मायबोलीवरील प्रकाशचित्रांबद्दल धोरण

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

गेले काही दिवस जिप्सी यांनी काढलेल्या काही फोटोंबाबत चर्चा सुरू आहे. त्यानिमित्ताने मायबोली प्रशासनातर्फे हे निवेदन.

मायबोलीवर नियमितपणे प्रकाशचित्रं प्रकाशित होत असतात. या प्रकाशचित्रांमध्ये अनेक फोटो हे सार्वजनिक ठिकाणी काढलेले असतात. जोपर्यंत हे फोटो कुठल्याही कायद्याचा भंग करत नाहीत, तोपर्यंत असे फोटो मायबोलीवर प्रकाशित करण्याला मायबोली प्रशासनाची हरकत नाही. मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे फोटोंचा गैरवापरही खूप वाढला आहे. असा गैरवापर जगभरात अनेक प्रकारे होत असतो. त्याला देशाचं, प्रांताचं बंधन नाही. म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.

हे बंधन फक्त लहान मुलांच्या फोटोंबाबतच नव्हे, तर इतर वेळीही पाळलं जावी, अशी अपेक्षा आहे. सर्व कायदे पाळून, इतरांच्या प्रायव्हसीचा, भावनांचा विचार करूनच मायबोलीवर लिखाण केलं जावं किंवा प्रकाशचित्रं प्रकाशित केली जावीत, अशी मायबोली प्रशासनाची भूमिका आहे.

मायबोलीवर प्रकाशित केलेल्या लेखनाचे, प्रतिसादांचे, प्रकाशचित्रांचे सर्व हक्क लेखकाकडे आणि फोटोग्राफरकडे असतात. या हक्कांबरोबरच त्या त्या देशातले कायदे पाळण्याच्या जबाबदारीची जाणीवही प्रत्येक सदस्याने ठेवायला हवी.

मात्र मायबोली हे एक सार्वजनिक व्यासपीठ आहे. मायबोलीचे सभासद इथे मुक्तपणे लिहू शकतात, प्रकाशचित्रं प्रकाशित करू शकतात. त्यामुळे फोटो प्रकाशित करण्याआधी फोटोग्राफरने पालकांची किंवा फोटोतल्या व्यक्तीची परवानगी घेतली आहे किंवा नाही, याची खातरजमा करणं मायबोली प्रशासनाला शक्य नाही. इतकंच नव्हे तर विविध देशात याबद्दलच्या कायद्यांमध्ये भिन्नता असल्यामुळे सरसकट एकच नियम करणेही शक्य नाही. अशा परिस्थितीत जर मुलांच्या पालकांनी किंवा फोटोतील व्यक्तीने किंवा कायद्याशी संबंधित विभागांनी / अधिकार्‍यांनी फोटोंवर आक्षेप घेतल्यास मायबोली प्रशासन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करेल.

विषय: 
प्रकार: 

यासंदर्भात जिप्सीच्या धाग्यावर झालेली चर्चा:
मृण्मयी | 3 February, 2014 - 15:39

जिप्सी यांची फोटोग्राफी आणि छायाचित्रांचे विषय वादातीत उत्तम असतात. पण जेव्हा लहान मुलांची छायाचित्रं इथे टाकल्या जातात, तेव्हा काही गोष्टी प्रकर्षानं खटकतात.

'प्रचि सौजन्यः जिवेश म्हात्रे' म्हणजे नेमकं काय ते स्पष्ट झालेलं नाही.

वरच्या छायाचित्रातल्या किती मुलांच्या आई-वडलांना, पालकांना, त्यांच्या मुलांचे, पाल्यांचे फोटो काढल्या गेलेत, ते मायबोलीत प्रसिध्द झालेत याबद्दल माहिती आहे? नुस्तं माहितीच असणं नाही तर संस्थळांवर फोटो प्रसिध्द झाल्यानंतर त्यांचं काय होऊ शकतं याबद्दल माहिती आहे? किती जणांना याची कल्पना देऊन त्यांच्याकडून मुलांचे फोटो घेण्याची रितसर परवानगी घेतल्या गेली आहे?

स्ट्रीट फोटोग्राफीमधे लहान मुलंही येऊ शकतात, त्याला इलाज नाही, असा प्रतिवाद कधीकधी केल्या जातो. पण इथे काही फोटो स्ट्रीट फोटोग्राफी नसून, मुलांना समोर उभं करून काढून घेतले आहेत.

मायबोलीला भेट देणारे, हे फोटो बघणारे, त्याचा दुरुपयोग करूच शकणार नाहीत असंही नाही. उघड आणि छुप्या विकृतांची इंटरनेटावर कमी नाही.

ज्यांना माझं हे म्हणणं अतिरेकी वाटतं त्यांना एकच प्रश्न विचारेन. तुम्ही स्वतःच्या, अस्तित्त्वात असलेल्या किंवा भविष्यात होऊ घातलेल्या पाल्यांचे फोटो, तुमच्या परवानगीशिवाय कुठल्याही संस्थळावर प्रसिध्द होऊ द्याल का? तुम्हाला कल्पनाही नसताना त्यांचे फोटो काढलेले तुम्हाला चालतील का?

इतर कुठल्याही विषयाबद्दल काही प्रॉब्लेम वाटत नाही. पण अजाण मुलांचे फोटो टाकताना थोडा विचार व्हावा.

परवानगीशिवाय हे फोटो इथे पोस्ट केल्या गेले असतील तर, त्यांच्याकडून कुठलाही कायदेशीर अडथळा येण्याची शक्यता नाही हे गृहित धरून फोटो टाकल्या जाताहेत असं वाटतं.

रितसर परवानगी घेऊन हे फोटो काढल्या गेले असतील तर मी जिप्सी यांची जाहीर माफी मागेन.

सिंडरेला | 3 February, 2014 - 18:12

मृण +१.

मी पण मागे एकदा हा मुद्दा उपस्थित केला होता. लहान मुलं विशेषतः इंटरनेटवतील धोक्य ची व्यवस्थित माहिती नसलेल्या मुलामुलीचे फोटो टाकू नयेत असं मी पण म्हणेन.

सायो | 3 February, 2014 - 18:15

फोटोग्राफीचे नियम प्रत्येक देशाप्रमाणे बदलत असतील. भारतात काय आहे कल्पना नाही पण मृ म्हणतेय त्यादृष्टीने विचार केला नव्हता. पण ती म्हणतेय ते पटतंय.

>>ज्यांना माझं हे म्हणणं अतिरेकी वाटतं त्यांना एकच प्रश्न विचारेन. तुम्ही स्वतःच्या, अस्तित्त्वात असलेल्या किंवा भविष्यात होऊ घातलेल्या पाल्यांचे फोटो, तुमच्या परवानगीशिवाय कुठल्याही संस्थळावर प्रसिध्द होऊ द्याल का? तुम्हाला कल्पनाही नसताना त्यांचे फोटो काढलेले तुम्हाला चालतील का?>>

नाही चालणार. लहान मुलांचं नाहीच पण आपल्याला आपले फोटो कुणी न विचारता सगळ्यांकरता पब्लिश केलेले कुठे चालतात? गटगचे फोटोही आपण सगळ्यांबरोबर शेअर करत नाहीच.

शाळेतही कन्सेंट विचारतात की मुलांचे वर्गात काढलेले फोटो वेबसाईटवर वगैरे पब्लिश करायला परवानगी आहे का म्हणून.

जिप्सी | 3 February, 2014 - 19:24

मृण्मयी, सर्वप्रथम स्पष्ट प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे, तसा विचारही माझ्या मनात आला नाही रादर हि थीम वादाचा विषय होऊ शकते असंही कधी वाटलं नाही. स्मित जसं मी आधीही माझ्या एका धाग्यात उल्लेख केल्याप्रमाणे भरपूर "प्रतिसाद" मिळतील या गोष्टीसाठी मी कधीही माझे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करत नाही. सदर थीममध्ये मला एक पॉझीटिव्ह गोष्ट दाखवायची होती जी दिनेशदांनी त्यांच्या प्रतिसादात लिहिली आहे:
"खुपदा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात प्रवास करताना, रस्त्यात शाळेला निघालेली मुले मुली दिसतात.
कधी कधी एस्टीतही गर्दी करतात.. हा बदल अगदी अलिकडचा. मला खुप आशादायी वाटतो. ती दृष्ये डोळ्यासमोरून तरळून गेली, हे फोटो बघताना. अगदी गेल्या पिढीपर्यंत शिक्षणाबद्दल, खास करुन मुलींच्या शिक्षणाबद्दल फारच अनास्था होती आपल्याकडे." आणि म्हणुनच "शाळेत जाणार्‍या मुलींचेच" फोटो इथे प्रदर्शित केले. वरीलपैकी काही फोटो काढताना त्यांचे पालक सोबत/समोर होते, त्यांनाही हे फोटो काढुन झाल्यावर दाखवले होते. (अर्थात "फोटो काढुन माबोवर प्रदर्शित करणे याला त्यांची परवानगी आहे" असा अर्थ होत नाही).

जर "मायबोली अ‍ॅडमिन"ला हि थीम/फोटो आक्षेपार्ह वाटत असेल तर त्यांनी हा धागा नक्कीच डिलीट करावे. स्मित, पण बहुतांशी मायबोलीकरांना जर हि थीम आवडली असेल आणि काही लोकांना आवडली नाही (त्यांच्या मतांचा आदर राखुन) तर मी "बहुतांशी" लोकांचाच विचार करेन. नाहीतर मी स्वत:च हा धागा डिलीट केला असता. फिदीफिदी

आणि हो 'प्रचि सौजन्यः जिवेश म्हात्रे' म्हणजे नेमकं काय ते स्पष्ट झालेलं नाही. >>>>>सदर दोन फोटो मायबोलीकर जिवेश म्हात्रे याने काढलेले आहे.

पुढच्या वेळेस तुम्हाला इतका मोठा प्रतिसाद टाईप करण्याची गरज पडणार नाही याची नक्कीच काळजी घेईन आणि नविन थीम घेऊन पुन्हा येईन, जी तुम्हालाही आवडेल अशी आशा करतो. स्मित

मृण्मयी | 4 February, 2014 - 05:44

जिप्सी, सर्वप्रथम, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

>>तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे, तसा विचारही माझ्या मनात आला नाही रादर हि थीम वादाचा विषय होऊ शकते असंही कधी वाटलं नाही. जसं मी आधीही माझ्या एका धाग्यात उल्लेख केल्याप्रमाणे भरपूर "प्रतिसाद" मिळतील या गोष्टीसाठी मी कधीही माझे फोटो मायबोलीवर प्रदर्शित करत नाही. सदर थीममध्ये मला एक पॉझीटिव्ह गोष्ट दाखवायची होती

तुमच्या हेतूबद्दल शंका नाही.

>>वरीलपैकी काही फोटो काढताना त्यांचे पालक सोबत/समोर होते, त्यांनाही हे फोटो काढुन झाल्यावर दाखवले होते. (अर्थात "फोटो काढुन माबोवर प्रदर्शित करणे याला त्यांची परवानगी आहे" असा अर्थ होत नाही).

'काही' फोटो काढताना. म्हणजे सगळ्यांचे पालक उपस्थित नाही. आणि तुम्ही म्हंटल्याप्रमाणे नुस्ते फोटो दाखवणं म्हणजे परवानगी नव्हे. तेव्हा त्यांना गृहीत धरल्या गेलं असं वाटतं.

>>जर "मायबोली अ‍ॅडमिन"ला हि थीम/फोटो आक्षेपार्ह वाटत असेल तर त्यांनी हा धागा नक्कीच डिलीट करावे. , पण बहुतांशी मायबोलीकरांना जर हि थीम आवडली असेल आणि काही लोकांना आवडली नाही (त्यांच्या मतांचा आदर राखुन) तर मी "बहुतांशी" लोकांचाच विचार करेन. नाहीतर मी स्वत:च हा धागा डिलीट केला असता.

पालकांना योग्य कल्पना न देणं, त्यांची परवानगी न घेणं आणि अनेकदा लहान मुलांच्या फोटोंचा दुरुपयोग चाइल्ड पॉर्नोग्राफीमधे केला जातो, हा मुद्दा विचारात न घेतल्याचा खेद आहे. (परवानगी घेऊन फोटो टाकले तरी दुसरा मुद्दा म्यूट ठरत नाही याची जाणीव आहे.) यात मायबोलीकरांना आवडलं की नाही हा मुद्दा अलाहिदा.

या आधी आक्षेप घेतल्या गेला तेव्हाही मायबोली अ‍ॅडमिनटीम बोलल्याचं आठवत नाही. प्रताधिकारांचा मुद्दा सोडून बाकी प्रकरणी त्यांचं धोरण 'कुत्ता जाने चमडा जाने' असल्याचं म्हणायला वाव आहे.

शेवटी, मायबोलीची एक वाचक आणि तुम्ही टाकलेले काही फोटो मनापासून आवडणारी व्यक्ती म्हणून मी फक्त 'मला काय वाटलं' एवढंच इथे नोंदवू शकते.

जिप्सी | 4 February, 2014 - 06:23

आणि तुम्ही म्हंटल्याप्रमाणे नुस्ते फोटो दाखवणं म्हणजे परवानगी नव्हे. तेव्हा त्यांना गृहीत धरल्या गेलं असं वाटतं.>>>>>अहो, मी वर लिहिलंय ना "(अर्थात "फोटो काढुन माबोवर प्रदर्शित करणे याला त्यांची परवानगी आहे" असा अर्थ होत नाही). इथं मी कुठेही त्यांना गृहित धरलंय असं लिहिलंय नाही."

शेवटी, मायबोलीची एक वाचक आणि तुम्ही टाकलेले काही फोटो मनापासून आवडणारी व्यक्ती म्हणून मी फक्त 'मला काय वाटलं' एवढंच इथे नोंदवू शकते.>>>>>तुमच्या मतांचा आदरच आहे. यापूर्वीही तुम्ही जे फोटो/थीम तुम्हाला आवडले त्यावर पॉझीटिव्ह प्रतिसादही दिला आहे.

मला फक्त एकच सांगायचे होते जर इतर लोकांना हि थीम, हे फोटो आवडत असेल तर मी तरी हा धागा डिलीट करणार नाही (आणि त्यासाठीच, अ‍ॅडमिनला जर हे आक्षेपार्ह वाटत असेल तर त्यांनी डिलीट करावे असे वर लिहिले आहे.)

