्यावर आहे...
रात्री जेवणाच्या टेबलवर
गप्पाटप्पा करत जेवण चालू होते.
चेतनने राजेशला विचारले पपा तूमी कोणत्या
दोर्यावर चालला आहात आणि किती दिवसासाठी?
चेतन ,अरे काही गेजेस आहेत ती चेक
करण्यासाठी मी व प्रा शर्मा जात आहोत. पर्वतराजींमध्ये... इथुन दोनशे मैल
नॉर्थ वेस्टला..खेरगाव
पपा म्हणजे आपल्या अशोककाकाच्या बंगल्याकडच्या भागात तर
नव्हे
अरे हो,त्याच्या बंगल्यावरच आमी उतरणार आहोत, बरिच वर्षं तो तिकडे
फिरकलाही नाहीए. दोन्ही कामे होतील माझी.
जेवणं झाल्यानंतर चेतन अमित व
राजेश टेरेसवर स्कॉचचा आस्वाद घेत होते .अमित लगेचच इथे कंटाळला होता.
शेवटचे दोन आठवडे त्याच्या आईबाबांकडे दिल्लीला जायचे त्याचे ठरले होते.
अंजुच्या आग्रहाखातर तो इथे थांबला होता.
'' पपा मी काय म्हणतो तुमच्या
दौर्यात आम्ही आलो तर चालणार नाही काय तेवढीच तुमला कंपनी
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलेय...पु.भा.प्र......

thnkx