Submitted by स्वाकु on 19 February, 2014 - 11:40
शब्द माझे जुळत नव्हते
फार काही सुचत नव्हते
टाळली मी भेट अपुली
पण दुरावे पचत नव्हते
हासलो मी कैक वेळा
हुंदके पण लपत नव्हते
वाहणार्या आसवांना
थांबणे ही जमत नव्हते
हरवला स्वानंद आता
का मनाला कळत नव्हते
-------------------------------
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाहणार्या आसवांना थांबणे ही
वाहणार्या आसवांना
थांबणे ही जमत नव्हते
शुभेच्छा.
मतला छान आहे
मतला छान आहे
मला सगळेच शेर आवडले धन्यवाद व
मला सगळेच शेर आवडले
धन्यवाद व शुभेच्छा
समीरजी,
समीरजी, बेफिजी..वैभवजी....धन्यवाद...
मला खूप छान वाटले....22 आठवडे
मला खूप छान वाटले....22 आठवडे 2 दिवस मनापासून प्रयत्न करत होतो....आज त्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
जयदीप, मनापासून धन्यवाद, तुझ्यामुळेच मी प्रयत्न करणे सोडले नाही....आणि आज खर्या अर्थाने गझल लिहीण्यास सुरुवात झाली असे म्हणता येईल....