असो, मला हा विषय वाढवायचा नाही म्हणुन या विषयावरची हि माझी शेवटची पोस्ट.

मृण्मयी | 4 February, 2014 - 06:28

मला काय म्हणायचंय ते तुमच्यापर्यंत पोचलंय असं वाटत नाही. तेव्हा या विषयावर या पुढे माझ्या लिहिण्याला काही अर्थ नाही. असो.

स्वाती | 4 February, 2014 - 06:30

जिप्सी, थीम खरच सुरेख आहे आणि फोटोजसुद्धा. तरीपण लहान मुलेच काय कोणाचेही क्लोजप्स टाकताना परवानगी आवश्यक आहे. ही काळजी लहान मुलांच्याबाबतीत तर जास्तच घ्यावी. तुमचे इंटेंशन खूप चांगले आहे पण बघणार्‍या लोकांचे ते तसेच असू शकते हे आपण सांगू नाही शकत.
फोटोग्राफर म्हणून एक जबाबदारी येते की शक्य तितके आपल्यामुळे दुसर्‍यांचे फोटो चुकीच्या वापरासाठी (याची क्वचित शक्यता असली तरी) हाती लागू नयेत. जर असे झाले तर नुकसान भरपूर मोठे आहे.

पराग | 4 February, 2014 - 06:37

आधी ह्या दृष्टीने विचार केला नव्हता. पण अतिरेकी वाटणारा प्रश्न वाचल्यावर मात्र मृण्मयीची पोस्ट पटली!
फोटो आणि थीम वरती आवडल्याचं लिहिलं आहेच.. कुठल्याही फोटोचा इंटरनेटवर दुरुपयोग न होओ !

प्राजक्ता | 4 February, 2014 - 06:38

म्रुण्मयीशी सहमत!
आणी जिप्सी तुमच्या सगळ्याच थिम अतिसुन्दर असतात हेही तितकच खरय्...हि थिम सुद्धा त्याला अपवाद नाही..

स्वाती_आंबोळे | 4 February, 2014 - 08:50

मृण्मयीशी सहमत आहे. यात आवडीनावडीचा प्रश्न नाहीये, जिप्सी. आणि अर्थातच तुमच्या हेतूबद्दल शंकाही नाही. अनेकदा आपल्याला एखाद्या बाबीची सर्वांगाने कल्पना नसते. ती करून घ्यायला काहीच हरकत नसावी.
बहुतांश मायबोलीकरांना काय आवडतं हा निराळा मुद्दा आहे आणि नेटीझनशिपचे नियम / संकेत हा निराळा.
मायबोली प्रताधिकारासारखे मुद्दे फार गंभीरपणे घेते हे पाहिलेलं आहे, तेव्हा अशा प्रकाशचित्रांबाबत मायबोलीचं काय धोरण आहे हे समजून घ्यायला आवडेल.

सीमा | 4 February, 2014 - 08:28

जिप्सी, खरचं सुरेख फोटो आहेत. जबरी थीम आहे.
पण मृण्मयी काय म्हणत आहे ते खरोखरच पोहोचलं नाहीये अस वाटतय. हेतु बद्दल किंवा लोकांना आवडणे / न आवडणे याबद्दल ती काही म्हणत नाहीये. यात धोका काय आहे ते ती स्पष्ट करत आहे.

फारएण्ड | 4 February, 2014 - 09:01

लहान मुलांचे फोटो त्यांच्या पालकांची स्पेसिफिक परवानगी घेतल्याशिवाय असे टाकू नयेत असे माझेही मत आहे.

मवा | 4 February, 2014 - 09:06

नुसत्या परवानगीचाही उपयोग नाही असं मला वाटतं, कारण ज्या लोकांचे हे फोटो काढले जातात, त्यांना जरी विचारले की हे इंटरनेटवर टाकू का, तरी त्यांना नक्की समजेल का की इंटरनेट वर टाकणे म्हणजे नक्की काय ? लाखो लोक ते बघतील व न जाणो त्याचा काही (गैर) वापर होईल, हे कळणे त्यांच्या आवक्यातले आहे का ?

साधना | 4 February, 2014 - 09:13

मायबोली प्रायोजित प्रिमियर्स ना कलाकार आणि मायबोलीकर दोघांचेही फोटो असतात. त्यांनाही तितकाच धोका आहे जितका लहान मुलाना आहे। तिथेही कोणी परवानगी विचारत नाही फोटो टाकू का म्हणून. मायबोली प्रशासनाने हे फोटो आजवर कसे आणि का चालव७ न घेतले?

आणि त्यानी दुर्लक्ष केले असले तरी माय्बोलिकरान्नी का नाही ही बाब तेव्हाच लक्षात आणून दिली?

जिप्सी | 4 February, 2014 - 09:22

एक्झॅक्ट्ली साधना. अगदी हेच माझ्या मनात होतं लिहायच (पण वरती हेमाशेपो लिहिल्याने नव्हते लिहिले).

या धाग्यावर वरील सर्वांनीच मी काढलेल्या क्लोजअप्सचे कौतुक केले आहे.
http://www.maayboli.com/node/46688

आता इथे "मायबोलीचा प्रतिनिधी" इ. मुद्दे येतीलच.

मी म्हणत नाही कि त्यांचे मुद्दे चुकीचे आहेत्/पटत नाही. पण अशा विरूद्ध कमेंटस वाचुन जरा गोंधळात पडलोय.

कुठल्याही फोटोचा इंटरनेटवर दुरुपयोग न होओ !>>>>परागचे हे वाक्य मनोमन पटतंय.

सायो | 4 February, 2014 - 09:18

कलाकारांची गोष्ट वेगळी आहे असं नाही वाटत साधना? ह्यातून मिळणार्‍या प्रसिद्धीतून त्यांना काम मिळत असतं आणि तोच त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग आहे. ज्या मायबोलीकरांना आपले फोटो चारचौघांना दिसलेले आवडत नसतील ते सांगतात की नाही हे त्यांनाच माहित.. पण इथे दिसत असून जर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं नसेल तर तो त्यांचा प्रश्न नाही का? (मागच्या पोस्टमध्ये गटगनंतर फोटो टाकायचे, नाहीत हा मुद्दा मांडला होता)

सिंडरेला | 4 February, 2014 - 09:27

साधना, सज्ञान मायबोलीकर किंवा चित्रपट कलाकार आणि इंटरनेटची जरासुद्धा माहिती नसलेली लहान मुलं यांच्यात फार मोठा फरक आहे.

माध्यम_प्रायोजक | 4 February, 2014 - 09:26

साधना,

प्रीमियरचे फोटो काढताना कलाकारांना अगोदर कल्पना दिलेली असते. किंबहुना जिप्सी, हर्पेन इत्यादी फोटो काढतील, असं नावासकट सांगितलेलं असतं. शिवाय ज्या मायबोलीकरांना त्यांचे फोटो मायबोलीवर यायला नको असतील, त्यांचे फोटो टाकले जात नाहीत. सर्व फोटो परवानगी घेऊन काढले आणि अपलोड केले जातात.

साधना | 4 February, 2014 - 09:33

वर ज्या धोक्याचा उल्लेख वारंवार केला गेला तो सगळ्या नाच आहे। कलाकारांना जास्त कारण त्यांचे चेहरे प्रसिद्ध आहेत

.प्रीमियर च्या फोटोताल्या माबोकरानी नापसंतिव्यक्त केलेली मी पाहिली नाही आणि कोणी त्यांच्या लक्षातही ही बाब कधी आणून दिलेली पाहिली नाही. म्हनू ण लिहिले

मवा | 4 February, 2014 - 09:35

धोका माहित असताना तरिही ते फोटो इथे टाकायला परवानगी दिली की ती परवानगी देणार्‍याची जबाबदारी असते, पण ज्यांना काहीच माहीत नाही अश्यांचे फोटो इथे टाकताना जबाबदारी टाकणार्‍याची होते, हे चुकीचं वाटतंय का ?

सिंडरेला | 4 February, 2014 - 09:37

साधना, तुला प्रसिद्ध कलाकारांची निरागस लहान मुलांपेक्षा जास्त काळजी वाटतेय का? खरंच?

प्राजक्ता | 4 February, 2014 - 09:46

कलाकारांना जास्त कारण त्यांचे चेहरे प्रसिद्ध आहेत>> हो असेल आणि तस केलही जात असेल पण,कलाकार त्याविषयी अजाण नाहित हा फार महत्वाचा मुद्दा आहे..
(म्रु ने माडंलेला मुद्दाच कुणाच्या लक्षात येत नाही आहे अस मला का वाटतय!)

साधना | 4 February, 2014 - 09:51

नाही मला कलाकारांची काळजी वाटत नाहीय. मुलांची काळजी नक्कीच वाटेल मात्र.

पण वरचे वाचुन जो विचार मनात आला तो लिहिला.. पालकाना इंटरनेट माहिती नसेल असे नक्कीच नाही. भारतात खेडोपाडी आता मोबाईल झालेत आणि डेटा प्लॅन्स डाळतांदळापेक्षा स्वस्त आहेत. त्या मुळे फेसबुक सगळ्यांम्ना माहित असते. कोणी फोटो काढु लागला की हल्ली लोक पैसे मागतात. कारण इंटरनेटवर हे फोटो प्रसिद्ध केले जातात हे लोकांना माहित असते.

पण म्हनुन इंतरनेटवरच्या धोक्यांची माहिती त्यांना पुर्णपणे असेलच असे मात्र नाही.

पण तरीही वर जो मुद्दा मांडला जातोय तो खुपच खेचला जातोय असे मला वाटते. आजवर माबोवर जे काही फोटो प्रसिद्ध झालेत त्यात सर्व प्रकाराचे फोटो आहेत. माणसांचे फोटोही त्यात आहेत. प्रत्येकाच्या फेसबुकात त्याचे, फॅमिलीचे फोटो आहेत. कितीही प्रायवसी केली तरी ते फोटो ज्याला मिळवायची इच्छा आहे तो सहज मिळवु शकतो. अशी परिस्थिती असताना एका चांगल्या थिमवर अशी चर्चा व्हाही या चे आश्व्हर्य वाटले.

वेगळा धागा काढुन ही चर्चा केलेली बरी . म्हणजे सगळ्या ना विषय कळेल आणि काय काळजी घ्यावी हेही कळेल.

सायो | 4 February, 2014 - 09:51

>>वर ज्या धोक्याचा उल्लेख वारंवार केला गेला तो सगळ्या नाच आहे। कलाकारांना जास्त कारण त्यांचे चेहरे प्रसिद्ध आहेत>> हो, बरोबर. पण ती जबाबदारी त्यांची स्वतःचीच नाही का? काही सेलेब्ज तर उलट पैसे देऊन ह्या ना त्या रुपात बातम्यांत, लोकांच्या नजरेत रहावं म्हणून प्रयत्न करतात.

मृण्मयीचा आक्षेप कळू नये (किंवा कळून वळू नये) ही बाब चिंतेची आणि खेदाची आहे.

प्राजक्ता | 4 February, 2014 - 09:52

प्रसिद्ध कलाकार किंवा मायबोलीकर यांचे फोटो मायबोलिवर येणे यात ते मायबोलिकर समजदार असणे आणि नेटवर फोटो येणे याची जाणिव असणारे आहेत..
जिप्सी ने काढलेले फोटो अतिशय निर्मळ हेतुने काढलेले आहेत यात शंकाच नाही आणि त्यावर कुणाच इथे दुमत नाही..
क्रुपया गैरसमज नसावा..

स्वाती_आंबोळे | 4 February, 2014 - 10:01

>> अशी परिस्थिती असताना एका चांगल्या थिमवर अशी चर्चा व्हाही या चे आश्व्हर्य वाटले.
साधना, 'आत्ताच का', 'या थीम/आयडीच्याच बाबतीत का' अशा प्रश्नांना फारसा अर्थ नाही. आपण सगळेच नेटीझनशिपचे नियम/संकेत आपापल्या परीने आणि गतीने शिकतो आहोत. कुठल्या का निमित्ताने असे ना, ही चर्चा झालेली आणि त्यातून सर्वांनीच शिकलेलं चांगलंच आहे की.

सशल | 5 February, 2014 - 07:46

छान थीम आणि फोटो .. स्मित

मृ चा कन्सर्न योग्य आहे .. मागे कोणाशीतरी बोलल्यावर असं समजलं होतं .. जिथे परवानगी घेणं "शक्य नाही" तिथे घेतली नाही तरी चालतं (कारण परवानगी घेणं फीजिबल नसतं ) .. ह्या बाबतीत जिथे लहान मुलांचे इन्टेशनली फोटो घेतले आहेत त्यांचे पॅरेन्ट्स/गार्डियन्स् ह्यांनां जर "परवानगी देणं" (म्हणजे संभाव्य रिस्क/बेनिफीट ची कल्पना/ज्ञान नसणं) म्हणजे काय हेच माहित नसेल तर इथेही तोच मुद्दा लागू होतो का असा प्रश्न पडत आहे ..

वेका | 4 February, 2014 - 10:52

जिप्सी फोटो आणि थीम दोन्ही छान आहेत. तुझी या विषयाबद्दलची कळकळ तू चित्रात मांडू शकतोस हे लक्षात येतं.

