Submitted by ग्रेटथिन्कर on 20 February, 2014 - 02:54
जानेवारी, फेब्रुवारी असा उच्चार करणे अथवा लिहिणे चूकीचे आहे काय?
january, february या इंग्रजी महिन्यांचा उच्चार आणि मराठी कॅलेंडरातील उल्लेख जानेवारी आणि फेब्रुवारी असा आहे,हे उच्चार योग्य आहेत काय.?
jan -yoo- er- ee आणि feb -roo- er -ee अशी त्यांची उच्चारांची फोड दिलेली आहे.याचा उच्चार जान्युअरी ,फेब्रुअरी असा होतो कि आणखि कसा...कि जानेवारी फेब्रुवारी हेच उच्चार योग्य आहेत.?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मराठीमध्ये जानेवारी,
मराठीमध्ये जानेवारी, फेब्रुवारी असाच उच्चार केला जातो. दुसर्या भाषेत असा उल्लेख करू (हिंदी/ इंग्रजी) नय . हिंदी वाले तर मई (मे), सितम्बर, अगस्त असे उच्चार करत असतात.आपण मराठी सोडून इतर भाषेत महिन्यांच्या नावाचा उच्चार करताना सरळ इंग्लिश पद्धतीने करावा उदा जान्युअरी, फ़ेब्रुअरि वगैरे
धन्यवाद.परंतु हिंदिवाले
धन्यवाद.परंतु हिंदिवाले सगळ्याचीच वाट लावतात, रशियाचा रूस ,अमेरिकेचा अमरिका, बँकेचा बैंक.
मराठीत अशी वाट लावायची पद्धत नाही, म्हणून ईचारले.
>>>>> मराठीत अशी वाट लावायची
>>>>> मराठीत अशी वाट लावायची पद्धत नाही, म्हणून ईचारले. <<<<
नै, ते ठीकाय हो.
पण जानेवारि/फेब्रुवारी या नामांची उच्चारणामधे वाट लागली आहे असे कोणी इन्ग्रज सान्गायला आला होता का?
फर्ग्युसन की फर्ग्सन? अन असेच अनेक उच्चार. पण निदान इथे जवळीक तरी आहे मूळ उच्चारनाशी. मुम्बै चे बॉम्बे नै केलेल. हो की नॉट?
परंतु हिंदिवाले सगळ्याचीच वाट
परंतु हिंदिवाले सगळ्याचीच वाट लावतात, रशियाचा रूस ,अमेरिकेचा अमरिका, बँकेचा बैंक >> मला पण आधी असं वाटायचं की हे वाट लावणं आहे. पण प्रत्यक्षात ते वाट लावणं नाहिये. प्रत्येक भाषेमध्ये या नावांमधे फरक पडतो. मुळात इंग्लिश हीच एक जर्मॅनिक भाषा आहे त्यामुळं इंग्लिश मध्ये जसा उच्चार असेल तोच बरोबर असंही नाहिये.
मुम्बै चे बॉम्बे नै केलेल. हो
मुम्बै चे बॉम्बे नै केलेल. हो की नॉट?> हे भारीच!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
विशेषनामांचे भाषांतर /
विशेषनामांचे भाषांतर / रुपांतर करु नये असे मत आहे पण आधीच जी भाषांतरे / रुपांतरे रुढ झालेली आहेत ती आता का बदलायची ?
जपान , इजिप्त, चीन, जर्मनी, मेक्सिको ही ठळक उदाहरणे.
इंग्रजांनी इथल्या स्थानिक
इंग्रजांनी इथल्या स्थानिक जागांच्या नावांची जी वाट लावलेली होती ती पाहता हे काहीच नाहीये...ग्रेथिं, तुम्हाला हवा तो उच्चार करा हो...समोरचा समजून घेतोच...नाहीतरी हल्ली मराठीचे वाभाडे आपलीच इंग्रजाळलेली माणसं काढत असतात आणि वर नाक करून म्हणतात...भाव समजून घ्या हो! उगाच चूका कसल्या दाखवताय?
मुंबई-बाँबे
कोलकाता-कॅलकता
वसई-बेसिन
वडोदरा-बरोडा
हे काही मासले आहेत...अजून आठवायचा प्रयत्न करा..हवी तेवढी मोडतोड मिळेल.
