पंधराशे हॅरीसन - Amateur
आपल्याला थोडं लिहायला जमतय हे लक्षात येताच मला वाटायला लागलं आपण निदान amateur लेखिका व्हायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. पण ह्यासाठी एखादा ‘मूक’ (MOOC) अभ्यास करावा इतके काही हे थोर लक्ष्य नाही ह्याचीही मला पूर्ण जाणीव होती. निमा, माझी तरुण मैत्रीण, मला म्हणाली, “आरती, मग तू ‘धमालस्’ जॉईन कर”. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून तिने खुलासा केला “‘धमालस’ (DH. M. A. L. S) म्हणजे ‘धेडगुजरी मराठी ऑथरस लास्ट स्टॉप’. हा आमचा लेखक ग्रुप दर महिन्याला जमतो. एक मिट-अप समज न. एक विषय सर्वानुमते निवडतो मग पुढच्या महिन्याच्या सत्रात त्या विषयावर सगळेजण आवडीप्रमाणे कथा, लेख, कविता असं वाटेल ते लिहून आणतात” “वेळ होतो सगळ्यांना? जे वाट्टेल ते चालत?” मी आश्चर्याने विचारले. ती हसून म्हणाली “लिहून वाट्टेल ते आणतात लोक. पण ‘पॉट लक’ वर मात्र खरच मेहनत घेतात हं, तू होशील आमच्यात फिट”. ही मला कॉमप्लीमेंट देतीये की वॉर्निंग?
किमान मर्यादा दहाच ओळी असल्याने पहिल्या एक दोन सत्रात मी खरच अगदी फिट्ट बसले. पण तिसऱ्या महिन्यात विषय आला ‘संदर्भ’, चौथ्या महिन्यात विषय आला ‘उपेक्षा’ आणि मला जाणीव झाली की आपल्याकडे लिह्ण्याजोग काहीच नाहीये. मी सत्राला गेलेच नाही. DH. M. A. L. S मधली विजया त्या दिवशी मला अचानक ग्रोसरी स्टोर मध्ये दिसली. तिने मला विचारलं “आली नाहीस?” मी भाबडेपणाने सांगितले “काही सुचलच नाही लिहायला, आमच्या भारतातल्या घरात मोलकरीणसुद्धा उपेक्षित सारखी नाही वागायची बघ. काय लिहणार मी ‘उपेक्षा’ बद्दल? म्हणा प्रत्येक गोष्ट अनुभवायला लागते अस नाही पण काही सुचलच नाही बघ.” कसनुसा चेहरा करीत ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी मला निमाचा फोन “मला नाही का सांगायचं? ह्याचा शास्त्रीय अभ्यास झालेला आहे, तू काही एकटी नाहीस. होत अस आणि त्यासाठीच DH. M. A. L. S सारखे ग्रूप लागतात” ह्यावेळी माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह snapchat ईमेज साईझ पेक्षा मोठे असल्याने ते काही मी तिला पाठवू शकले नाही. पण मी शांतच आहे बघून तीच समजावणीच्या स्वरात म्हणाली “तुला थोडं लवकर झालाय पण प्रत्येक लेखकाला कधी न कधी ‘रायटरस ब्लॉक’ होतो. काही काही सुचत नाही.” अरे देवा! लेखिका होण्यापूर्वीच मला रायटरस ब्लॉक झाला!!
दुसऱ्या दिवशी विजयाने ‘स्काईप करूया’ म्हणून टेक्स्ट केला. रात्री बोलतांना तिने विचारलं “आज सुचलं काही” मी नकारार्थी मान हलवली. मग तिने हळूवारपणे सांगितले “रायटरस ब्लॉक वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. तुला काहीच सुचत नाहीये का खूप काही सुचतय? आणि जे खूप काही सुचतय ते काहीच्या काही सुचतय का ठीक-ठाक सुचतय?” “नाही ग, काहीच सुचत नाहीये” मी म्हणाले. मग आम्ही दोन वर्षापूर्वी क्रियेटीव्ह प्रकारचा रायटरस ब्लॉक जिला झाला होता त्या DH. M. A. L. S मधल्या लेखिकेबद्दल बोलत राहिलो. हल्लीच तिचा एक लेख “विषामृत” मासिकात प्रसिद्ध झाला होता म्हणे. एकूणात ह्या रायटरस ब्लॉकला सर्व्हायवर पण असतात तर. मी पण आता हळूह्ळू रायटरस ब्लॉक विषयावर वाचायला लागले होते. ‘फ्री रायटिंग’ ‘ब्रेन स्टोरमिंग’ ‘लिस्ट मेकिंग’ असले काहीबाही उपाय करून बघितले. पण कशाचा उपयोग झाला नव्हता. त्यात पुढच्या महिन्याचा विषयही आला होता. आता मात्र मलाच वैताग यायला लागला होता आणि ‘गिव्ह अप’ करणे हा मार्ग समोर होता. ग्रूप सोडून द्यावा हे बर. निदान सतत आपल्याला ‘ब्लॉक झालाय ब्लॉक झालाय’ ही मनाची भुणभुण तर बंद होईल.