पण एक लक्षात घ्यायला हवं कुणीतरी एक असा असू शकतो की जो या निरागस फोटोमधून काही विकृतपणे प्रेझेंट करू शकतो. अशावेळी तेमाझ्या सहज उपलब्ध असलेल्या फोटोमुळे झाल हे मला आवडेल का? काहीवेळा अशा चर्चांमुळे आपल्याला लक्षात न आलेला एक मुद्दा कळला आणि पुढच्या वेळी त्याचा विचार होईल वगैरे असं मधलं काही फोटोग्राफर्सना वाटू शकेल का? फोटो कुणी कसेही मिळवू शकेल आणि त्याचं काय वाट्टेल ते करेल म्हणून माझे फोटो मी तशा प्रकारे उपलब्ध करावे का हा वैयक्तिक तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करायचं ठरवता यावरही असतं. प्रत्येक फोटो आणि प्रत्येक फोटोग्राफरला कोण सांगायला जाणार? शेवटी नवीन काही कळलं तर तुम्ही कसं घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे..(जिप्सी हे तुझ्यासाठीच असं नाही जेनेरिक म्हणावंसं वाटतं)

ही चर्चा कुठच्या तरी थीमच्या निमित्ताने का होईना होते आहे हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या माहितीत निदान तीन-चार तरी असे फोटॉग्राफर्स आहेत ज्यांनी स्वत्।च्या मुलांच्या फक्त पावलांचे फोटो टाकले आहेत आणि इतरवेळी सणांचे किंवा इतर गावी फिरायला जाताना तिकडच्या मुलांचे क्लोजअप्स वगिअरे आरामात टाकतात...अशा लोकांना सांगायला जायला पण आवडत नाही (ते ऐकणार का हा वेगळा मुद्दा)

जिप्सी तुझ्यासाठी सांगायचं तर तुझ्या थीमचं कौतुक होताना हा मुद्दा आला याचा अर्थ तुझ्याकडून असणार्^या अपेक्षा हेही असेल नं? Take it positive and take this as a learning. स्मित

सिंडरेला | 4 February, 2014 - 11:18

साधना, मी तरी हा मुद्दा याआधी दुसर्‍या एका आयडीच्या धाग्यासंदर्भात उपस्थित केला आहे. तुझ्या पोस्टींमधून इथे लिहिणार्‍यांना जिप्सीविषयी आकस असल्याचा अर्थ निघतोय. आम्ही सर्वांनीच वेळोवेळी त्याने काढलेल्या फोटोंना प्रतिसाद दिले आहेत हे त्याने स्वतःच लिहिले आहे. त्यामुळे 'आत्ताच का', 'या आयडीच्याच बाबतीत का' या प्रश्नांना काही अर्थ नाही, इथे ते विचारण्याचं प्रयोजन पण नाही.

राजू७६ | 4 February, 2014 - 12:19

मला तरी यामध्ये काहीही चुकीचे वाटत नाही... कारण यामध्ये अजून कोणतीही(IDENTITY) माहिती दिलेली नाही जी या मुलींच्या सुरक्षितेला धोका पोहोचू शकतो..

जर जिप्सीने मुलीचे नाव/ गाव लिहिले असते तर ते चुकीचे ठरले असते..

जेव्हा शाळेत विचारले जाते तेव्हा शाळा ते फोटो त्याचा वेबसाईटवर/ पुस्तिकेमध्ये टाकत असतात, तिथे IDENTITYमुळे त्या मुलांच्या सुरक्षितेला धोका पोहोचू शकतो कारण ती वेबसाईट/ पुस्तिका त्या मुलांच्या एरियात दिल्या जातात...

सायो | 4 February, 2014 - 13:41

सशल, तुझा जो मुद्दा आहे तो फोटो १६ आणि १८ मधले वरचे दोन फोटो याला लागू होईल असं वाटतंय. किंवा जिप्सीचेच प्रजासत्ताक दिनाचे फोटो जे (माझ्यामते ) स्ट्रीट फोटोग्राफी म्हणता येतील आणि प्रत्येकाची परवानगी घेणं शक्य नाही.

राया | 4 February, 2014 - 16:08

मलाहि नाहि पटत. का कुणास ठावुक हि मुले केविलवाणि वाटतात. कुणि परका माणुस फोटो काढतो, आईवडिल परवानगि देतात, कदाचित हरखुन , कदाचित अज्ञानाने. गावात अजुनहि नेटचि माहिति, प्रसार पुरेसा नाहि. असे असताना त्या मुलांचे फोटो वापरणे चुकच आहे. माझ्या मुलाचा फोटो मि वापरु देणार नाहि, कुणा परक्या माणसाला फोटो काढुहि देणार नाहि. गावातल्या मुलांना, त्यांच्या पालकांना फोटोचा वापर समजावुन मगच फोटओ काढले जावेत.

साधना | 4 February, 2014 - 20:04

धोका माहित असतानाही परवानगी दिली म्हणुन धोका टळतो का? धोका तर आहेच. मुलांना आहे तसा मोठ्यांना आहे आणी कलाकरांनाही आहेच.

इथेच जिप्सीने टाकलेला काजोलचा फोटो जर विकृत स्वरुपात माझ्यास्मोर आला तर मला तेवढेच वाईट वाटेल. ती कलाकार आहे त्यामुळे बघुन घेईल काय ते हा विचार मी तरी करणार नाही. वर कलाकारांची मला काळजी वाटत नाही असे जरी लिहिले तरी मला त्यांचीही काळजी वाटेल हे सत्य आहे.

हा धोका माहित असुनही ;लोक आज इंटरनेटावर स्वतःचे मुलांचे स्वतः च्या घरादारचे फोटो टाकत अस्तात. जरी स्वतःच्य फ्रेंडसर्कलपर्यंतच हे फोटो लिमिट केले तरी ते एकदा टॅग झाले की ते कुठल्या कुठे जाऊ शकतात.

असे असुनही लोक करतात कारण मग दोनच ऑप्शन्स राहतात. ह्या सर्व नव्या गोस्टींकडे पाठ फिरवुन बसा नाहीतर या धोक्यासोबत जगायला शिका. बहुतेक लोक दुसरा ऑप्शन निवडताहेत असेच इंटरनेटावरची फोटोंची गर्दी पाहुन वाटते. माबो प्रोफाईलवर टाकलेला फोटोही चोरीला जाऊ शकतो जरी तो मी माझ्या मर्जीने टाकला तरीही. मग काय फोटो टाकायचाच नाही? आजच्या जगात घरात आणि घराबाहेर भरपुर धोके पसरलेत. म्हणुन कोणी जगायचेच नाकारत नाहीय.

आणि ही परवानगी घ्यायची तरी कशी? मी फोटो काढतोय असे तोंडी सांगितलेले चालते की लिखित घ्याय्ची आणि प्रत्येक फोटोसोबत ती प्रसिद्ध कराय्ची? कारण आज तोंडी परवानगी देणारा उद्या कशावरुन शब्द फिरवणार नाही ? असे तर मग इथे कोणी फोटो टाकायलाच नको. कारण फोटोग्राफर हाही एक कलाकार आहे आणि कलाकाराला तु फक्त ह्याच विषयावर कला सादर कर, हे अमुक विषय वर्ज्य हे आपण कसे सुचवणार?

ह्या धाग्यावर झालेली ही चर्चा मला आवडली नाही असे मी लिहिलेय कारण हा धागा मला खुप पॉसिटीव वाटला. मी सुरवातीला दिलेली एक कमेंट नंतर काढली कारण मला ती एकुण मुडशी सुसंगत वाटली नाही.

याचा अर्थ ह्या धाग्यावर सगऴ्यांनी फक्त गुलाबजामाच्या पाकातल्याच कमेंट टाकायला हव्यात असे नाही हे कृपया लक्शात घ्या. मी मला जे वाटते ते लिहायला स्वतंत्र आहे आणि इतरजणही तसेच स्वतंत्र आहेत.

जिस्प्यावर इतरांचा आकस दिसतोय वगैरे काही नाही. परवानगीबद्दल लिहिणा-यांनीही फोटोंचे कौतुकच केलेय. मी त्याला पर्सनलीही ओळखत असल्याने त्याचे एकुण व्यक्तिमत्व पाहता त्याच्याबद्दल कोणी मनात कसलाही आकस बाळगेल असे मला तरी अजिबात वाटत नाही.

एकुण मला या चर्चेतुन हे सार मिळाले की प्रतिक्रिया देताना देणा-याच्या पुर्वानुभावाचे प्रतिबिंब त्याने दिलेल्या प्रतिक्रियेत पडते

इथे कोणाला फोटोंमध्ये आशावाद दिसला तर कोणाला मुले अगदी केविलवाणी वाटली तर कोणाला इंटरनेटवरच्या धोकयाची आठवण झाली. माझी सुरवातीची प्रतिक्रिया निगेटिव होती.

याउप्पर या विषयावर माझ्याकडुन अजुन काही लिहिले जाईल असे मला वाटत नाही.

जिप्सी | 4 February, 2014 - 20:14

चिन्मय सॉरी, या धाग्यावर प्रतिसाद देणार नव्हतो, पण...काल टि पार्टी पार्ले या धाग्यावरचा "मवा" यांचा हा प्रतिसाद वाचला आणि रहावलं नाही.
(मलाही स्क्रीनशॉट घेणं इ. गोष्टी आवडत नाही/कधी गरज पडली नाही, पण काल कुणीतरी सांगितल्याप्रमाणे या धाग्यावर पाहिले असता हा प्रतिसाद दिसला)

"मवा | 4 February, 2014 - 11:52 नवीन
क्लिक क्लिक करताना आपण जे करतोय त्याचा थोडा तरी विचार करावा असं अजिबात एकदाही वाटत नसेल ?
त्या वेळेपासून खरं सांगते त्यांच्या कुठल्याच बाफवर प्रतिक्रिया द्यायची इच्छा होत नाही. एखाद्या ठिकाणी दिली असेल अगदीच आवडलं तर, पण हे जे असे बिनधास्त लोकांच्या चेहेर्‍याचा, त्यांच्या परिस्थितीचा फोटोसाठी वापर करणं चालू असतं त्याची मनस्वी चीड येते.

इथे मवा यांना मी नम्रपणे नमूद करू इच्छितो कि कुठल्याही फायद्यासाठी, कुणाच्या परिस्थितीचा फोटोसाठी वापर मी करत नाही. मायबोलीवर फोटो प्रदर्शित केल्याने मला कुठलाही आर्थिक/वैयक्तिक फायदा होत नाही. लोकांच्या वाहवा मिळवण्यासाठीही मी इथे फोटो प्रदर्शित करत नाही. फोटोग्राफी माझा छंद आहे, व्यवसाय नाही.

तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे, लोकांच्या परिस्थितीचा मी फोटोसाठी/वैयक्तिक फायद्यासाठी वापर करतो हे सिद्ध करा, मी पुन्हा कधीही मायबोलीवर फिरकणार नाही याची खात्री देतो.

मला माहिती आहे (रादर खात्रीच आहे) कि वरील बहुतेक जणांना माझ्या हेतुबद्दल शंका नाही पण "मवा" यांच्या वरच्या पोस्टने खरंच दुखावला गेलोय. अरेरे

वेका, तुमचा प्रतिसाद आवडला आणि पटलाही. स्मित

मवा | 4 February, 2014 - 20:28

माझ्या पोस्टमध्ये (तुम्हीच पेस्ट केलेल्या) फायदा हा शब्द कुठे दिसला सांगाल का प्लीज ?

जिप्सी | 4 February, 2014 - 20:29

त्यांच्या परिस्थितीचा फोटोसाठी वापर करणं चालू असतं>>>>याचा अर्थ सांगाल का?

मवा | 4 February, 2014 - 20:33

त्यांच्या चेहेर्‍यांचा फोटोचा सब्जेक्ट म्हणून वापर, त्याच्या थीम्स काढून मायबोलीवर प्रसिद्ध करण्यासाठी वापर - हा असा अर्थ आहे माझ्याकडून तरी.

जिप्सी | 4 February, 2014 - 20:43

त्यांच्या चेहेर्‍यांचा फोटोचा सब्जेक्ट म्हणून वापर, त्याच्या थीम्स काढून मायबोलीवर प्रसिद्ध करण्यासाठी वापर>>>>>अशा किती थीम्स असतील माझ्या?
त्या वेळेपासून खरं सांगते त्यांच्या कुठल्याच बाफवर प्रतिक्रिया द्यायची इच्छा होत नाही>>>>फक्त चेहर्‍यांचे फोटो थीम्स नसुन इतरही आहेतच ना? वरील प्रतिसादातुन वैयक्तिक आकसच दिसतो ना?

असो, मलातरी तुमच्याबद्दल (आणि इतर कुणाबद्दलही) कसलाही वैयक्तिक आकस नाही किंवा. जसे पॉझीटिव्ह कमेंटस मी स्विकारतो तसंच निगेटिव्ह कमेंटसही. पण कुणीही माझ्या हेतुबद्दल शंका घेतलेली मला आवडणार नाही.

एक मात्र नक्की यापुढे मायबोलीवर माझे फोटोज/थीम्स टाकताना मला आता विचार करावा लागेल. अरेरे

(हि माझी खरोखरच शेवटची पोस्ट)

मवा | 4 February, 2014 - 21:59

वरील प्रतिसादातुन वैयक्तिक आकसच दिसतो ना? >>> माझा तुमच्यावर वैयक्तिक आकस असायचे कुठलेही कारण मला माहित नाही, किंबहुना याआधी आपले कधी कुठल्याही संदर्भात बोलणे झाल्याचेही आठवत नाही, आपले कुणी मित्रमंडळ देखील कॉमन नाही, एवढेच काय तर मी फोटोग्राफर देखील नाही. असे असताना माझा वैयक्तिक आकस कसा वा का असू शकतो याचा उलगडा होत नाही मला.

खरे तर तुमचे इतर फोटो, जुन्या गाण्यांबद्दलच्या पोस्टी, एकूण मायबोलीवरचा हसतखेळत वावर यांमुळे उलट माझे तुमच्याबद्दल चांगलेच मत होते, परंतू अकारणच माझ्यावर वैयक्तिक आकस असल्याचा आरोप पाहून , तसेच माझ्या पोस्टीत दूरान्वयेही संबंध नसलेले 'वैयक्तिक फायदा, व्यवसाय' वगैरे शब्द टाकून पोस्ट केल्याचे पाहून मला अत्यंत सखेद आश्चर्य वाटत आहे.

तुमच्या इतर थीम्स बद्दल मी काहीच बोललेली नाही. केवळ विना परवानगी काढलेल्या फोटोंबद्दलच बोलले आहे.

मवा | 4 February, 2014 - 20:52

पण कुणीही माझ्या हेतुबद्दल शंका घेतलेली मला आवडणार नाही >> तुमच्या हेतुबद्दल शंका घेतली असे प्रूव करा असे म्हणावेसे वाटत होते पण असो. माझ्याबद्दल काहीच कारण नसताना आरोप केलेले मलाही आवडणार नाही हे ही नक्की.

