जात

Submitted by Anaghavn on 8 December, 2008 - 12:55

"मी त्याला तुझ्या ताब्यात देणार नाही. तुझा आरडाओरडा आधी बंद कर".
"तुला माझं ऐकावं लागेल. आधी ग्रील उघड.मला तो माणुस माझ्या ताब्यात हवा आहे.उघडतेस की नाही तू?"
"शांत हो मग तुला आत घेईन".
"का होऊ? तो माणुस, ज्याला तु घरात लपवलं आहेस, त्याचे भऊबंद बाहेर धिंगाणा घालतायेत. त्याला माझ्या ताब्यात दे.सोडणार नाहीये मी साल्याला.
"शांत हो".
"तु उघडतेस का ग्रील फोडुन आत येऊ?बघतोच साला कसा जिवंत रहातोय ते".
"----------"
"Don't try my patience. आज त्याच्यासाठी तु मला घरात घेत नाहीयेस?"
"तुला घरात घ्यायच आहे मला, आधी शांत हो".
"आणि काय करु? तुला माहीत आहे बाहेर किती गोंधळ सुरु आहे? ..... लेकाचे एकेकाला धरून चिरलं पाहीजे.साले, आमच्या देशात आम्हाला जगणं मुष्किल करतायेत. एकजात साले अतिरेकी".
"अतिरेक्यांना जात नसते"
"ए तु मला शहाणपणा शिकवु नकोस. मुकाट्याने दार उघड."
"तु शांत हो, मी दार उघडते".
"..........."
"ग्रील आपटुन काहीही होणार नाहीये.तुझ्या आवाजाला घाबरुन, तमाशाला घाबरुन मी दार उघडेल असं तुला वाटल असेल, तर तो गैरसमज काढुन टाक डोक्यातुन."
"मी तमाशा करतोय?मी करतोय तमाशा? बाहेर ये, तुला दाखवतो कसला तमाशा केलाय या लोकांनी आपल्या लोकांचा बघ, बाहेर ये जरा".
"मला माहीत आहे बाहेर काय चाललंय ते.ईथे टीव्ही वर बघीतलय मी".
"बघितलं आहेस ना? तरीही तु त्याला वाचवते आहेस?"
".........................."
"नाही, तुम्ही बाहेर येऊ नका,आतच थांबा. मी handle करते".
"ए तु गप्प बैस. येऊ दे त्याला बाहेर. बघतो साल्याला. आमचं जीणं हराम केलंय ----नी . एकेकाला घरून मारलं पाहीजे हरामी लेकाचे"

