Submitted by Prashant Pore on 31 January, 2014 - 10:42
कलीयुगाच्या दुनियेमध्ये कुठे हरवला राम?
रामाच्या नावाने जो तो साधत असतो काम !
पूज्य मानतो कर्तव्याला विसरून सारे भेद
कुणी म्हणाले योग्य मला अन कुणी म्हणाले वाम
असली कसली ही उफराटी त-हा जगाची आज
कुणास मिळते मोफत काही कुणी मोजतो दाम
कळले नव्हते तुला मलाही कधी जाहले एक
तुझ्या नि माझ्या श्वासांचे जे वेगवेगळे धाम
विसरलीच असशील सखे तू तुझा न काही दोष
दिल्याघेतल्या वचनांवर मी अजून आहे ठाम
सहस्त्र सोळा कन्या वरतो दो भार्यांचा नाथ
कधी कुणाला कळला जगती राधेचा घनशाम
जीवन म्हणजे मद्यालय संकटे शेकडो ब्रँड
सुखदुःखाच्या कॉकटेलचे रिचवत जातो जाम
मंदिराहुनी जास्त भीक या गुत्त्याच्या दारात
कुठला पत्ता दिलास देवा कुठे तुझा मुक्काम ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही खयाल आवडले शेर शेवटचा
काही खयाल आवडले
शेर शेवटचा जास्त आवडला (तरी त्यात भीक असे का म्हटले ते समजले नाही दुसरा एखादा शब्द योजणे शक्य होईल का)
ठाम चा शेरही आवडला
श्वासांचे धाम ही कल्पना /शब्दप्रयोग देखील आवडला
सहस्त्र सोळा कन्या.....<<< ह्यात मला काही तरी प्रॉब्लेमॅटिक वाटत आहे(पूर्णतः वैयक्तीक मत !) दोन्ही ओळींची शब्दकळा आणि मांडणीतली सुलभता मॅच होत नाहीये असे वाटते आणि मला माहीत असलेल्या पौराणिक संदर्भानुसार सोळा सहस्त्र कन्या (की स्त्रीया?) वरण्याच्या वेळेपर्यंत कृष्णाच्या सोळा बायका ऑल्रेडी होत्या(ऐकीव माहीती.. प्लीज आता नावे बिवे विचारू नका कुणी मला :))
त्याही पेक्षा महत्त्वाने मला असे जाणवते आहे की दुसर्या ओळीत आता आहे त्या कलाटणी पेक्षा जरा वेगळी कलाटणी घेवून ही द्वीपदी अशी करता आली असती का
जसे की..
वरतो सोळा हजार कन्या जरी द्वारकानाथ
तरी तयाची ओळख जगती राधेचा घनश्याम
(बदलाची सूचना विनंती आग्रह वगैरे काही काही नाही कृ गै न )
असो
शेरामध्ये एक उठावदारपणा की जोरकसपणा असे काहीतरी असते ते नक्की काय असते ह्याची मलाही नीटशी कल्पना नाही किंवा समजावून सांगताही येणार नाही पण मला स्वतःला जमत नाही म्हणून काय झाले ...आपण त्याचा अधिक अभ्यास करावा (करत असालही म्हणा!)असे आपणास सांगून पहावे असे वाटते
मी उणे अधिक बोलत आहे असे वाटल्यास क्षमस्व
धन्यवाद व शुभेच्छा
वैवकुच्या प्रतिसादाने उठले हे
वैवकुच्या प्रतिसादाने उठले हे डो़के ज्जाम
कुणीतरी आणून द्याच हो मजला झंडू बाम
धन्यवाद वैभवराव आपल्या दोन्ही
धन्यवाद वैभवराव
आपल्या दोन्ही प्रतिसादांबद्दल....
आपल्या नेहमीच्या माझ्यावरील अपेक्षीत प्रेमापोटी.....