राजू७६ | 4 February, 2014 - 21:04

मला पण हे पटत नाही.. एखाद्या धागाकर्त्याच्या विरुध्द प्रतिक्रिया त्याच धागावर देण्याऐवजी दुसर्या बाफावर देऊन काय मिळतं बुवा?

वत्सला | 4 February, 2014 - 21:37

जिप्सी, फोटो आणि थीम नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट!

मी जेव्हां हा धागा बघितला तेव्हा (कुठेलेही प्रतिसाद वाचण्यापूर्वी) माझ्या मनातही मुलांचे फोटो काढण्याबद्दलचा कन्सर्न आलाच! एक नेटिझन म्हणून आणि दोन अपत्यांची आई म्हणून असेल पण मला असे फोटो बघुन अस्वस्थ होतं. यात तुझ्या हेतुबद्दल अजिबात शंका नाही! वर साधनाने म्हटलय की हल्ली भारतात इंटरनेट डाळ तांदळापेक्षाही स्वस्त आहे त्यामूळे सगळ्याच पालकांना कल्पना असेल... वरील मुलींच्या चेहर्‍यावरून मला नाही वाटत त्यांच्या पालकांना फोटोंचं काय होऊ शकतं याची कल्पना असेल.चित्रपट तारका आणि मायबोलींकरांचे प्रसिद्ध होणारे फोटो यांची या फोटोंबद्दल तुलना तर केवळ अशक्य!

जिप्सी, तू गैरसमज करुन घेऊ नकोस. तुला एकट्यालाच असं नाही पण व्यक्तिंचे फोटो काढणार्‍या सर्वांनाच सांगावेसे वाटते की त्या संबंधित व्यक्तिला/पालकाला पूर्ण कल्पना देऊन असे फोटो काढावेत आणि प्रकाशित करावेत.

रच्याकने, आजच मुलींच्या शाळेत फोटो काढण्यास आणि ते मिडीयात वापरण्यास परवानगी आहे अशा अर्थाचा फॉर्म सही करुन दिला म्हणून हा 'कन्सर्न' प्रकर्षाने जाणवला!

रिया. | 4 February, 2014 - 23:31

एक मात्र नक्की यापुढे मायबोलीवर माझे फोटोज/थीम्स टाकताना मला आता विचार करावा लागेल
>>>
जिप्सी, इथे लिहिणार नव्हते पण तुझा हा निर्णय / विचार अतिशय चुकीचा आहे.
१०-१२ बायका म्हणजे मायबोली नव्हे. कोणाच्या काही म्हणण्याने किंवा इतर बीबींवर केलेल्या कमेंट्सवरुन तू हा निर्णय घेऊच कसा शकतोस?
ही थिम पाहिल्या पाहिल्या यातुन काही विकृत घडू शकतं असा विचार माझ्या मनातही आला नव्हता पण चर्चा "वाचुनच" तो यायला लागला हेही तितकंच खरं!
सकाळपेपर मध्ये कित्येकदा "रस्त्यावरच्या खड्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात!" अशा मथळ्याखाली खड्डा आणि त्याच्याशेजारुन चालणार्‍या मुलींचा फोटो येतो. त्यांच्याकडुनही परवानगी घेतली जाते का? त्यांच्या पालकांशी बोललं जातं का? आणि "बाळ दोन मिनिट थांब मी इथला फोटो काढतोय" असं सांगुन त्या मुलींना फोटोतुन एक्स्क्ल्युड केलं जाणं इतकंच अशक्य आहे का?
तरिही घडतय ना हे? त्या मुलींचा वापर विकृतीसाठी केला जाऊ शकत नाही का?
जगात काहीच सेफ नाहीये. म्हणुन घराबाहेर पडं बंद करायचं का?

बाकी चर्चेत मला रस नाही. पण तुझ्या त्या वाक्यामुळे खरतर तुझ्यावर रागवुन ही पोस्ट लिहितेय अरेरे

उदयन.. | 5 February, 2014 - 01:19

भारतात आहोत आपण

अमेरिकेत नाही.............त्यामुळे विकृतीचे जे स्तोम माजवले ते बाहेर राहु..द्यावे ........भारतात होत असतील प्रकार मान्य आहे.. पण इतके नाही.. जितके बाहेरच्या देशात होतात...

आणि राहिली फोटो वापरण्याचा प्रश्न ..............ज्यांना वापरायचे असतात ते कुठुन ही वापरतात......

वत्सला | 5 February, 2014 - 01:31

रिया,

एक मात्र नक्की यापुढे मायबोलीवर माझे फोटोज/थीम्स टाकताना मला आता विचार करावा लागेल
>>>
जिप्सी, इथे लिहिणार नव्हते पण तुझा हा निर्णय / विचार अतिशय चुकीचा आहे.
१०-१२ बायका म्हणजे मायबोली नव्हे. कोणाच्या काही म्हणण्याने किंवा इतर बीबींवर केलेल्या कमेंट्सवरुन तू हा निर्णय घेऊच कसा शकतोस?>>>>>>>>>>>>>>>>> ज्यांनी 'कन्सर्न' दाखवला आहे ते १०-१२ आयडी 'पालक' आहेत असा विचार करून बघ जमल्यास... आपण नेटिझन्स आहोत आणि नियम शिकत आहोत असेही वर म्हटलं आहे ते वाचलेस का? त्या अनुषंगाने चर्चा घडली, नेमकी या बाफवर तर काय हरकत आहे? जिप्सीबद्दल कुणाच्याही मनात आकस नाहीये हे सगळ्यांनीच नमुद केले आहे. त्याला वेगळा रंग का दिला जातोय?
तुझ्याबद्दल मला कोणताही पूर्वग्रह नाही किंवा आकस नाही. फक्त या चर्चेकडे वेगळ्या दृष्टीने पण बघ एव्हढेच तुला सांगायचे आहे! स्मित

या धाग्यावरचे हेमाशेपो. या संदर्भात दुसरा धागा कुणी काढल्यास तिथे लिहीन.

रिया. | 5 February, 2014 - 01:47

अनुतै स्मित
मला चर्चा किंवा कन्सर्न खटकलेला नाहीच आहे स्मित
किंवा त्याबद्दल काही मत व्यक्त करायचा मला अधिकार नाहीच. ते एखाद्याचं मतं असु शकत आणि ते असण्याला विरोध मी करतच नाहीये.
कोणीतरी बाहेरच्या एका बीबीवर काही तरी बोलतं.... पुन्हा ते काहीतरी असं असतं की सरळ कोणाच्याही मनाला लागेल.आणि त्यावरुन माबोवरचा माझा लाडका फोटोग्राफर (इथे जिप्सी, आशू पैकी कोणीही असतं तरी अशीच प्रतिक्रिया असली असती) पुन्हा इथे फोटोज न टाकण्याचा निर्णय घ्यावा का या विचारापर्यंत येतं असेल तर ते माझ्या दृष्टीने चुकीचं आहे आणि ते इतरत्र न बोलता मी इथेच सगळ्यांसमोर बोलतेय.

इथे मत मांडणार्‍या प्रत्येक व्यक्तीने इथे हे लिहिलय की त्यांना जिप्सीच्या थीम्स आवडतात. त्यांच्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाहीये कारण त्यांच्या इथल्या हरएक कमेंटी योग्य आहेत. आक्षेप इतरत्र जे बोललं गेलंय त्यावर आहे.राग कोणत्याही एका आयडीवर नाही . पण त्यांच्या चर्चेवर आहे!

तुझा मुद्दा मला कळाला स्मित गैरसमज होण्याचं कारणच नाही. माझाही मुद्दा तुला कळाला असेल अशी अपेक्षा आहे स्मित
माझीही शेपो!

वत्सला | 5 February, 2014 - 02:09

ओके रिया. तुला काय म्हणायचेय ते आत्ता समजले. स्मित

आता खरच हेमाशेपो! स्मित

स्वाती | 5 February, 2014 - 03:02

आणि ही परवानगी घ्यायची तरी कशी? मी फोटो काढतोय असे तोंडी सांगितलेले चालते की लिखित घ्याय्ची आणि प्रत्येक फोटोसोबत ती प्रसिद्ध कराय्ची? कारण आज तोंडी परवानगी देणारा उद्या कशावरुन शब्द फिरवणार नाही ? असे तर मग इथे कोणी फोटो टाकायलाच नको. कारण फोटोग्राफर हाही एक कलाकार आहे आणि कलाकाराला तु फक्त ह्याच विषयावर कला सादर कर, हे अमुक विषय वर्ज्य हे आपण कसे सुचवणार? >> साधना, इंटरनॅशनल लॉज आहेत या कंन्सेंटबद्दल. इतकेच काय एका अ‍ॅडल्ट स्ट्रीट मॉडेलचे फोटो त्यांच्याच परमिशनने काढल्यावरसुद्धा त्याच्या रीयूजसाठीही कंन्सेंट घ्यावी लागते.
photography consent form for children असे गुगल करून बघ, भरपूर टॅम्प्लेट्स सापडतील.

इथे मुद्दा नुसता कंसेंटचा नसून फोटोग्राफर म्हणून असलेल्या जबाबदारीचाही आहे असे मला वाटते. हौस म्हणून बरेच लोकं त्यांच्या लहान मुलांचे फोटो काढायला सांगतात. त्यांच्याकडे कॅमेरा नसतो, आपल्या मुलाचा फोटो कोणी काढला आहे याचे अप्रुप असते. त्यांनी स्वता जरी मुलाचे फोटो काढा सांगितले तरी ते पब्लिश करावे का? यात एक थिन लाइन आहे. एक इंटरनेट वापरणारा/री जबाबदार नागरीक म्हणून, ज्याला आसपास काय चालते, काय होऊ शकते, याची जाणिव आहे अश्या व्यक्तिने तरी हे टाळावे असे मला वाटते.

>>>भारतात आहोत आपण

अमेरिकेत नाही.............त्यामुळे विकृतीचे जे स्तोम माजवले ते बाहेर राहु..द्यावे ........भारतात होत असतील प्रकार मान्य आहे.. पण इतके नाही.. जितके बाहेरच्या देशात होतात...>> हे लिहीताना तुम्ही कोणत्या जगात रहाता हे माहित नाही. अत्यंत विकृत माणसे भारतात सतत आजूबाजूला फिरत असताना विकृतीचे स्तोम बाहेरचे यावर हसावे की रडावे समजत नाही.

आऊटडोअर्स | 5 February, 2014 - 03:24

स्वाती, एकदम परफेक्ट पोस्ट

उदयन, यांना जाहीर ________/\___________

maitreyee | 5 February, 2014 - 04:54

कमाल कमाल कमेन्ट्स आहेत काही!
रिया , साधना - बाहेर धोका आहे , अपघात होतात म्हणून घराबाहेर पडायचेच नाही का, हा मुद्दा इथे का यावा हे कळले नाही !! तरी या उदाहरणाबाद्दल बोलायचेच तर धोक्यांमुळे घराबाहेर पडायचे का नाही हा निर्णय तुम्ही तुमच्यापुरता घेणार ना? की इतरांसाठीही निर्णय घेण्याचे पण तुम्हालाच अधिकार आहेत ???
काजोलच्या फोटो चा गैरवापर झाला तर काय इ. वाचून हसावे की रडावे कळत नहिये! "कन्सेन्ट" हा मुद्दा इतका अवघड आहे समजायला ?
मुद्दा आहे संबंधित लहान मुलांच्या पालकांच्या परवानगीचा. फोटो छापण्याला पालकांनी परवानगी द्यावीच किंवा देऊ नये यावर कोणाचा अक्षेप नाहिये, पण फोटोग्राफर ने ती परवानगी मागायला हवीच यावर दुमत का असावे हे खरंच कळण्यापलिकडे आहे!!

रिया. | 5 February, 2014 - 05:09

मैत्रेयी, मी खरतर इथे काहीच लिहिणार नव्हते पण तुझी पोस्ट भांडणाची न वाटता चर्चेची वाटल्याने लिहित आहे -
तुम्हा सगळ्यांचं असं म्हणणं आहे का की फोटोग्राफरने ज्या व्यक्तीचा फोटो काढायचाय (इथे लहान मुलगा/मुलगी कोणीही असु शकतं) त्याच्या पालकांना जाऊन असं विचारायला हवं की मी तुमच्या मुलीचे फोटो एका मराठी साईटवर टाकणार आहे तर टाकू का?
वरच्या फोटोजपैकी ज्या ज्या मुलांचे फोटोज पालकांसमोर काढले गेलेत, त्या त्या पालकांना ते काढलं जाऊ नये असं वाटत असतं तर त्यांनी नकार दिला असताच की नाही? मग पुन्हा वेगळी परवानगी मागण्यातला मुद्दा माझ्या लक्षात आला नाही.

बरं त्यातलंही बहुतांश पब्लिक आमच्यासारखं असेलच की ज्याला फोटो टाकण्यात आक्षेप असू नये. मग त्यांना तुमचं जे म्हणणं आहे ते लक्षात येईलच कशावरुन?
समजा त्यांना तुम्ही म्हणताय तोटे समजावुन सांगितले तर ते म्हणतील मग फोटोच कशाला घेताय? (हा मुद्दा वादातीत आहे किंवा मला नेमकं काय ते सांगता येत नाहीये)
काही जण म्हणतील मग फेसबूकवर फोटोज असतात त्यांचं काय?
आणि तरीही समजा त्यांनी इतकं सगळं ऐकुन घेऊन , समजुन घेऊनही फोटो वापरायला परवानगी दिली आणि त्याच फोटोचा समजा एखाद्या विकृतीसाठी उपयोग झाला तर ते चालण्याजोगं आहे का?

उदयन.. | 5 February, 2014 - 05:10

१००

maitreyee | 5 February, 2014 - 05:23

रिया - तुला अजूनही मुद्दा समजला नाहिये.

बरं त्यातलंही बहुतांश पब्लिक आमच्यासारखं असेलच की ज्याला फोटो टाकण्यात आक्षेप असू नये. >> आक्षेप नसेल तर प्रश्न मिटला ना!