"........."
"नकोय मला पाणी.माझं डोकं अजुन फिरवु नकोस, दार उघड."
"आधी हातातला सुरा आणि दुसरी हत्त्यर खाली ठेव."
"......"
"ठेव म्हणते ना खाली, तुला आत यायचं असेल तर ते सगळं बाहेरच ठेवावं लागेल".
"आज माझ्या हातातलं काढुन घेते आहेस. बाहेर "त्यांचे" लोक अशी अनेक हत्यारं घेऊन फिरतायेत त्यांच काय? काढुन घेणारेस त्यांची हत्यारं?"
"तु ज्या माणसासाठी हत्यार घेऊन आला आहेस, त्याच्यकडे हत्यार नाहीये. तो निर्दोष आहे".
"कोणाची बाजु घेते आहेस गं तु? कोण लागतो तो तुझा?"
"भावा सारखा आहे तो माझ्या".
"तुझ्या त्या भावाचे जातवाले----- साल्यांनी तुझ्या इतर भावांना जीवे मारलं आहे."
"त्यात त्याचा काही दोष नाहीये".
"दोष कसा नाहीये? त्याचेच जातवाले आहेत ना ते?"?
"तुला जन्माला घालताना जातीचा option दिला होता? विचारण्यात आलं होतं तुला,"कुठल्या जातीत जन्माला घालु?" म्हणुन?"
"??????"
"तु आज या जातीचा नसुन त्याच्याच जातीचा म्हणुन जन्माला आला असतास तर? काय केलं असत? तु पण त्याच लोकांसारखा झाला असता ज्याना तु जातीवरुन नावं ठेवतो आहेस?केवळा एका विशिष्ठ जातीचा आहेस म्हणुन तु तमाशा केला असतास?"
"काय बोलते आहेस तु? मी असं कसं करेन? मी असा वाटतो?"
"मग तो कशावरुन "तसा" आजे?त्याने म्हटलं नव्हत मला अमुक एका जातीत जन्माला घाला म्हणुन."
"............."
"असा हताश होऊ नकोस. ये आत".
" "
"पाणी घे".
" "
"काय झालंय तुला? असा कधीच नव्हतास तू. जातीवरुन कधी कोणाबद्दल बोलला नाहीस,आणि आज इतका संताप? इतका राग?"
" "
" "
"माझ्या मित्राला जिवंता जाळंलं गं यांनी. कारण एकच, तो आपल्या जातीतला आहे. बाहेर स्वयंपाकासाठी रॉकेल आणायला गेला होता. त्याचंच रॉकेल घेऊन त्याला पेटवला."
" "
"त्याचा तो चेहरा, त्याला होणारा त्रास डोळ्यासमोरुन जात नाहीये."
"म्हणुन सुड उगवायचा आहे तुला?"
"हो, सुड उगवायचा आहे मला".
"तुझ्या आणि त्यांच्या वागण्यात फरक काय राहीला मग? तेही अशाच रागाच्या आमलाखाली असतील,आणि त्यांच्या रागाचा बळी ठरला,तुझा मित्र."
"पण तुला का वाचवायचं आहे त्याला"?
"तो निर्दोष आहे म्हणुन. तो फक्त एक माणुस आहे म्हणुन."
"ओह,तो तुझ्या भावासारखा......"
"नाही.दुसर्‍या कुठल्याही व्यक्तिबाबत मी हाच विचार केला असता."
"नुसतं तत्वज्ञान आहे हे."
"अजिबात नाही. Infact मी खुपच practical बोलते आहे. ज्या माणसाने काही केलं नाही,ज्याचा काही दोष नाही, त्याला केवळ त्याच्या विशिष्ठ जातीमुळे त्रास द्यायचा, मारुन टाकायचं, हे illogical नाही वाटंत?"
"पण त्यांचे काही विचार, नियम मला पटत नाहीत."
"मलाही पटत नाहीत.पण निर्दोष माणसाला मारुन "काही विचार" मरत नसतात. त्यांना विचारांनीच मारावं लागतं"
"इतका patience कुणाकडे आहे?"
"आजोबांनी झाड लावलंच नाही, तर नातवाला फळं कशी मिळतील?"
" "
"थांब जेवुन जा".
-------------------------------------------------------------------------------------------