नै पण मला सांगा, उच्चार कसाही
नै पण मला सांगा, उच्चार कसाही केला तरी महिन्यात दिवस, आणी सुट्ट्या तेवढ्याच रहातील ना........ की फेब्रुअरी उच्चार केला की तो महिना ३०-३१ दिवसांचा होणार आहे?![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
(No subject)
परंतु हिंदिवाले सगळ्याचीच वाट
परंतु हिंदिवाले सगळ्याचीच वाट लावतात, रशियाचा रूस ,अमेरिकेचा अमरिका, बँकेचा बैंक.
मराठीत अशी वाट लावायची पद्धत नाही, म्हणून ईचारले.>>
मराठीतही असेच काहीसे करतोच ना आपण; इंग्लिश्-इंग्रजी, इंदौर्-इंदूर, वॉशर- वायसर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्याला वाट लावणे म्हणायचे का मराठमोळे करून अंगिकारणे हा ज्याचा त्याचा दृष्टीकोन
मसुदा हिंदी असेल तर उच्चार
मसुदा हिंदी असेल तर उच्चार हिंदीच करावा लागेल.
उदा. "26 जनवरी, 1950 को देश का संविधान लागू किया गया था| तब से यह दिन भारत के लिए विशेष महत्व रखता है|"
यात, "26 जानेवारी, 1950 को देश का संविधान लागू किया गया था|" किंवा "26 जॅन्युअरी, 1950 को देश का संविधान लागू किया गया था|" असं म्हणणं/ लिहिणं चुकीचंच आहे.
वॉशर- वायसर >> सगळ्यात भारी
वॉशर- वायसर >>
सगळ्यात भारी आहे.. सोल्यूशन - सुलोचन ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>मुम्बै चे बॉम्बे नै केलेल.
>>मुम्बै चे बॉम्बे नै केलेल. हो की नॉट?
बॉम्बेचे ओरिजीन वेगळे आहे ना... मुंबई चा अपभ्रंश नाही तो.
विकि वरची माहिती.. अजुन पण बर्याच ठिकाणी हे ऐकले होते.:
In 1508, Portuguese writer Gaspar Correia used the name Bombaim, in his Lendas da Índia ("Legends of India").[23][24] This name possibly originated as the Old Portuguese phrase bom baim, meaning "good little bay",[25] and Bombaim is still commonly used in Portuguese
इंग्लिशला इंग्रजी हा
इंग्लिशला इंग्रजी हा प्रतिशब्द आहे, ती वाट लावणे नव्हे.मास्टरचे मास्तर करणे ही वाट लावणे आहे.
खेड्यातल्यांनी लावलेली वाट आणि एखाद्या भाषेत 'प्रमाण' म्हणून मान्यता पावलेला शब्द यातला फरक समजून घ्या..स्वच्छ मराठीत बोलणारे वॉशरच म्हणतात वायसर नाही.त्यामुळे इंग्लिश विशेषणामाचे उच्चार आपण योग्य केले पाहिजेत असे मला वाटते.
वॉशर- वायसर >> हे माहीतच
वॉशर- वायसर >> हे माहीतच नव्हते. आम्ही आपले वायसरच म्हणतो :P:
(No subject)
उच्चार कसा करावा? प्रख्यात
उच्चार कसा करावा?
प्रख्यात वाल्टर क्राँकाईट ला फेब्रूआरि चा उच्चार बरोबर करता येत नाही, मला माहित असलेले दोन अमेरिकन प्रेसिडेंट न्युक्लिअर चा उच्चार नुकिलर असा करत तिथे उच्चाराचे काय घेऊन बसलात?
त्यातला एक, कार्टर, स्वतः न्युक्लियर इंजिनियर आहे, पण तो नुकिलर म्हणत असे!
आणि खुद्द इंग्लंडमधे निरनिराळ्या शब्दांचा उच्चार काय होतो हे पाहिले आहे का?
मुळात इंग्रजी भाषेशिवाय, निदान त्यातल्या असंख्य शब्दांशिवाय आपले काहीहि चालत नाही, तर उगाच इंग्रजी शब्दांच्या उच्चाराचे काय घेऊन बसलात?
खुद्द आपली मातृभाषा मराठी, त्यातल्या शब्दांच्या उच्चाराबद्दल सगळ्यांचे मत एक आहे का?
परंतु हिंदिवाले सगळ्याचीच वाट
परंतु हिंदिवाले सगळ्याचीच वाट लावतात, रशियाचा रूस ,अमेरिकेचा अमरिका, बँकेचा बैंक.