काही जण म्हणतील मग फेसबूकवर फोटोज असतात त्यांचं काय?
आणि तरीही समजा त्यांनी इतकं सगळं ऐकुन घेऊन , समजुन घेऊनही फोटो वापरायला परवानगी दिली आणि त्याच फोटोचा समजा एखाद्या विकृतीसाठी उपयोग झाला तर ते चालण्याजोगं आहे का? >>>> पुन्हा तेच. तुला मूळ मुद्दा कळलेला नाही हे यातून अन्डरलाइन होतंय. " फोटो वापरायला परवानगी दिली " -- मॅटर एन्ड्स हिअर !
पुढे त्या फोटोंचे जे होईल ती परवानगी देणार्‍याची रिस्पॉन्सिबिलिटी!
पण फोटोग्राफर ने न विचारता फोटो टाकले आणी मग त्यांचा गैरवापर झाला तर जबाबदारी फोटोग्राफर ची.
सिंपल !!

रिया. | 5 February, 2014 - 05:25

अग पण जबाबदारी कोणाचीही असो कन्सर्न इतकाच आहे ना की फोटोंचा गैरवापर होईला नकोय!
तो परवानगीने होवो वा परवानगी न देता.
हां तुमचा कन्सर्न असा असेल की काही झालंच तर आपल्यावर नको यायला तर मात्र मग अवघडेय!

maitreyee | 5 February, 2014 - 05:36

काय अवघडेय त्यात ? आपल्या हातात जे आहे तेवढे आपण करू शकतो. आपण विकृत लोकांना थांबवू शकत नाही पण आपल्या पाल्यांचे फोटो नेट वर टकयचे की नाही हे ठरवू शकतो. या केस मधे पालकांची परवानगी मागू शकतो परस्पर फोटो टाकण्यापूर्वी. इथे तर तेवढेही करायला तुमचा विरोध आहे! काय तर म्हणे "भारतात सब चलता है " " खड्डे आहेत म्हणून चालायचंच नाही का" ही तुमची अर्ग्युमेन्ट्स हाहा ग्रो अप!!

सिंडरेला | 5 February, 2014 - 05:44

मैत्रेयी +१.

विकृतीबद्दल स्वातीला पण अनुमोदन.

सुनिधी | 5 February, 2014 - 08:10

जिप्सी दु:खी होऊ नका. रागावु नका. फोटो काढणे व आम्हाला दाखवणे थांबवु नका.
काये की, भारत व अमेरिका ह्या दोन्ही देशात राहिल्याने हे जाणवले की, भारतापेक्षा ह्या देशात अशा विकृतीची जास्त ओळख झाली, खास करुन मुले-बाळे मोठी होताना, शाळेला जातात तेव्हा ते कसले कसले फॉर्म्स भरताना, बातम्यात वगैरे पाहुन जास्त जागृती झाली. ह्या देशात sense of independence, sense of privacy प्रचंड आहे त्यामुळे ह्या गोष्टी लवकर लक्षात येतात. (कोणा लहान मुलाशी बोलायला पण जाताना विचार करावा लागतो की त्याच्या पालकांना आवडेल ना?) कदाचित भारतात ते तितके गडद नसेल म्हणुन तुम्हाला ते जास्त जाणवले नसेल. तर हा एक अशा फोटोंचा दुसरा पैलु आहे की ज्यामुळे तुम्ही पुढील वेळेस सावध रहाल इतकेच.

तुम्ही प्रतिभावान फोटोग्राफर आहात ह्यात दुमत नाही.

बाकी एका धाग्यावरील विषय बाहेरच्या धाग्यावर मनाला लागेल अशा प्रकारे बोलणे खरच टाळायला हवे. अरेरे

स्वाती_आंबोळे | 5 February, 2014 - 09:01

अजून मायबोली प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही? म्हणजे रीतसर परवानगी न घेता काढलेले लहान मुलांचे फोटो मायबोलीवर प्रसिद्ध केलेले चालतात असं समजायचं का?

मायबोलीवर लहान मुलांचे उपक्रम घेणार्‍यांना नावं प्रकाशित करणं अनिवार्य करणं, गटगचे मोठ्यांचेही फोटो सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रसिद्ध करताना पूर्वपरवानगी घेणं या पार्श्वभूमीवर हे अतिशय नवलाचं वाटलं.

सिंडरेला | 5 February, 2014 - 09:07

मायबोलीवर लहान मुलांचे उपक्रम घेणार्‍यांना नावं प्रकाशित करणं अनिवार्य करणं >>> +१

मला वाटतं याच मुद्द्यावर एका अनोनिमस आयडीला संयोजनात की उपक्रमात भाग घेऊ दिला गेला नव्हता.

राया | 5 February, 2014 - 09:22

उदयन, भारत अमेरिका, विक्रुति, डोळे, डोकं हे तुम्हि काय लिहिताय तुम्हालाच ठावुक. मुद्दा साधा आहे. अजाण, परक्या मुलांचे फोटो काढणे, ते नेट्वर टाकणे बरोबर आहे कि नाहि. मायबोलि परवानगि देते कि नाहि.

मवा | 5 February, 2014 - 10:30

इथे अकारण मला का टारगेट केले जात आहे कळेल का ? काल २-३ पोस्टींत माझी भूमिका स्पष्ट करुनही परत 'मनाला लागेल असे बोलणे' हा प्रकार अजूनही ऐकू येतोच आहे काही पोस्टींत.
मी जे शब्द बोलले नाही ते (फायदा, वैयक्त्तिक फायदा, व्यवसाय इ.) माझ्या नावावर का चिकटवले गेले ? माझी पोस्ट आऊट ऑफ प्रपोर्शन का वाचली गेली व तसा अर्थ काढला गेला ? मी कधी या आयडीबद्दल कुठे काय वावगं बोलले आहे आजतागायत ?
तसेच सार्वजनिक धाग्याबद्दल सार्वजनिक बाफवर बोलले आहे. ते ही मला चुकीच्या वाटणार्‍या गोष्टीबद्दल.

तसंच सिनेतारका वगैरेंचे कंपॅरिझन्स वाचले, काजोल वा इतर तार्‍यांचे फोटो मायबोलीवरच पहिल्यांदा प्रकाशित झालेत का ?

मवा | 5 February, 2014 - 09:29

बाकी काल मृण्मयी ने विचारलेल्या प्रश्नाचं एकाच सदस्याने प्रामाणिकपणे उत्तर दिलं. बाकीच्यांनी इथे उत्तर नाही दिलं तरी मनात द्या पण प्रामाणिकपणे, म्हणजे झालं.

मृण्मयी | 5 February, 2014 - 09:33

>>या धाग्यावर वरील सर्वांनीच मी काढलेल्या क्लोजअप्सचे कौतुक केले आहे.
http://www.maayboli.com/node/46688

जिप्सी, तुम्हाला त्या धाग्यावरचे फोटो आणि इथले फोटो, विषय एकाच पठडीताले वाटतात ही बाब, 'माझा मुद्दा पोचला नाही' पुन्हा अधोरेखित करते.

>>चिन्मय सॉरी, या धाग्यावर प्रतिसाद देणार नव्हतो,
हे वाचल्यावर तुम्हाला प्रशासनाकडून किंवा चिन्मयकडून गप्प रहायला सांगितलं गेलं असण्याची शक्यता असल्याचं जाणवतं.

उत्तराची अपेक्षा नाही.

राया | 5 February, 2014 - 10:11

आणि इथे कुणिहि आपल्या लाडक्या मित्रमैत्रिणिंना बरे वाटावे म्ह्णुन काहितरि खरडु नये, विषय समजुन घेवुन मत मांडावे. फोटोग्राफि सुंदरच आहे. फक्त फोटो वापराबद्दल प्रश्न आहेत. गैरसमज नसावा.

admin | 5 February, 2014 - 10:15

मृण्मयी.
काल मीच चिन्म्यमार्फत जिप्सीला निरोप पाठवला होता की प्रशासन यासंबंधातील धोरणावर विचार करत आहे त्यामुळे आत्ता तू काही लिहू नकोस. अर्थत त्यानंतरही चर्चा पुढे चालूच राहिली आणि तीला काही वेगळी वळणे पण लागली.

सर्वांना विनंती:
उद्यापर्यंत यासंबंधी मायबोलीचे धोरण प्रकाशीत करू तेव्हा त्यानंतर आपण हवं तर पुन्हा चर्चा करू. आणि कृपया परस्परांविषयी वैयक्तीक दोषारोप नकोत.

मृण्मयी | 5 February, 2014 - 10:18

खुलाश्याबद्दल धन्यवाद!

सायो | 5 February, 2014 - 10:45

अ‍ॅडमिन, स्पष्ट केलंत ह्याबद्दल धन्यवादच. पण जर हे कालच जेव्हा चर्चा सुरू होऊन मृण्मयी आणि स्वाती आंबोळे ह्य. दोघींनी प्रशासनाच्या धोरणाबद्दल विचारलं तेव्हाच खुलासा करायला हवा होतात. तुम्ही चिन्मयमार्फत जिप्सीला ऑफलाईन काय सांगितलंत हे इथे लिहिणार्‍या जनतेला अर्थातच माहित नसल्याने चर्चा सुरू रहाणं सहाजिकच होतं.

दुसरा प्रश्न असा की जर आत्ता मृण्मयीने हा मुद्दा इथे मांडला नसता तर तुम्ही इथे लिहायला आला असतात का?

असो,

भास्कराचार्य | 5 February, 2014 - 11:19

http://commons.wikimedia.org/wiki/Commons:Photographs_of_identifiable_pe...

येथे काही चांगली मार्गदर्शक तत्वे आहेत. अर्थात ती विकीमीडिया कॉमन्स साठी आहेत (आणि प्रमाणवाक्य नाहीत असे म्हणता येईल), परंतु ह्या निमित्ताने सर्वांनीच त्यावर विचार करायला हरकत नाही. एक महत्वाची नोंद अशी करावीशी वाटते, की त्याखाली Country Specific ह्या भागात भारत आणि अमेरिका दोन्हीमध्ये सार्वजनिक जागी फोटो काढून ते प्रकाशित करायला सर्वसामान्यतः हरकत नाही, असेच म्हटलेले आहे.

ह्यात एक मुद्दा असाही येतो, (जो बहुधा फोटोग्राफरच्या बाजूने मांडता येईल) की Street Photography ह्या प्रकारात स्वाभाविक, सहज फोटो येणे महत्वाचे. त्यामुळे आधी परवानगी घेणे हे त्रासाचे ठरू शकते. हा मुद्दा http://erickimphotography.com/blog/2011/03/28/5-reasons-why-you-shouldnt... येथे मांडला गेला आहे.

अर्थात, हे जरी असले, तरी लहान मुलांचा विषय असल्याने तो जास्त संवेदनशीलपणे हाताळला गेला पाहिजे असे मला वाटते. वैयक्तिकरीत्या मायबोलीसाठी तरी मी असे म्हणेन, की असे फोटो विनापरवानगी काढायला हरकत नाही जेणेकरून ते फोटोग्राफरला हवे तसे काढता येतील, परंतु काढल्यानंतर पालक तेथे असतील तर त्यांची प्रकाशित करण्यासाठी परवानगी घेणेच श्रेयस्कर ठरेल. ते तेथे नसतील, (विशेषतः गावांमध्ये इ.) तर ते डीलीट केलेच पाहिजेत असे नाही, तुम्ही ते स्वतःच्या कलेक्शनसाठी ठेवून द्या. Private Circulation साठीही हरकत नाही. परंतु प्रकाशित करण्यापूर्वी परवानगी घ्या. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. अ‍ॅडमिन काय ते सांगतीलच.

तळटीप : हे portrait प्रकारच्या फोटोसाठी आहे. सामुदायिक फोटोंमध्ये ह्याची आवश्यकता आहे असे माझे मत नाही.

दीपांजली | 5 February, 2014 - 12:23

जिप्सीच्या कलाकृती नेहेमीच सुरेख असतात , हे देखील फोटो नेहेमीप्रमाणे अप्रतिम आहेत , पण इथे सगळ्यांनी लिहिलेला कन्सर्न अगदी योग्य आहे !!
अ‍ॅडमिन ,
मागे मायबोलीच्या कव्हर पेज वर जिप्सी यांचच 'रंगोत्सव' फोटोप्फिचर पाहिलं तेंव्हाही हा विचार मनात आला होता ,( ते देखील फोटो - थीम दोन्ही सुरेख आहे तरीही , सेम अप्लाइज देअर)
ही रंगोत्सव ची लिंक http://www.maayboli.com/node/42121
लिहायचं राहून गेलं त्यावेळी .. अता इथली चर्चा वाचून तो थ्रेड आठवला.

मला कॉपीराइट इ. संदर्भात डिटेल्स माहित नाहीत, प्रशासन कॉपीराइट इश्युज बद्दल जाणकार असल्याने योग्य निर्णय घेइलच !
जिप्सी,
नथिंग पर्सनल !

कौवा | 5 February, 2014 - 13:57

व्यक्तींचे आणि विशेषतः लहान मुलांचे फोटो जालावर प्रकाशित करण्याबद्दल काळजी वाटणं आणि त्यामुळे पूर्वकल्पना/परवानगीची गरज वाटणं साधार आहे. स्वतःला तसा दंडक घालून घेणं 'प्रोग्रेसिव्ह बेस्ट प्रॅक्टिस' म्हणता येईल. पण वेगवेगळ्या देशांतल्या यासंबंधीच्या कल्पना आणि कायद्यांत खरंच केवढंतरी अंतर आहे. विकीमीडियाच्या मार्गदर्शक तत्त्वांत त्याचंच प्रतिबिंब पडलंय का?

निरागसता जपण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे, सामाजिक व्यवहारातला नेमका त्यासाठीचा अवकाश कमी झाला तर? 'एंड ऑफ इनोसन्स' कष्टप्रद आणि आवश्यक, मात्र त्यापोटी 'इनोसन्स'ला अवसर राहिला नाही असं होऊ नये.

दुर्योधन | 5 February, 2014 - 14:01

.

तन्मय शेंडे | 5 February, 2014 - 17:59

फोटोग्राफीसाठी कॉपीराईट हा मूद्दा फार किचकट आहे.

बरीचं शिल्प, जून्या वास्तू यांचे कॉपीराईट त्याच्या संस्थे कडे असतात (यूरोपात बर्याच ठिकणी हा प्रकार आहे) ..तूम्हाला त्या शिल्पाचे किंवा वास्तूचे फोटो विकायचे असतील किंवा प्रदर्षनात मांडायचे असतील तर पूर्व परवानगी लागते नाहीतर लिगल अ‍ॅक्शन होउ शकते..