"
मला इथे येऊन २/३ दिवस झालेत.मला घरी परतायला हवं."
"पण भाई, बाहेर परिस्थिती ठीक नाहीये.लोक खुप चिडले आहेत.मी तुम्हाला अशा परिस्थितीत जाऊ देऊ शकत नाही."
"तिकडे घरीपण माझी गरज आहे. मुलं घाबरली आहेत. अम्मीला पण खुपच काळजी लागुन राहीली आहे. यापेक्षा मोठं कारण
म्हणजे हॉस्पिटल मध्ये माझी गरज आहे.खुप लोक भरती झाले आहेत. डॉक्टर्स कमी पडतायेत.मला जायला हवं, माझ्या एकट्याचा विचार करून मी इथे राहीलो तर कितीतरी पेशंट्स कडे दुर्लक्ष होऊ शकतं. तिकडे माझी Team माझी वाट बघत आहे.मी अजुन थांबु शकत नाही."
" "
"हॅलो,प्रसाद? मी बोलते आहे. महत्वाच काम आहे तुझ्याकडे".
".........."
"भाईंना जाणं आवश्यक आहे. बाहेर इतकं तापलेलं वातावरण आहे. इथुन आपले लोक त्यांना नीट जाऊ देतील की नाही, मला काळाजी वाटते.त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणं आपली जवाबदारी आहे."
"लगेच निघतोय".
---------------------------------------------------------------------------------------------
"काळजी करू नकोस. मी आहे. त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही."
-------------------------------------------------------------------------------------------
"अरे किती उशिर केलास फोन करायला काळजी वाटते रे."
" "
"हॉस्पिटल मध्ये?का? काय झालं?हॅलो..... हॅलो...... कोण भाई? काय झालं? प्रसाद काय म्हणत होता?कोण आहे हॉस्पिटल मध्ये?काय प्रकार आहे?"
"शांत हो.प्रसाद माझ्य हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे."
" "
"वीर जवान आहे तो.तुझ्या इथुन बाहेर पडताना खुप लोकांशी सामना करावा लागला आम्हाला. मला मारुन टाकयच होतं त्यांना. सगळा राग माझ्यावर ओकत होते ते. पण या वीर जवानाने सगळ्यांशी सामना केला. मला त्यांच्यातुन सुखरुप बाहेर आणलं.त्यांच्या रागाचा आवेश याने स्वतःच्या अंगावर झेलला."
"......................."
"काळजी करू नकोस. इथे त्याच्यवर व्यवस्थित उपचार सुरु आहेत. तो माझ्याजवळ आहे. आता त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही."
*******************************************************************
"समाप्त".

गुलमोहर: 

सुरेख! विषेशतः पहिला संवाद खुपच आवडला.

एकदम आवडली! फक्त तो पहिला ही प्रसादच आहे ना? ते नीट कळत नाही (म्हणजे प्रसाद च्या विचारात बदल झाला ते).

सध्याच्या वातावरणात बेस्ट फिट.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नयी तहज़ीब में दिक़्क़त ज़ियादा तो नहीं है I
मज़ाहिब रहते हैं क़ायम, फक़त ईमान जाता है II
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नाही पटली!
कथा म्हणून खूपच छान आहे. पण सामाजिक विचार केला तर.....
आजून किती प्रसादलाच "प्रसादलाच" समजावणार? कथेत का होईना पण भाइची अम्मी भाइला समजावते आहे असं दिसू दे ना?
मान्य आहे प्रसादने डोक्यात राख घालून घेतली आहे. पण ती राख ज्यातून निर्माण झाली त्या आगीविषयी पण काही तरी लिहा ना!

मी_माझा...

भावना पोचली, मान्य , पण सुरुवात ही नेहेमी स्वतःपासुनच व्हावी लागते, कारण तेच आपल्या हातात असते. आणि ही कथा प्रसादची आणि त्याच्या 'ती' ची आहे, किंबहुना 'ति'चीच आहे. भाईची नव्हे.....!
आणि तिच्या या वागण्याचा काही न बोलता भाईवर झालेला परिणाम कथेच्या शेवटी आलेलाच आहे.
कधी कधी, काही न बोलताही खुप काही सांगता येतं, पटवता येतं.

अनघा, खुप छान.

सस्नेह...

विशाल.

अनघा, छान लिहिले आहेस.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे...:)

छान, ज्वलंत विषयावर ग अगदी..

सुरेख !..........
प्रसादच्या विचारातला फरक असा एकदम ?? तु मधले २/३ दिवसातले संवाद टाक की त्यात म्हणजे प्रसादचे शांत होणे आणि तिच्या विचारांशी सहमत होणे वगैरे ! बाकी मांडणी एकदम छान !
.................................................................................................................................
इथे रात्रंदिन, युद्धाचाच प्रसंग, ........... !