मराठीत अशी वाट लावायची पद्धत नाही >>
आं ? बर्याच देशांची नावं भाषेगणिक बदलतात. जर्मनीला स्पॅनिश मधे आलेमान म्हणतात, अन स्पेनला एस्पान्या, मेक्सिको चा उच्चार स्पॅनिश मधे मेहिको होतो, ते लोक स्वतःला मेहिकानो / मेहिकाना म्हणवतात. जर्मन भाषेत जर्मनीला डॉयशलंड म्हटले जाते.
मराठीत आपण जपानी / चिनी भाषा / लोक म्हणतो. इंग्रजीत जॅपनीझ, चायनीझ म्हणतात.
मग उद्या इंग्रजी भाषिकाने मराठीत सगळ्याचीच वाट लावतात म्हटले तर ?
तसेही 'कि' , 'आणखि' ,
तसेही 'कि' , 'आणखि' , 'चूकीचे' असले शब्द लिहिलेच आहेत की तुम्ही. कशाला त्या इन्ग्रजी जानेवारी की जान्युअरी ची चिंता करता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मेधा +१
मेधा +१
स नडे, म नडे. च्यूस डे सगळी
स नडे, म नडे. च्यूस डे![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
सगळी रसो मंबु गुशुश म्हणूच का आता?
पटेटो.. पोटेटो.. पोटाटो..
पटेटो.. पोटेटो.. पोटाटो.. पोट्याटो.. पोह्ठाठो..!
ऑक्टोंबर हा चुकीचा उच्चार
ऑक्टोंबर हा चुकीचा उच्चार बहुतांश लोक करतात.
मराठीतही 'बंग' ऐवजी 'वंग' वगैरे भंपक उच्चार आहेत पण हिंदीच्या तुलनेत कमीच.
इन्ग्रजांनी त्यांच्या
इन्ग्रजांनी त्यांच्या सोयीप्रमाणे परभाषेतले शब्द वाकवले आहेत.
जगरनॉट : जगन्नाथ
शाम्पू : चम्पी/चम्पो
ग्यान्जेस : गंगा
जुम्ना : यमुना/जमुना
कॉवेरी: कावेरी
कॉनपोर : कानपूर
बॅम्बू : बांबू
बंगलो : बंगला
टीपॉय : तिपाई
डॅकॉईट : डकैत
शॉल : शाल
टॉडी : ताडी
इत्यादि
मग आपण इंग्रजीला आपल्या सोयीप्रमाणे का वळवू नये? प्ल्याटफॉर्मला फलाट, वॉशरला वायसर, क्लिनरला किन्नर, ड्रायव्हरला डायवर. हिंदीत स्कूलला इस्कूल (स्पॅनिशमधे एस्कुएला म्हणतातच) वगैरे.
मला असे वाटते की भारतीयांच्या गुलामी वृत्तीमुळे असल्या भारतीयीकरणाला नाक मुरडले जाते. साहेबाची इंग्रजी कशी शुध्द सोवळ्यातली पाहिजे! पण इंग्रजाने ते केले तर आपण त्या अपभ्रंशाचे मोठ्या कौतुकाने अनुकरण करतो.
इजिप्तला अरबी भाषेत व अन्य मध्य पूर्वी भाषांत प्राचीन काळापासून मिसर म्हटले जाते. तेच हिंदीतही आहे. पण इंग्रजीत मात्र इजिप्त. तेव्हा माझेही हेच मत आहे की इंग्रजांचे तेच बरोबर आणि बाकीच्यांचे मात्र गांवढळ असे मानणे चूक आहे.
तसेही 'कि' , 'आणखि' ,
तसेही 'कि' , 'आणखि' , 'चूकीचे' असले शब्द लिहिलेच आहेत की तुम्ही. >>>>>>>>>>>मैत्रेयी तुला + १००००
आपली एक शंका उगाचच भांडणे
आपली एक शंका उगाचच भांडणे लावून गम्मत बघणे असा उद्देश वाटतो.