राज, माझा मुलगा, त्याला नको तेव्हा नको ते प्रश्न विचारायची खोड आहे. काल मला भारतीय टीव्ही बघताना बघून त्याने लगेच प्रश्न केला, “मॉम तू हल्ली तुझ्या रायटर मिटींगला जात नाहीस?” टीनेज मुलांबरोबर रायटरस ब्लॉकच ‘कॉन्व्हरसेशन’ कस करावं हे विजयाला विचारायचं राहूनच गेल की! पण सामान्यपणे सरळ सांगून टाकाव ह्या मताची मी असल्याने, मी त्याला सांगितलं “अरे, जाणार आहे जरा दिवसांनी, सध्या मला रायटरस ब्लॉक झालाय. सोप्पा विषय असला तरी काही सुचत नाहीये. असं समज काळ हेच औषध आहे.” त्याचा क्लासिक आयरोल करीत राज म्हणाला “ए, स्वतःला हि फिलोसोफी आणि आम्हाला सांगतेस- time will not change everything but discipline always will. हे फेयर डील नाहीये”.... मी मुकाट्याने त्याच्यासमोर (हे सगळ टाईप करायला) वर्ड डॉक्युमेंट उघडले. मुले होऊन इतकी वर्ष होऊनसुद्धा मी अजूनही amateur आईच आहे.
गुरुची विद्या गुरुला असे खुप
गुरुची विद्या गुरुला असे खुप प्रसन्ग येतात बॉ.
अनुभव आहे अर्थात अजुन तुमच्या इतका नाही.
आमचं पिल्लु आता ६ वर्षाचं आहे.
मस्तं!
मस्तं!
DHAMALS ची कल्पना मस्त! छान
DHAMALS ची कल्पना मस्त!
छान लिहीलंयस.
नेहमेीसारकखेच मस्ताय
नेहमेीसारकखेच मस्ताय
आवडले
आवडले
...... हे (DH. M. A. L. S)
...... हे (DH. M. A. L. S) आहे.
>>>>> अरे देवा! लेखिका होण्यापूर्वीच मला रायटरस ब्लॉक झाला!!
एकूणात ह्या रायटरस ब्लॉकला सर्व्हायवर पण असतात तर
क्लासिक आयरोल, क्रियेटीव्ह प्रकारचा रायटरस ब्लॉक >>>>
टीनेज मुलांबरोबर रायटरस ब्लॉकच ‘कॉन्व्हरसेशन’ कस करावं हे विजयाला विचारायचं राहूनच गेल की! >>> अल्टिमेट सरकॅस्टिक!!!
तुमची शैली भलतीच ओरीजिनल आणि क्यूट आहे. आवडतेच आणि आवडलीच.
रायटर्स ब्लॉक का? बर्बर.. आता
रायटर्स ब्लॉक का? बर्बर..
आता सगळी भिस्त शिस्तीवर !
झकासराव ते गोष्टीतील आरतीचे
झकासराव ते गोष्टीतील आरतीचे पिल्लू आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर लोकाची पिल्ले मायेने पीडतात तेव्हढे भाग्य पुरेसे आहे.
बाकी सगळे धन्यवाद.
सप्टेंबरपासून वाट बघत होते
सप्टेंबरपासून वाट बघत होते पुढच्या भागाची. जरा लहान वाटला भाग. सगळ्या मालिकेत उगीच एक फिलर घातल्यासारखा पण वाटला.
धमाल्स् भाग नेहेमीइतका
धमाल्स् भाग नेहेमीइतका खुसखुशीत नाही वाटला .. पण शेवट नेहेमीसारखाच, खुसखुशीत ..
मस्त आहे. अजून लिहा.
मस्त आहे.
अजून लिहा.
नेहमी प्रमाणेच - वाचायला
नेहमी प्रमाणेच - वाचायला हलके-फुलके. पण नंतर विचार करायला लावणारे. मस्तच!
रच्याकने, पंधराशे हॅरीसनचा काय संदर्भ आहे? (पहिल्या भागापासूनच मनात आहे हा प्रश्न.)
आवडले अरे देवा! लेखिका
आवडले
अरे देवा! लेखिका होण्यापूर्वीच मला रायटरस ब्लॉक झाला!!>>>
पंधराशे हॅरीसन हा उत्तर
पंधराशे हॅरीसन हा उत्तर अमेरिकेतील कुठल्याही शहरातील एक पत्ता. तिथे राहणारे हे एक सर्वसामान्य (!) भारतीय कुटुंब. त्यांच्या घरात घडणाऱ्या सामान्य गोष्टींची हि मालिका.