नमस्कार मंडळी,
पुढील महिन्यात क्वाला लंपूरला जाण्याचा योग येत आहे. त्यासाठी मला थोडे मार्गदर्शन हवे आहे. मी, माझा नवरा आणि आमचे पिल्लू असे आम्ही तिघेच आहोत. मुलगी पाच वर्षांची असल्यामुळे थोडी काळजी वाटत आहे.
जालावर शोध घेतलं तेव्हा बाटू गुहा, पेट्रोनास टॉवर, लांगकावी, लेगोसिटी, गेंटिंग हायलंड, बर्ड पार्क, जालान अलोरबद्दल या पर्यटन स्थळांबद्दल माहिती मिळाली. तिकडे खाण्या पिण्याची एकंदर रेलचेल आहे असे लक्षात येते. काय खावे ते सगळेच सांगत आहेत पण काय खाउ नये, खाण्याच्या बाबतीत काय काळजी घ्यावी याबद्दल कुठेच उल्लेख नाही.
आमची पहिलीच विदेश वारी आणि मुलगी तशी लहान आहे म्हणुन काहि सुचना असल्यास खूप मदत होइल.
सहा ते सात दिवस मुक्कामाचे ठरत आहे.आर्वजून भेट द्यावीत व आर्वजून टाळावीत अशी ठिकाणे याबद्दल मार्गदर्शन हवे आहे तसेच फसवणुक कशी टाळता येइल, बजेट, हॉटेल, सोयिचे ठिकाण, जेवण(शाकाहारी व मांसाहारी) ह्याबद्दल कुणी माहिती देउ शकेल काय? आपल्या सूचनांच्या प्रतिक्षेत आहे.
*पहिल्यांदाच मायबोलीवर लिहीत आहे त्यामुळे काही चुका झाल्या असल्यास एकडाव माफी असावी