वेडींग फोटोग्राफी मध्ये जर का कॉट्रेक्ट मध्ये लिहीलं नसेल तर फोटोचे सर्व हक्क फोटोग्राफर कडे असतात.

सांगायचा मूद्दा हा की या वरील केसेस मध्ये कॉपीराईटची बॉर्डर स्पष्ट आहे.

पण जेव्हा आपण अनोळखी माणसांचे फोटो काढतो तेव्हा ही बॉर्डर धूसर होते, जिप्सीने काढलेले फोटो पोर्ट्रेट नसून बरेचसे फोटो कॅन्डीड फोटोग्राफी मध्ये मोडतात.. या प्रकारात कॉपीराईट्स फोटोग्राफर कडे असतात, पण त्या व्यक्तीच्या नकळत फोटो काढला असल्यास गोपनीयता कायदा (privacy) धक्का लागतो. ईथे गोपनीयता म्हणजे परवानगीशीवाय फोटो मासीकात, अंतरजालावर प्रसिध्द करणं.
म्हणून अश्या केसेसं मध्ये फोटोग्राफरने त्या व्यक्तीची अमूक ठि़काणी प्रसिध्द करण्याची परवानगी घेणे उचीत.

फोटोग्राफी कोड ऑफ एथिक्स नूसार अश्या वेळी म्हणजे कॅडीड फोटो काढल्यानंतर त्या व्यक्तीला भेटून फोटो काढल्याची कल्पना देणे, आपलं कार्ड (कॉन्टॅक्ट नंबर) देणं , आणि त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट घेणे, जर तो फोटो विकणार असाल तर त्यातला काही फायदा हा त्या व्यक्तीला देणे ई.या बद्दल बरिच माहिती अंतरजालावर उपलभ्द आहे.

डिजीटल यूगात टेक्निकली फोटोचं विक्रुतीकरण पूर्णतः थांबवण कठिण आहे....ते कमी करण्यासाठी काही गोष्टी करु शकतो.
१. वॉटर मार्क्स
२. फूल साईझ - हाय रिझॉल्यूशन फोटो अपलोड न करणे ( मायबोलीवर हाय क्वालेटी फोटो अपलोड होत नाहीत )
३. फोटो डाउनलोड करण्यास प्रतीबंध - बॉक राईट क्लिक मेन्यू - (विक्रुतीकार फोटोचा स्क्रीन शॉट घेउ शकतात पण ती कॉलेटी मिळत नाही.)

मायबोलीवर कोणते फोटो टाकायचे ?
हा सर्वस्वी अंतीम निर्णय अ‍ॅडमीनचा.
जरी कॉपीराईट्स असलेले फोटो टाकले तरी गोपनीयता कायद्याचे उंलंघन होता कामा नये हे माझे मत, हा कायदा देशानूसार बदलतो.

दीपांजली | 5 February, 2014 - 16:20

परवानगी -प्रायवह्सी-कॉपीराइट इश्यु आहेच पण आय थिंक इथे वर लिहिलेल्या सगळ्यांचा मेन कन्सर्न 'लहान अजाणत्या वयातल्या मुलांचे फोटो ' परवानगी शिवाय पब्लिक साइट वर टाकल्याने उद्भवु शकणार्या गंभीर समस्यांबद्दल असल्याने सेन्सिटीव इश्यु आहे !
फोटो कलकृति म्हणून चांगले आहेत यात दुमत नाही ..
असो , बाकी अ‍ॅडमिन घेतीलच योग्य निर्णय !

मून | 5 February, 2014 - 16:56

वत्सला +१

"The road to hell is paved with good intentions"

जिप्सी | 5 February, 2014 - 19:15

मागे मायबोलीच्या कव्हर पेज वर जिप्सी यांचच 'रंगोत्सव' फोटोप्फिचर पाहिलं तेंव्हाही हा विचार मनात आला होता ,( ते देखील फोटो - थीम दोन्ही सुरेख आहे तरीही , सेम अप्लाइज देअर)>>>>दीपांजली जस्ट तुमच्या माहितीसाठी.स्मित या थीममधील सगळे फोटो माझ्या सोसायटीमध्ये रंगपंचमी दरम्यान काढलेले आहेत. हे सर्व फोटो मायबोलीवर प्रदर्शित करण्याआधी त्यांच्या पालकांना दाखवले होते (एकाच सोसायटीमध्ये राहत असल्याने हे सहज शक्य होते) त्यांनाही हि थीम आवडली आणि बर्‍याच जणांनी ती त्यांच्या फेसबूकपेजवर शेअरही केली होती. मुख्य म्हणजे यात माझा दिड वर्षाचा सख्खा भाचा 'श्लोक' आणि पुतणी 'गार्गी' यांचेही २-३ फोटोज आहेत. स्मित

दीपांजली | 5 February, 2014 - 21:43

थँक्स जिप्सी खुलासा केल्याबद्दल !

स्वाती_आंबोळे | 6 February, 2014 - 07:03

तन्मय शेंडे यांची पोस्ट माहितीपूर्ण आहे. धन्यवाद, तन्मय. स्मित

>> हे सर्व फोटो मायबोलीवर प्रदर्शित करण्याआधी त्यांच्या पालकांना दाखवले होते
बरोब्बर, हीच कर्टसी अनोळखी मुलांच्या बाबतीतही दाखवली जायला हवी इतकाच मुद्दा आहे.

अवांतर :
सायोला अनुमोदन.
ज्या कोणा व्यक्तीने (आधी अ‍ॅडमिन आयडीने) माध्यम प्रायोजकांची बाजू मोठ्या लगबगीने स्पष्ट केली त्याच व्यक्तीने अ‍ॅडमिन आयडीने 'यावर विचार करतो आहोत आणि मायबोलीचं धोरण लवकरच जाहीर करू' इतकं एक वाक्य लिहायला हरकत नव्हती. मायबोली प्रशासनाची प्रतिमा निदान माप्रांच्या प्रतिमेइतकीच महत्त्वाची आहेच.

गजानन | 6 February, 2014 - 07:43

जिप्सी, फोटो मस्त आहेत.

मृण्मयीची पोस्ट आणि स्वातीची पोस्ट याच्याशी १००% सहमत.

सावली | 6 February, 2014 - 08:26

तन्मय शेंडे >>> चांगली पोस्ट.
अजुन एक मुद्दा टाकायला हवा.
वृत्तांकनासाठी केलेली / एडीटोरियल फोटोग्राफी. अशा प्रकारच्या फोटोग्राफीसाठी सहसा कोणाच्या परवानगीची जरूरी नसते. पण जर ते पोर्ट्रेट असेल आणि लहान मुलाचे असेल तर वृत्तपत्रे विनापरवानगी प्रकाशित करु शकत नाहीत / सहसा करतही नाहीत.
त्याशिवाय जर एखादे मासिक / पुरवणी यात फोटो ( सज्ञान व्यक्तीचा ) विना परवानगी प्रकाशित झाला आणि त्या व्यक्तीने हरकत घेतली तर फोटोग्राफर ( क्वचित एडीटर वर , जर तसे काँट्रॅक्ट असेल तर. ) केस होऊ शकते. यातही जर फोटोग्राफरला काहीच आर्थिक फायदा मिळाला नाही असे त्याने दाखवुन दिले तर फोटोग्राफरला नुकसान भरपाई द्यावी लागत नाही, अन्यथा द्यावी लागते. मात्र इथे आपण लहान मुलांच्या फोटो बाबत आणि त्यांच्या दुरुपयोगाबाबत बोलत आहोत त्यामुळे परवानगी घेणे उत्तम.

पुन्हा भारतात सध्या हे इतके नियम कोणी पाळत नाहीत. इतकंच काय पण दुर्दैवाने नॅशनल लेवलच्या फोटो. स्पर्धांना देखील मॉडेल कन्सेन्ट मागताना क्वचितच कोणी दिसले आहेत. तरिही एक सवय म्हणुन आणि चांगले एथिक्स म्हणुन असे फोटो प्रकाशित करताना परवानगी घेतलेली उत्तम.

वैद्यबुवा | 6 February, 2014 - 11:22

तन्मय शेंडे, माहितीपुर्वक पोस्ट. बरेच मुद्दे अगदी लॉजिकल आहेत तसं विचार करायला गेलं तर.

ज्ञाती | 6 February, 2014 - 12:10

दोन तीन दिवस ही चर्चा वाचते आहे. जिप्सी च्या कलेबद्दल आदर आहे परंतु हे फोटो प्रसिद्ध करण्यापूर्वी पाल्य्/पालकांना योग्य ती माहिती/कल्पना न देणे हे कोणत्याच परिस्थितीत समर्थनीय वाटत नाही. तन्मय शेंडेंनी लिहीलेल्या / तत्सम नियमांची आपल्याला माहिती असताना, त्याकडे दुर्लक्ष करणे/ उदासीनता बाळगणे या गोष्टीला काही स्पष्टीकरण असू शकत नाही. मग ते मायबोली असो किंवा स्वतःच ब्लॉग, किंवा अजून कुठे प्रकाशित केलेले असो.

सावली, प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये तु म्हणतेस तसेच घडत असेल तर ते दुर्दैवी आहे.

मृण्मयी यांच्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे झाल्यास
ज्यांना माझं हे म्हणणं अतिरेकी वाटतं त्यांना एकच प्रश्न विचारेन. तुम्ही स्वतःच्या, अस्तित्त्वात असलेल्या किंवा भविष्यात होऊ घातलेल्या पाल्यांचे फोटो, तुमच्या परवानगीशिवाय कुठल्याही संस्थळावर प्रसिध्द होऊ द्याल का? तुम्हाला कल्पनाही नसताना त्यांचे फोटो काढलेले तुम्हाला चालतील का?>>> अजिबात नाही.
वैयक्तिक काही प्रसंगी माझ्या कॅमेर्‍यात आपल्या कुटुंबियांचे फोटो असतील आणि ते प्रसिद्ध करण्या/ न करण्याबाबत स्पष्टपणे आपली भूमिका मांडणार्‍या व्यक्तींबद्दल, त्यांच्या ह्या सजगतेविषयी मला आदरच वाटत आला आहे, सर्वांनाच वाटावा.

अगेन जिप्सी नथिंग पर्सनल, तुझ्या धाग्याच्या निमित्ताने चर्चा सुरू झाली इतकाच सर्वांच्या पोस्टचा अर्थ आहे.

राजसी | 10 February, 2014 - 07:35

प्लीज! राईट क्लिकतरी (कॉपी) डिसेबल करा निर्णय होईपर्यंत अरेरे

सिंडरेला | 10 February, 2014 - 07:39

राईट क्लिक डिसेबल कसा करायचा माहिती आहे का तुम्हाला राजसी? मला पण सांगा.

राजसी | 10 February, 2014 - 08:37

सिंडरेला, मला तांत्रिक ज्ञान नाही त्याबद्दल.

सायो | 10 February, 2014 - 08:38

अरे काय, मदतपुस्तिकेत तरी विचारायची शंका. तीन नवीन मेसेज दिसल्यावर अ‍ॅडमिननी धोरण लिहिलं असावं असं वाटून आले तर तुम्हीच टेक्निकल शंका विचारताय!!!

सिंडरेला | 10 February, 2014 - 08:43

राजसींनी एवढ्या ठामपणे सांगितल्यावर मला वाटलं त्यांना माहिती असेल.

मी स्वतः बरेचदा प्रयत्न केला आहे स्क्रिप्ट एंबेड करायचा. पण चालत नाही पान लोड झाल्यावर. बेसिक HTML चालतं फक्त.

झंपी | 10 February, 2014 - 09:18

राजसी, ते मायबोलीला (टेकनीकल /डेवलंपमेंट टीम) प्रत्येक ईमेज(आणि फक्त ईमेजसाठीच) साठी टाकणं सोपं जाईल. तो छोटा चेंज करु शकतात डेवलंपमेंट टीम एच्टीम्ल टॅग मध्ये. इतर अनेक साईट्स्/ब्लॉग मध्ये वापरतात की.

राज | 10 February, 2014 - 09:44

जिप्सी, कल्पना आणि प्रस्तुतीकरण आवडलं. आशा आहे, नाउमेद न होता अशाप्रकारचे उपक्रम माबोवर यापुढेहि राबवाल.

बाकिचे फक्त प्रॉब्लेम हायलाइट करत असताना सोल्युशन सुचवल्याबद्दल राजसी यांचं अभिनंदन. आता ड्रुपल किती साथ देतो ते पाहुया... स्मित

अश्विनी के | 10 February, 2014 - 18:13

राईट क्लिक करुनही काही होणार नाही. प्रिंट स्क्रीन वापरुनही ज्याला काही करायचं असेल तर करेलच स्मित

ही सगळी चर्चा मी आत्ताच वाचली...आणि आपले त्यासंदर्भातले धोरणही....
परंतु ते पुरेसे स्पष्ट नाहीत असे वाटते....
इथेच अजून थोडा खुलासा करणार का

मात्र मायबोलीवर फोटो प्रकाशित करताना फोटोग्राफरने पुरेशी काळजी घेणं, फोटोंबाबत व्यवस्थित विचार करणं अत्यावश्यक आहे, असं प्रशासनाचं मत आहे.
>>>>
पुरेशी काळजी घेणे समजू शकतो...व्यवस्थित विचार करणे म्हणजे नक्की काय ते उमगले नाही. ते थोडे तपशीलवार देणार का...

हे फोटो आपण का काढत आहोत, ते कुठे, कसे प्रकाशित होणार आहेत, याची मुलांच्या पालकांना फोटोग्राफरने व्यवस्थित कल्पना द्यायला हवी आणि तशी परवानगी मिळवायला हवी. पालकांच्या संपूर्ण परवानगीने फोटो आंतरजालावर प्रकाशित करणं सगळ्यांच्याच दृष्टीनं हितावह आहे, हे प्रत्येकानं लक्षात घ्यायला हवं.
>>>>>>>>

हा मुद्दा फक्त पोट्रेट फोटोग्राफीपुरता मर्यादित आहे का स्ट्रीट फोटोग्राफीसंर्दभात सुद्धा हेच धोरण राहणार आहे.
याचे कारण गणेशोत्सव मिरवणूकीदरम्यान मी काढलेल्या फोटोंबाबतही असेच आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे त्याचा खुलासा व्हावा...जर ते फोटो चालणार नसतील तर मला तातडीने आत्तापर्यंत काढलेले फोटो डीलीट करावे लागतील. त्यामुळे कृपया खुलासा करावा..