पटतेय कथा. पण मुद्दा तसाच राहतो शेवटी. वास्तवात कथेचे शेवट सुखद होतातच असे नाही. कित्येक भाई जबान फिरवतात. त्यामुळेच एखादा प्रसाद डोक्यात राख घालतो. अशा प्रसादांची जेव्हा 'गर्दी ' होते तेव्हा मग फक्त विनाश कारण गर्दीला ना भावना ना दिशा.

.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

कथा सुरेख उतरलीये, अनघा. नुस्त्या संवादांवर बेतलीयेस, छानच. फारएन्डशी सहमत. सुरूवातीला तो प्रसाद असणार असं कथा संपल्यावर मी स्वतःला सांगितलं.
आणि चफ्फ्याशी थोडिशीच सहमत. मधे थोडा प्रसादच्या मतातला बदल.... थोडा अधिक दाखवायला हवा म्हणजे तो 'जादुई' नाही वाटणार. तिचा प्रसादशी तो संवाद परिणामकारक आहे.. पण प्रसादने जितक्या प्रमाणात डोक्यात राख घातलिये ती, इतक्या थोडक्यात विझेल असं वाटत नाही.
सद्य परिस्थितीला साजेशी कथा, अनघा!

नुस्त्या संवादांवर बेतलीयेस >> सहमत.

अवांतर -
सद्य परिस्थितीला साजेशी कथा असे बर्‍याच जनांनी लिहीले. पण कथेतली परिस्तिथी आणि सद्यस्तिथी ह्यात भरपुर फरक आहे. इथे कोणीही भडकून कूठल्याही अम्मीच्या मूलाला मारत नाहीये. सद्य परिस्तिथी म्हणताना गफलत होतीये असे माझे प्रामानिक मत. दंगल असली असती तर मीही सत्यपरिस्तिथी असे म्हणले असते पण आत्ता नाही.

खुप छान कथा...या विषयाला आतापर्यंत आपण किती तरी वेळा भेटलोय, पुन्हा दुर होतो त्याच्यापासुन...मुळ मुद्दा तसाच, आणी सगळंच "जैसे थे" .कथेत तरी काही सकारात्मक झालंय हे खुप दिलासा देणारं..सुरेख मांडणी आणी अप्रतीम संवाद!! खुप मस्त अनघा!!

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

खुप छान.
स्मिता भागवत.

ह्ह्म्म्म्...चांगली मांडलीये.. फक्त एक प्राथमिक शंका, "जाती" ऐवेजी "धर्म" म्हणायचे आहे का..?

बाकी एकंदरीत गुलमोहरावरील अलिकडील कथांचे स्वरूप, आकारमान अन वेग पाहता "लघु कथा" विभाग सुरू करायला हरकत नसावी. जे काही अती लघू आहे ते "कानोकानी" ऐकीवात आहेच....

म्या अल्पमतीला माहीत असलेले अर्थः
१. ललितः अनुभवात्मक, वर्णनात्मक, सामजिक वा परिच्छेदात्मक लिहीलेले, केलेले मुक्त (free form या अर्थी मोकाट या अर्थी नव्हे) लिखाण
२. लघु कथा: एखादा संदेश, मुद्दा, आशय वा हेतू घेवून त्यावर अधिक स्पष्टीकरणात्मक केलेले लिखाण ज्यात हा संदेश, मुद्दा वा हेतू वाचका पर्यंत पोचविण्यास "संवादात्मक", "घटना-प्रसंगात्मक", "व्यक्ती वर्णनात्मक" असे लिखाण केले जाते.
३. कथा: एखादा विषय, घटना (क्रम वा इतीहास), व्यक्ती (एक वा अनेक), परिसर, इत्यादी च्या अनुशंगाने केलेले विस्तारीत लिखाण ज्यात पात्र, पार्श्वभूमी, परस्पर संबंध, कारण मिमांसा, व्याप्ती, यांचा सखोल विचार असतो.
४. कादंबरी: एक वा अनेक विषय, वा एक वा अनेक कथा, उपकथा गुंफून त्या अनुशंगाने केलेला प्रस्तार.. (थोडक्यात एकता कपूर च्या "आता बास!" म्हणायच्या आधी संपलेल्या मालिका) Happy