मेधा, तुझा नावे भाषेगणिक
मेधा, तुझा नावे भाषेगणिक बदलतात हा मुद्दा बरोबर आहे (रूस, अमरिका बद्दल). पण हिन्दीचे जरा वेगळे आहे. परकीय भाषांतील शब्द कसे लिहावेत याचे हिन्दी च्या व्याकरणात काही विशिष्ठ नियम आहेत (माझ्या माहितीप्रमाणे मराठीत व इतर बर्याच भाषांत तसे नाही). बँक चे बैंक, सुपरमॅन चे सुपरमैन हे त्यातील व्याकरणाप्रमाणे होते. मराठीत परकीय शब्द बहुधा तसेच्या तसे लिहायची पद्धत आहे. त्यामुळे परकीय भाषेतील शब्द लिहीताना नियमानुसार बदलणारी हिन्दी ही कदाचित एकच भाषा असेल.
बाकी देशांची, व्यक्तींची नावे जवळजवळ प्रत्येक भाषेत वेगळी उच्चारली जातात. त्याबद्दल सहमत आहे. नायगारा/नायाग्रा, रॉकफेलर्/रॉकंफेलर, मियामी/मायामी असे मराठी/अमेरिकन उच्चार ही आणखी काही उदाहरणे. सॅन होजे शब्द वाचणार्या बहुतेकांनी आयुष्यात कधीतरी (आधी कोणाकडून उच्चार ऐकला नसेल तर) नक्कीच सॅन जोस उच्चार केला असेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
@फारएण्ड, हिंदीमध्ये ऐ चा
@फारएण्ड, हिंदीमध्ये ऐ चा उच्चार आपल्यासारखा अई असा होत नाही तर तो अॅ असा होतो. कैसे हा शब्द आपण कइसे असा उच्चारू तर हिंदीभाषक (खडी बोली) तो क्यय्से म्हणजे आपल्या अॅ ला जवळचा असा उच्चारतील. म्हणून हिंदीमध्ये इंग्लिश अॅ साठी ऐ हे अक्षर नेमले गेले आहे. म्हणून खडी बोलीत साधारणतः बँक, स्टँप असेच उच्चार होतात, लेखनात मात्र ऐ वापरतात. अर्थात पुरवैय्या लोकांचे उच्चार वेगळे असतात. ते कैसे चा उच्चारच मुळी कइसे असाच करतात.
@ शेंडेनक्षत्र, मला वाटते की
@ शेंडेनक्षत्र, मला वाटते की ब्रिटिश लोकांनी भारतीय शब्द वाकवले असे नसावे. उलट या शब्दांचे जास्तीत जास्त मुळाबरहुकूम उच्चार त्यांच्याकडून होतील अशी स्पेलिंग्ज़ त्यांनी बनवली. आपण मात्र त्या स्पेलिंग्ज़चा उच्चार आपल्या पद्धतीने करतो. पंडित, पंजाब,जम्ना या नावांमधल्या अ साठी त्यांनी यू हा स्वर वापरला कारण त्याचा उच्चार ते अ असा करतात. म्हणून त्यांचे उच्चार पंडित, पंजाब, जम्ना, पण त्याच स्पेलिंग्ज़चे आपले उच्चार मात्र पुंडित, पुंजाब, जुम्ना वगैरे. यमुनेला उत्तर भारतात जम्ना असेच म्हणतात. कॉनपोरच्या बाबतीतही तेच. जर या शब्दासाठी त्यांनी के ए एन पी यु आर असे स्पेलिंग वापरले असते तर त्यांच्या दॄष्टीने तो उच्चार कॅ(खॅ)न्पर असा झाला असता. शक्यतो कानपुर असा उच्चार त्यांच्याकडून व्हावा म्हणून हे स्पेलिंग. शॉल वगरेच्या बाबतीतही तेच.
शींव (अनुस्वारासकट) या शब्दाचा शक्यतो व्यवस्थित उच्चार व्हावा म्हणून एस आय ओ एन हे लेखन. आपण सायन उच्चारतो ती वेगळी गोष्ट. माण खुर्द च्या स्पेलिंग मध्येही कितीतरी वर्षे डबल एन होता. ण हा उच्चार आहे हे समजावे म्हणून. पुढे आपण तो काढून टाकला.
असे बर्याच शब्दांच्या बाबतीत सांगता येईल. भारतीय भाषा शिकण्यासाठी ब्रिटिशांनी पुष्कळ कष्ट घेतले. कोश तयार केले, टाईप पाडले. ब्राह्मी लिपी उलगडण्याचे श्रेयही एका इंग्रजाकडेच जाते.
हिरा, संपुर्ण पोष्टला
हिरा, संपुर्ण पोष्टला अनुमोदन. अत्यंत अभ्यासपुर्ण.
Pages