सर्वात महत्वाचा मुद्दा....
तन्मय शेंडे यांनी लिहील्याप्रमाणे
फोटो डाउनलोड करण्यास प्रतीबंध - बॉक राईट क्लिक मेन्यू - (विक्रुतीकार फोटोचा स्क्रीन शॉट घेउ शकतात पण ती कॉलेटी मिळत नाही.) हे अजूनही का होऊ शकत नाही मायबोलीवर...
माझ्या माहीतीप्रमाणे गेल्या ३ वर्षांपासून ही गोष्ट व्हावी यासाठी मागणी होत आहे. हे न होण्यामधली तांत्रिक अडचण काय आहे...
फक्त लहान मुलांचेच नव्हे तर कित्येक चांगले फोटो देखील माबोवरून ढापण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी माबोवर फोटो टाकणे देखील बंद केले आहे.

अरे बापरे, इतकी चर्चा झाली होती? मग मला कशी दिसली नाही? हं, पूर्वीसारखा ट्री व्ह्यू नाहीना, म्हनुन.! असो
मी रिया अन उदयन.. च्या मताशी सहमत, शक्य असेल तिथे परवानगी घ्यावी, पण बाकी दृश्याचा भाग असेल तर किती जणान्ची परवानगी घेणार? लग्नमुन्जमोर्चेधरणी, इथल्या गर्दीला कसे कसे विचारनार? झालच तर मला बेशिस्त पादचार्‍यान्वर फोटॉ थिम करायची आहे,

वरील नियम पाळायचा ठरला तर प्रत्येक नियम मोडणार्‍या पादचार्‍याला आधि विचारुन घ्यावे लागेल की बाबारे, तू नियम मोडतो आहेस, अन मी तुझा फोटो तू नियम मोडताना घेऊ पहातोय, तेव्हा तुझी परवानगी आहे का कारण हा फोटो मी इन्टरनेटवर प्रसिद्ध करणार आहे.

>>>>> अनेकदा लहान मुलांच्या फोटोंचा दुरुपयोग चाइल्ड पॉर्नोग्राफीमधे केला जातो, हा मुद्दा विचारात न घेतल्याचा खेद आहे. <<<<, हे शक्य असेल.
पण काय दैवदुर्विलास आहे बघा, जिवन्त व्यक्तिच्या निर्जिव फोटोवरील "वस्त्रे उतरवली जाऊ" शकतील म्हणुन एकीकडे दु:ख/वेदना व्यक्त होता हेत, अन दुसरीकडे, जिवन्त व्यक्तिला नागटी उभी करुन केल्या गेलेल्या नग्नचित्रणाचे मात्र कलास्वादा की अशाच कशाकरता तरी उद्दात्तीकरणही हाच समाज याच इथे मायबोलिवर करतो आहे. अन मला "भ्रम" होऊ लागला आहे की खरे काय? असो.

बर जिप्स्या, ती फोटूस्पर्धा तर सुरू असणार आहे ना? मध्यन्तरी मी थोरलीच्या लग्नाच्या गडबडीमुळे बघु शकलो नव्हतो.

बाकी मला माझ्या फोटॉत एकही मर्त्य मानव आलेला आवडत नाही! Proud मजबुरीने काढावे लागतात फोटो ते वेगळे.

पण काय दैवदुर्विलास आहे बघा, जिवन्त व्यक्तिच्या निर्जिव फोटोवरील "वस्त्रे उतरवली जाऊ" शकतील म्हणुन एकीकडे दु:ख/वेदना व्यक्त होता हेत, अन दुसरीकडे, जिवन्त व्यक्तिला नागटी उभी करुन केल्या गेलेल्या नग्नचित्रणाचे मात्र कलास्वादा की अशाच कशाकरता तरी उद्दात्तीकरणही हाच समाज याच इथे मायबोलिवर करतो आहे. अन मला "भ्रम" होऊ लागला आहे की खरे काय? असो. >>>>

"म्हणून आपण काढलेल्या प्रकाशचित्रांमुळे फोटोतील व्यक्तीची सुरक्षितता तर धोक्यात येत नाही, तिच्या प्रायव्हसीचा भंग तर होत नाही ही काळजी तर घेतली पाहिजे, शिवाय त्या व्यक्तीची, किंवा लहान मुलांचे फोटो असतील, तर मुलांच्या पालकांची परवानगी घेतली गेली पाहिजे, असं मायबोली प्रशासनाला वाटतं. "

हे वाचलंत का? नग्नचित्रण करताना /न्युड र्ण्गवताना त्या मॉडेल्सची परवानगी घेतलेली असते. ती चित्रं शिकण्यासाठी आहेत की प्रसिद्ध होणार आहेत हेसुद्धा त्या मॉडेल्सना माहित असतं. त्याच बरोबर बहूतांशी न्युडसमध्ये मॉडेलचा चेहरा रंगवलेला नसतो (चुभुदेघे).. खरंतर हे दोन्ही पुर्णपणे वेगळए मुद्दे आहेत.

असो....

धन्यवाद अ‍ॅडमिन-टीम!

माझ्या काही शंका / प्रश्न :

१. प्रस्तुत परवानगी ही लिखित स्वरूपात घेणे आवश्यक आहे का? (उत्तर हो असल्यास मायबोलीवर प्रकाशित होणार्‍या फोटोंसाठीच्या परवानगीचा लिखित नमुना येथेच देऊ केल्यास ते सोयीचे पडेल.) तोंडी परवानगीवर कितपत भरवसा ठेवायचा? [समजा, अनोळखी व्यक्तीकडून तोंडी स्वरुपात परवानगी घेतली व नंतर त्या व्यक्तीने परवानगी दिल्याचा इन्कार केला तर अशावेळी फोटोग्राफर व फोटो प्रकाशित करणारा हे दोघेही अडचणीत येऊ शकतात. त्याला उपाय काय?]

२. तसेच अनेकदा निदर्शनास येते की फोटोग्राफरने ज्या व्यक्तीचा फोटो काढायचा आहे त्या व्यक्तीस किंवा त्याच्या पालकांस तो फोटोग्राफ कोठे, कसा, कोणत्या स्वरुपात प्रकाशित होणार आहे इत्यादीची व्यवस्थित कल्पना देऊनही त्यांना ते सारे कळतेच असे नाही. किंवा अशा तर्‍हेने फोटोग्राफ प्रकाशित झाल्यावर त्याचा कोठे, कशा प्रकारे गैरवापर होऊ शकतो ह्याची त्यांना कल्पना येतेच असे नाही. अशा वेळी त्यांनी दिलेली परवानगी ही कितपत ग्राह्य धरायची?

३. एखाद्या व्यक्तीने फोटोसाठी परवानगी दिली. परंतु नंतर काही कारणाने तो फोटो प्रकाशित झाल्यावर आपला विचार बदलला तर त्या व्यक्तीचा प्रकाशित केलेला फोटो डिलिट करावा लागेल का?

४. मायबोलीवर प्रकाशित झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या फोटोचा त्रयस्थ पार्टीने (फोटोग्राफरच्या परवानगीविना) काही कमर्शियल कारणासाठी वापर केला तर त्यासाठी मायबोलीवर तो मूळ फोटो प्रकाशित करणार्‍यास काही अडचण येईल का? त्याचे हक्क सुरक्षित कसे राहातील?

५. मायबोलीवर प्रकाशित झालेल्या फोटोचा नंतर त्या फोटोग्राफरने काही कमर्शियल किंवा अन्य कारणासाठी वापर करायचे ठरविले तर त्यासाठी त्याला ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्याची पुन्हा वेगळी परवानगी घ्यावी लागेल, हे बरोबर ना?

६. तसेच मायबोलीवर प्रकाशित झालेल्या फोटोचा कोणी गैरवापर केल्याचे निदर्शनास आले तर त्यावर कोणी अ‍ॅक्शन घेणे अभिप्रेत आहे? मायबोलीने, फोटोग्राफरने की ज्या व्यक्तीचा फोटो आहे त्या व्यक्तीने?

एकच शंका. समजा एखाद्या व्यक्तीचे प्रकाशचित्र काढुन नेटवर किंबा माबोवर टाकायचे असेल तर तशी परवानगी घेणे म्हणजे नेमके काय करणे अपेक्षीत आहे. लेखी परवानगी का? भटकंतीला जाताना काढलेल्या फोटोंकरता परवानगी घ्यायची असेल तर सोबत कागदही नेणे अपेक्षीत आहे का? तो कागद म्हणजे हिरवा लिगल कागद हवा का? या खरंच परवानगी काढायची झाली तर मनात आलेल्या शंका आहेत. खरच संभ्रमात पडलो आहे.

>>>>> तो कागद म्हणजे हिरवा लिगल कागद हवा का? <<<<< रास्त प्रश्न
स्ट्रीक्टली लिगली स्पिकिन्ग म्हणजे तो स्ट्याम्पपेपर हवा अन अफेडेव्हीटच्या धर्तीवर परवानगी देणार्‍या व्यक्तिला मी बघितले असून, माझे समोर "बिफोर मी" त्या व्यक्तिने परवानगीची सही दिलीये असा नोटरीकडून प्रमाणीतही करुन घ्यायला हवा. असे मला वाटते, खरे खोटॅ जाणकारच सान्गतील. Happy

तो कागद म्हणजे हिरवा लिगल कागद हवा का?>>> केपी, खरंच असा प्रश्न पडला का? का?
आपणही 'बालबच्चेवाले इन्सान' आहोत.
उद्या समजा माझं मूल शाळेच्या बसमधे चढतानाचा स्पष्ट पोर्ट्रेट फोटो काढला, आणि सोशल नेटवर्किंग साईटवर आम्हाला सांगून टाकला. तो नावाजला गेला. पुढे तो सहज कॉपी करता येण्यासारखा आहे आणि स्वतःच्या विषयाला समर्पक आहे म्हणून तिसर्‍याच कोणी उचलला आणि 'स्कूलबसची असुरक्षितता' या मथळ्याखाली वापरला तर आम्ही 'हा फोटो वापरण्यासाठी आमची परवानगी घेतली होती' म्हणून गप्प बसावं अशी अपेक्षा कोणी का करावी?

'परवानगी' या शब्दाने स्वातंत्र्यावर बंधन येते हे कबूल आहे, पण हे सगळं गैरवापर टाळण्यासाठीच चालू आहे एवढंच प्रत्येकाने ध्यानात घ्यावं आणि 'परवानगी' या शब्दाचा विपर्यास टाळावा.

>>पण काय दैवदुर्विलास आहे बघा, जिवन्त व्यक्तिच्या निर्जिव फोटोवरील "वस्त्रे उतरवली जाऊ" शकतील म्हणुन एकीकडे दु:ख/वेदना व्यक्त होता हेत, अन दुसरीकडे, जिवन्त व्यक्तिला नागटी उभी करुन केल्या गेलेल्या नग्नचित्रणाचे मात्र कलास्वादा की अशाच कशाकरता तरी उद्दात्तीकरणही हाच समाज याच इथे मायबोलिवर करतो आहे. .

Happy

अ‍ॅडमिन धन्यवाद.

हा मुद्दा फक्त पोट्रेट फोटोग्राफीपुरता मर्यादित आहे का स्ट्रीट फोटोग्राफीसंर्दभात सुद्धा हेच धोरण राहणार आहे. याचे कारण गणेशोत्सव मिरवणूकीदरम्यान मी काढलेल्या फोटोंबाबतही असेच आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे त्याचा खुलासा व्हावा....>>>>आशु +१.

माझ्याही गणेशोत्सव मिरवणुक, आषाढी वारी, प्रजासत्ताक दिन परेड (अजुनही बरेच धागे आहे) या धाग्यावर वरीलपैकी (पहिल्या प्रतिसादातील) काहीजणांनी "अफाट फोटो", "निरागसता छान टिपलीस", "सुंदर फोटो" इ. इ. प्रतिसाद दिले आहेत (ज्यात लहानमुलांचे पोर्ट्रेट फोटोही आहेत). या अशा दोन वेगवेगळ्या प्रतिसादामुळे माझं कन्फ्युजन झालं होतं कि स्ट्रीट फोटोग्राफीत काढलेले पोर्ट्रेट (लहान मुलांचे किंवा इतर) चालु शकतात का? जर चालत असेल तर या फोटोंचा (गैर) वापर होणार नाही का? आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो.

(पुन्हा एकदा nothing personal, कुणा एका-दोघांवर रोख नाही आहे, मला ज्या शंका आहेत त्याचे निरसन व्हावे म्हणुन वरची पोस्ट).

जर ते फोटो चालणार नसतील तर मला तातडीने आत्तापर्यंत काढलेले फोटो डीलीट करावे लागतील>>>अगदी अगदी. मला सुद्धा. Happy

मंजुडे खरच प्रामाणीकपणे हा प्रश्न पडला आहे मला. अजिबात चेष्टेचा संबंध नाहीये. एक फोटोग्राफर म्हणुन काय काळजी घ्यावी लागेल या करता पडलेला प्रश्न आहे. मला मुद्दा कळला आहे पण तो आचरणात कसा आणता येईल लिगली त्याचा विचार करताना हा प्रश्न पडला आहे.

काहीजणांनी "अफाट फोटो", "निरागसता छान टिपलीस", "सुंदर फोटो" इ. इ. प्रतिसाद दिले आहेत >>
जिप्स्या यात आक्षेप घेणार्‍या व्यक्तींनी जर असे प्रतिसाद दिले आहेत का पण? तर असा गोंधळ उडणे स्वाभावीक आहे.

जिप्स्या यात आक्षेप घेणार्‍या व्यक्तींनी जर असे प्रतिसाद दिले आहेत का पण? तर असा गोंधळ उडणे स्वाभावीक आहे.>>>>हो, केपी.

मला मुद्दा कळला आहे पण तो आचरणात कसा आणता येईल लिगली त्याचा विचार करताना हा प्रश्न पडला आहे. >>> मग ठीक आहे.