काय म्हणता "तज्ञ" मंडळी? Happy

खुप खुप धन्यवाद मित्र मैत्रिणंनो....
आणि सॉरी-- इतके दिवस नेट वर येऊ शकले नव्हते त्यामुळे माझ्या कडुन उशीर झाला..

आपल्या पासुन सुरुवात, हा धागा मझ्या मनत होता-- तो लिखाणात उतरला.

माझ्या या संभाषणात फक्त तीन व्यक्तिरेखा आहेत-- "ती", "तो--प्रसाद" आणि "भाई".
यात, "भाई" म्हणजे तिचा मानलेला भाऊ हे आलं आहे.
ती आणि प्रसाद यांचं नातं काहीही असु शकतं--- टिपीकल-"ती आणि तिचा तो" किंवा बहीण-भाऊ किंवा चांगले मित्र मैत्रिण--- ज्याला जसं हवं तसं--- पण हक्काचं, ज्यात आपण त्याच्यावर्/तिच्यावर चिडु शकतो असं.
यात प्रसाद हा मुळात एकदम मित्र प्रिय असा माणुस आहे, ज्याला कुठल्याही प्रकरचे, जाती धर्माचे मित्र आहेत/असु शकतात.. एकदम जीवाला जीव देणारा असा मित्र आहे तो.
पण जवळच्या मित्राला जिवंत जाळल्यामुळे बिथरलेला.. संतापलेला.. मनातला राग काढु इच्छिणारा..
त्यातच त्याला कळतं की "त्या अमुक" जातीचा / धर्माचा एक माणुस आपल्या जवळच्या व्यक्तिकडे आला आहे..त्याला त्याचा सगळा राग या माणसावर काढण्याची अनावर इच्छा होते--त्याच तिरीमिरीत तो तिच्यकडे जातो.. आणि तिच्याशी बोलु लागतो. तो करतो आहे हे बरोबर नाही हे त्यालाही कुठेतरी माहीत आहे.. पण त्याचा राग अतिशय स्वाभविक आणि सात्विक आहे...त्याला अनुसरुन त्याचं सगळं बोलण सुरु आहे.
ती त्याला खुप जवळुन ओळखते-- यारोंका यार म्हणुन.. तिला माहीत आहे, की तो रागात आहे म्हणुन बिथरला आहे- वास्तविक तिला आधी करण महीत नसतं पण ती त्याला इतक्या चांगल्या प्रकारे ओळखते, की याचं कहीतरी बिनसलं आहे म्हणुन हा असं बोलतोय हे तिला पक्कं माहीत अहे-- म्हणुनच ती त्याला सरखं "तु शांत हो, तुला मी घरात घेते" असं म्हणते आहे. त्याचे वीक पॉईंट्स तिला माहीत आहे... त्यामुळेच लॉजिकल प्रश्न विचारल्यावर--( जन्माआधी तुला विचारलं होतं का, कुठल्या जातीत जन्माला यायच आहे?) जेव्हा तो सत्ब्ध होतो, काहीही न सुचल्यामुळे शांत होतो, तेव्हा ती त्याला घरात घेते, पाणी देते. आणि त्याला ताळ्यावर आणते.
तेव्हा काही डायलॉग घालुन मला हे दाखवता आलं असतं की आता प्रसाद चं मत बदलल आहे. पण मला तस नको होतं-- कारण मुळात प्रसादचं मत प्रतिकुल नाहीच आहे.. तो फक्त रागामुळे तसं बोलतो आहे-- आणि ती फक्त त्याचा राग शांत करुन त्याला ताळ्यावर आणण्याचं काम करते आहे.

भाई ही व्यक्तिरेखा पण प्रसाद सारखीच आहे--- माणुसकीमध्ये जात /धर्म न आणणारी... त्यामुळे भाई च शेवटचं वागण हे त्यांच्या स्वभावाला अनुसरुन अहे-- त्यांचं मतपरिवर्तन दाखवण्याचा विचार नाहीये त्या मागे.

म्हणुनच ती भाईंन्ना थांबवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस तो म्हणतो, की माझ्या पेशंट्स ना माझी गरज आहे-- माझ्या टीम ला माझी गरज आहे.(भाईंच स्वतःच हॉपिटल आहे याचा उल्लेख केला आहे).
त्यामुळे केवळ प्रसाद चं मत असं आहे म्हणुन ते तसं वागतायेत असं नाहीये. त्यांना त्यांच स्वतः चं असं मत आहे.
"अम्मी" या शब्दाचा उल्लेख फक्त जात / धर्म पुन्हा एकदा अधोरेखित करण्यासाठी केला आहे.
या तिघांनाही त्यांची स्वतः ची, ठाम मतं आहेत... आणि ते त्याप्रमाणे बोलतात..

जात हा शब्द बोलीभाषेत "धर्म" या शब्दापेक्शा जास्त वापरला जातो. इथे रागाच्या भरात प्रसाद बोलतो आहे, त्यामुळे "जात" शब्द वापरला आहे.

कोणत्या जाती / धर्माच्या कोणत्या गोष्टी आपल्याला पटतात, किंवा पटत नाहीत-- हा खरं तर वैयक्तिक मुद्दा आसतो... म्हणजे एखाद्याला एक गोष्ट आवडते तर दुसर्‍याला नाही.. तसं. पण जेव्हा त्याचा इश्यु होतो, त्याच्यावरुन मानापमान जन्म घेतात, तेव्हा ति गोष्ट जीवघेणी ठरते... मनःस्तापाची ठरते.

केवळ एका विशिष्ठ जाती / धर्मात जन्मा घेतलेल्या माणसाचा आपण तिरस्कार करण्यामागे खरंच काही लॉजिक असतं का? भले आपण त्यांच्यशी घनिष्ठ संबंध जोडु नयेत, भले आपल्या मुलामुलींना त्या जातीत लग्न करण्यापासुन परावुत्त करावं--(कारण त्यामागे प्रत्येकाचं असं वेगळं लॉजिक असु शकतं)... पण केवळ जाती वरुन अनोळखी किंवा आपला काहीही अपराध न केलेल्या माणसा बाबत तिरस्कार करण्यामागे काय लॉजिक असतं?

"तुला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे?" ह प्रश्न आपल्यापैकी कोणाला विचारला असतो का जन्माला यायच्या आधी?

---------------------------------------------------------------------------------------

ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

अनघा, या स्पष्टीकरणानंतर बर्‍याच गोष्टी क्लिअर होतात..पण हे कुठेतरी तुझ्या कथेत स्पष्टपणे रिफ्लेक्ट व्हायला हवं होतं. होतं काय कथा वाचताना त्यातल्या हिडन गोष्टींचा, तसेच संदर्भांचा विचार करण्याची सवय असलेले फार कमी असतात. माझ्याकडुनही याच चुका होतात, हळु हळु शिकतोय मायबोलीच्या दिग्गजांकडुन. पण जे काही लिहिलेयस ते खुप सुंदर, आणि प्रवाही आहे. मनापासुन आवडलं.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

मस्त अनघा,
कथा आणि नंतरचे अवांतर एकदम सही Happy
********************************************
The trouble with being punctual is that, no one is there to appreciate it!!

अनघा, चांगली कथा गं. मलाही थोडं अधीक विस्तार व्हायला हवं होतं असं वाटलं होतं.