अकु, तुझा नं. २ चा मुद्दा त्या बीबीवर मवानेही मांडला होता. अशा बाबतीत माझ्यामते फोटोग्राफरनेच काय योग्य, अयोग्य ह्याचा निर्णय घ्यावा.

जिप्सी, तुझे फोटो छान असतात ह्याबद्दल अजिबातच वाद नाही. वेळोवेळी तुझ्या बीबीवर तसा प्रतिसाद दिलाही गेला आहे. पण लहान मुलं, मोठी माणसं ह्यांना समोर बसवून फोटो काढून ते नेटवर प्रकाशित करताना त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावीस हाच आणि एवढाच मुद्दा आहे.

अ‍ॅडमिन, धोरण जाहीर केल्याबद्दल धन्यवाद.

माझ्याही गणेशोत्सव मिरवणुक, आषाढी वारी, प्रजासत्ताक दिन परेड (अजुनही बरेच धागे आहे) या धाग्यावर वरीलपैकी (पहिल्या प्रतिसादातील) काहीजणांनी "अफाट फोटो", "निरागसता छान टिपलीस", "सुंदर फोटो" इ. इ. प्रतिसाद दिले आहेत (ज्यात लहानमुलांचे पोर्ट्रेट फोटोही आहेत). या अशा दोन वेगवेगळ्या प्रतिसादामुळे माझं कन्फ्युजन झालं होतं कि स्ट्रीट फोटोग्राफीत काढलेले पोर्ट्रेट (लहान मुलांचे किंवा इतर) चालु शकतात का? जर चालत असेल तर या फोटोंचा (गैर) वापर होणार नाही का? आणि हेच मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. <<<

योगेश, तुझं कन्फ्युजन मिटलं का?

अवांतर :

भारतात किंवा अन्य देशांमध्ये पाळीव प्राण्यांच्या फोटोग्राफ्सबद्दलही ते प्रकाशित करताना अशीच दक्षता घ्यायला लागते का ह्याबद्दलही उत्सुकता आहे. [माझ्याकडील अगदीच तुटपुंज्या माहितीनुसार कोण्या पाळीव प्राण्याचा तुम्ही जर फोटो काढलात तर तो फोटो प्रकाशित करण्यापूर्वी किंवा कोठेही वापरण्यापूर्वी त्याच्या मालकाची परवानगी घेणे आवश्यक असते. अर्थात हे कितपत 'पाळले' जाते ह्याबद्दल माहिती नाही.]

माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत मायबोली प्रशासनाची भूमिका नेहमीच 'इथून पुढे..' अशी राहिली आहे.

street photography बद्दल इथे जे दिले आहे ते अतिशय नीट आणी अचूक शब्दामधे लिहिले आहे. माबो प्रशासनाला सुद्धा हेच म्हणायचे आहे असे मला वाटले.

http://www.clickinmoms.com/blog/street-photography-and-the-law-7-things-...

काही प्रश्न......

१) समजा मी कुणाचे फोटो काढले.. परवाणगी घेउन इथे प्रसिध्द केले... परवाणगी तोंडी घेतलेली चालेल की लिखित ?

२) लिखित हवी असल्यास ते लिखित परवाणगी देखील इथे फोटो खाली प्रसिध्द करावी लागेल का ?

३) मी परवाणगी घेउन काढलेला फोटो इतर साईट ने अथवा व्यक्तीने स्वतः करीता चांगल्या अथवा वाईट कारणा करीता वापरला तर काय कारवाई होउ शकेल आणि कुणावर ? कोणत्या कारणाने..?

४) जर कारवाई समोरील व्यक्ती बरोबर माझ्यावर देखील होणार असेल तर माझ्या कडे तर परवाणगी आहे..मग समोरच्या व्यक्तीने कॉपी करुन फोटो घेतला असेल तर माझ्यावर कशी कार्यवाई होईल ?

५) फोटो वर वॉटरमार्क टाकुन सुध्दा जर फोटो वापरले जात असेल तर मायबोली काय कारवाई त्या विरुध्द करणार ?

६) एका प्रकरणात .. मायबोलीवर प्रसिध्द केलेले साहीत्य हे मायबोलीचे होते ( चुकभुल असावी ) तर फोटो जर इतर व्यक्तीने अथवा संस्थेने फोटोग्राफर या मायबोली च्या विनापरवाणगीने वापरला तर मायबोली काय कारवाई करेल ?
आणि फोटोग्राफर वर कारवाई होईल का ? साहित्य तर मायबोलीचे होते .. मग

असे अजुन काही प्रश्न आहेत... कृपया कोणी "जाणकार" व्यक्तीनेच उत्तरे द्यावी...

माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत मायबोली प्रशासनाची भूमिका नेहमीच 'इथून पुढे..' अशी राहिली आहे.
<<< ज्यांना हरकत घ्यायची आहे ते कोणत्याही तारखेच्या फोटोवर घेऊ शकतील. समजा मी एखादा फोटो पूर्वी टाकला असेल तर मायबोली प्रशासनास नाही (कारण प्रशासनाचे धोरण आता बनले आहे) पण मला तरी याचा पुनर्विचार करावा लागेल.

हे सगळे घडले ते माहित नव्हते. सगळी चर्चा आत्ता वाचली. अ‍ॅड्मिन, धोरण जाहिर केल्याबदल धन्यवाद.
असामी, दुव्याबद्दल धन्यवाद.

या निमित्ताने हा विषय चर्चेला आला हे छान झाले. छायाचित्रांशी माझा संबंध फक्त पाहण्यापुरताच आहे. मायबोलीने आपले वेगळे असे काही धोरण जाहीर केले आहे असे वाटत नाही. छायाचित्रकारांनी जे काही एथिक्स पाळणे अपेक्षित आहे तेच मांडले आहे.

क्रायच्या मार्गदर्शक तत्त्वांत हे मिळाले.
Autonomy - In what way can I show respect for a person's right to decline or consent to
photography? How do I handle informed consent?
o
Parents or guardians must give free and informed permission for the publishing of any image after the risks/ benefits – the situation have been explained to them.
मला कळले ते असे :
१. कोणाचेही छायाचित्र घेताना त्या व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे.
२. जर ते छायाचित्र प्रकाशित करणार असाल तर त्या व्यक्तीला/मुलांच्या पालकांना त्यातील नफा-नुकसानीची संपूर्ण माहिती देऊन त्यासाठी परवानगी घ्यायला हवी.

मध्ये फेसबुकवर मुंबईच्या लोकल गाडीत कचरा टाकणार्‍या महिलेचा फोटो फिरत होता. तो पाहताना, कुणाच्या परवानगीशिवाय असा फोटो काढणे आणि खरा असला तरी बदनामीकारक मजकुरासोबत प्रकाशित करणे हा एक अपराधच नाही का असे डोक्यात आले होते.

ह्याच संदर्भात एक अनुभव शेअर करावासा वाटतो - अनेक ब्रँडेड गुड्स विकणारी स्टोअर्स, शॉपिंग सेंटर्स, मॉल्समधील शो रूम इत्यादी ठिकाणीही फोटोग्राफी करण्यास मनाई असते किंवा बंधने असतात. त्यांच्या काही पॉलिसीज असतात ह्या संदर्भातील. अशा ठिकाणी फोटो घ्यायचा झाल्यास संबंधित अधिकारी व्यक्तीची (मॅनेजर किंवा मालक) परवानगी घेऊन फोटोग्राफ्स घ्यावे लागतात.

नोव्होएडचा क्रिएटिविटी ऑनलाईन कोर्स करताना पहिल्याच असाईनमेन्टला आम्हाला ब्रँडेड गूड्स मिळणारी स्टोअर्स / शो-रूम्स, मॉल्स मधील मोठमोठी दुकने किंवा फाईन डायनिंग रेस्तराँ मध्ये जाऊन तेथील काही गोष्टी कॅमेर्‍यात बंदिस्त करायला सांगितल्या गेल्या. हा त्यांचा (नोवोएडचा) पहिलाच मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्स असल्याने आणि एरवी कँपसमधील विद्यार्थ्यांना त्या परिसरातील दुकाने / मॉल्स इत्यादी ठिकाणी त्यांचे आयडी कार्ड दाखवले व असाईनमेन्ट आहे म्हणून सांगितले की परवानगी मिळत असल्यामुळे, ह्याचा जेव्हा ऑनलाईन कोर्स होतो तेव्हाची बदललेली परिमाणे तसेच वेगवेगळ्या देशांमधील कडक बंधने त्यांच्या लक्षात आली नसावीत. त्यामुळे असाईनमेन्ट जाहीर होताच जगभर विखुरलेल्या विद्यार्थ्यांनी 'आमच्या देशात हे शक्य नाही' असा सूर लावला. काही ठिकाणी लोकांनी तसे फोटो घेण्याचे प्रयत्न केल्यावर त्यांना पोलाईट शब्दांत समज, पोलाईटली सिक्युरिटीने बाहेरचा रस्ता दाखविणे, पोलाईटली परवानगी नाकारणे ते सिक्युरिटीने त्या विद्यार्थ्याचा २-३ ब्लॉक्स पर्यंत [पिक्चरमध्ये दाखवतात तस्सा] पाठलाग करणे असे अनुभव आले. बर्‍याचजणांना विनाफोटो हात हलवत परत जावे लागले. शेवटी असाईनमेन्टचे नियम शिथील झाले व पब्लिक प्लेसेस मधील फोटोग्राफ्सही असाईनमेन्टसाठी चालतील अशी सूचना आली!! हुश्श!!

मी असाईनमेन्ट जाहीर होताच घराजवळच्या एका आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या शो-रूममध्ये गेले. तेथील मॅनेजरची 'माझी अमक्या तमक्या कोर्सची अशी अशी असाईनमेन्ट आहे व त्यासाठी मला तुमच्या शो-रूमच्या इंटिरियरचे फोटो घ्यायचेत, घेतले तर चालतील का?' अशी रीतसर तोंडी परवानगी घेतली. पण अस्मादिक २-४ फोटो न काढता शो-रूमच्या अंतर्भागाचे, शो-केसेस, डिस्प्ले इत्यादीचे वेगवेगळ्या कोनांतून फोटू काढण्यात इतके रंगून गेले की शेवटी त्या मॅनेजरला येऊन मला 'आता बास, चालू लागा' असे पोलाईट शब्दांमध्ये सांगणे भाग पडले! Proud

>>जिप्सी | 11 February, 2014 - 07:14
योगेश, तुझं कन्फ्युजन मिटलं का?>>>>खरं सांगु, अजुनही नाही. >>

जिप्सी, नक्की कोणत्या बाबतीत अजूनही कन्फ्युजन आहे?
१- ह्या पर्टिक्युलर धाग्यासंबंधीत (फिरूनी नवी...) परवानगी घ्यायची काय गरज किंवा वॉट्स अ बिग डिल?
२- तिथे आक्षेप घेतलेल्या बर्‍याच आयडींनी तुझ्या दुसर्‍या फोटोवर 'अरे वा, छान' वगैरे प्रतिसाद दिले आहेत. तेव्हा आक्षेप घेतला नाही. मग आत्ताच का?
ह्यापैकी नक्की कोणता मुद्दा आहे.

मला खालचा प्रश्न तुला फिरूनी... च्या अनुषंगाने विचारावासा वाटत होता पण पर्सनल आहे /वाटेल म्हणून टाळत होते पण पहिला मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून विचारतेच.

तुझ्या लग्नाला उपस्थित मित्र मैत्रिणींनी तुमचे फोटो काढले आहेत हे तुला माहिती आहे पण तुझी/तुमची परवानगी न घेता समजा त्या व्यक्तीने मायबोली, मिसळ्पाव वगैरे तत्सम साईटवर टाकले तर तुला/ तुम्हांला आवडेल?
उत्तर हो असेल तर मग कन्फ्युजनचं कारण मी लक्षात घेऊ शकेन.

आमच्या इथे मुलाला जेव्हा डेकेअर प्रीस्कूल अ‍ॅडमिशन मिळते तेव्हा एका फोर्म वर पालकांकडून लिखित स्वरूपात परवानगी घेतात.
खालिल मुद्दे असतात.
तुमच्या मुलाचे फोटो आम्ही काढलेले चालतील का?
काढल्यास..
शाळेतील डिस्प्लेबोर्डवर लावलेले चालतील का?
वेबसाईटवर टाकायचे झाल्यास टाकू शकतो का?
वर्तमानपत्रात जर एखाद्या बातमीत छापून आले तर चालेल का?

याशिवाय इमारतीच्या परीसरात जर तुम्हाला तुमच्या मुलाचा फोटो काढायचा असेल तर त्यात इतर मुलांचा फोटो येणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. शिक्षकांनी घेतलेल्या तुमच्या मुलाचा जर तुम्हाला फोटो हवा असेल तर त्यात तो एकटाच असायला हवा असतो. इतर मुले त्या फोटोत असले तर त्या मुलांच्या पालकांची तोंडी परवानगी घेऊनच तो फोटो ते देतात परंतू तो फोटो कुठेही प्रकाशित करायची परवानगी तुम्हाला नसते.

मायबोलीवर राईटक्लीक बंद का करत नाही असे वारंवार लिहिले जाते त्याबद्दलचा हा खुलासा.

राईटक्लीक बंद केल्यावर फोटो सेव्ह करता येत नाही असा एक प्रचंड गैरसमज आहे.
१) ज्या क्षणी तुम्ही आंतरजालावरचे एखादे पान पाहता त्या क्षणी त्या पानावरचे सगळे फोटो आधीच तुमच्या ब्राऊझरने एका डिरेक्टरीत (कॅश)अगोदरच उतरवले असतात. राईट क्लीक न करताही तिथून ते सगळे मिळवता येतात.
२) अनेक ब्राऊझर आहेत जे राईटक्लिक बंद केले तरी वर मेनू मधून संपूर्ण पान आणि आणि त्यावरचे फोटो डाऊनलोड करू देतात.
राईटक्लीक बंद केले तर जे अगदीच नवशिके आहेत ते सोडून इतर कुणालाही तुम्ही थांबवू शकत नाही. ज्याला मुद्दाम ते फोटो चोरायचे आहेत त्यांना तर नाहीच. पण राईट्क्लीक बंद केले तर त्यामुळे इतर ज्या सुविधा मिळतात त्या मिळणार नाहीत.

Pages